Somnath Jagtap Deshmukh

Somnath Jagtap Deshmukh Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Somnath Jagtap Deshmukh, Digital creator, Navnath Sevkak Pariwar Hindusthan Pune, Pune.
(2)

13/02/2026
08/02/2026

महाशिवरात्री व्रतकथा

एकदा पार्वतीने परमेश्वर शिवशंकरांना विचारले, ''असे कोणते श्रेष्ठ तसेच सरळ व्रत-पूजन आहे, ज्यामुळे मृत्यू-लोकातील प्राण्यांना तुमची कृपा प्राप्त होईल?''

तेंव्हा शंकराने पार्वतीला 'शिवरात्री'च्या व्रताची कथा सांगितली. 'एका गावात एक गुरुद्रह नावाचा शिकारी राहत होता. मुक्या जनावरांची हत्या करून तो आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करीत असे.

आपल्या दिनचर्येप्रमाणे तो एकदा जंगलात शिकारीसाठी निघाला. पण दिवसभर जंगलात फिरुन व प्रयत्न करुनही शिकार न मिळाल्यामुळे तो तहान-भुकेने व्याकूळ झाला होता. शेवटी शिकारसाठी तो तलावाकाठच्या बेलपत्राच्या झाडावर चढुन बसला. त्या बेल-वृक्षाच्या खाली बेलपत्रांनी झाकले गेलेले शिवलिंग होते. शिकार्‍याला मात्र हे माहीत नव्हते.त्याने जे बेल पत्रे तोडली होती ती योगायोगाने शिवलिंगावर पडली. अशा प्रकारे दिवसभर उपाशी असलेल्या शिकार्‍याचे व्रतही झाले आणि त्याच्याकडून शिवलिंगावर बेलपत्रही वाहिले गेली.

एका प्रहरानंतर एक गर्भिणी हरणी तलावावर पाणी पिण्यासाठी पोहचली. शिकार्‍याने आपल्या धनुष्याने तिच्यावर नेम साधलाच होता तितक्यात ती हरिणी बोलली, मी गर्भिणी आहे, तू एकाच वेळी दोन जीवांची हत्या करशील. हे योग्य नाही. मी आपल्या पिलाला जन्म देऊन लवकरच तुझ्यासमोर येईल. तेंव्हा तू मला मार. शिकार्‍याने अविश्वास दाखविताच तिने वेदवचनानुसार पापांच्या फलितांचे वर्णन करुन सांगितीली आणि ती पापे परत न आल्यास तिला भोगावी लागतील असे सांगितले.तेंव्हा शिकार्‍याने तिच्याकडून तसे वचन घेतले.

काही वेळाने दुसरी हरिणी तेथे आली. शिकार्‍याच्या आनंदाला पारावर उरला नाही. त्याने तिच्यावर नेम साधला. हे बघून त्या हरिणीने त्याला सांगितले, की 'हे पारधी! मी एक कामातूर विरहिणी आहे. आपल्या प्रियेच्या शोधात भटकत आहे. मी माझ्या पतीला भेटून लवकरच तुझ्याजवळ येईल.

शिकारीने तिच्याकडून कर्माच्या बाबतीतील वेदवचने ऐकून तिलाही जाऊ दिले. दोनदा शिकार हातातून गेल्यामुळे तसा तो चिंतित झाला होता.

नंतर एक हरिणी आपल्या पिलासोबत तेथे आली. शिकार्‍याला जणू सुवर्णसंधीच मिळाली. त्याने धनुष्याला बाण लावला आणि बाण सोडणार तेवढ्यात ती हरिणी बोलली, हे पारधी! मी माझ्या पिलाला त्याच्या वडिलांकडे सोडून लगेच येते, यावेळी तू मला मारू नकोस.'
शिकारी हसला आणि म्हणाला समोर आलेली शिकार सोडून द्यायला मी काही मूर्ख नाही. या आधी मी दोनदा शिकार गमावली आहे. माझी मुलं तहान-भुकेने व्याकूळ झाले असतील.
उत्तरादाखल हरिणी म्हणाली, जशी तुला आपल्या मुलांची काळजी वाटते आहे तशीच मलाही वाटत आहे. त्यामुळे मी फक्त काही काळ तुझ्याकडून जीवनदान मागत आहे. माझ्यावर विश्वास ठेव. मी वचन देते परत येईन.
हरिणीचा तो व्याकूळ स्वर ऐकून शिकार्‍याला तिची दया आली. त्याने तिलाही जाऊ दिले. शिकार न मिळाल्यामुळे तो बेलाच्या झाडावर बसून बेलपत्र तोडत खाली फेकत होता.

