FTE Studios

FTE Studios FTE STUDIOS is a film and ott content production and streaming venture by FTE Group.

19/08/2025

शिव बिन शक्ति कहां, शक्ति बगैर शिव कहां!
सृष्टीच्या सृजनातील अत्यंत महत्त्वाची दोन तत्व. एकाशिवाय दुसरे अपूर्ण तरी स्वतःतच परिपूर्ण. आज चौथ्या श्रावणी सोमवार निमित्त शिवशक्तीचे या कडीतील अंतिम तैलचित्र प्रस्तुत.
हर हर महादेव 🙏🏼🔱🚩

कृपया आपला अभिप्राय कळवावा, व सदर पोस्ट आवडल्यास "Repost" करावी 🙏🏼

19/08/2025

मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना ।
मत्स्थानि सर्वभूतानि न चाहं तेष्ववस्थित: ॥ 

श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त तैलचित्रांची शृंखला आपल्यासोबत प्रस्तुत करायचा प्रयत्न केला, वेगवेगळ्या भावातील कृष्णरूपे साकारली. या शृंखलेतील आठवे चित्र सादर करून ही शृंखला संपन्न करीत आहे.

माझ्या "Instagram Channel" ला नियमीत माहितीसाठी "Follow" करा. व आपला अभिप्राय नक्की कळवा...
हरे कृष्ण 🪈🦚🐚🙏🏼

19/08/2025

ज्याच्या रूपाने अशांत मन देखील अथांग शांतता अनुभवत. भगवान विष्णूचा आठवा अवतार, श्रीकृष्ण 🙏🏼
कृष्ण जन्माष्टमीच्या पावन मुहूर्तावर या शृंखलेतील सातवे तैलचित्र प्रस्तुत करत आहे.

माझ्या "Instagram Channel" ला नियमीत माहितीसाठी "Follow" करा. व आपला अभिप्राय नक्की कळवा...
हरे कृष्ण 🪈🦚🐚🙏🏼

14/08/2025

बासरी जितकी कृष्णाच्या पूर्णत्वाची वाटेकरी आहे तितकीच "राधा". इतिहास आणि पौराणिक दाखल्यांच्या भूमिकेतून विचार करण्यापेक्षा प्रेमाच्या वैश्विक दृष्टिकोनातून विचार केल्यास यासारखे अत्यंत खोल आणि पवित्र नाते शोधून सापडणार नाही. कदाचित स्वतःचाच एक भिन्न आयाम. म्हणूनच गजरात "राधा कृष्ण" हा गजर केला जातो.
हे तैलचित्र चितारताना राहून राहून लगान चित्रपटातील एक संवाद स्मृतीत येत होता "कृष्ण और राधा मान लो, कमल के पत्ते पे पानी की बूंद जैसे। एक भी नहीं हुए और कभी अलग भी नहीं।" या अत्यंत सुंदर आणि निर्मळ तत्वाला कृष्ण जन्माष्टमी च्या पूर्वसंध्येच हे चित्र समर्पित ❤️

माझ्या "Instagram Channel" ला नियमीत माहितीसाठी "Follow" करा. व आपला अभिप्राय नक्की कळवा...
हरे कृष्ण 🪈🦚🐚🙏🏼

14/08/2025

कृष्णाची अनेक रूप आहेत, कधी तो चक्रधर आहे तर कधी गिरीधर. कधी तो अर्जुनाच सारथ्य करतो तर कधी सुदाम्याचे पोहे खातो. कधी तो द्रौपदीचा रक्षणकर्ता आहे तर कधी राधेचा सखा. कधी माखन चोर तरी कधी अर्जुनाच्या माध्यमातून महाविष्णूचे विश्र्वरूप दाखवतो पण कलाकारांना भावणारा देव म्हणजे निरागस मुरलीधर. महाभारताच्या गदारोळात कुठेतरी हा पावा हरवला पण त्या बासरीचे सूर कृष्णाच्या चरित्रात आणि या भुलोकीच्या वातावरणात अगदी मोरपिसाने कोरल्यासारखे मिसळले. म्हणूनच कुठुनही वेणुनाद ऐकू आला तरी त्या कृष्ण तत्त्वाचे शाश्वत अस्तित्व जाणवते. या शृंखालेतील पाचवे तैलचित्र त्याच मुरलीधर रूपाला समर्पित.

