Abhipsa Marathi Masik

Abhipsa Marathi Masik 'Abhipsa' is a Marathi monthly magazine devoted to Sri Aurobindo and The Mother's thought.

आंतरिक युद्ध – ४१महत्त्वाकांक्षेतून उठलेल्या ऊर्मी व तत्सम गोष्टी नेहमी ‘प्राणिक मन' (vital mind) किंवा ज्याला 'प्राणाचे...
07/09/2026

आंतरिक युद्ध – ४१

महत्त्वाकांक्षेतून उठलेल्या ऊर्मी व तत्सम गोष्टी नेहमी ‘प्राणिक मन' (vital mind) किंवा ज्याला 'प्राणाचे मन' (mind of the vital) असे म्हणता येईल, त्यामध्ये उदय पावतात. आणि तेथून त्या उसळी मारून, विचारशील मनापर्यंत (thinking mind) येऊन पोहोचतात आणि मानसिक इच्छेची मान्यता व अनुमती मिळावी म्हणून त्या मागणी करू लागतात.

उसळी मारून वर आलेल्या या उर्मींमुळे जेव्हा विचारशील मन झाकोळले जाते, तेव्हा ते वाहवत जाते आणि त्या भरात ते मान्यता देऊन बसते. विचारशील मनाने (तर्कबुद्धीने) नेहमीच उच्चस्थानी अविचल राहिले पाहिजे आणि प्राणाच्या कचाट्यात न सापडता किंवा त्यामुळे वाहवत न जाता, योग्य काय आणि अयोग्य काय याचा निवाडा केला पाहिजे.

- श्रीअरविंद (CWSA 31 : 239)

(सौजन्य : – अभीप्सा मराठी मासिक)

आमच्या auromarathi.org या वेबसाईटला आणि AUROMARATHI या युट्यूब चॅनलला जरूर भेट द्या आणि सबस्क्राईब करा.

**

Inner Battle – 41

Suggestions of ambition etc. are always born in the vital mind or, as it might be called, the mind of the vital and from there they rush up to the thinking mind and claim its assent and the sanction of the mental will.

When the thinking mind gets clouded by the uprush, it gets carried away and gives its assent. The thinking mind (reason) has always to remain unmoved above and judge what is right without being caught and carried away by the vital.

-Sri Aurobindo (CWSA 31 : 239)

Do visit and subscribe to our website auromarathi.org and YouTube channel AUROMARATHI.

३९४) आत्मा आणि चैत्य पुरुष यातील फरक
06/09/2026

३९४) आत्मा आणि चैत्य पुरुष यातील फरक

...

आंतरिक युद्ध – ४०(श्रीअरविंद लिखित पत्रामधून...)‘क्ष' ला काही अनुभव आले असणे शक्य आहे. कारण त्याच्याकडे कदाचित एक प्रकार...
06/09/2026

आंतरिक युद्ध – ४०

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून...)

‘क्ष' ला काही अनुभव आले असणे शक्य आहे. कारण त्याच्याकडे कदाचित एक प्रकारची मानसिक शक्ती आहे आणि त्यामुळे तो जे काही वाचत असतो, त्या गोष्टींचा त्याला साक्षात्कार झाला आहे, अशी त्या शक्तीच्या आधारे तो कल्पना करू शकतो. पण तो प्राणप्रधान जीवन जगत आहे. त्याला जे अनुभव येतात किंवा तो जे काही स्वीकारतो त्या सगळ्या गोष्टी त्याच्या प्राणाद्वारे (vital) ग्रहण केल्या जातात आणि प्रत्यक्षात त्या गोष्टी जेवढ्या आहेत त्यापेक्षा तो त्या शंभर पटीने फुगवून सांगतो. त्याचे सगळे दावे अवाजवी, हास्यास्पद असतात. बहुतांशी लोकांप्रमाणे त्यालासुद्धा 'अतिमानस' (supramental) म्हणजे काय आहे याची पुसटशी देखील कल्पना नाहीये हे तर उघडच आहे. जे कोणी प्राणप्रधान जीवन जगत असतात आणि जे अतिशय गर्विष्ठ असतात त्यांना असे वाटू लागते की, आपल्याला सर्व गोष्टी साध्य झालेल्या आहेत; आपल्याला अजिबात अहंकार नाहीये; आणि मी जे काही ग्रहण करत आहोत ते सर्व ईश्वराकडून आलेले आहे.