काही वेळाने एक धष्ट-पुष्ट मृग त्या रस्त्यावरून जात होता. आता या मृगाची नक्कीच शिकार करावी असा विचार केला.पण त्याच्यावर नेम धरला असता मृग दीनवाण्या स्वरात म्हणाला, 'हे पारधी! जर तू माझ्या आधी तीन हरिणींना मारले असेल तर मला मारण्यातही वेळ करू नकोस, म्हणजे त्यांच्या वियोगात मला एकही क्षणाचे दु:ख सहन करावे लागणार नाही. मी त्यांचा पती आहे आणि जर तू त्यांना जीवनदान दिले असशील तर मला काही क्षणांसाठी जीवनदान देण्याची कृपा कर. मी त्यांना भेटून तुझ्यासमोर हजर होईल.
मृगाचे बोलणे ऐकून शिकार्‍याच्या डोळ्यासमोरून संपूर्ण रात्रीचे घटना-चक्र आले. त्याने सर्व कथा मृगाला ऐकविली. तेंव्हा मृगाने सांगितले, ' माझ्या तीनही पत्नी येथून वचनबध्द होऊन गेल्या आहेत, मात्र त्या माझ्या मृत्यूनंतर आपल्या धर्माचे पालन करू शकणार नाहीत. त्यामुळे तू मला आता जाऊ दे, मी त्यांच्यासमवेत तुझ्यासमोर हजर होतो.

घडलेला उपवास, रात्रीचे जागरण तसेच शिवलिंगावर बेलपत्र पडल्यामुळे व हरिणींच्या मुखातुन ऐकलेल्ला वेद वचनांमुळे शिकारीच्या हिंसक हृदयाचे निर्मल हृदयात परिवर्तन झाले होते.धनुष्य त्याच्या हातातून निसटले. शिवाने त्याच्या ह्रदयात बदल घडवून आणला. त्याला आपल्या भूतकाळातील कर्मांचा पश्चात्ताप झाला.

थोड्याच वेळात मृग सहपरिवार शिकार्‍यासमोर आला. या प्राण्यांमधील प्रेम पाहून शिकार्‍याच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले. शिकार्‍याने त्यांना न मारता आपणही मुक्या प्राण्यांची हिंसा न करण्याचे ठरविले.

देवलोकातून समस्त देव ही घटना बघत होते. घटनेची परिणती झाल्याबरोबर देवी-देवतांनी फुलांचा वर्षाव केला. तेंव्हा शिकारी व मृग परिवाराला पुढे मोक्षप्राप्ती झाली.

तात्पर्य—नित्य शिवपुजन करावे. शिवाला बेल,फुल,फळ,जल इ.पैकी काही ना काही अर्पण करावे.
नित्य शिवमंत्र जपावा.
विशेषता महाशिवरात्रीला हे करावेच.

टिप- हरिणींच्या मुखातुन प्रकट झालेली वेदवचने शिवलिलामृत ग्रंथात वाचावित ते ऐकल्याने' वाचल्याने, पाठ केल्याने पापक्षय होतो.
मानवजातीचे कल्याण आणि धर्म,संस्कृतीचे रक्षण होण्यासाठी अवश्यक असणार्‍या, संपुर्ण ब्रह्मज्ञानाचे मार्गदर्शन करणारे अनेक ग्रंथ उपलब्ध आहेत.
॥ ॐ नमः शिवाय ॥
ॐश्रीसद्गुरुचरणकमलार्पणमस्तु

आदेश🔱

https://youtu.be/djKvF1rFJ18?si=xUtdT36ZEXZdVU-1
20/01/2026

https://youtu.be/djKvF1rFJ18?si=xUtdT36ZEXZdVU-1

॥ ॐ चैतन्य श्री गोरक्षनाथाय नमः ॥श्री धर्मनाथ बीज आणि जन्मोत्सवाच्या पावन पर्वावर, आम्ही घेऊन आलो आहोत एक नवीन आण....

29/12/2025

गुरू अनेक झालेले आहेत पण खरे सद्‌गुरू मिळणे दुर्मीळ झालेले आहे आणि शिष्यही सत्शिष्य न होता ते #स्वतः केव्हा गुरू बनतील याची वाट पहात त्याच प्रयत्नाला लागलेले आहेत.त्यामुळे आत्मधर्माला आधार असलेली सद्‌गुरू सत्शिष्य परंपराच लोप पावत आहे.

आदेश 🔱

काशीमध्ये, अहिल्यानगरचे 19 वर्षीय वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे यांनी शुक्ल यजुर्वेदाचे दंडक्रम पारायण पूर्ण केले. त्यांची...
02/12/2025

काशीमध्ये, अहिल्यानगरचे 19 वर्षीय वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे यांनी शुक्ल यजुर्वेदाचे दंडक्रम पारायण पूर्ण केले. त्यांची ही महासिद्धी सर्वांसाठी प्रेरणादायी आहे!

