27/05/2026
वर्षभर टिकणारे पारंपरिक कैरीचे लोणचे 🥭
साहित्य
कच्च्या टणक कैऱ्या – १ किलो
मीठ – २०० ते २५० ग्रॅम
लाल तिखट – १५० ग्रॅम
मोहरी ची डाळ – १०० ग्रॅम
मेथीदाणे – २ टेबलस्पून
हळद – २ टेबलस्पून
हिंग – १ टीस्पून
तेल (मोहरीचे किंवा शेंगदाणा तेल) – ४०० ते ५०० मि.ली.
कृती
१) कैऱ्या स्वच्छ धुवून पूर्ण कोरड्या पुसून घ्या.
त्यात अजिबात पाणी राहू देऊ नका.
मध्यम आकाराचे तुकडे करा.
२) मसाला तयार करा
मेथीदाणे हलके भाजून जाडसर कुटून घ्या.
मोठ्या भांड्यात मोहरी दाळ, मेथी पूड, तिखट, हळद, हिंग आणि मीठ एकत्र करा.
३) लोणचे मिक्स करा
कैरीचे तुकडे मसाल्यात घाला आणि व्यवस्थित मिक्स करा.
४) तेल गरम करणे
तेल चांगले गरम करून पूर्ण थंड होऊ द्या.
थंड झालेले तेल लोणच्यात घालून नीट हलवा.
५) भरून ठेवणे
पूर्ण कोरड्या काचेच्या बरणीत लोणचे भरा.
वर तेलाचा थर राहिला पाहिजे.
३–४ दिवस रोज एकदा कोरड्या चमच्याने हलवा.
वर्षभर टिकण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स ✨
*पाण्याचा एक थेंबही जाऊ देऊ नका.
*नेहमी कोरडा चमचा वापरा.
*लोणचे पूर्ण तेलाखाली राहिले पाहिजे.
*ओलसर हात लावू नका.
*उन्हात १–२ दिवस ठेवले तर चव अजून छान येते.
She Plans Dinner
सोनाली कुलकर्णी
#मराठीरेसिपी