27/09/2024
‘गूढगाथा’ एक संग्राह्य पुस्तक. गूढ विषयांचा सविस्तर, सचित्र मागोवा घेणारे मराठीतील एकमेव पुस्तक. उडत्या तबकड्या (UFO), बर्म्युडाचा भयत्रिकोण, येती, राक्षस यांवर सविस्तर प्रकरणे. २५४ पाने रोमांचकारक माहिती व शास्त्रीय विवेचन. लॅमिनेट केलेले बहुरंगी कव्हर.
प्राचीन काळी पृथ्वीवर खरोखरी राक्षस होते काय? हिमालयातील येती व अमेरिकेच्या जंगलातील सॅस्कवॉच हे कोण आहेत? उडत्या तबकड्यांचे गूढ काय आहे? परग्रहावरील बुद्धिमान एलियन्स पृथ्वीवर येत आहेत का? त्यांनी ‘हिल’ पती-पत्नींना पळवून नेले होते का? बर्म्युडाच्या भयत्रिकोणात घडणाऱ्या विलक्षण घटनांमागे काय रहस्य आहे?
या सर्व गूढ प्रश्नांची विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनातून चर्चा करणारे, रोमांचकारक घटना व प्रसंग सांगणारे, ज्ञानाच्या कक्षा विस्तृत करणारे मराठीतील एकमेव पुस्तक.