31/10/2025

गिरनार लिली परिक्रमा 2025 यावर्षी जंगलात झालेल्या प्रचंड पावसामुळे रद्द झाली आहे.
रस्ते चिखलमय झाले आहेत.
याची सर्वांनी नोंद घ्यावी.
आदेश 🔱

 #मंत्रपुष्पांजलीभारतीय इतिहासात अयोध्येचा एक राजा खणिनेत्र होऊन गेला. हा राजा प्रजेवर अत्याचार करत असे , म्हणून एक दिवस...
29/08/2025

#मंत्रपुष्पांजली

भारतीय इतिहासात अयोध्येचा एक राजा खणिनेत्र होऊन गेला. हा राजा प्रजेवर अत्याचार करत असे , म्हणून एक दिवस प्रजेने त्या राजाला राजपदावरून बेदखल केलं.
राजाची हकालपट्टी करणारी प्रजा हे एक विलक्षण उदाहरण इथे सापडतं.

खणिनेत्राला पायउतार करून त्याचा मुलगा आविक्षित याला राजा बनवले व सुयोग्य कारभार करण्यासाठी अनेक अटी प्रजेनी घालून दिल्या. वडिलांनी शेजारी राज्यांशी शत्रुत्व पत्करल्यामुळे आविक्षिताला वारंवार आक्रमणांच्या संकटांना तोंड द्यावे लागले. पण प्रजेच्या भक्कम पाठिंब्याने तो विजयी झाला आणि त्याने उत्तम राज्य केले.आविक्षित हा प्रजाहित रक्षक राजा होता. या आविक्षिताचा मुलगा मरुत्त.

“आविक्षितस्य कामप्रे” —- मधला हा आविक्षित
“मरुत्तस्यावसनगृहे” —- मधला हा मरुत्त

हा मरुत्त चक्रवर्ती राजा झाला. त्याच्या गौरवासाठी रचली गेलेली ही मंत्रपुष्पांजली होय.

भारतात अनेक चक्रवर्ती राजे झाले मग या मरुत्ताचं वैशिष्टय काय ? त्यानी प्रजेसाठी अनेक अडचणींना तोंड देत एक मोठ्ठा यज्ञ केला.

यज्ञ म्हणजे समाजातील अनेकांच्या भल्यासाठी केलेला प्रकल्पच.

यज्ञ म्हणजे असं मोठं कर्म ज्यात अनेक लोकांचा सहयोग घेऊन एक संघ तयार होतो. या संघातील सहयोगी हे विविध विषयांचे जाणकार,तज्ञ,कामगार असतात त्यांना “ऋत्विक” म्हणतात. या संघाच्या प्रमुखाला “होता” म्हणतात. हे सगळे मिळून एकत्र येऊन प्रजेच्या कल्याणासाठी यज्ञ करतात. जसे नदीवर बांध घालणे, तळी खणणे, डोंगरावर झाडी लावणे , जलाशय स्वच्छ करणे, अनाचारी दुष्ट चोरांवर वचक बसवणे, औषधोपचार करणे , शिक्षण देणे, अन्न धान्याची सोय करणे इत्यादि साठी अनेक यज्ञाची स्वरूपं आहेत. यज्ञ करणे म्हणजे सगळ्यांनी मिळून सगळ्यांच्या भल्यासाठी मोठं काम करणे.
यज्ञो वै श्रेष्ठतमं कर्म ! अर्थात यज्ञ हे महानतम कर्म आहे.

