27/08/2026
📢 शहाद्यातील जनता चौकातील शनिवारची सभा स्थगित!
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर बहुतांश नागरिक बाहेरगावी असल्याने नागरिकांच्या मागणीनुसार शनिवार, २९ ऑगस्ट रोजी जनता चौकात आयोजित करण्यात आलेली सभा तूर्तास स्थगित करण्यात आली आहे, अशी माहिती लोकनियुक्त नगराध्यक्ष अभिजीत दादा पाटील यांनी दिली.
💧 पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू
सारंगखेडा येथील तापी नदीवरील जॅकवेलच्या दुरुस्तीचे काम सुरू असून जुनी मशिनरी व विद्युत पुरवठ्यातील तांत्रिक अडचणींमुळे पाणीपुरवठ्यावर परिणाम होत असल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले.
🛣️ शहरातील खड्डे बुजविण्याचे काम सुरू
मुख्य रस्त्यांसह विविध भागांतील खड्डे बुजविण्यासाठी मुरूम व काँक्रीट पॅचवर्कची कामे सुरू आहेत. डांबर प्लांट सुरू झाल्यानंतर प्रलंबित रस्त्यांचे पॅचवर्क लवकर पूर्ण करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
“नागरिकांनी आणखी काही दिवस प्रशासनाला सहकार्य करावे. पाणीपुरवठा आणि रस्त्यांच्या समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत,” असे आवाहन नगराध्यक्ष अभिजीत दादा पाटील यांनी केले.
📍 शहादा | तालुका प्रतिनिधी – कौस्तुभ मोरे
#शहादा #जनताचौक #पाणीपुरवठा #रस्ते #शहादानगरपालिका