
29/06/2023
विदर्भ साहित्य संघाचे वाङ् मयीन नियतकालिक ‘युगवाणी’- जुलै-ऑगस्ट-सप्टेंबर-२०२२ च्या चित्रकार प्रभाकर कोलते विशेषांकातील श्री.जयंत भीमसेन जोशी यांनी लिहिलेल्या ‘अंतःप्रेरणेचे शाहीर’ या चिंतनात्मक लेखामधील हा अंश-
--------
‘आत्मप्रचितीची रूपबिंबे’ (२)
---------
“स्वतःच्या चित्रांबद्दल सर फारसे बोलत नाहीत. मग आपणच आडाखे बांधायचे. मला असं वाटत, तीस-चाळीस वर्षांपूर्वी कधीतरी सरांना कलेचे मर्म दाखवणारा खूप व्यापक आणि परिपूर्ण दृष्टांत झालेला आहे आणि त्या दृष्टांताच्या वेगवेगळ्या रूपछटांचे गुणवर्णन ते पेंटीग्जद्वारा करत असतात. जणू त्या साक्षात्काराची जिवंत स्मृती त्यांच्या मनात आहे आणि खूप सहजतेने सरांच्या हातातून कॅनव्हासवर उमटते आहे. प्रयोगशीलतेतल्या सातत्यामुळे तसेच ऑरगॅनिक आणि स्ट्रक्चरल यांच्या संतुलित मिलाफामुळे या कलाकृतींना आस्तित्वभान लाभले आहे आणि त्यांचे भवतालाशी नाते निश्चित झाले आहे. पाहणाऱ्यांचे त्या कलाकृतीबरोबर धागे जुळू लागतात. इतक्या साऱ्या वर्षांच्या रियाजामुळे हे सारे काही सहज होऊन जाते. आविष्कारातली ही सारी सहजता/अकृत्रिमता कलाकृतीला लोभस बनवते, जिवंत करते. रसिक, कलाप्रेमी, कलेचे विद्यार्थी या किमयेचे रहस्य शोधू लागतील तेव्हा तिथे दडलेले खूप मोठे विचारधन त्यांना दिसू शकेल. दृश्यकलेतल्या सनातन समीकरणांचे नवे अर्थ कळतील. ही कोलते सरांची खास परिभाषा आहे. सौम्य, आत्ममग्न, तृप्त आणि न खुपणारी. परमेश्वराचे रूपवर्णन, गुणवर्णन करताना संत थकत नाहीत. कितीही बोलले, सांगितले तरी सांगण्यासारखे काहीतरी राहिलेलेच असते. अगदी तसेच कोलते सरांना झालेल्या मूळ साक्षात्काराबद्दल म्हणता येईल. सततच्या ध्यासामुळे आणि कामात निमग्न राहिल्यामुळे त्या आनंदमय रूपब्रह्माच्या साक्षात्काराची नवनवी अधिष्ठाने त्यांना दिसत रहातात आणि किती किती, किती तऱ्हेनी हे ऋणानुबंध सांगावेत असे होत असावे.”
(आभार - प्रफुल्ल शिलेदार । ‘युगवाणी’ अंकासाठी संपर्क - श्रीमती सना पंडित - 7709047933)
——-
प्रभाकर कोलते
लिखित
‘दृक् चिंतन’
हे चित्रविश्वातील पाश्चात्त्य व भारतीय चित्रकारांच्या
योगदानाचा परामर्श घेणारे आणि आपले ‘दृक् संचित समृद्ध करणारे’
पुस्तक विशेष सवलतीच्या किंमतीत उपलब्ध आहे.
Anunaad Prakashan:
https://anunaadprakashan.com/drukchintan/
Amazon:
https://www.amazon.in/dp/8195459609?ref=myi_title_dp
Google Pay, PhonePay इत्यादी वरून +919422322644 या क्रमांकावर UPI Payment करू शकता.
UPI Payment केल्यानंतर खाली दिलेल्या लिंक वरून तुमची माहिती भरणे आवश्यक आहे म्हणजे आपली प्रत घरपोच पाठविणे सोयीचे होईल.
https://forms.gle/25PajTmrHQ8W5ndHA
---
अधिक माहितीसाठी संपर्क : अनुनाद प्रकाशन, पुणे
WhatsApp +919422322644 | [email protected]
#दृक्_चिंतन