तर मरुत्त राजानी प्रजेला दुष्काळापासून वाचवण्यासाठी मोठा प्रकल्प हाती घ्यायचं ठरवलं. पण मरुत्त राजाची कीर्ति यामुळे अधिकच पसरेल अशी ईर्ष्या उत्पन्न झाल्याने त्याकाळातील अनेक प्रबळ आणि संसाधन पुरवणा-या गटांनी( इंद्र आदि देवांनी ) मरुत्ताला विरोध केला. मरुत्ताचे सल्लागार असलेल्या बृहस्पतिलाही त्यांनी ह्या यज्ञात सहयोग देण्यापासून परावृत्त केले. यामुळे खचलेल्या मरुत्त राजाला समवर्त नावाच्या बृहस्पतीच्या दुर्लक्षित भावानी मदत द्यायचं मान्य केलं.
समवर्तासोबत मरुत्त राजानी प्रकल्प पुढे नेला. एवढेच नव्हे तर नंतर हळू हळू मरुत्ताने सर्व विरोधक गटांना आमंत्रित करून , त्यांचं मन वळवून यज्ञात सहभागी करून घेतलं आणि यज्ञ उत्तमप्रकारे यशस्वी केला.
यामुळे “मरुत: परिवेष्टारो मरुत्तस्यावसनगृहे” - अर्थात मरुत देव मरुत्त राजाच्या घरी अन्न देऊ लागले म्हणजेच मरुत्ताचे राज्य पर्जन्याने/योग्य पाऊस पाण्याने अन्नधान्यानी समृद्ध झाले.
"अशाप्रकारे यज्ञेन....” यज्ञाद्वारे मोठ्ठी कार्य सार्थकी लावता येतात ही पूर्वापार केवळ श्रद्धा नसून आपली परंपरा आहे. या परंपरेप्रमाणे सर्वांना सहभागी करत, अडचणीत मार्ग शोधत, न खचता लोककल्याणकारी प्रकल्प पूर्ण केल्याने संपन्नता ( कुबेर म्हणजे संसाधन विपुलता) राहील आणि संपूर्ण पृथ्वीवर सार्वभौम प्रजाहितकारी राज्य पसरेल.
असा हा मंत्र पुष्पांजली चा इतिहास आणि आशय आहे. एकत्र येऊन सर्व कल्याणासाठी यज्ञ करा हा समाज, देश आणि विश्व सुखी आणि आनंदी बनवण्याचा परंपराप्राप्तमार्ग वारंवार आपल्या सर्वांच्या मनावर बिंबवण्यासाठी ही मंत्रपुष्पांजली आहे.
मंत्रपुष्पांजली हे प्राचीन राष्ट्रगीत मानतात. मंत्रपुष्पांजलि शिवाय पूजेची सांगता होत नाही.स्पष्ट आणि शुद्ध उच्चार करण्यासाठी असा हा मंत्र खाली दिलाय.
🙏🙏

प्रथम:
ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्।
ते ह नाकं महिमान: सचंत यत्र पूर्वे साध्या: संति देवा:||
द्वितीय:
ॐ राजाधिराजाय प्रसह्य साहिने।
नमो वयं वैश्रवणाय कुर्महे।
स मे कामान् काम कामाय मह्यं।
कामेश्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय। महाराजाय नम:।
तृतीय:
ॐ स्वस्ति, साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं
वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं ।
समन्तपर्यायीस्यात् सार्वभौमः सार्वायुषः आन्तादापरार्धात् ।
पृथिव्यै समुद्रपर्यंताया एकरा‌ळ इति ॥
चतुर्थ:
ॐ तदप्येषश्लोकोभिगीतो।
मरुतः परिवेष्टारो मरुत्तस्यावसन् गृहे।
आविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवाः सभासद इति ॥
॥ मंत्रपुष्पांजलीं समर्पयामि ॥
🌹🪷🌸🙏

अंघोळ झाल्यावर कपाळ मोकळे ठेवू नये आपले पूर्वज सांगत असत, त्याला शास्त्राधार काय होता ते जाणून घेऊया.धर्मशास्त्र सांगते,...
10/08/2025

अंघोळ झाल्यावर कपाळ मोकळे ठेवू नये आपले पूर्वज सांगत असत, त्याला शास्त्राधार काय होता ते जाणून घेऊया.

धर्मशास्त्र सांगते, गंध ही केवळ धर्माची नाही तर मनुष्याच्या अस्तित्त्वाची खूण आहे

वाचा गंध लावण्याचे फायदे!

अलीकडेच आंतरराष्ट्रीय स्तरावर बुद्धिबळ खेळणाऱ्या आर. प्रज्ञानंधा या भारतीय खेळाडूला परदेशात मुलाखतीच्या दरम्यान विचारण्यात आले, 'तू कपाळावर ही विभूती का लावतोस?' त्यावर सोळा वर्षीय प्रज्ञानंधा म्हणाला, 'माझी आई मला सांगते म्हणून!'

मित्रांनो, सोळा वर्षीय प्रज्ञानंधाच्या जागी आपण असतो, तर कदाचित आपणही हेच उत्तर दिले असते. कारण बालपणापासून आपल्यावरही हा संस्कार आपल्या आई आजीने घातला आहे. त्यानुसार आपण कपाळाला गंध लावतोसुद्धा! मात्र ते का लावावे? किंवा ते लावल्याने होणारे फायदे कोणते? की ती केवळ धार्मिक खूण आहे, याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.

'देह देवाचे मंदिर' असे आपण म्हणतो. ज्याप्रमाणे मंदिरात सर्वत्र ईश्वर व्यापून उरलेला असतो, त्याप्रमाणे देहातील रोमारोमात होणारे स्फुरण हे ईश्वरीभावाकडे खेचणारे असते. हृदय, यकृत, मेंदू, मूत्रपिंड ही स्थाने तंदुरुस्त असतील, तरच देह तंदुरुस्त राहतो. हे अवयव म्हणजे देहमंदिराचे स्तंभ आहेत.

