19/09/2025
Maharashtra Heavy Rainfall : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करणार का? कृषिमंत्री म्हणाले.
राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी माध्यमांशी बोलताना अतिवृष्टीमुळे राज्यात मोठे नुकसान झाल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी आकडेवारी सांगत सर्व शेतकऱ्यांना हे सरकार मदत करणार असल्याचेही जाहीर केले. सध्या अतिवृष्टी झालेल्या भागात पंचनामे सुरु असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. तसेच राज्यातून होत असलेल्या ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीवरही त्यांनी महत्त्वाचे विधान केले आहे.