30/07/2025
Good news to all Buddhists in India .
1898 साली पिप्रहवा येथे सापडले भगवान बुद्धांचे शारिरीक धातु भारतात परत आणले गेले आहेत.सदर धातु ज्यात भगवान बुद्धांचे अस्थिधातु मौल्यवान रत्न , सोन्याची आभुषणे आहेत आता पर्यंत हे धातु ब्रिटिश ईंजीनियर विल्यम पेपे व त्यांच्या कुटुंबाकडे होते जे त्यांनी लिलावासाठी आंतरराष्ट्रीय बाजारात उपलब्ध केले होते पण सर्व बौद्ध जगतातुन झालेल्या विरोधामुळे हा लिलाव थांबवून भगवान बुद्धांचे धातु भारत सरकार कडे सोपविण्यात आले आहेत आणि 127 वर्षांनंतर पुन्हा बुद्ध धातु भारतात परत आले आहेत .
हे धातु भगवान बुद्धांचे कुटुंबीय म्हणजेच शाक्यांनी पिप्रहवा जि.सिद्धार्थनगर ऊत्तर प्रदेश म्हणजेच मुळ कपिलवस्तु येथे एका स्तुपात स्थापन केले होते.
विल्यम पेपेंनी सदर स्तुपाचे ऊत्खनन करुन हा मौल्यवान वारसा शोधुन काढला होता व जतन केला होता .
पिप्रहवा येथील बरेचशे धातु व इतर अवशेष जसे की धातु करंडक हे कोलकता येथील संग्रहालयात ठेवलेल्या आहेत पण महापरिनिर्वाण सुत्तामध्ये तथागतांनी सांगीतल्या प्रमाणे भगवंतांच्या शारिरीक धातुंवर स्तुप ऊभरुन त्यांना आदरपूर्वक स्थापीत केले गेले पाहिजे. म्हणुन भारतात दिल्ली व कोलकता संग्रहालयात असलेले बुद्ध धातु हे सर्व जगाच्या प्रेरणा व कल्याणासाठी लवकरात लवकर भव्य स्तुपात स्थापीत करण्यात यायला हवे.
कारण भगवान बुद्ध कोण्या एका देशाचे अथवा समुहाचे नसुन समस्त मानव सभ्यतेचे मुकुटमणी आहेत .
Atul Salve Vajrapani