28/07/2026
वल्लरी प्रकाशनतर्फे ‘कृष्णकमळ’ हा तेविसावा प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा भारत इतिहास संशोधन मंडळाच्या वि. का. राजवाडे सभागृहात शनिवार, दि. १६ मे २०२६ रोजी आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ कवी चंद्रकांत दादा वानखेडे, कवयित्री नीलिमा फाटक, समर्थ फाऊंडेशनचे अध्यक्ष किरण इनामदार, यशदाचे अधिकारी व्यंकटेश कल्याणकर उपस्थित होते.
वल्लरी प्रकाशनाच्या मुख्य संपादिका प्रज्ञा कल्याणकर यांनी संपादित केलेल्या ‘कृष्णकमळ’मध्ये स्वप्नगंधा आंबेतकर, हर्षिता बेंद्रे, अनुराधा चव्हाण, चंद्रप्रकाश शिंदे, मनिषा ढगे, संध्या देशपांडे, अश्विनी जाधव, भरत जगताप, समृद्धी मुंगसे अशा नऊ कवी-कवयित्रींचा समावेश होता. यावेळी सहभागी कवी-कवयित्रींचा सहभाग असलेला काव्यमहोत्सव संपन्न झाला.
यावेळी बोलताना वानखेडे यांनी बहारदार कवितांचे सादरीकरण करत कवींना मार्गदर्शन केले. तर नीलिमा फाटक यांनी ‘कृष्णकमळ’ संग्रहावर रसग्रहणात्मक आस्वादात्मक भाष्य केले. समारंभाचे सूत्रसंचालन वल्लरी प्रकाशनाच्या संपादकीय सल्लागार मानसी चिटणीस यांनी केले. तर आभार प्रदर्शन न्यूज अँकर आरती परळकर यांनी केले.
या समारंभातील वानखेडे सर यांच्या संशोधनातील अंश -