Prose Publications

  • Home
  • Prose Publications

Prose Publications Publication house from Pune, working with and for, new authors!

ता. क. - डॉ.ऊर्जिता लिखित लघु कादंबरी. लघु-कादंबरीच्या स्वरुपात असणारी ही कथा उलगडत जाते, पत्रांच्या मार्फत. 'ती' पत्रं ...
12/03/2024

ता. क. - डॉ.ऊर्जिता लिखित लघु कादंबरी. लघु-कादंबरीच्या स्वरुपात असणारी ही कथा उलगडत जाते, पत्रांच्या मार्फत. 'ती' पत्रं लिहिते तिच्या मित्राला, फिलोला.

प्रोज पब्लिकेशन्स पुणे, अंतर्गत, साहित्यकट्टा प्रस्तुत "एक गोष्ट सांगू…!?” हा कार्यक्रम आम्ही घेतला होता.  मराठी  “कथा- ...
04/04/2023

प्रोज पब्लिकेशन्स पुणे, अंतर्गत, साहित्यकट्टा प्रस्तुत "एक गोष्ट सांगू…!?” हा कार्यक्रम आम्ही घेतला होता.

मराठी “कथा- अभिवाचन” असं या कार्यक्रमाचं स्वरूप होतं. त्याचं ऑडिओबुक स्टोरीटेल वर प्रकाशित होतंय

या कार्यक्रमातील कथा आणि अभिवाचक याप्रमाणे-
१.आचमन-लेखिका -विद्या बालवडकर ; अभिवाचक : डॉ. ऊर्जिता कुलकर्णी
२. येणार आहे तुम्हाला भेटायला- लेखक- चंदर भागवत अभिवाचक- चिंतामणी केळकर
३. डोहाचा तळ-लेखिका- प्राची देशपांडे , अभिवाचक- सायली मराठे
४.अखेरचा शब्द- लेखक संतोष जाधव- अभिवाचक- गणेश इनामदार
५. वीज- चारुदत्त गोरे अभिवाचक - गणेश इनामदार

नक्की ऐका आणि तुमच्या प्रतीक्रिया आम्हाला कळवा…

⁃ प्रोज पब्लिकेशन्स

https://www.storytel.com/in/en/books/ek-goshta-sangu-part-one-2397424?

नमस्कार मंडळी! प्रोज पब्लिकेशन्स , साहित्यकट्टा अंतर्गत उपक्रम: १२ फेब्रुवारीला झालेल्या 'एक गोष्ट सांगू?' या कथा अभिवाच...
24/02/2023