कारण प्राणिक अहंकार हा नेहमीच उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी उतावीळ झालेला असतो. महान होण्यासाठी, सिद्ध पुरुष होण्यासाठी तो अधीर झालेला असतो आणि त्यामुळे अगदी सहजच त्याची अशी समजूत होते की, त्याला या सर्व गोष्टी प्राप्त झाल्या आहेत.

'क्ष'ला त्याच्या मार्गाने जाऊ दे. त्याच्या स्व-संतुष्टतेला धक्का पोहोचविण्याचा काही उपयोग नाही. कारण कदाचित स्वत:ला अभिव्यक्त करण्यासाठी तो तेवढा एकच मार्ग उपयोगात आणू शकतो, असे दिसते.

- श्रीअरविंद (CWSA 31 : 240)

(सौजन्य : – अभीप्सा मराठी मासिक)

आमच्या auromarathi.org या वेबसाईटला आणि AUROMARATHI या युट्यूब चॅनलला जरूर भेट द्या आणि सबस्क्राईब करा.

**

Inner Battle – 39

It is possible that X has experiences for he has probably some mental force and through that can build up mental realisations of what he reads, but he lives in the vital and whatever he experiences or receives the vital takes it and makes it a hundred times bigger in its construction than it really is. His claims are preposterous. It is evident that, like most people, he has no idea what the supramental is or he would never talk like that.

People who live in the vital and have much vanity (there have been several examples here too) easily get the idea that they have attained everything, are without ego, all they receive is from the Divine (even when a magnified ego is driving them) etc. etc., for the vital ego is eager to arrive, to be big, to be siddha, and it persuades itself very easily that it is all these things.

Let him however go on his own way; it is no use disturbing his self-content, as probably it is the only kind of self-expression he can do.

-Sri Aurobindo (CWSA 31 : 240)

Do visit and subscribe to our website auromarathi.org and YouTube channel AUROMARATHI.

ऑरोमराठी नवनीत• लिंक - https://youtu.be/UAlDhiH_m3s• आजचा विषय -  परिसरीय चेतना - स्वरूप आणि कार्य• कालावधी - सुमारे १४ ...
05/09/2026

ऑरोमराठी नवनीत
• लिंक - https://youtu.be/UAlDhiH_m3s
• आजचा विषय - परिसरीय चेतना - स्वरूप आणि कार्य
• कालावधी - सुमारे १४ मिनिटे

'परिसरीय चेतना' या विषयांतर्गत हा अंशभाग. *स्वत:ला ओळखा - भाग ०...

आंतरिक युद्ध – ३९एखाद्या व्यक्तीमध्ये महत्त्वाकांक्षा असूनसुद्धा, त्या व्यक्तीला अनेक सिद्धी किंवा शक्ती प्राप्त होऊ शकत...
05/09/2026

आंतरिक युद्ध – ३९

एखाद्या व्यक्तीमध्ये महत्त्वाकांक्षा असूनसुद्धा, त्या व्यक्तीला अनेक सिद्धी किंवा शक्ती प्राप्त होऊ शकतात. काही योगी असेही असतात की, जे अत्यंत अहंकारी असूनसुद्धा, त्यांना मोठमोठ्या 'सिद्धी' प्राप्त झालेल्या असतात.

मात्र, ते जोवर महत्त्वाकांक्षा आणि अहंकार यांवर विजय संपादन करत नाहीत तोपर्यंत त्यांना 'मुक्ती' लाभू शकत नाही, हे निश्चित !

- श्रीअरविंद (CWSA 31 : 239)

(सौजन्य : – अभीप्सा मराठी मासिक)

आमच्या auromarathi.org या वेबसाईटला आणि AUROMARATHI या युट्यूब चॅनलला जरूर भेट द्या आणि सबस्क्राईब करा.

