Yuva Ladha

Yuva Ladha 'Yuva Ladha' is a media/news company. It has been publishing a magazine since 2013.

दोन हजार रुपयांच्या पुढील युपीआय व्यवहारांवर लागणार कर; व्यक्तींतील व्यवहारांना सूटदुकानदार अथवा व्यापाऱ्यांशी केलेल्या ...
16/09/2026

दोन हजार रुपयांच्या पुढील युपीआय व्यवहारांवर लागणार कर; व्यक्तींतील व्यवहारांना सूट

दुकानदार अथवा व्यापाऱ्यांशी केलेल्या दोन हजार रुपयांपेक्षा जास्त रुपयांच्या युपीआय व्यवहारांना आता ०.०४ टक्के प्रमाणे कर लागणार आहे. मात्र, सामान्य व्यक्तीने दुसऱ्या सामान्य व्यक्तीशी केलेले आर्थिक व्यवहारांना मात्र, या नियमातून बाहेर ठेवण्यात आले आहे.

Manoj Jarange Patil | जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमधून मनोज जरांगे पाटील मोठ्या ताफ्यासह मुंबईच्या दिशेने निघाले. मा...
16/09/2026

Manoj Jarange Patil | जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमधून मनोज जरांगे पाटील मोठ्या ताफ्यासह मुंबईच्या दिशेने निघाले. मात्र, त्यांचा ताफा बीड जिल्ह्यातील पाटोदापर्यंत पोहोचताच त्यांची प्रकृती अधिकच बिघडली. तरीही त्यांनी मध्यरात्री त्यांनी सभा घेतली. मात्र, सकाळपासून त्यांची प्रकृती अधिकच बिघडली. त्यांच्यावर औषधोपचार सुरू आहेत. वरील वक्तव्य त्यांनी पाटोदा येथील सभेत केले. त्या सभेत त्यांनी प्रकृती व पुढील आंदोलनाबाबत भुमिका मांडली.

15/09/2026

Bageshwar Baba | सोन्याच्या खटावासह बागेश्वर बाबा अंबानींच्या गणेश मूर्ती दर्शनाला

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील बंगल्यात गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. या मूर्तीच्या दर्शनासाठी बॉलीवूडमधील अभिनेते, अभिनेत्री, सचिन तेंडूलकरचे कुटूंब, रामदेव बाबा यांच्यासह बागेश्वर बाबाही आले होते. बागेश्वर बाबांनी अंबानीच्या बंगल्यात प्रवेश करण्यासाठी खास सोन्याचे खटाव पायात घातले होते.

15/09/2026

मनोज जरांगे पाटलांचे भगवे वादळ मुंबईच्या दिशेने

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटलांनी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्याचे निश्चित केले आहे. त्या अनुषंगाने ते अंतरवाली सराटीमधून मंगळवारी (दि. १५) मुंबईच्या दिशेने निघाले. यावेळी मराठा कार्यकर्ते मोठ्या संख्येत त्यांच्या बरोबर निघाले आहेत.

14/09/2026

योगी आदित्यनाथ यांना प्रश्न विचारणाऱ्या दिव्या श्रीवास्तव झाल्या ट्रोल

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगीआदित्यनाथ यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारणाऱ्या मुक्त पत्रकार दिव्या श्रीवास्तव सध्या ट्रोल होत आहेत. त्यामुळे आक्रमक झालेल्या श्रीवास्तव यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. या व्हिडिओत त्यांनी ट्रोल करणाऱ्यांना उत्तर दिले आहे.

श्रीलंकेला ७२ धावांनी पराभूत करत भारतीय महिलांनी आठव्यांदा कोरले टी-२० आशिया कप वर नावमहिलाच्या टी-२० आशिया क्रिकेट कपचा...
14/09/2026

श्रीलंकेला ७२ धावांनी पराभूत करत भारतीय महिलांनी आठव्यांदा कोरले टी-२० आशिया कप वर नाव

महिलाच्या टी-२० आशिया क्रिकेट कपचा अंतिम सामना रविवारी (ता. १३) खेळविण्यात आला.या सामन्यात भारतीय संघाने ७२ धावांनी विजय मिळवत कपवर नाव कोरले. भारतीय संघाने ही स्पर्धा आठव्यांदा जिंकली आहे. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत पाच गडी गमावत १८३ धावा जमवल्या. १८४ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या श्रीलंकेचा संपूर्ण संघ २० षटकांत अवघ्या १११ धावा जमवू शकला. शेफाली वर्माने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर तिला सामनावीराचा बहुमान देण्यात आला.

13/09/2026

दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षांनी घेतली गौतम अदानी यांची भेट

ब्रिक्स शिखर परिषद सध्या दिल्लीत सुरू आहे. यात ब्रिक्स सदस्य असलेल्या दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनी अदानी उद्योग समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांची भेट घेतली. ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर दक्षिण आफ्रिकेच्या व्यावसायिक उपक्रमांचा एक भाग म्हणून तसेच दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील व्यावसायिक व गुंतवणुकीचे संबंध अधिक दृढ करण्याचा प्रयत्न म्हणून ही भेट झाल्याचे दक्षिण आफ्रिका सरकारकडून सांगण्यात आले.

Manoj Jarange Patil | मुंबईत आंदोलन करण्यासाठी पोलिसांनी परवानगी नाकारली; जरांगे पाटील आजपासून सलाईन, पाणी, उपचार बंद कर...
13/09/2026

Manoj Jarange Patil | मुंबईत आंदोलन करण्यासाठी पोलिसांनी परवानगी नाकारली; जरांगे पाटील आजपासून सलाईन, पाणी, उपचार बंद करणार

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषण करत आहेत. गणेशोत्सवात १९ सप्टेंबर रोजी ते मुंबईतील आझाद मैदानावर जाऊन उपोषण करणार आहेत. या संदर्भात त्यांनी शनिवारी (दि. १२) घोषणा केली. मात्र, रविवारी (दि. १३) पोलिसांनी आंदोलन करण्यास परवानगी नाकारली आहे. त्यामुळे आक्रमक झालेल्या जरांगे पाटलांनी सलाईन, पाणी, उपचार बंद करण्याचे ठरवले आहे.

Donald Trump | अमेरिकेत काही महिन्यांवर मध्यावधी निवडणुका होणार आहेत. तत्पूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ...
12/09/2026

Donald Trump | अमेरिकेत काही महिन्यांवर मध्यावधी निवडणुका होणार आहेत. तत्पूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तेथील सर्व प्रौढ नागरिकांसाठी प्रत्येकी पाच हजार रुपये देण्याची योजना मंजूर केली आहे. या योजनेची महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेशी तुलना होऊ लागली आहे. या बाबत तुम्हाला काय वाटते?

11/09/2026

America | ९५ वर्षांच्या आज्जीने मारली उंच उडी

अमेरिकेतील शालेय मैदानी स्पर्धेदरम्यान एक ९५ वर्षीय आज्जी आल्या. किशोरवयीन मुले त्यांनी मजेने हसू लागली. मात्र, त्यांनी चक्क उंच उडी मारत सर्वांना अवाक केले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yuva Ladha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share