नमस्कार मंडळी!
प्रोज पब्लिकेशन्स , साहित्यकट्टा अंतर्गत उपक्रम:
१२ फेब्रुवारीला झालेल्या 'एक गोष्ट सांगू?' या कथा अभिवाचनाच्या कार्यक्रमातील ही काही क्षणचित्रे!
दमदार कथा, तितकंच उत्तम सादरीकरण यामुळे हा कार्यक्रम ही श्रोते- प्रेक्षक यांच्यासाठी पर्वणीच ठरला.
या कार्यक्रमात निवडल्या गेलेल्या कथा, त्यांचे लेखक, आणि अभिवाचक याप्रमाणे-
१. आचमन- लेखिका- विद्या बालवडकर (पुणे)
अभिवाचक- डॉ. ऊर्जिता कुलकर्णी
२. अखेरचा शब्द- लेखक-संतोष जाधव (मुंबई)
अभिवाचक - गणेश ईनामदार
३.डोहाचा तळ- लेखिका- प्राची देशपांडे(पुणे)
अभिवाचक- सायली मराठे
४.येणार आहे तुम्हाला भेटायला- लेखक- चंदर भागवत(मुंबई)
अभिवाचक- चिंतामणी केळकर
५. वीज- लेखक- चारुदत्त गोरे(पुणे)
अभिवाचक- गणेश ईनामदार
या सगळ्याच कथा storytel या app वर तुम्हाला audiobook स्वरूपात लवकरच ऐकता येणार आहेत. त्याचबरोबर यांचं प्रत्यक्ष सादरीकरण देखील व्हिडीओ स्वरूपात तुम्हाला youtube चॅनल वर पाहता येईल.
वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थित असणारे मान्यवर
असे.
मा. किरण केंद्रे - संपादक किशोर, बालभारती
मा. वैशाली पतंगे - additional commissioner GST , Pune , अपर आयुक्त GST पुणे
मा. आनंद अवधानी- व्यवस्थापकीय संचालक युनिक फीचर्स
मा. अभिराम अंतरकर- हंस
या सर्व मान्यवरांचे सुबोध मार्गदर्शन, त्यांनी केलेली चर्चा देखील youtube वर पाहता येईल.
त्याचबरोर अक्षरधारा बुक गॅलरी च्या मा. रसिका राठीवडेकर यांनीही यात निवडल्या गेलेल्या लेखकांसाठी कुपन स्वरूपात सदिच्छा भेट दिली, त्यासाठी त्यांचेही खूप आभार!
मराठी टी-शर्ट , यांच्यातर्फे देखील सर्व लेखक व अभिवाचक यांच्यासाठी कुपन्स देण्यात आली, त्याबद्दल त्यांचेही आभार!
भांडारकर इन्स्टिट्यूट च्या , 'नवलमल फिरोदिया' या अद्ययावत प्रेक्षागृहात हा कार्यक्रम पार पडला. ते उपलब्ध करून देणे, तसेच कार्यक्रमासाठी लागणारी सर्व तांत्रिक मदत करणे यासाठी
भांडारकर इन्स्टिट्यूट आणि तेथील मा.भूपाल पटवर्धन, मा.श्रीनिवास कुलकर्णी यांचेही खूप आभार!
यातील प्रत्येक सदारीकरणाला साजेसं उत्तम संगीत देणारे अमित पाटील, सुरज सोळसे, आणि सुरज कदम यांनाही धन्यवाद!
महत्वाचं म्हणजे 'एक गोष्ट सांगू?' या कथा अभिवाचन कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद देत तिथे प्रत्यक्ष उपस्थित असणाऱ्या सर्व श्रोते आणि प्रेक्षक यांचे खूप आभार!
लवकरच या माळेतील पुढचा कार्यक्रम जाहीर करूच.
-
प्रोज पब्लिकेशन्स

भयकथा आणि रहस्यकथांचे अभिवाचन!!! १२ फेब्रुवारी २०२३, रविवार! म्हणजे आजच ... चुकवू नये असा कार्यक्रम! फिरोदिया हॉल, भांडा...
12/02/2023

भयकथा आणि रहस्यकथांचे अभिवाचन!!!
१२ फेब्रुवारी २०२३, रविवार! म्हणजे आजच ...
चुकवू नये असा कार्यक्रम!
फिरोदिया हॉल, भांडारकर इन्स्टिट्यूट पुणे

विनामूल्य प्रवेश - प्रथम येणाऱ्यास प्राधान्य देण्यात येईल...

https://bit.ly/EkGoshtaSangu

१२ फेब्रुवारी म्हणजे आलंच की २ दिवसात! आमची तयारी जोरात सुरु आहे, अभिवाचक सुद्धा उत्तम सराव करतायत... आपल्या ह्या उपक्रम...
10/02/2023

१२ फेब्रुवारी म्हणजे आलंच की २ दिवसात! आमची तयारी जोरात सुरु आहे, अभिवाचक सुद्धा उत्तम सराव करतायत...
आपल्या ह्या उपक्रमाला खूप भारी प्रतिसाद मिळालाय ... प्रवेश विनामूल्य आहे, पण प्रथम येणाऱ्यास प्राधान्य असेल ...
तेव्हा रजिस्टर करा, आणि संध्याकाळी ५.१५ ला या जागा पकडायला!
Registration Link - https://bit.ly/EkGoshtaSangu

RJ Shonali Dr. Urjita Kulkarni The Bhandarkar Oriental Research Institute Soham Sabnis Vidya Chandrakant Balwadkar Charudatta Gore

तर मंडळी तयार आहात ना !? १२ फेब्रुवारी २०२३ रोजी होणारा, कथा अभिवाचन कार्यक्रम - 'एक गोष्ट सांगू?' निमंत्रितांची यादी खा...
06/02/2023

तर मंडळी तयार आहात ना !? १२ फेब्रुवारी २०२३ रोजी होणारा, कथा अभिवाचन कार्यक्रम -
'एक गोष्ट सांगू?'

