AGAN FILMS

AGAN FILMS film making

29/10/2022

खरच! एक चांगला नेता सापडणे, हे एक चांगला गुरू मिळण्या इतपत महत्त्वाचे आहे. 'नेता' म्हणजे काय? ज्याला चांगल्या प्रकारे सगळ्याशी एकरुप होऊन, सगळ्याना पुढे घेऊन जाता येत, जो स्वताच्या प्रभावाने इतरांना बदलतो.
नेतृत्व गुण हा प्रभावी व्यक्तिमत्त्वाचा एक भाग आहे. जो एखाद्या माणसात उपजत असू शकतो किंवा सवयीने आणता येतो पण वंश परंपरेने मिळणारे नेतृत्व कितपत फायदेशीर ठरेल हे माहीत नाही. राजकारणात आपण अशी अनेक उदाहरणं पाहतो. पाहिल्या पिढीने प्रभावाने कमावलेले नेतृत्व दुसर्‍या पिढीला दबावाने पण कायम राखता येत नाही. नेतृत्व करणार्‍यांचा प्रभाव असणे खूप गरजेचे आहे. प्रभावाने अभाव असलेल्या गोष्टी पण बदलता येतात. किंबहुना प्रभाव नेतृत्व करायला भाग पाडतो.
नेपोलियन म्हणतात,आपल्या टीम मध्ये 100 शक्तिशाली माणसे आहेत पण टीम चा लीडर हा निर्णय घेण्यास कमजोर आहे तर ते टीम चा पराभव निश्चित. त्याच उलट टीम मध्ये 100 कमकुवत माणसे आहेत पण टीम लीडर अतिशय प्रभावी आणि अचूक निर्णय घेणारा असेल तर टीम चा विजय निश्चित.
नेता हा फक्त पैशाने किंवा देहयष्टीने मजबूत चालत नाही. अचूक निर्णय क्षमता त्याकडे असावी लागते. बर्‍याच वेळा असे प्रसंग येतात की संघाचे मनोधैर्य कमी होऊ शकते, त्यावेळेस प्रसंगावधान राखून कोणालाही न दुखावता निर्णय घेणे खूप जोखमीचे असते.
बर्‍याच वेळा एखाद्या नेत्याला हरल्या सारखे वाटत असेल, बर्‍याच अडचणी असतील, अश्या वेली आपले कमजोर गोष्टी टीमला किवा आपल्या संघाला n दाखवता सोडवता आल्या पाहिजे. नेताच जर हातपाय गाळून बसला तर संघाचे काय?सतत सकारात्मक विचार टीमला दिले गेले पाहिजे. आपण करू शकतो आणि आपण करून दाखवणार इतके पॉझिटिव्ह नेत्याला अडचणीच्या वेळे त राहता आले पाहिजे.
नेतृत्व करण्यासाठी संघापेक्षा एक पाउल पुढे राहून सगळा विचार करता आला पाहिजे आणि परिस्तिथी जिंकता आली पाहिजे. तरच सफल नेता म्हणुन लोक आपला स्विकार करतील. कंपनी चा लेखाजोखा सगळ्यांची शेअर करायला पाहिजे. जेणे करून भविष्यात कराव्या लागणार्‍या अचिव्हमेंट साठी सगळे प्रयत्नशील राहतील.
टीम मधल्या प्रत्येकाशी सलोख्याने वागणे, सूचनांचा आदर करणे, वैयक्तिक अडचणी मध्ये धावून जाणे अशा गोष्टींनी संघ बांधणी करता येईल. आनंद महिंद्रा म्हणतात," काही लोक फक्त हात पाय वापरून काम करायचे म्हणुन करतात आणि काही जण जीव ओतून काम करतात. आपण आपली टीम बांधताना कोणत्या लोकाना घेतो यावर कंपनी चे, संघाचे यश अवलंबून असते. तुम्ही लोकाना तुमच्या स्वप्ना साठी धावायला लावले तर ते एक दिवस दामतील आणि कंपनी किवा संघ सोडून जातील, पण तेच जर का कंपनी चे यश त्यांच्या स्वप्ना शी जोडले तर कदाचित ते ना थकता काम करतील. कारण संघाच्या यशासोबत त्यांना त्यांची स्वप्ने पूर्ण झालेली दिसतील. अशा पद्धतीने लोकाना बांधुन ठेवणे हे नेतृत्व करणार्‍यांचे कसब आहे.