या देहात भगवंत नित्य वास करतो. या देहस्थित मूर्तीस गंध लावणे, म्हणजे छोटीशी देवपूजाच आहे. ज्या संसारी माणसांना पूजेसाठीदेखील वेळ नसतो, त्यांनी किमान स्नान झाल्यावर कपाळावर गंध लावून अंतरात्म्याची पूजा जरूर करावी.

गंध लावण्यामागे रहस्य म्हणजे, गंध लावताना अंगुलीस्पर्श होतो. ही अंगुली मध्यमाच असावी, म्हणजे मधले बोट असावे. त्या बोटाचा थेट हृदयाशी संबंध आहे. अंगुलीतून प्रवाहित होणारी स्पंदने थेट हृदयाला जाऊन भिडतात.

गंध लावण्याचे व्यावहारिक कारण म्हणजे, गंध लावणारा मनुष्य सहसा पापकर्मास प्रवृत्त होत नाही. कारण तो देवाचे अस्तित्व मानणाऱ्यांपैकी एक असतो. सकाळी कपाळावर गंध लावून केलेली मानसपूजा दिवसभर, आपण देवाच्या साक्षीने काम करत आहोत याची जाणीव देत राहते. जणू काही, आपल्या प्रत्येक घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवणारा तो सीसीटीव्ही कॅमेरा असतो आणि त्याचा ऑपरेटर हृदयसिंहासनावर विराजमान झालेला असतो. आपण कोणाच्या निगराणीत आहोत, हे कळल्यावर जसे वाईट कृत्य करण्यास धजावत नाही, त्याप्रमाणे `माझ्याकडे देव माझा पाहतो आहे' ही जाणीव गंधाद्वारे सातत्याने होत राहते.

गंध लावणाऱ्या व्यक्तीकडे समाजदेखील संस्कृतीरक्षक या भूमिकेतून पाहतो. ही केवळ धार्मिक खूण नाही, तर स्वत:च्या अस्तित्वाची स्वत:ला करून दिलेली जाणीव असते. म्हणून हिंदूधर्माने आणि आर्यसंस्कृतीने तिलकविधीला धर्मात स्थान दिले आहे.

पूर्वीपासून स्त्री-पुरुष कपाळावर गंध लावीत असत़ त्याची जागा आता टिकल्यांनी घेतली. परंतु, गंध लावण्यामागे शास्त्रीय कारणेदेखील आहेत. गंध केवळ सुगंधी म्हणून नाही, तर अनेक औषधी गुणांनी परिपूर्ण असे चंदन, हळद, अष्टगंध, गुलाल, कृष्णचंदन इ. विविध पदार्थांनी युक्त असते. आपले मस्तक शांत राहावे, गंध दरवळत राहावा आणि कपाळावरील दोन भुवयांच्या मध्ये स्थित असलेले चक्र कार्यरत व्हावे, यासाठीदेखील गंध लावले जाते.

तिलकधारी व्यक्तीचा भक्तिभाव, मनाची निर्मळता, सात्विकता, सोज्वळता इ. सद्गुणांचे दर्शन गंधातून घडते. कोणाही सुवासिनीने हळद-कुंकाची लावलेली दोन बोटं तिच्या चेहऱ्यावरचे तेज वाढवतात. कीर्तनकार, प्रवचनकार, व्याख्याते, गुरुजी, पुरोहित मंडळी अबीर, चंदन किंवा अष्टगंधाचा टिळा लावतात. तो पाहता त्यांच्याही चेहऱ्यावरचे सात्विक भाव उठून दिसतात. पूर्वीदेखील लढाईला जाण्यापूर्वी आणि विजयश्री मिळवून परत आल्यावर मधल्या करांगुलीने कपाळावर खालून वरच्या दिशेने गंधाचे बोट उमटवले जाई. त्याला विजयतिलक म्हटले जात असे. त्यालादेखील बहुमान होता. बहीण भावाला, पत्नी पतीला, आई मुलांना गंध लावून त्यांच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करते. यशस्वी व्यक्तीचेही औक्षण करून त्याला उत्तरोत्तर यश मिळत राहावे म्हणून गंध लावले जाते. एवढेच काय, तर नवीन वस्तू आणि नवीन वास्तू यांनादेखील गंध लावून पूजन केले जाते.

