09/09/2026
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. "रोहित पवार गेल्या चार वर्षांपासून एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे नेतृत्व करण्याचा प्रयत्न करत आहेत. एमपीएससीचे विद्यार्थी हुशार आणि बुद्धिमान आहेत, त्यांच्यासाठी काहीतरी करतोय हे दाखवून तळागाळापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा हा राजकीय खटाटोप आहे," अशी टीका पडळकर यांनी सांगलीत माध्यमांशी बोलताना केली.