माझ्या "Instagram Channel" ला नियमीत माहितीसाठी "Follow" करा. व आपला अभिप्राय नक्की कळवा...
हरे कृष्ण 🪈🦚🐚🙏🏼

11/08/2025

मध्यंतरी राजा रवि वर्मा यांचे चरित्र वाचायचा योग आलेला, त्यांची चित्रे तर लहानपणापासूनच पहात आलोय. त्यामुळे त्या शैलीबद्दल मला प्रचंड कुतूहल होते. आता त्या शैलीची फोड करून संपूर्ण विवरण करणे जरी एका अर्थी शक्य असले तरी चित्रकारितेची ही शैली स्वतःतच एक अद्भुत कोडे आहे. आपण देखील या शैलीत प्रयत्न करावा ही बरेच दिवसांची इच्छा होती पण मुळातच अत्यंत बारकाव्याने युक्त असणाऱ्या या शैलीला, किंतानावरती उतरवणे तितकेच कठीण होते. पण हातून हे घडावे ही त्या वासुदेवाचीच इच्छा असेल म्हणून हे शक्य झाले. श्रीकृष्ण चित्र शृंखलेतील हे तिसरे तैलचित्र.

माझ्या "Instagram Channel" ला नियमीत माहितीसाठी "Follow" करा. व आपला अभिप्राय नक्की कळवा...
हरे कृष्ण 🪈🦚🐚🙏🏼

10/08/2025

जिवमात्रांत ईश्वर या तत्वाप्रमाणे आपल्या अवतारकार्यात ज्या रूपाने सर्वांना प्रेमाचीच भाषा बोलायला लावली, अगदी आपल्या मुरलीच्या स्वरांवरती गाईंनाही डोलायला लावले, त्या गोपाळाचे हे रूप तैलचित्रात घडवायचा प्रयत्न... कृष्ण शृंखलेतील दुसरे तैलचित्र...

माझ्या "Instagram Channel" ला नियमीत माहितीसाठी "Follow" करा. व आपला अभिप्राय नक्की कळवा...
हरे कृष्ण 🪈🦚🐚🙏🏼

09/08/2025

श्रावण महिना म्हटला की श्रीकृष्ण जन्माष्टमी आलीच. कलाकारांसाठी, सहिष्णू माणसांसाठी प्रेरणा स्थान म्हणजे भगवान श्रीकृष्ण. या जन्माष्टमी सप्ताहाच्या माध्यमातून कृष्णाच्या आठ तैल चित्रांची शृंखला आपल्यासमोर सादर करत आहे.

माझ्या "Instagram Channel" ला नियमीत माहितीसाठी "Follow" करा. व आपला अभिप्राय नक्की कळवा...
हरे कृष्ण 🪈🦚🐚🙏🏼

09/08/2025

मी विशेषतः कधी आधुनिक किंवा अमूर्त कला प्रकारात जास्त रमलो नाही, माझ्याकडून जास्तीत जास्त अतिवास्तववादी चित्रेच चितारली गेली पण हा विषयच असा होता की इथे या प्रकारातील कलाच जास्त गंभीर भाष्य करू शकेल. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला हे चित्र सादर करताना हाच मानस आहे... तुम्हाला हे चित्र पाहून काय जाणीव होते, काय अनुभूती होते हे अभिप्रायांद्वारे मला कळवावे. या प्रकारातही समृद्ध होऊन कुंचलेला वेगळा ठेहराव द्यायचा मानस आहे...

नियमीत चित्रे व अन्य कलाप्रकार पाहण्यासाठी माझे "Instagram Channel" शी जोडले जा...

09/08/2025

सृष्टीचा संहार करता, अशी जरी शिवाची ओळख असली तरी त्याच सगुण आणि निर्गुण रूपात तिनही तत्वांची व ब्रह्मांडाची अनुभूती होते. शेवटी नाव अनेक, पण ऊर्जा एक. अनुभूती अनेक, पण शक्ती एक! श्रावण सोमवार निमित्त शिवरूपाचे दुसरे तैलचित्र 🙏🏼🔱🚩

हे माझ्या महाराष्ट्राचं भविष्य आहे.यांच्या भावनांशी खेळलात,तर याद राखा...गाठ माझ्याशी आहे."पुन्हा शिवाजीराजे भोसले"याजसा...
09/07/2025

हे माझ्या महाराष्ट्राचं भविष्य आहे.
यांच्या भावनांशी खेळलात,
तर याद राखा...
गाठ माझ्याशी आहे.

"पुन्हा शिवाजीराजे भोसले"
याजसाठी केला होता अट्टहास



Written & Directed by:


Produced by:



Dialogues :

Starring:
thosar02_official

Address

FTE Group, Narsinha Chintamani Kelkar Road, Narayan Peth
Pune

Opening Hours

Monday 4pm - 8pm
Tuesday 4pm - 8pm
Wednesday 4pm - 8pm
Thursday 4pm - 8pm
Friday 4pm - 8pm

Telephone

+918208998033

Alerts

Be the first to know and let us send you an email when FTE Studios posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to FTE Studios:

Share

FTE Web Shiriyal

Web Shiriyal is a platform by FTE Group for production & broadcasting of WEB Series, Short Films, Documentaries etc.