**

Inner Battle – 39

A kind of siddhi or siddhis can come [even if there is ambition in the nature] — siddhis of power etc. There are Yogins who have great powers and also a big ego.

Of course there can be no liberation without overcoming ambition and ego.

- Sri Aurobindo (CWSA 31 : 239)

Do visit and subscribe to our website auromarathi.org and YouTube channel AUROMARATHI.

आंतरिक युद्ध – ३८(महत्त्वकांक्षा आणि सिद्धींचे प्रदर्शन यासंबंधी श्रीमाताजींनी जे विवेचन केले होते ते आपण काल विचारात घे...
04/09/2026

आंतरिक युद्ध – ३८

(महत्त्वकांक्षा आणि सिद्धींचे प्रदर्शन यासंबंधी श्रीमाताजींनी जे विवेचन केले होते ते आपण काल विचारात घेतले. त्यावरच आधारित एक प्रश्न एका साधकाने त्यांना विचारला आहे.)

साधक : ‘महत्त्वाकांक्षा हा जणू एक रोग असतो,' असे तुम्ही का म्हटले आहे?

श्रीमाताजी : ती एक उपमा आहे. एखादा अतिशय रसरशीत आंबा असतो, दिसायला तो अगदी उत्तम दर्जाचा दिसत असतो पण जेव्हा तुम्ही तो कापून पाहता तेव्हा तुम्हाला त्यामध्ये एक अळी आढळते. याचे कारण ते फळ तयार होत असतानाच किड्याने त्यामध्ये अंडे घातलेले असते, पण बाहेरून मात्र त्याचा मागमूससुद्धा लागत नाही. (तसंच आहे हे.)

बाहेरून व्यक्ती अगदी विनम्र, निरपेक्ष असल्यासारखी वाटते. पण आतमध्ये, खोलवर कोठेतरी तळाशी व्यक्तीमध्ये एक महत्त्वाकांक्षा दडलेली असते. म्हणजे आपल्याला काहीतरी असामान्य स्थान मिळावे, प्रत्येकाने आपल्याला मान द्यावा अशी सुप्त इच्छा तिच्यामध्ये दडलेली असते. हा अहंकार असतो. आणि हाच तो रोग असतो. तो दबा धरून बसलेला असतो, पण तो तिथे असतो.

त्यामुळे व्यक्तीला जेव्हा सिद्धी प्राप्त होते तेव्हा, वास्तविक आपण कोणीच नाही, हे मिळविण्याची आपली पात्रता नाही याची जाणीव तिने ठेवली पाहिजे आणि त्यावेळी शक्य तितके अविचल राहिले पाहिजे. पण तसे न करता व्यक्ती स्वतःची फसवणूक करते. प्रत्येकाने माझ्या सिद्धींची दखल घेतली पाहिजे, अशी गरज तिला वाटू लागते. यालाच मी रोग असे म्हणते. बाहेरून पाहताना सारेकाही ठीकठाक असल्यासारखे दिसते पण व्यक्तीच्या आतमध्ये जे काही असते ते मात्र या रोगामुळे पोखरले गेलेले असते.

- श्रीमाताजी (CWM 05 : 08)

(सौजन्य : – अभीप्सा मराठी मासिक)

आमच्या auromarathi.org या वेबसाईटला आणि AUROMARATHI या युट्यूब चॅनलला जरूर भेट द्या आणि सबस्क्राईब करा.

**

Inner Battle – 38

(We previously considered the observations made by the Mother regarding ambition and the display of powers. Based on that, a seeker has asked her a question.)

Sadhak : What do you call a “canker”?

The Mother : It is an image, as of a fine mango, very beautiful to look at, and when one opens it, there is a worm inside. That is because the fly laid an egg before the fruit was formed; outside there is no trace.

Everything seems candid, disinterested. But within, right at the bottom, there is a great ambition, the desire to have an exceptional position, to be respected by everybody... that is, the ego. This is the canker, it remains very quiet, but it is there.

When the power comes, instead of realising that one is nothing, does not deserve anything and that all that one has to do is to remain as passive as possible, one deceives oneself, feels the need of others taking note of it also. It is this I call the canker. It eats up all that is inside and leaves the appearance intact.