दूरदृष्टी हा अजून एक गुण नेतृत्व करताना ऊपयोगी पडतो. भविष्यातील धोरणाचा विचार किवा येणार्‍या अडचणी वर कशी मात करता येईल याची पूर्ण कल्पना नेतृत्व करताना असायला हवी. त्यासाठी आवश्यक असे उपाय करण्याचे सामर्थ्य पाहीजे. सतत होणारे बदल, नवनवीन धोरणे शिकण्याची मानसिकता आणि वेळेनुसार स्वतःला सिद्ध करण्याची क्षमता नेतृत्व करणार्‍या मध्ये हवी.
जसे चार चाकी शिकताना कितीही उत्तम चालवायला आली तरी ही भविष्यात येणारा अपघाता चा धोका 100% टाळता येत नाही. प्रत्येक दिवस हा चालकासाठी नवीन असतो. त्याप्रमाणे एखाद्या गटाची, संघाची बांधणी करताना येणारे आव्हान, अनुभव हे नवीन असतात. ह्या सगळया गोष्टींचा दूरदृष्टी ने विचार करावा.
जास्तीत जास्त योग्यता आपल्यात यावी यासाठी लीडर ने एक सूचना फलक बनवावा आणि त्याचे नियम संघातील सर्वांसोबत स्वतःलाही लागू करावेत. जिथे जिथे सुधारणा करावीशी वाटते तिथे तिथे योग्य पाउल उचलून सुधारणा करावी.
नेतृत्व आले म्हणजे काही वेळा माणसे आत्मकेंद्री बनण्याची शक्यता असते. शक्यतो राजकारण, समाजकारण, यामध्ये कालांतराने असे घडताना दिसते. कंपनी, पक्ष, संघटना त्यांना दुय्यम वाटू लागते. नेतृत्व करणार्‍या माणसाने नेहमी लक्षात ठेवावे की त्याच्यासाठी त्याचे संघ हित प्रथम ठेवावे. भूतकाळातल्या राजकारणात आपण अशी अनेक उदाहरणे पाहिली आहेत. नेतृत्व करताना मिळालेल्या ताकदीचा वापर करून स्वार्थ साधला गेला आणि नंतर सत्ता संपुष्टात आली. त्यामुळे आत्मकेंद्री पणा नसावा.
ज्याच्या अंगी मोठेपण तया यातना कठीण असे तुकाराम महाराज सांगतात. प्रत्येक उंचीवर पोहोचताना अनेक खाचखळगे पार करावे लागतात. नेतृत्वामुळे मिळवलेले मोठेपण दिसते पण त्या मागचे कष्ट तोच जाणो. सामाजिक, मानसिक, कौटुंबिक पातळीवर कणखर असलेले लोक हे शिवधनुष्य पेलवू शकतात. इंदिरा गांधी हे कणखर नेतृत्वाचे उत्तम उदाहरण आहे. समाजात कित्येक लोक भेटतील ज्यानी कधी ना कधी आपापल्या परीने नेतृत्व केले असेल. आणि आता एका यशस्वी नेतृत्वा साठी त्यांचे नाव घेतले जात असेल.
एक ठराविक ऊंची गाठल्यानंतर लोक आपोआप आपल्या प्रभावाने आकर्षित होतात. पण हे आकर्षण मिळवण्यासाठी काही गोष्टी नियमित अंगीकारल्या पाहिजेत. जसे की वक्तशीरपणा, दिलेला शब्द पाळणे, स्वच्छ चारित्र्य, व्यवहारातील विश्वास. या सर्व गोष्टी एका दिवसात मिळणे कठीण कारण ही एक प्रक्रिया आहे. सुरुवात आहे. तपश्चर्या आहे. कित्येक वर्षाच्या सवयीने जी शेवटी साध्या होते. मिळवणे सोपे पण टिकवणे त्याहून कठीण. एकदा का कष्टाने ही संधी मिळाली की ती टिकवण्यासाठी प्रयत्न सुरू.
मित्रहो, शेवटी कितीही मी सांगितले तरी स्वतः अनुभवल्याशिवाय काही मज्जा नाही.. म्हणतात ना स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही तेच खरे.
दीपाली गणेश सणस.

Coming soon....
06/07/2022

Coming soon....

Address

Pune
411021

Telephone

+919145687817

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when AGAN FILMS posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to AGAN FILMS:

Share