Rajya Loktantra - दैनिक राज्य लोकतंत्र

  • Home
  • Rajya Loktantra - दैनिक राज्य लोकतंत्र

Rajya Loktantra - दैनिक राज्य लोकतंत्र राज्य लोकतंत्र नवी दिशा, नवे विचार देणारे तसेच ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आहे.

13/07/2025

नागपूरजवळील गावांमध्ये सततच्या पावसामुळे पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली असून, अनेक भाग जलमय झाले आहेत. या आपत्तीत अडकलेल्...
09/07/2025

नागपूरजवळील गावांमध्ये सततच्या पावसामुळे पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली असून, अनेक भाग जलमय झाले आहेत. या आपत्तीत अडकलेल्या ५० नागरिकांना प्रशासनाने वेळेवर रेस्क्यू करून सुखरूप वाचवले आहे. मदतकार्य वेगाने सुरु असून, अधिक धोका टाळण्यासाठी सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.

08/07/2025
07/07/2025

पाटणामध्ये शुक्रवारी रात्री उशिरा शहरातील प्रसिद्ध उद्योगपती गोपाळ खेमका यांची डोक्यात गोळी झाडून निर्घृण हत्या करण्यात ...
05/07/2025

पाटणामध्ये शुक्रवारी रात्री उशिरा शहरातील प्रसिद्ध उद्योगपती गोपाळ खेमका यांची डोक्यात गोळी झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. ही धक्कादायक घटना रामगुलाम चौकाजवळ हॉटेल पनाशजवळ घडली. खेमका हे रात्री आपल्या निवासस्थानी परतत असताना दुचाकीवर आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांना थांबवून जवळून गोळी झाडली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे पाटणामध्ये भीतीचं वातावरण पसरले असून कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Disha Salian Case मध्ये Aditya Thackeray यांना क्लिन चीट?
04/07/2025

Disha Salian Case मध्ये Aditya Thackeray यांना क्लिन चीट?

...

हिंदी भाषा कुठल्याही भारतीय भाषेची शत्रू नाही. हिंदी सर्व भारतीय भाषांची मित्र आहे. देशात सुरू असलेल्या भाषावादावरून पुन...
26/06/2025

हिंदी भाषा कुठल्याही भारतीय भाषेची शत्रू नाही. हिंदी सर्व भारतीय भाषांची मित्र आहे. देशात सुरू असलेल्या भाषावादावरून पुन्हा एकदा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाष्य केले आहे. हिंदी भाषा कुठल्याही भारतीय भाषेची शत्रू नाही. हिंदी सर्व भारतीय भाषांची मित्र आहे. असं ते म्हणालेत.

20/06/2025

उजनी धरणात मिसळणाऱ्या दौंड विसर्गात 70 हजार क्यूसेकपर्यंत वाढ झाली आहे. यामुळे उजनी धरणाची पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्या...
20/06/2025

उजनी धरणात मिसळणाऱ्या दौंड विसर्गात 70 हजार क्यूसेकपर्यंत वाढ झाली आहे. यामुळे उजनी धरणाची पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी धरण व्यवस्थापनाने भीमा नदीपात्रात पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आज (20 जून) दुपारी 3 वाजता 1,600 क्यूसेक व सायंकाळी 5 वाजता 10,000 क्यूसेक असा एकूण 11,600 क्यूसेक विसर्ग होणार आहे. सध्या धरणाची पातळी 63% असून ती वेगाने वाढते आहे. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

पश्चिम बंगालच्या पुरुलिया जिल्ह्यात आज पहाटे एक अत्यंत दुर्दैवी आणि भीषण अपघात घडला. लग्न समारंभासाठी निघालेल्या वऱ्हाडा...
20/06/2025

पश्चिम बंगालच्या पुरुलिया जिल्ह्यात आज पहाटे एक अत्यंत दुर्दैवी आणि भीषण अपघात घडला. लग्न समारंभासाठी निघालेल्या वऱ्हाडाच्या गाडीला भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली, आणि या अपघातात ९ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना इतकी गंभीर होती की कारचा अक्षरश: चक्काचूर झाला.अपघात घडला तेव्हा कारमधील सर्वजण लग्नाच्या कार्यक्रमासाठी पश्चिम बंगालमधून झारखंडकडे जात होते. ट्रक आणि कारची समोरासमोर धडक झाल्याने मोठा आवाज झाला आणि स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र, सर्व प्रवासी जागीच मृत झाले होते.

सातारा जिल्ह्यात १९ ऑगस्टपर्यंत पर्यटनस्थळांवर बंदी गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. धरण क्...
20/06/2025

सातारा जिल्ह्यात १९ ऑगस्टपर्यंत पर्यटनस्थळांवर बंदी गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. धरण क्षेत्रातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, पर्यटकांनाही सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यात पावसाचा प्रभाव वाढल्याने प्रशासनाने १९ ऑगस्टपर्यंत पर्यटनस्थळांवर निर्बंध लागू केले आहेत.

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when Rajya Loktantra - दैनिक राज्य लोकतंत्र posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Rajya Loktantra - दैनिक राज्य लोकतंत्र:

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Contact The Business
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share