- The Mother (CWM 05 : 08)

Do visit and subscribe to our website auromarathi.org and YouTube channel AUROMARATHI.

३९२) बहिर्वर्ती आणि आंतरिक चेतना
03/09/2026

३९२) बहिर्वर्ती आणि आंतरिक चेतना

आंतरिक युद्ध – ३७श्रीमाताजी : महत्त्वाकांक्षा अनेक योग्यांसाठी हानिकारक ठरली आहे. महत्त्वाकांक्षा हा जणू एक रोग असतो आणि...
03/09/2026

आंतरिक युद्ध – ३७

श्रीमाताजी : महत्त्वाकांक्षा अनेक योग्यांसाठी हानिकारक ठरली आहे. महत्त्वाकांक्षा हा जणू एक रोग असतो आणि तो दीर्घ काळ लपून राहिलेला असतो. बरेच लोक जेव्हा योगमार्गावर वाटचाल करायला सुरुवात करतात तेव्हा त्यांना त्यांच्यामध्ये लपून बसलेल्या या रोगाची जाणीवही नसते. पण जेव्हा त्यांना काही सिद्धी प्राप्त होऊ लागतात, तेव्हा त्यांच्यामधील ही छुपी महत्त्वाकांक्षा डोकं वर काढू लागते. बरेचदा ती आक्रमकपणे वर उफाळून येते, कारण ती महत्त्वाकांक्षा त्यांनी सुरुवातीलाच मुळापासून उपटून टाकलेली नसते.

एका योग्याची गोष्ट सांगतात. त्याला बऱ्याच अद्भुत सिद्धी लाभलेल्या होत्या. त्याच्या शिष्यांनी त्याला एकदा भोजनासाठी आमंत्रित केले होते. एका मोठ्या टेबलावर भोजनाची व्यवस्था केलेली असते. ‘आम्हाला तुमच्या सिद्धींचा चमत्कार दाखवाल का,' अशी विनंती शिष्यगण त्याला करतात. अशा रितीने सिद्धींचा वापर करणे योग्य नाही, हे त्या योग्याला माहीत असते. पण त्याच्या आतमध्ये कोठेतरी महत्त्वाकांक्षेचे बीज दडलेले होते. त्याने असा विचार केला की, “खरं तर ही अगदी साधीशीच गोष्ट आहे; मी चमत्कार करून दाखविला तर त्यामुळे अशा गोष्टी करणे शक्य असते हे शिष्यांना कळेल आणि त्यातून मी त्यांना ईश्वराची महती पटवून देऊ शकेन. तेव्हा असे करायला काहीच हरकत नाही.”

त्याने शिष्यांना सांगितले की, “फक्त हे समोरचे टेबल खालच्या खाली काढून घ्या. पण फक्त हे टेबलच हं. त्यावर आच्छादलेले वस्त्र तसेच राहू दे, त्याच्यावर ठेवलेली ताटंवाट्यादेखील तशाच राहू देत.” शिष्यगण म्हणू लागले, “पण असं कसं करता येईल? सगळ्या गोष्टी खाली पडणार नाहीत का?” पण तरीही त्या योग्याने त्याचा आग्रह तसाच कायम ठेवला आणि मग त्या शिष्यांनी त्याने सांगितले होते अगदी तसेच केले.

आणि काय आश्चर्य! ते टेबल बाजूला काढले तरी, ते वस्त्र आणि त्यावर असलेल्या सगळ्या गोष्टी जशाच्या तशा त्याच जागेवर राहिल्या होत्या. त्या गोष्टी अधांतरी राहिलेल्या पाहून शिष्यांना आश्चर्य वाटले. पण मग मात्र तो योगी ताडकन उठून उभा राहिला आणि सैरावैरा धावू लागला आणि आकांत करत म्हणू लागला की, “आता मी कधीच कोणाला शिष्य बनवणार नाही. माझा धिक्कार असो. मी माझ्या देवाशी प्रतारणा केली आहे.” त्याचे अंतःकरण पश्चात्तापाने पोळू लागले. त्याने दैवी शक्तीचा वापर स्वतःच्या स्वार्थासाठी केला होता.