अशा रितीने गंध लावून आपण आपल्या अस्तित्वाची ओळख ठेवावी आणि अंत:पुरातील देवाची पूजा करून त्याच्या साक्षीने सत्कार्य करीत राहावे

आदेश fans

नाथ चैतन्य

अनुग्रह किंवा दीक्षा झालीच पाहिजे का?स्थूल पातळीवर काही गोष्टी देता येतात. शिष्याची योग्यता कितीही असली तरी पन्चभौतीक शर...
10/07/2025

अनुग्रह किंवा दीक्षा झालीच पाहिजे का?

स्थूल पातळीवर काही गोष्टी देता येतात. शिष्याची योग्यता कितीही असली तरी पन्चभौतीक शरीराच्या शुध्दीसाठी प्रत्यक्ष अनुष्ठान आवश्यक असते. तेव्हा दीक्षा दिली जाते.

साधकाची सातत्य व एकाग्रता ज्यामुळे होते तो मंत्र दिला जातो. कोणता मंत्र ते गुरूच जाणत असतात. प्रत्येक जीवाचे प्रारब्ध व संचित अनाकलनीय असते. ते फक्त "तेच" जाणतात. मग त्या शिष्याच्या कल्याणाप्रमाणे मन्त्र त्यांना प्रसवतो. व तो मंत्र ते देत असतात. असे आवश्यक नाही की मंत्र वेगळा असलाच पाहिजे किंवा असतोही. ते फक्त गुरूच जाणतात. त्यांना कारण विचारूही नये व विचारत नसतात.

आणि अनुग्रह म्हणजे सूक्ष्मातील नकळत होणारे शुध्दीकरण. नुसतेच शुध्दीकरण नाही तर अवस्थाही उंचावत असते. अनुग्रहासाठी बुद्धीची शुध्दी, विनम्रता, सेवेतील भाव आणि कृपेची गुरुंना आतून आलेली उर्मी याच गोष्टी अत्यन्त महत्त्वाच्या आहेत. हे सर्व सूक्ष्म व अति सूक्ष्म असते. त्यामुळे ते होते. ते झाले का केले असे होत नाही. म्हणजे जीवाला समजत नाही.

व्यावहारिक जगात गुरु आहेत. मंत्र घेतला आहे. दीक्षा मिळाली आहे. अनुग्रह झाला. ही वाक्ये आम्ही "होतकरू" साधकांच्या तोंडून खुप वेळा आणि कधिकधी एक सूप्त अहन्कारी समाधानाने बोलल्याचे ऐकत असतो.

ते साधक त्यान्च्या उपासनेचा बाऊ करुन घेतात व तसाच करतातही. त्यामुळे त्यांची साधक अवस्था बेगडी असते. वास्तविक मार्ग तोच असतो. पण इतरत्र रमणे, अशा साधकांचे जास्त असते.

ज्याचे जसे होईल तसे कल्याण करायचे, नक्कीच जीवाच्या पूर्वाभ्यासानेच हे ठरवले जाते. आणि तसे होणे हेच गुरुंचे दयारुपी आशिर्वाद असतात. त्यामुळे इथे व्यावहारिकतेला खूप दूर असावे लागते.

या दीक्षेचा वा अनुग्रहाचा या लौकिक जगात एकमेव "शुध्द साधना" करण्याशिवाय काहीही उपयोगी नसते. गुरु आदेशाच्या अनुकरणाने फक्त पारलौकिक कल्याण होते. ज्यांना मनुष्य जन्माला आल्यावर त्यासाठी आंतरिक तळमळ आहे, त्यांच्या पाठीशी " सर्वस्व आधार मानलेले गुरु" भक्कम आधार म्हणून उभे असतात.

इथे जरी "दिसणारा दीक्षा वा अनुग्रह" झाला तरीही, साधकांचे ना जग बदलत, ना कर्म बदलत. ना आयुष्य बदलत, ना जगणे बदलत. ना भोग, उपभोग, प्रारब्ध बदलत.

गुरुकृपेने जागी होणारी "समत्व बुद्धी" आणि तसेच केलेले आचरणातून बदल हे घडले की "मग आणि नंतरच" सन्चिताचा नाश होतो. हे सारे माझ्या आयुष्यात प्रत्येक कार्याच्या मागील हेतू शुध्द करतात. क्षणाक्षणाला सावध आणि सुरक्षित ठेवतात.

मग जे मुक्त जीवन भगवंताच्या सहवासात आणि जिवंतपणीच जगता येते हीच मोक्षप्राप्तीची अनुभूति असते. अशी मनोवृत्ती ज्याची होते त्यालाच समजते हीच "खरी दीक्षा आणि अनुभूति" आहे असे.

ही माझी विचारसेवा आहे. कोणीही दीक्षा घेतलेल्या व अनुग्रह झालेल्या साधकाने आपापल्या गुरुंना विचारल्याशिवाय हे विचार स्वीकार करु नये.

