
26/03/2024
खास.. द्वेषाने बरबटलेल्या लोकांसाठी..!
#बुध्दांची_भूमी... !
बुद्धांच्या भूमीमध्ये!
जन्म झाला तुमचा आमचा!
घर होतं की उकिरडा समाजाच्या..
हा प्रश्नच नाही कामाचा!
काळरात्रीच्या अंधारात!
बुद्ध माझा चोरला!
कपटनीती करून मित्राने!
अवघा द्वेष द्वेष पेरला!
कसे न कळे मूर्ख लोका!
सृष्टी बुद्धांची सारथी!
जितकी खोदाल ही छाती धरती!
फक्त बुद्धच येतील वरती!
केलं जरी जमीनदोस्त!
धम्म मनी रुजलाय!
तुमच्या निष्फळ कृत्याला!
बुद्ध हळूच हसलाय!
सम्राटाच्या प्रतिकांच!
बा भीमाच्या नैतिकांच!
लोण पसरलंय नभी!
वाजणार बुध्दांचा डंका!
मानवकल्याणा जगी!
चराचरात! मनामनात!
मातीच्या त्या कणाकणात!
बुद्धच मिळतील हाती!
मानवतेच्या घराघरात!
तेवतील न्याय ज्योती!
नाही कसला वादविवाद!
येउद्या मनातून साद!
जग हे बुद्धांच आहे!
मान्य करु हाच लवाद!
हेची अंतिम सत्य!
बुद्धधम्म आहे नित्य!
म्हणून!!!
मानव जाती एकसंगती!
गाऊ सारे याचं पंक्ती!
#बुद्धं_सरणं_गच्छामी.. !
#धम्मं_सरणं_गच्छामी.. !
#संघं_सरणं_गच्छामि... !