सिद्धींचे असे प्रदर्शन करणे नेहमीच अयोग्य असते. म्हणजे सिद्धींचा काही उपयोगच नसतो, असा त्याचा अर्थ नाही. मात्र, सिद्धी ज्या कारणासाठी प्राप्त झालेल्या असतात, त्यासाठीच त्यांचा उपयोग केला गेला पाहिजे. म्हणजे असे की, ईश्वराशी एकत्व पावल्यामुळे त्या सिद्धी प्राप्त झालेल्या असतात; त्यामुळे त्यांचा उपयोग ईश्वरी इच्छेनुसारच झाला पाहिजे, प्रदर्शनासाठी त्यांचा वापर करता कामा नये.

समजा एखादा अंध मनुष्य तुमच्यासमोर आला आणि त्याला दृष्टी प्रदान करण्याचे सामर्थ्य तुमच्या अंगी असेल आणि त्या मनुष्याला दृष्टी प्राप्त व्हावी अशी जर ईश्वरी इच्छा असेल तर अशा वेळी, तुम्ही ‘त्याला दृष्टी प्राप्त होऊ दे,' अशी फक्त प्रार्थना करणे पुरेसे असते. त्यामुळे त्या मनुष्याला दिसू लागेल. पण त्याला दृष्टी प्राप्त व्हावी आणि तो बरा व्हावा अशी 'तुमची' इच्छा असेल आणि जर तुम्ही तुमच्या शक्तीचा वापर केलात तर तो तुम्ही तुमच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेच्या पूर्तीसाठी केलेला असतो, हे लक्षात घ्या. अशा उदाहरणांमध्ये, बरेचदा, तुम्ही तुमची सिद्धी गमावून बसता आणि एवढेच नव्हे तर, त्यामुळे त्या मनुष्याच्या जीवनामध्येही काहीतरी प्रचंड गोंधळ निर्माण होऊ शकतो.

वरवर पाहता, दोन्ही प्रकार दिसायला सारखेच दिसतात. एका प्रकारामध्ये तुम्ही तुमच्या कोणत्यातरी वैयक्तिक हेतुने कृती केलेली असते आणि दुसऱ्या प्रकारामध्ये तुम्ही ईश्वरी इच्छेनुसार कृती केलेली असते.

- श्रीमाताजी (CWM 03 : 07-08)

(सौजन्य : – अभीप्सा मराठी मासिक)

आमच्या auromarathi.org या वेबसाईटला आणि AUROMARATHI या युट्यूब चॅनलला जरूर भेट द्या आणि सबस्क्राईब करा.

**

Inner Battle – 37

Ambition has been the undoing of many Yogis. That canker can hide long. Many people start on the Path without any sense of it. But when they get powers, their ambition rises up, all the more violently because it had not been thrown out in the beginning.

A story is told of a Yogi who had attained wonderful powers. He was invited by his disciples to a great dinner. It was served on a big low table. The disciples asked their Master to show his power in some way. He knew he should not, but the seed of ambition was there in him and he thought, "After all, it is a very innocent thing and it may prove to them that such things are possible and teach them the greatness of God."

So he said, "Take away the table, but only the table, let the table-cloth remain as it is with all the dishes upon it." The disciples cried out, "Oh, that cannot be done, everything will fall down." But he insisted and they removed the table from under the cloth.

Lo, the miracle! The cloth and all that was upon it remained there just as though the table was underneath. The disciples wondered. But all on a sudden the Master jumped up and rushed out screaming and crying, "Nevermore shall I have a disciple, nevermore! Woe is me! I have betrayed my God." His heart was on fire; he had used the divine powers for selfish ends.

It is always wrong to display powers.This does not mean that there is no use for them. But they have to be used in the same way as they came. They come by union with the Divine. They must be used by the will of the Divine and not for display.

If you come across someone who is blind and you have the power to make him see — if it is the Divine Will that the man shall see, you have only to say, "Let him see" and he will see. But if you wish to make him see simply because you want to cure him, then you use the power to satisfy your personal ambition. Most often, in such cases, you not only lose your power but you create a great disturbance in the man.

