08/07/2024
#पालकांनो #वाचन
*इकिगाई*
जगभरातील लाखो वाचकांनी वाचलेले हे पुस्तक. मूळ पुस्तक हेक्टर गार्सिया, फ्रान्सिस मिरेलस यांनी लिहिले. या मूळ पुस्तकाचा मराठी अनुवाद प्रसाद ढापरे यांनी केला आहे. पुस्तकाचे सार सांगायचे तर, पुस्तकातून मिळालेला संदेश पुढीलप्रमाणे
१. सतत आणि कायम कार्यरत रहा. निवृत्त न होण्याची संकल्पना. काम करणे कधीच थांबवून नका.
२. संथ गतीने चाला. आपल्याकडे ससा आणि कासवाची गोष्ट आहे ना, अगदी तेच तत्त्व जपानी लोक पळतात.
३. आपण आग्रहाने ‘पोटभर भर जेवण करा’ असं म्हणतो. तर त्या ऐवजी आरोग्य चांगले राहण्यासाठी १०० टक्के जेवण्यापेक्षा केवळ ८० टक्के जेवण करा. थोडी जागा शिल्लक ठेवा.
४. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे चांगला मित्र परिवार बनवा. चांगल्या मित्रांच्या संगतीत रहा.
५. वय वाढत जाते पण येणाऱ्या पुढील वाढदिवसाला अधिक आरोग्यदायी रहा.
६. काय हसतमुख रहा. लहान-लहान गोष्टीत आनंद मिळवा.
७. निसर्गाशी असणारी नाळ कायम जपा.
८. Say Thank You आपल्याला मिळालेल्या गोष्टीबाबत समाधान व्यक्त करा. धन्यवाद माना.
९. आणखी एक महत्त्वाचे म्हणजे आपण सतत भूतकाळातील गोष्टीबद्दल दु:ख, खेद व्यक्त करतो आणि भविष्यात कसे होणार याचा ताण घेत राहतो. या सगळ्यात जगणे राहून जाते किंवा आपण विसरून जातो. म्हणून वर्तमानात जगा.
१०. प्रत्येकात काहीतरी वेगळ आहे. हे आपण मानतो, पण वळत नाही. नेमकं हेच आपल्यात दडलेले वेगळे/विशेष शोधा आणि ते शोधण्यासाठी धडपडा. आपण फक्त आपणच आपल्याला प्रेरणा देऊ शकतो, हे लक्षात ठेवा.
या पुस्तकाची जगभर चर्चा झाली. पण या पुस्तकाचे सार म्हणजे मला भारतीय संस्कृती, परंपरा, संस्कार याच्या मुळाशी जाणारे वाटते. जपानी लोकांचे शिस्तबद्धता, सातत्यपूर्ण काम करण्याची पद्धत सर्वज्ञात आहे. पण त्यातील मूल्य ही भारतीय संस्कार मूल्यांशी साधर्म्य साधणारी आहेत. आपण आपल्याच संस्कार मूल्यांकडे पाहिले तर आपणच प्रेरणेने ओतप्रोत होऊ, हे निश्चित.
पुस्तक ओके असले तरीही मला, हे पुस्तक वाचताना आजी-आजोबांचे संस्कार, शिकवण ही सातत्याने आठवत राहिली. त्यामुळे भारतीय संस्कृतीत पूर्वापार चालत आलेली परंपरा विसरून आपण नव्याच्या (खरंतर आपल्या संस्कृतीत मूल्य असतानाही) मागे लागतोय का, हे जाणवले. तुमचा अनुभव तुम्ही शेअर करा.
मीनाक्षी अरविंद नूतन गुरव