
26/06/2025
खाली पुस्तकांचा सारांश व पुस्तक बाय लिंक व बुकिंग नंबर आहे
ऑर्डर साठी कॉल किवा whatsapp करा या नंबर वर
+919284793579
Whatsapp Link
https://wa.me/message/WKLO4FY2WFGGI1
Amazon:
https://amzn.in/d/dEGUQOx
‘स्व’ भावनांची यथायोग्य जाणीव होणे, स्वत:ची व इतरांचीही आंतरिक मन:स्थिती ओळखता येऊन भावभावनांवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय. स्वत:च्या भावनांवर आणि त्यांच्या अभिव्यक्तीवर नियंत्रण ठेवता येणे, आपल्या जवळील व्यक्तींसोबत सुसंवाद साधता येणे, स्वयंप्रेरणेतून व जीवनात ठरविलेल्या उद्दिष्टांनुसार कार्य करणे, वागण्यात व स्वभावात लवचिकपणा असणे या सर्व गुणात्मक मिश्रणाला भावनिक बुद्धिमत्ता म्हणतात. विचार व कृती यांच्या मार्गदर्शनासाठी भावनांचा उपयोग करण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय. कोणत्याही व्यक्तीची भावनांचा वापर करून संवाद साधण्याची, घडलेल्या व केलेल्या सर्व घडामोडी स्मरणात ठेवण्याची, एखाद्या प्रसंगाचे वर्णन करण्याची, एखाद्या घटनेतून बोध घेण्याची, इतरांचे मत समजून घेण्याची, व्यक्तींना पारखण्याची, भावना समजून सांगण्याची आंतरिक क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय. ज्या विद्यार्थ्यामध्ये वा व्यक्तीमध्ये भावनिक बुद्धिमत्ता सुदृढ असते, तो जीवनात यशस्वी व समाधानी असतो. त्यांच्यात आनंद, परिपूर्णता, स्वायत्तता, स्वतंत्रता, स्वनियंत्रण, मैत्री, जागरुकता, प्रशंसा, मानसिक शांतता, इच्छा, समाधान अशा अनेक भावनांचा निरोगी समतोल दिसून येतो. आनंदी व गुणवत्तायुक्त जीवन जगण्याकरिता उच्च भावनिक बुद्धिमत्ता तयार करणे नितांत गरजेचे असते.