Yet in appearance the two ways are the same; but in one case you act because of the Divine Will and in the other for some personal motive.

- The Mother (CWM 03 : 07-08)

Do visit and subscribe to our website auromarathi.org and YouTube channel AUROMARATHI.

३९१) आत्मसमर्पण म्हणजे काय?
02/09/2026

३९१) आत्मसमर्पण म्हणजे काय?

आंतरिक युद्ध – ३६(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...)साधनेमध्ये तुम्हाला प्रगती करण्याची इच्छा असेल तर तुमचे समर्पण प्र...
02/09/2026

आंतरिक युद्ध – ३६

(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...)

साधनेमध्ये तुम्हाला प्रगती करण्याची इच्छा असेल तर तुमचे समर्पण प्रामाणिक, खरेखुरे आणि समग्र असले पाहिजे. पण जोपर्यंत तुमच्या आध्यात्मिक अभीप्सेमध्ये तुमच्या इच्छा मिसळलेल्या असतील तोपर्यंत हे होणे शक्य नाही. जोपर्यंत तुम्ही कुटुंब, मुलंबाळं किंवा कोणत्यातरी वस्तुशी किंवा कोणत्यातरी व्यक्तीबाबत प्राणिक आसक्ती (vital attachment) बाळगत राहाल तोपर्यंत तुम्हाला प्रामाणिक, खरेखुरे, समग्र समर्पण शक्य होणार नाही.

तुम्हाला पूर्णयोगाची साधना करायची असेल तर आध्यात्मिक सत्य ग्रहण करणे तसेच विचारांद्वारे, भावनांद्वारे, कृतींद्वारे आणि प्रकृतीद्वारे त्या सत्याचे आविष्करण करणे हीच तुमची एकमेव इच्छा व अभीप्सा असली पाहिजे.

तुम्ही कोणाही बरोबरच्या कोणत्याच नातेसंबंधाबद्दल आसक्ती बाळगता कामा नये. साधकाचे इतरांबरोबर असलेले नातेसंबंध हे अंतरंगातून निर्माण झाले पाहिजेत. जेव्हा साधकाला खरी चेतना गवसलेली असेल आणि जेव्हा तो साधक दिव्य प्रकाशात निवास करत असेल तेव्हा हे नाते निर्माण झाले पाहिजे. असे नातेसंबंध हे अतिमानसिक सत्यानुसार, दिव्य जीवनासाठी आणि दिव्य कार्यासाठी, दिव्य मातेच्या इच्छेने, तिच्या शक्तीद्वारे त्या साधकाच्या अंतरंगामधूनच निर्धारित केलेले असतील; ते मनाद्वारे किंवा प्राणिक इच्छांनुसार निर्धारित झालेले असता कामा नयेत.

- श्रीअरविंद (CWSA 32 : 141-142)

(सौजन्य : – अभीप्सा मराठी मासिक)

आमच्या auromarathi.org या वेबसाईटला आणि AUROMARATHI या युट्यूब चॅनलला जरूर भेट द्या आणि सबस्क्राईब करा.

**

Inner Battle – 36

It is necessary if you want to progress in your sadhana that you should make the submission and surrender of which you speak sincere, real and complete. This cannot be as long as you mix up your desires with your spiritual aspiration. It cannot be as long as you cherish vital attachment to family, child or anything or anybody else.

If you are to do this Yoga, you must have only one desire and aspiration, to receive the spiritual Truth and manifest it in all your thoughts, feelings, actions and nature.

You must not hunger after any relations with anyone. The relations of the sadhaka with others must be created for him from within, when he has the true consciousness and lives in the Light. They will be determined within him by the power and will of the Divine Mother according to the supramental Truth for the divine life and the divine work; they must not be determined by his mind and his vital desires.

- Sri Aurobindo (CWSA 32 : 141-142)

Do visit and subscribe to our website auromarathi.org and YouTube channel AUROMARATHI.

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Abhipsa Marathi Masik posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Abhipsa Marathi Masik:

Shortcuts

Share

Category