Punha Ekada

Punha Ekada Film production house.

12/08/2025

9 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट, या स्वातंत्र्य दिनाच्या आठवड्यामध्ये पुन्हा एकदा या चित्रपटावर 50 टक्क्यांची सूट आहे. आता हा चित्रपट तुम्ही फक्त 49 रुपयांमध्ये बघू शकता.

9 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट, या स्वातंत्र्य दिनाच्या आठवड्यामध्ये पुन्हा एकदा या चित्रपटावर 50 टक्क्यांची सूट आहे.  आता हा चित्र...
10/08/2025

9 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट, या स्वातंत्र्य दिनाच्या आठवड्यामध्ये पुन्हा एकदा या चित्रपटावर 50 टक्क्यांची सूट आहे. आता हा चित्रपट तुम्ही फक्त 49 रुपयांमध्ये बघू शकता.

आज सरळ www.punhaekadamovie.com वेबसाईटवर रिलीज करण्यात आलेला “पुन्हा एकदा” हा मराठी चित्रपट पाहिला. अरुण आणि त्याची पत्न...
26/07/2025

आज सरळ www.punhaekadamovie.com वेबसाईटवर रिलीज करण्यात आलेला “पुन्हा एकदा” हा मराठी चित्रपट पाहिला. अरुण आणि त्याची पत्नी सुधा एका कामानिमित्य कोकणामध्ये जातात आणी त्यांच्या याच प्रवासाची गोष्ट म्हणजे पुन्हा एकदा. या प्रवासा दरम्यान अरुण आणि सुधा यांचं आयुष्य आपल्यापुढे उलगडू लागतं. आणि त्यातून एक-एक नव-नवीन माहिती समोर येऊ लागते. हा संपूर्ण सिनेमा नॉन-लिनियर स्ट्रक्चरमध्ये आपल्यापुढे येतो. खरतर मराठीमध्ये अशा प्रकारच्या नॉन लिनियर स्ट्रक्चरमध्ये खूप कमी सिनेमा लिहल्या गेलाय. पुन्हा एकदा आर्ट सिनेमा आणि कमर्शियल सिनेमा यांचा सुवर्ण मध्य साधतो.
या चित्रपटाची भक्कम बाजू म्हणजे चित्रपटातील प्रमुख कलाकारांचा अभिनय. अरुणची भूमिका केलीय ते अनुराग दळवी याने आणि सुधाची भूमिका केलीय स्वप्नजा सतीश या अभिनेत्रीने, दोघांनी कमाल काम केलय. ब्रिजवरचा सीन बघताना डोळ्यात पाणी दाटून येतं. शेवटी सुधा जेव्हा जात असते, तेव्हा दोघेही आतून पूर्णपने खचलेले आहेत, कमाल !! चित्रपटाच्या म्युझिकबद्दल काय बोलावं ! चित्रपट दोन काळामध्ये दिसतो तिथे वेग-वेगळ्या प्रकारचे म्युझिक, काही जागी म्युझिकच वापर न करता फक्त शांतता, शेवटी समुद्राच्या सीनमध्ये फक्त एक आलाप, संगीत दिग्दर्शक एल.के. लक्ष्मीकांत यांनी संगीताचा खूप प्रगल्भपणे वापर केलय. “माझ्या मनाची व्यथा” हे गाण खूप जमून आलय. खरतर या चित्रपटाला मोठ्या पडद्यावर रिलीज करायला हवं होतं, पण सिनेमाला कुणी डिस्ट्रिब्युटर न मिळाल्यामुळे सरळ वेबसाईटवर रिलीज करण्यात आलाय. आपण तमिळ आणि मल्याळम सिनेमाबद्दल खूप बोलतो पण तिथेच आपला एक मराठी निर्माता एवढा सुंदर चित्रपट सरळ वेबसाईटवर करावा लागतो, त्याबद्दल थोडी सुद्धा चर्चा होत नाही. ही खूप दुखद गोष्ट आहे. चित्रपटाची लिंक शेयर करतोय. तुम्ही बघा लोकांना पण दाखवा, चर्चा सुद्धा करा तेव्हाच मराठी सिनेमाला प्रेक्षक मिळतील...
-प्रणव बोके (अमरावती)
Link : www.punhaekadamovie.com

पुन्हा एकदा या वर्षीचा सर्वात हृदयस्पर्शी चित्रपटमराठी सिनेमाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखादा चित्रपट स्वतःच्या वेबसाईटवर...
26/07/2025

