
14/07/2025
द्रौपदी : इंद्रप्रस्थची साम्राज्ञी समकालीन समस्यांचा अज्ञात स्त्रीवादी दृष्टिकोन ~ भाग १ : कुरुवंश प्रवेश
द्रौपदीची आई, महाराणी प्रीश्ती, मानवी हक्कांची पुरस्कर्ती आणि एक चतुर राजकारणी म्हणून ओळखली जात असे. आपल्या मुलीच्या व्यक्तिमत्त्व विकासात आणि तिला खंबीर बनवण्यात महाराणींचा मोठा वाटा होता. अशा स्वतंत्र विचारांच्या राजकन्येने, माँ कुंतींनी चुकून सांगितलेली गोष्ट आंधळेपणाने कशी ऐकली असती? सर्व पांडव तिच्याशी लगेचच विवाहबद्ध होण्यास तयार झाले का? बुद्धिमान सहदेव आणि दूरदृष्टी असलेली द्रौपदी यांनी एकत्रितपणे विभाजनासाठी युक्तिवाद केला, त्याचा परिणाम म्हणून दुर्योधन हस्तिनापुराच्या सिंहासनावर कायदेशीररीत्या बसू शकला का? खुल्या आणि मुक्त विवाहाची गुंतागुंत (बहुपतित्व), सत्तेचा आणि राजकारणाचा अनाठायी प्रयत्न, असामान्य आणि विलक्षण मैत्री, सर्वसमावेशकता आणि लिंग-समानतेला सक्रियपणे प्रोत्साहन देणाऱ्या भावंडांचे एकमेकांशी असलेले बंध, अशा अनेक गोष्टी उलगडून दाखवणारी प्राचीन महाकाव्याची ही कालातीत कथा आहे. पाच भागांत उलगडत जाणाऱ्या, एका साम्राज्ञीचा जीवनपट कथेच्या रूपात सादर केलेला आहे.
=========================
द्रौपदी : इंद्रप्रस्थची साम्राज्ञी समकालीन समस्यांचा अज्ञात स्त्रीवादी दृष्टिकोन ~ भाग २ : साम्राज्य स्थापना
खांडवप्रस्थ - एक उजाड माळरान, वास्तव्यासाठी प्रतिकूल... समोर आलेल्या निर्वासितांची समस्या आणि आर्थिक अस्थिरतेशी दोन हात करताना पांडवांची राज्य विस्ताराची वाटचाल, की तिचे एक आई म्हणून तिच्या मुलांसोबतचे नाते असो, या सर्व गोष्टींचा अनुभव या कथेत घ्या.
या प्रवासात देविका, वलंधरा, सुभद्रा, कारेणुमती आणि विजया या घरातील कुशल, हुशार आणि मेहनती स्त्रियांनी द्रौपदीच्या आधिपत्याखाली एकत्र येऊन एका महान साम्राज्य स्थापनेसाठी आपापल्या परीने कसे योगदान दिले, हे पाहा. नारीशक्तीच्या या अफाट कर्तृत्वाच्या कथांचा आनंद घ्या...
========================
द्रौपदी इंद्रप्रस्थची साम्राज्ञी-समकालीन समस्यांचा अज्ञात स्त्रीवादी दृष्टिकोन -भाग ३ : आयुष्याचा नीचांक
आपल्या रजःस्वला बहिणीला केसांनी ओढून नेऊन तिची सार्वजनिक विटंबना केली जाते, हे कळल्यावर द्रौपदीचा भाऊ, उत्तमौजस, काय प्रतिज्ञा करतो? द्रौपदीचे माहेरघर तिच्या आयुष्यातील सर्वांत वाईट परीक्षेत तिला कशी साथ देते?
द्रौपदीची लाज राखणाऱ्या साडीचं पुढे काय झालं? वनवासाच्या काळात पांडवांच्या साथीनं तिचं अनोळखी आणि धोकादायक वाटांवरून मार्गक्रमण करणारं रूप, एक साम्राज्ञी, प्रेमळ पत्नी आणि प्रेमळ आईपासून ते एक शूर तलवारधार