निमंत्रितांची यादी खाली देतच आहोत. तुम्हीही नक्की या! रजिस्ट्रेशन लिंक - https://forms.gle/4HGZcky5BbNtHSdJ9

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे
मा. निलीमा कुलकर्णी - संपादक, प्रकाशक धनंजय आणि चंद्रकांत दिवाळी अंक आणि राजेंद्र प्रकाशन

मा. अभिराम अंतरकर - संपादक हंस दिवाळी अंक
मा. किरण केंद्रे - संपादक - किशोर, बालभारती
मा. अनिल टाकळकर - ज्येष्ठ पत्रकार
मा. अमृता कुलकर्णी, मा. ऋतुपर्ण कुलकर्णी - संचालक - कॉंटिनेंटल प्रकाशन
मा. मंदार जोगळेकर - संचालक बुक गंगा
मा. वैशाली पतंगे - अपर आयुक्त, जी एस टी पुणे
मा. अभय कुलकर्णी - व्यवस्थापकीय संपादक - माहेर, व्यवस्थापकीय संचालक - मीडियानेक्स्ट
मा. डॉ. दिलीप शिंदे - संचालक - ‘संवेदना’ वृद्धसेवा केंद्र
मा. आनंद अवधानी - व्यवस्थापकीय संचालक, युनिक फीचर्स
मा. दिनकर शिलेदार - संचालक - मोना ऍडव्हरटाइजिंग
मा. योगेश नांदुरकर - संस्थापक, संचालक - सहयोगी
मा. सुवर्णरेहा जाधव - आर्टिस्ट
मा. शंकर जाधव - एम. डी BSE Investments
मा. उल्का पासलकर - सहयोगी
मा. रसिका राठिवडेकर - अक्षरधारा
RJ शोनाली - रेडिओ सिटी

नमस्कार मंडळी, डिसेंबर महिन्यात आपण एक कथा स्पर्धा घेतली होती. त्यामध्ये काही भयकथा ,रहस्यकथा मागवल्या होत्या. त्यातून आ...
01/02/2023

नमस्कार मंडळी,
डिसेंबर महिन्यात आपण एक कथा स्पर्धा घेतली होती. त्यामध्ये काही भयकथा ,रहस्यकथा मागवल्या होत्या. त्यातून आता ५ कथांची निवड झालेली आहे!
नेमक्या कशासाठी?

तर प्रोज पब्लिकेशन्स मार्फत साहित्यकट्टा अंतर्गत आपण घेत आहोत अभिनव कथा अभिवाचनाचा कार्यक्रम - एक गोष्ट सांगू?
दिनांक: १२ फेब्रुवारी २०२३ , रविवार
वेळ: सायंकाळी ५.३० ते ८.३०
स्थळ: फिरोदिया ऑडिओटोरिम भांडारकर इन्स्टिट्यूट, भांडारकर रोड ,पुणे.
या कार्यक्रमात नेमकी कोणाकोणाच्या कथांची वर्णी लागली आहे?

येणार आहे तुम्हाला भेटायला-

चंदर भागवत, मुंबई
डोहाचा तळ- प्राची देशपांडे , पुणे
आचमन- विद्या बालवडकर ,पुणे
अखेरचा शब्द- संतोष जाधव ,मुंबई
पाचवी कथा - अजून गुलदस्त्यात!