पुन्हा एकदा या वर्षीचा सर्वात हृदयस्पर्शी चित्रपट
मराठी सिनेमाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखादा चित्रपट स्वतःच्या वेबसाईटवर रिलीज होत आहे मागील दोन वर्षापासून ज्या स्वप्नावर काम करत होतो ते आज या चित्रपटाच्या माध्यमातून तुमच्यापुढे येत आहेत. चित्रपट पाहण्यासाठी पुढील वेबसाईटला भेट द्या. https://www.punhaekadamovie.com

22/07/2025

https://youtu.be/WtO1oPSBQFo?si=rJvDJ1Lm2nB3z-_3“एक ब्रेकअपची गोष्ट” च्या यशानंतर, पीलग्रिम पिक्चर्स घेऊन येत आहे या वर्...
26/04/2025

https://youtu.be/WtO1oPSBQFo?si=rJvDJ1Lm2nB3z-_3
“एक ब्रेकअपची गोष्ट” च्या यशानंतर, पीलग्रिम पिक्चर्स घेऊन येत आहे या वर्षीचा सर्वात हृदयस्पर्शी मराठी चित्रपट, “पुन्हा एकदा”
निर्माता, लेखक आणि दिग्दर्शक : अनुराग दळवी
एल. के. लक्ष्मीकांत म्युजिकल
अनुराग दळवी, डॉ. स्वप्नजा सतीश, अमोल मारुती रेडीज, अमोल गिरासे, स्वरुप कोरगांवकर, सायली भापकर
छायांकन : मयूर रामचंद्र परनकर,
संकलन आणि डी.आय.:विशाल सरोदे,
ध्वनि : आयुष अडांगळे
ध्वनि आरेखन : आदित्य देशमुख,
व्ही.एफ.एक्स : रोहिदास मिसाळ,
प्रथम सहाय्यक दिग्दर्शक : प्रजिता देवराम बुरुड,
स्थिर छायाचित्रण: मंगेश नागनाथ कसबे,
रंगभूषा : केदार परमेश्वर लक्ष्मण,
वेशभूषा : अनुराग दळवी,
गीत : मुकुंद भालेराव, राहुल काळे आणि अनुराग दळवी,
गायन : एल.के. लक्ष्मीकांत, स्नेहा ठाकरे आणि अबोली गिर्हे
प्रॉडक्शन्स मॅनेजर : किरण वसंत इंगळे
लाईन प्रोड्यूसर : गंगाराम विश्वनाथ मोहिते,
कार्यकारी निर्माता : स्नेहा ठाकरे
चित्रपटाबद्दल आधिकारिक अपडेट्स, टीझर्स आणि इतर माहितीसाठी आम्हाला फॉलो करा.

“एक ब्रेकअपची गोष्ट” च्या यशानंतर, पीलग्रिम पिक्चर्स घेऊन येत आहे या वर्षीचा सर्वात हृदयस्पर्शी मराठी चित्रपट, “...

खरंतर अशोक सराफ सरांना हा पुरस्कार मिळण्यासाठी खूपच उशीर झालाय. जेव्हा हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये आपल्या आई वडिलांच्या पु...
29/01/2025

खरंतर अशोक सराफ सरांना हा पुरस्कार मिळण्यासाठी खूपच उशीर झालाय. जेव्हा हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये आपल्या आई वडिलांच्या पुण्याईवर स्थिरावलेल्या आणि अवघ्या तिशीत असलेल्या कलाकारांना पद्मश्री मिळतो, अशा वेळी असा कलाकार ज्याने स्वबळावर कित्येक वर्ष मराठी चित्रपट सृष्टीवर राज्य केलं आणि एवढेच नव्हे तर नवद्दच्या दशकात
जेव्हा मराठीसृष्टी आर्थिक अडचणींमधून जात होती. तेव्हा कित्येक निर्मात्यांना मदत करून त्यांचे चित्रपट पूर्ण केले आणि स्पॉट बॉईज, लाईट बॉईज यांचे संसार चालवले. अशा या कलाकाराला एवढ्या काळानंतर पद्मश्री मिळतोय. असो, यानंतर पुढे मराठी चित्रपटात काम करणाऱ्या कलाकारांसाठी पद्म पुरस्कारांची वाट मोकळी होईल,आणि पुढे महेश कोठारे,सचिन पिळगावकर अशा दिग्गज मंडळींना आणि त्याचबरोबर मराठी सिनेमात सातत्याने चांगल काम करणाऱ्या तंत्रज्ञ, लेखक,दिग्दर्शक अशा सर्व मंडळींना सुद्धा पुरस्कारासाठी ग्राह्य धरल्या जाईल अशी अपेक्षा करतो. पद्मश्री अशोक सराफ सरांना त्यांच्या या चाहत्याकडून हार्दिक शुभेच्छा...

21/01/2025

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Punha Ekada posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Punha Ekada:

Share