06/05/2024
जीवन ज्योति..!
*तारणाचा अनुभव*
मे ६ आजचे वाचन
🌹सुप्रभात व सर्वांस सलाम 🌹
*जुन्यापासून ताजे/नवीन जीवन*
_देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे, म्हणून ह्या युगाचरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतः चे रूपांतर होऊ द्या" (रोम १२:२)._
अचानक मरण पावलेल्या निरोगी लोकांच्या मेंदूचा अभ्यास कोलंबिया विद्यापीठाच्या संशोधकांनी अलीकडेच केला. तेव्हा तरुणांप्रमाणे म्हाताऱ्या लोकांचाही मेंदू नवीन पेशी निर्माण करण्यास सक्षम असतो असे त्यांना आढळले. अर्थात इतर घटकांचाही विचार करायचा असला, तरी ह्या शोधामुळे म्हाताऱ्या लोकांच्या आरोग्यविषयी असणारे गैरसमज दूर होण्यास मदत होईल.
देव कोणाही व्यक्तिच्या मेंदूमध्ये चमत्कार करू शकतो. पवित्र आत्मा लोकांमध्ये वास्तव्य करतो, तेव्हा तो त्याच्यासोबत ख्रिस्ताची समक्षता त्यांच्याकडे आणतो. म्हणून तर प्रेषित पौल असे म्हणू शकला, "मी *खिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे; आणि ह्यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्या ठायी जगतो; आणि आता देहामध्ये जे माझे जीवित आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे; त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वतः ला माझ्याकरता दिले" (गलती २:२०).*
ख्रिस्त आपल्यामध्ये वास्तव्य करत आहे हे माहीत झाल्याने त्याच्या समक्षतेद्वारे आपण नवीन लोक बनत आहोत ह्या आशेने आपण भरले पाहिजे (इफिस ३:१७). आपल्यासोबत राहण्यासाठी तो जेव्हा येतो, तेव्हा आमची निर्णयक्षमता आम्ही रूपातंराच्या प्रक्रियेत गुंतवावी अशी त्याची इच्छा असते. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर आपल्या परवानगीशिवाय तो आपली ओळख काढून घेईल अशी भीती आपण बाळगू नये अशी त्याची इच्छा आहे. त्याऐवजी तो *आपल्याला त्याच्याशी संवाद साधण्यासाठी आणि त्याचे शब्द कृतीत आणणारे निर्णय घेण्यासाठी उत्तेजन देतो.*
पृथ्वीवर असताना येशूने खाण्यापिण्याची उपमा वापरून परिवर्तनाच्या अनुभवाचे वर्णन केलेः *"जो माझा देह खातो व माझे रक्त पितो तो माझ्यामध्ये राहतो व मी त्याच्यामध्ये राहतो" (योहान ६:५६),* ही प्रक्रिया तारणाच्या योजनेच्या बौद्धिक आकलनापासून सुरू होऊ शकते, पण त्या प्रक्रियेत जेव्हा आपल्या भावना आणि निर्णयदेखील समाविष्ट असतात तेव्हा देवाशी असणारा आपला संवाद सर्वात जास्त प्रभावी असतो. देवाच्या वचनाचे मनन करणे ही पहिली पायरी आहे.
■ *लागूकरण कराः*
पवित्र शास्त्राच्या आधारे किमान एक तरी निर्णय घेण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न आज करा.
■ *सखोल शोध घ्याः*
२ करिंथ ४:१६; १ थेस्सल ५:२३; तीत ३:५