तर भेटूया १२ फेब्रुवारी च्या या कार्यक्रमात.
या लिंक वरून तुम्ही तुमची जागा आजच राखून ठेवा! https://bit.ly/EkGoshtaSangu

*प्रवेश विनामूल्य. काही जागा राखीव.
कार्यक्रम लहान मुलांसाठी नाही - वयोगट 18 आणि पुढे.
प्रवेशाचे हक्क प्रोज पब्लिकेशन्स कडे राखीव.
-
प्रोज पब्लिकेशन्स,पुणे

"ऐक ना ,काल काय झालं माहितीये..!?" इथून पुढे जे काही घडतं, ते आपल्या सगळ्यांनाच आवडतं! म्हणजे या संवादात पुढे ज्या -ज्या...
21/01/2023

"ऐक ना ,काल काय झालं माहितीये..!?" इथून पुढे जे काही घडतं, ते आपल्या सगळ्यांनाच आवडतं! म्हणजे या संवादात पुढे ज्या -ज्या प्रसंगाचं कथन होतं, खरंतर ती असते एक कथा! हो की नाही!
म्हणजेच आपल्या कोणत्याही भाषेचा आत्मा हे कथन, त्यातून निर्माण होणाऱ्या कथा. त्या सांगायला, ऐकायला आपल्याला आवडतंच की. त्यातही जर त्या लेखक मंडळींनी त्यांच्या कल्पनेच्या जोरावर, प्रतिभेवर त्या फुलवलेल्या असतील, तर फारच कमाल. पूर्वी असे कथा- कथनाचे, कथा-अभिवाचनाचे कितीतरी कार्यक्रम असायचे. निखळ आनंद आणि वेगवेगळ्या पद्धतीने मनोरंजन करणारे. सध्या मात्र असे कार्यक्रम जवळपास नामशेष होत चाललेत. म्हणूनच प्रोज पब्लिकेशन्स, साहित्यकट्टा अंतर्गत; तुम्हा सर्वांसाठीच एक मस्त प्रकट कार्यक्रम घेऊन येत आहे. अर्थात कथा- अभिवाचनाचा.
कार्यक्रमाचं शीर्षक- एक गोष्ट सांगू!?
या कार्यक्रमात तुम्हाला वेगवेगळ्या लेखकांनी लिहिलेल्या रहस्यकथा, भयकथा ऐकण्याचा थरार अनुभवायला मिळेल.
या कथांचं सादरीकरण सुद्धा तसंच दमदार असेल. वेगवेगळे अभिवाचक त्या सादर करतील, ते ही संगीताच्या साथीने..
येणाऱ्या प्रेक्षक, श्रोतृवर्ग यांना एक उत्तम,सकस मनोरंजनाचा आनंद देण्याचा हा आमचा प्रयत्न.
त्याची ही माहिती-
कार्यक्रम- एक गोष्ट सांगू!?
दिनांक- १२ फेब्रुवारी २०२३, रविवारी
वेळ- संध्याकाळी ५.३० ते ८.३०
स्थळ- नवल फिरोदिया सभागृह ,भांडारकर रीसर्च इन्स्टिट्यूट, भांडारकर रोड, पुणे.

शिवाय या कार्यक्रमास साहित्य क्षेत्रातल्या काही मान्यवरांची उपस्थितीही असणार आहेच.
प्रवेश - विनामूल्य!
मात्र आपली जागा राखीव ठेवण्यासाठी या खालच्या लिंकवर जाऊन तिथे नाव नोंदवा.
जागा मर्यादित असल्याने, हे आवश्यक आहे.
तर मंडळी नक्की या! तुमच्या मित्र-मंडळींना,कुटुंबियांना ही घेऊन या!
नावनोंदणी साठी लिंक -
https://bit.ly/EkGoshtaSangu

*प्रवेश मर्यादित.
*प्रवेशाचे संपूर्ण हक्क प्रोज पब्लिकेशन्स कडे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य.
*कार्यक्रम लहान मुलांसाठी नाही. वयोगट १८ आणि पुढे.
-
प्रोज पब्लिकेशन्स

03/01/2023

एक गोष्ट सांगू ? अनोखी कथा स्पर्धा!
स्पर्धेसाठी तुम्हा सर्वांचा भरघोस प्रतिसाद येतोय, त्यासाठी खूप खूप धन्यवाद! आता मात्र कथा पाठवण्याची अंतिम तारीख जाहीर करत आहोत.
अंतिम तारीख : १० जानेवारी २०२३. भयकथा आणि रहस्यकथा, आम्ही अजूनही शोधतोय... लेखक मित्रमंडळींना टॅग करा, किंवा शेयर करा:
स्पर्धेसाठी नोंदणी फॉर्म - https://forms.gle/SgMoRmJocqwNyoCn6

