पुणे म्हणजे कला-साहित्य आणि संस्कृतीचे माहेरघर. पुण्यामधले रसिक हे जितके चोखंदळ तितकेच नवीनतेचा शोध घेणारे.
पुण्यामध्ये शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीत, सुगम संगीत, भक्तीसंगीत, गझल, अल्बम प्रकाशन, संगीत- महोत्सव, नृत्य, नाटक, नाट्यसंगीत, रॉक संगीत, फ्युजन संगीत, चर्चासत्र, व्याख्याने, कीर्तन, प्रवचन, कविसंमेलन, वक्तृत्व स्पर्धा, गायन स्पर्धा, शिबिरे
अश्या सर्व सांस्कृतिक कार्यक्रमांची जणू चळव
ळच सुरु असते.
ओरायन स्टुडीओज् ने पुणेकरांना अश्या दर्जेदार कार्यक्रमांची माहिती देणारा रेडिओ कार्यक्रम आणला आहे "सांस्कृतिक पुणे". हा कार्यक्रम पुणे विविधभारतीवरून दर मंगळवार आणि बुधवार सकाळी १०.२५ वाजता प्रसारित केला जाईल. यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांची माहिती उदा. कोणता कार्यक्रम, सहभागी कलाकार, कार्यक्रमाचे वैशिष्ट्य, स्थळ, काळ, वेळ इत्यादी सर्व माहिती सविस्तरपणे सांगितली जाईल. त्याचप्रमाणे सहभागी कलावंतांची तसेच आयोजक व मान्यवर यांची मुलाखतही समाविष्ट होऊ शकते. तसेच कार्यक्रम झाल्यावर कार्यक्रमाविषयी वृत्तान्तही समाविष्ट केला जाणार आहे. आणि ही सविस्तर माहिती अत्यल्प दरामध्ये लाखो श्रोत्यांपर्यंत पोहोचविता येणार आहे.