पुणे शहराचा सार्वजनिक गणेशोत्सव संपूर्ण देशात लोकप्रिय आहे.पुणे शहरात बाहेरून आलेल्या नागरिकांना विशेषतः महिलांना महाराष्ट्रातील महिलांचे माहेरघर असणाऱ्या तुळशीबागेचे विशेष आकर्षण असते,सार्वजनिक गणेशोत्सव काळात बाजीराव रस्त्यावरील तुळशीबागेच्या मुख्य प्रवेशद्वारातून येणाऱ्या नागरिकांना सर्वप्रथम दर्शन होते ते श्री गजानन मित्रमंडळाच्या गणेशमूर्तीचे.साधारण ५० वर्षांपूर्वी स्थानिक नागरीक कै.धोंडीबा
दहिभाते, व लहान मुलांच्या कपड्यासाठी सुप्रसिद्ध असणाऱ्या गजानन होजिअरीचे मालक कै.शालगर यांनी अतिशय छोट्या प्रमाणात या गजानन मित्रमंडळाची स्थापना केली.प्रारंभिक काळात स्थानिक नागरिक,काही दुकानदार व ह्या परिसरात पथारी व्यवसायिक हेच मंडळाचे कार्यकर्ते होते.सुरवातीला रुपया-दोन रुपये वर्गणी गोळा करून गणेशोत्सव साधेपणाने साजरा केला जात असे.सदर
मंडळ स्थापना करण्यामागे संस्थापकांचा उदेश स्थानिक नागरिक,व्यापारिक व पथारी व्यवसायिक यांच्यात सुसंवाद व्हावा व यथा शक्ती सामाजिक कार्ये घडवीत हाच होता.काळाच्या ओघात मंडळाच्या परिसरातील बऱ्याच जुन्या वाड्यांचे,वस्तूंचे व्यपारीकरण झाले व स्थानिक नागरिक उपनगरांमध्ये रहावयास गेले तेव्हापासून सदर मंडळ हे प्रामुख्याने पथारीव्यवसायिक व दुकानदार,व्यापारिक यांचे एकत्रित सहकार्याने करीत आहेत. मंडळामुळे स्थानिक नागरिक व व्यवसायिक यांच्या मध्ये जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झालेले आहेत त्यामुळे दुसरीकडे रहावयास गेलेले स्थानिक नागरिक,जुने भाडेकरू गणेशोत्सव काळात व इतरवेळीही मंडळात येत असतात,मंडळाचे उपक्रमांमध्ये भाग घेतात.
श्री गणेशमुर्तीसाठी २००५ मध्ये मंडळाचे पदाधिकारी,कार्यकते व दुकानदार यांचे संयुक्त प्रयत्नाने संपूर्ण संगमरवरी असे सुंदर देवालय निर्माण करण्यात आले.रक्तदान शिबीर,कार्यकर्त्यांसाठी व परिसरातील व्यावसायिक आरोग्य तपासणी शिबीर,वारकरी भोजन,श्री गणेश जयंती निमित्त मुख्यद्वार भंडारा असे अनेक उपक्रम मंडळाच्या वतीने राबविले जातात.
आगामी काळत परिसरातील व्यावसायिकांना आर्थिक मदत करणे,त्यांच्या कुटुंबातील बेरोजगार सदस्यांना कौशल्य आधारित व्यवसाय प्रशिक्षणाचा कार्यक्रम ठरविणे व तुळशीबाग परिसरात येणाऱ्या महिलांचे सुरक्षिततेसाठी CCTV कॅमेरा बसविणे असे उपक्रम मंडळाच्या माध्यमातून घेणार आहोत.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ २०१७ साठी मंडळाने एकमताने तरुण,तडफदार श्री सागर सुनिल दहिभाते यांची निवड केलेली आहे.