यातून उत्तम कथांची निवड होईल.
निवड झालेल्या कथा उत्तम अभिवाचकांकडून सादर केल्या जातील. हा जाहीर कार्यक्रम आपण पुण्यात करतोय.
आणखीन एक महत्वाचं,
तुमच्या निवड झालेल्या कथेला इतर कथांसोबत Audiobook मध्ये स्थान मिळेल. म्हणजेच हजारो, लाखोंच्या संख्येने या कथा ऐकल्याही जातील!
चला तर, पट्कन कथा पाठवा, आणि आमच्या मेल ची वाट बघा!
कथा पाठवण्यासाठी
-प्रवेश शुल्क, १००/₹ मात्र.
-कथा केवळ स्वलिखितच असावी
-कथेच्या निवडीचे अधिकार प्रोज पब्लिकेशन्स कडे राखीव.
-नियम व अटी लागू.

प्रोज पब्लिकेशन्स.

Dr. Urjita Kulkarni Soham Sabnis Vidya Chandrakant Balwadkar Aditi Bhave Dhange Charudatta Gore

नमस्कार मंडळी, घेऊन येतोय पुढचा साहित्यकट्टा..! नवीन वर्षात नावीन्य लेऊन. डिसेंबर महिन्यातला कट्टा ज्या विषयावर आधारित ह...
26/12/2022

नमस्कार मंडळी,
घेऊन येतोय पुढचा साहित्यकट्टा..! नवीन वर्षात नावीन्य लेऊन. डिसेंबर महिन्यातला कट्टा ज्या विषयावर आधारित होता तो म्हणजे, 'ललित साहित्यप्रकार'. याची व्याप्ती इतकी मोठी आहे, की तोच विषय याही कट्ट्याच्या वेळेस आपण घेणार आहोत. अर्थातच जी मंडळी मागच्या कट्ट्याच्या वेळेस उपस्थित राहू शकली नव्हती, त्यांच्यासाठी एक उजळणी देखील असेल. आणि या तरल साहित्य प्रकाराचे विविध पैलूही आपण पाहणार आहोत. त्याविषयी गप्पा मारणार आहोत.
तर नक्की या!
दिनांक - २२ जानेवारी २०२३, रविवार
वेळ सायंकाळी - ४ ते ६
ठिकाण - ऑस्टिन 40 कॅफे हाऊस , भांडारकर रोड , पुणे
विषय - वर्तुळ
शब्दमर्यादा - ५००
या विषयावर ५०० शब्दांत आपले ललित लेखन खालील ई-मेल वर पाठवा.
[email protected]
नावनोंदणी करण्यासाठी माफक शुल्क- ५०/- (चहा + वडापाव असेलच)
Gpay नंबर - +91 90964 61133 आदिती
महत्वाचे निकष -
१. नोंदणी अनिवार्य
२. केवळ नोंदणी केलेल्या व्यक्तींचे लेखन विचारात घेतले जाईल
३. नोंदणी शुल्क कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही, किंवा पुढील कट्ट्यासाठी वापरता येणार नाही.
४. तुमच्या लेखनासोबत तुम्ही 'ललित' या साहित्यप्रकारातील कोणते पुस्तक वाचताय, त्याचे नाव, त्याचबरोबर साहित्यिकांचे नाव ई-मेल मध्ये नमूद करणे अत्यावश्यक.
५. निवडीचे संपूर्ण अधिकार प्रोज पब्लिकेशन्स कडे राखीव.
काहिही शंका असल्यास वरील क्रमांकावर संपर्क साधावा.
६. लिखाण पाठवण्याची शेवटची तारीख १५ जानेवारी २०२३

चला तर मग, भेटूया साहित्य कट्ट्यावर.
अरेच्चा! एक सांगायचं राहिलंच, आपल्या नवीन कार्यक्रमाविषयी, स्पर्धेविषयी देखील या कट्ट्यावर आपण भरपूर बोलूया.
नक्की या!
-
प्रोज पब्लिकेशन्स

