15/05/2025
एसटी बसचालकाच्या प्रसंगावधानतेने आज मोठा अनर्थ टळला.. संभाजीनगर ते बीड येत असलेल्या एसटी बसने वडीगोद्री जवळ आल्यानंतर अचानक पेट घेतला.. ही बाब एसटीचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या चालकाच्या लक्षात आली..
तात्काळ बस थांबवत चालकाने सुरुवातीला बसमधील 40 ते 45 पेक्षा अधिक प्रवाशांना सुरक्षित रित्या खाली उतरवले.. तेथून जवळच असलेल्या हॉटेलमध्ये जाऊन पाणी आणले व ज्या ठिकाणी पेट घेतला होता त्याच ठिकाणी पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला..
काही प्रवासी व स्थानिकांनी त्यांना मदत केली.. यामुळे आग आटोक्यात आली.. एसटी बस इंजिनने घेतलेला पेट वेळीच लक्षात आल्यामुळे पुढील अपघात टळला.. आग विझवल्यानंतर त्यातील एका प्रवाशांनी त्या बसचे फोटो घेतले होते व त्याने ते मला पाठवले आणि सगळा प्रसंग सांगितला..
सर्व प्रवाशांनी त्या बस चालकाचे आभार देखील मानले.. वाढलेल्या उष्णतेने गेल्या काही दिवसात बस पेटण्याचे प्रकार देखील वाढलेले आहेत.. एस टी महामंडळ अधिकारी, व लोकप्रतिनिधी यांनी या बाबीकडे लक्ष द्यायला पाहिजे ...
धनंजय गुंदेकर, बीड