आदेश
fans
सद्गुरू कानिफनाथ महाराज भक्त परिवार,हिंदुस्थान
चैतन्य कानिफनाथ महाराज मढी
चैतन्य आवजीनाथ महाराज मिरपुर लोहारे
(गुरूशिष्य)

आज ज्येष्ठ कृष्ण द्वादशी. माऊली महावैष्णव संत श्रीज्ञानेश्वर माऊली यांचे परमवंदनीय गुरुदेव, संत श्रीनिवृत्तीनाथ महाराज य...
22/06/2025

आज ज्येष्ठ कृष्ण द्वादशी. माऊली महावैष्णव संत श्रीज्ञानेश्वर माऊली यांचे परमवंदनीय गुरुदेव, संत श्रीनिवृत्तीनाथ महाराज यांचा समाधीदिवस. दंडकारण्यामध्ये सदेह रुपात वास करणाऱ्या श्रीगहिनीनाथ यांनी ब्रह्मगिरीवरील कौलीगुडा गुहेमध्ये कुल-अकुलाचे, शिवशक्तीचे ऐक्य याविषयी निवृत्तीनाथ यांना सज्ञान करून नाथपंथाची दीक्षा दिली. नाथांनी दिलेला कृष्णमंत्र पुढे माऊलींना देत निवृत्तीनाथांनी भागवत धर्माची पताका उंचवायला सांगून उभ्या महाराष्ट्राला, हिंदुस्थानाला पसायदान लिहिणारा अवलिया दिला. श्रीक्षेत्र दक्षिण काशी असलेल्या जनस्थानी हे घडले, आपण किती भाग्यवान आहोत हे यावरून कळावे. ज्ञानदेव नावाच्या बीजात माऊली संज्ञेचा विशाल वटवृक्ष आहे, याचे अंतर्ज्ञान असलेल्या, साक्षेपी, द्रष्टा संत निवृत्तीनाथांस शतशः वंदन.

आदेश 🔱

fans
नाथ चैतन्य

विज्ञानाचे मूळ ज्ञानेश्वरीत सापडते जगातले पहीले शास्त्रज्ञ म्हणजे ज्ञानेश्वर महाराज...सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी सूर्याभ...
16/06/2025