नमस्कार मंडळी, प्रोज पब्लिकेशन्स प्रस्तुत, 'साहित्यकट्टा' अंतर्गत, एक अभिनव कथा स्पर्धा! तुम्हाला भयकथा / रहस्यकथा लिहाय...
23/12/2022

नमस्कार मंडळी,
प्रोज पब्लिकेशन्स प्रस्तुत,
'साहित्यकट्टा' अंतर्गत,
एक अभिनव कथा स्पर्धा!
तुम्हाला भयकथा / रहस्यकथा लिहायला आवडत असतील, आणि त्या अनेकांपर्यंत पोचव्यात असं वाटत असेल, तर हा प्लॅटफॉर्म खास तुमच्याचसाठी.
तुमची स्वतःची अप्रकाशित म्हणजे अगदी कोरी करकरीत , अगदी फेसबुक वर देखील न आलेली भयकथा किंवा रहस्यकथा आम्हाला खालील लिंक वर पाठवा.
https://forms.gle/SgMoRmJocqwNyoCn6
त्यातून उत्तम कथांची निवड होईल.
निवड झालेल्या कथा उत्तम अभिवाचकांकडून सादर केल्या जातील. हा जाहीर कार्यक्रम आपण पुण्यात करतोय.
आणखीन एक महत्वाचं,
तुमच्या निवड झालेल्या कथेला इतर कथांसोबत Audiobook मध्ये स्थान मिळेल. म्हणजेच हजारो, लाखोंच्या संख्येने या कथा ऐकल्याही जातील!
चला तर, पट्कन कथा पाठवा, आणि आमच्या मेल ची वाट बघा!
कथा पाठवण्यासाठी
-प्रवेश शुल्क, १००/₹ मात्र.
-कथा केवळ स्वलिखितच असावी
-कथेच्या निवडीचे अधिकार प्रोज पब्लिकेशन्स कडे राखीव.
-नियम व अटी लागू.

प्रोज पब्लिकेशन्स Dr. Urjita Kulkarni

नमस्कार मंडळी, प्रोज पब्लिकेशन्स प्रस्तुत, 'साहित्यकट्टा' अंतर्गत, एक अभिनव कथा स्पर्धा! तुम्हाला भयकथा / रहस्यकथा लिहाय...
23/12/2022

नमस्कार मंडळी,
प्रोज पब्लिकेशन्स प्रस्तुत,
'साहित्यकट्टा' अंतर्गत,
एक अभिनव कथा स्पर्धा!
तुम्हाला भयकथा / रहस्यकथा लिहायला आवडत असतील, आणि त्या अनेकांपर्यंत पोचव्यात असं वाटत असेल, तर हा प्लॅटफॉर्म खास तुमच्याचसाठी.
तुमची स्वतःची अप्रकाशित म्हणजे अगदी कोरी करकरीत , अगदी फेसबुक वर देखील न आलेली भयकथा किंवा रहस्यकथा आम्हाला खालील लिंक वर पाठवा.
https://forms.gle/SgMoRmJocqwNyoCn6
त्यातून उत्तम कथांची निवड होईल.
निवड झालेल्या कथा उत्तम अभिवाचकांकडून सादर केल्या जातील. हा जाहीर कार्यक्रम आपण पुण्यात करतोय.
आणखीन एक महत्वाचं,
तुमच्या निवड झालेल्या कथेला इतर कथांसोबत Audiobook मध्ये स्थान मिळेल. म्हणजेच हजारो, लाखोंच्या संख्येने या कथा ऐकल्याही जातील!
चला तर, पट्कन कथा पाठवा, आणि आमच्या मेल ची वाट बघा!
कथा पाठवण्यासाठी
-प्रवेश शुल्क, १००/₹ मात्र.
-कथा केवळ स्वलिखितच असावी
-कथेच्या निवडीचे अधिकार प्रोज पब्लिकेशन्स कडे राखीव.
-नियम व अटी लागू.

प्रोज पब्लिकेशन्स

Address


Telephone

+919923409300

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Prose Publications posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Prose Publications:

  • Want your business to be the top-listed Media Company?

Share