31/01/2022
मिशन_ उपळे दुमाला जिल्हा_ परिषद_ गट
गाठीभेटी चालू आहेत... संधी मिळाल्यास लढणार: प्रा. विठ्ठल एडके
बंधू-भगिनींनो...
मी गेल्या अनेक वर्षापासून समाजकारण आणि राजकारण यामध्ये सक्रिय आहे. माञ या दोन वर्षात राजकारणातील खूप अनुभव येत आहेत. राजकारण ही खूप तारेवरची कसरत असून अनिश्चिततेचा खेळ आहे. तरीही जनतेचे प्रेम ही खूपच मोठी गोष्ट असते. सामान्य जनता आणि माझे सर्व मिञ माझ्यासोबत आहेत.
घरातुनच राजकारणाचे बाळकडू काही प्रमाणात मिळाले चुलते अंकुश एडके झरेगावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य म्हणुन पंधरा वर्षे झरेगाव ग्रामपंचायतीचे कामकाज चांगल्या प्रकारे केले आहे. वडील बिरुदेव एडके पाच वर्षे झरेगाव ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणुन कामकाज केले आहे तसेच झरेगाव ग्रामपंचायतीमध्ये माझीप पत्नी दिपाली विठ्ठल एडके सदस्य म्हणुन काम पहात आहे. मी राज्यशास्त्र विषयात एम. ए. करत असताना राष्ट्रकुल संसदीय मंडळा मार्फत नागपूर येथील विधीमंडळाच्या अधिवेशनात सहभागी होऊन कामकाजाचा अनुभव पाठीसी आहे. सोलापूर येथे विविध वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणुन काम करत असताना सोलापूर जिल्हा परिषदेचे कामकाज जवळून अनुभवले आहे. शासकीय योजना आणि जिल्हा परिषदेचा सेस फंड या योजनाची परिपुर्ण माहिती असुन जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी मी तत्पर रहाणार आहे. मी जेव्हा राजकारणात पडलो तेव्हा जास्त अनुभव नव्हता. पण जसजसा राजकारणात रूळलो तसा मी जनतेशी एकरूप झालो. आज जनता माझ्यासोबत आहे. जनतेची सेवा हेच ब्रीद घेऊन पुढील सर्व वाटचाल होईल.
सध्या मिञपरिवार आणि जनतेच्या आग्रहास्तव जिल्हा परिषदेची निवडणूक लढवण्यास सज्ज झालो आहे. मी जनतेच्या अपेक्षांची परिपूर्ती करण्यासाठी कटीबध्द आहे.
मी संकल्प करतो आहे विजयाचा..!
आपली खंबीर साथ आणि प्रेम हेच माझे सामर्थ्य आहे. संधी _मिळाली _तर निश्चितच संधीचे सोने होईल यात तीळमाञ शंका नाही.
आपलाच
प्रा. विठ्ठल बिरुदेव एडके