विज्ञानाचे मूळ ज्ञानेश्वरीत सापडते जगातले पहीले शास्त्रज्ञ म्हणजे ज्ञानेश्वर महाराज...
सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा शोध कोपर्निकसने लावला. त्याचा हा सिद्धांत बायबलविरोधी असल्याने धर्ममार्तंडांनी त्याचा छळ केला. कारण बायबलमध्ये पृथ्वी स्थिर असून सूर्य फिरतो असा उल्लेख आहे (आणि यांना आपण विज्ञाननिष्ठ समजतो).
माऊलीं ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये ७२५ वर्षापूर्वीच सूर्याचे भ्रमण हा भास आहे, हे वैज्ञानिक सत्य मांडले होते.
उदय-अस्ताचे प्रमाणे |
जैसे न चालता सूर्याचे चालणे |
तैसे नैष्कर्म्यत्व जाणे |
कर्मींचि असता ||
सूर्य चालत नसून चालल्यासारखा दिसतो. सूर्याचे न चालता चालणे हा ज्ञानेश्वरीतील क्रांतीकारक शोध आहे.
मानवी जन्माची प्रक्रिया कसल्याही उपकरणाची मदत न घेता ज्ञानेश्वर महाराज जेव्हा सांगतात तेव्हा नामांकित डॉक्टरांनाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहात नाही. माऊली लिहितात,
शुक्र-शोणिताचा सांधा |
मिळता पाचांचा बांधा |
वायुतत्व दशधा |
एकचि झाले ||
शुक्र जंतू पुरुषाच्या वीर्यामध्ये असतात व शोणित पेशी स्त्रियांच्या बिजांड कोषात असतात. या शोणित पेशी अतिसूक्ष्मदर्शक यंत्राशिवाय दिसत नाहीत.
सूक्ष्मदर्शक यंत्राचा शोध चारशे वर्षांतील आहे. परंतु माऊलींनी कसल्याही सूक्ष्मदर्शकाच्या मदती-शिवाय शोणित पेशींचा उल्लेख केला आहे. इथे त्यांच्यातील सर्वज्ञता दिसते.
पृथ्वी सपाट आहे की गोल या प्रश्नावर शास्त्रज्ञांत बराच काळ वाद चालला होता. पृथ्वी गोल आहे हा सिद्धांत आता जगन्मान्य झाला आहे.
माऊली ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये ७२५ वर्षापूर्वीच पृथ्वी गोल असल्याचे सांगितले.
पृथ्वीये परमाणूंचा उगाणा घ्यावा |
तरी हा भूगोलचि काखे सुवावा |
तैसा विस्तारू माझा पाहावा |
तरी जाणावे माते ||
भूगोल हा शब्दच ज्ञानेश्वरीने मराठीला दिला आहे. आणि पृथ्वी गोल असल्याचे निःसंदिग्ध सांगताना परमाणूचाही (Micro-Electron) स्पष्ट उल्लेख केलाय.
पाण्याच्या घर्षणातून जलविद्युत निर्माण होते. हा विजेचा शोधही शे दिडशे वर्षांपूर्वीचा आहे.
परंतु माऊली ज्ञानोबाराय ७२५ वर्षांपूर्वीच सांगतात की, पाण्याचे जोरात घर्षण झाले की वीज तयार होते.
तया उदकाचेनि आवेशे |
प्रगटले तेज लखलखीत दिसे |
मग तया विजेमाजी असे | सलील कायी ||
सागराच्या पाण्याची वाफ होते, त्याचे ढग बनतात व त्याला थंड हवा लागली की पाऊस पडतो. ही पाऊस पडण्याची प्रक्रिया विज्ञानाने अलिकडे शोधून काढली आहे. परंतु माऊली ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये लिहितात की, सुर्याच्या प्रखर उष्णतेने मी परमात्माच पाणी शोषून घेतो व त्या वाफेचे ढगात रूपांतर करतो व इंद्रदेवतेच्या रूपाने पाऊस पाडतो. ती पावसाचे शास्त्रशुद्ध तंत्र सांगणारी ओवी अशी,
मी सूर्याचेनि वेषे |
तपे तै हे शोषे |
पाठी इंद्र होवोनि वर्षे |
मग पुढती भरे ||
विज्ञानाला सूर्यमालेतील ग्रहांचा शोध लागला आहे.
या विश्वाच्या पोकळीतील फक्त एकच सूर्यमाला मानवी बुद्धीला सापडली. अशा अनेक सूर्यमाला या पोकळीत अस्तित्वात आहेत. विश्वाला अनंत हे विशेषण लावले जाते. या विश्वात अनंत ब्रम्हांडे आहेत म्हणून भगवान अनंतकोटी ब्रहांडनायक ठरतात. परंतु माऊलीं ज्ञानोबारायांनी ७२५ वर्षापूर्वीच सूर्यमालेतील मंगळ या ग्रहाबद्दल लिहिले आहे. विज्ञानाने शोध लावण्यापूर्वीच माऊली मंगळाचे अस्तित्व सांगतात,
ना तरी भौमा नाम मंगळ |
रोहिणीते म्हणती जळ |
तैसा सुखप्रवाद बरळ |
विषयांचा ||
किंवा
जिये मंगळाचिये अंकुरी |
सवेचि अमंगळाची पडे पारी |
किंवा
ग्रहांमध्ये इंगळ |
तयाते म्हणति मंगळ |
इतकेच नव्हे, तर नक्षत्रांचेही उल्लेख आहेत. रोहिणीचा वरच्या ओवीत आलाय, तसेच मूळ नक्षत्र:
परी जळो ते मूळ-नक्षत्री जैसे |
किंवा
स्वाती नक्षत्र:
स्वातीचेनि पाणिये |
होती जरी मोतिये |
तरी अंगी सुंदराचिये |
का शोभति तिये ||
कॅमेरा आणि पडद्यावर दिसणारा चित्रपट यांचे मूळही ज्ञानेश्वरीत सापडते
जेथ हे संसारचित्र उमटे |
तो मनरूप पटु फाटे |
जैसे सरोवर आटे |
मग प्रतिमा नाही ||
अर्थात संकल्प-विकल्पांमुळे मनाचे चित्र उमटवणारा पडदा फाटून जातो. चित्रपटासाठी पडदा आवश्यक आहेच किंवा सरोवरात पाणी असेल तरच आपली प्रतिमा त्यामध्ये उमटते. ते आटून गेले तर उमटत नाही.
या सर्व ओव्यांचा आशय लक्षात घेतला तर ज्ञानेश्वरीची वैज्ञानिकता ध्यानात येईल.
विज्ञानयुगात दिशाभुल झालेल्या युवक-युवतींनी ज्ञानेश्वरीची ही शास्त्रीयता लक्षात घेऊन मानवी जीवनाचे यथार्थ दर्शन घडविण्या-या संत वाड़मयाच्या सहवासात यावे.
नाथ चैतन्य
आदेश

fans

Address

Navnath Sevkak Pariwar Hindusthan Pune
Pune
411028

Telephone

+919762757575

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Somnath Jagtap Deshmukh posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Somnath Jagtap Deshmukh:

Share