Hinjawadi Times

Hinjawadi Times Media Service

11/09/2026
10/09/2026

पिरंगुटला घोटवडे फाट्यावर हायवा डंपर खाली येऊन महिलेचा मृत्यू. संगीता सोपान पारखी (रा.माण, ता.मुळशी) असे मृत महिलेचे नाव.

बातमी अपडेट होत आहे....

09/09/2026

एसटीचा अजब जुगाड, नागरिकांच्या जीवाशी खेळ!

ऍक्सिलरेटरची वायर तुटली; चक्क घंटीच्या दोरीने बस चालवली

मुळशी, दि. ९ : प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. स्वारगेटहून मुळशीमार्गे भांबार्डे गावाकडे जाणाऱ्या एसटी बसमध्ये काल, दि. ८ सप्टेंबर रोजी धक्कादायक प्रकार घडला. प्रवासादरम्यान बसची ऍक्सिलरेटर वायर तुटल्यानंतर चालक आणि वाहकाने चक्क बसमधील घंटीची दोरी काढून ती ऍक्सिलरेटर वायरला बांधली आणि त्याच जुगाडावर बस पुढे नेण्यात आली.

विशेष म्हणजे, या मार्गावर नागरिकांसाठी दुसरी पर्यायी वाहतूक व्यवस्था उपलब्ध नसल्याने प्रवाशांना अक्षरशः जीव मुठीत धरून याच बसमधून प्रवास करावा लागला. प्रवाशांच्या सुरक्षिततेपेक्षा ‘बस कशीबशी चालवायची’ यालाच प्राधान्य दिले जात असल्याचा संताप नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

या प्रकाराबाबत एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, संबंधित एसटी बंद पडली असून चालक आणि वाहकाशी नेटवर्कअभावी संपर्क होऊ शकलेला नाही. त्यामुळे बसमध्ये नेमके काय झाले, याची माहिती अद्याप मिळालेली नसल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

मात्र, प्रश्न आता केवळ बस बंद पडण्याचा नाही; प्रश्न आहे तो प्रवाशांच्या जीविताचा! ऍक्सिलरेटर सारख्या महत्त्वाच्या यंत्रणेची वायर तुटल्यानंतर तात्पुरता जुगाड करून बस रस्त्यावर धाववणे कितपत सुरक्षित आहे? एखादा गंभीर अपघात झाल्यानंतरच एसटी महामंडळ जागे होणार का? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

मुळशीच्या दुर्गम भागातील नागरिकांना सुरक्षित, विश्वासार्ह आणि नियमित सार्वजनिक वाहतूक मिळणार तरी कधी? एसटी महामंडळाने या घटनेची तातडीने चौकशी करून संबंधित बसची तांत्रिक तपासणी करावी आणि प्रवाशांच्या जीवाशी खेळणारे असे ‘जुगाड’ तात्काळ थांबवावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

08/09/2026

मुळशीतील कोळवण रोडलगत रावडे फाटा ते रावडे गावच्या रस्त्याची पार दुरावस्था झाली आहे. रस्त्यावर इतके खड्डे पडले आहेत की रस्त्याचा अंश दिसतच नाही. एवढ्या प्रचंड दुरावस्थेतल्या रस्त्यावरून अनेक ग्रामस्थांना रोज प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे अनेकांना कंबरदुखीचा त्रास सुरू झाला आहे. विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांचे हाल सुरू आहेत.

या रस्त्यावर भादस गावापर्यंतच्या रस्त्यासाठी पीएमआरडीएकडून लवकरच निविदा काढली जाणार असून दिवाळीपासून काम सुरू होण्याची चिन्ह आहेत. येत्या २ दिवसात हे खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले जाईल, अशी माहिती पंचायत समिती सदस्य प्रवीण धनवे यांनी दिली.

07/09/2026

सांगा, जांबेकरांनी रस्त्यावरून प्रवास करायचा तरी कसा? मारुंजीवरून कोलते पाटील सोसायटीमार्गे जांबे गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून, मोठमोठे खड्डे आणि अवजड वाहनांच्या सततच्या वाहतुकीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. परिसरात अनेक शाळा असल्याने शाळकरी विद्यार्थ्यांनाही याच धोकादायक रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

म्हाळुंगेसारख्या दुर्घटनेची पुनरावृत्ती जांबे गावात होण्याची प्रशासन वाट पाहत आहे का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. केवळ खड्डे बुजवण्याची मलमपट्टी न करता मजबूत आणि टिकाऊ सिमेंट काँक्रीट रस्त्याची गरज आहे. पीएमआरडीए, एमआयडीसी, जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने जबाबदारी निश्चित करून तातडीने रस्त्याचे काम हाती घ्यावे, अशी मागणी होत आहे.

How are the residents of Jambe supposed to travel on these roads? The road connecting Marunji to Jambe via the Kolte Patil Society route is in a severely damaged condition, with large potholes and constant movement of heavy vehicles. With several schools located in the area, schoolchildren are also forced to travel on this dangerous stretch, putting their safety at risk every day.

Residents are now asking whether the administration is waiting for a tragedy like the incidents reported in Mhalunge to happen in Jambe before taking action. Instead of temporary pothole repairs, the area urgently needs strong and durable cement-concrete roads. Residents are demanding that PMRDA, MIDC, Zilla Parishad and the Public Works Department clearly fix responsibility and immediately take up the road work.

06/09/2026

हिंजवडी आयटी पार्कमधील खड्डे, वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर आज भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शिवसेना नेते आदित्य ठाकरे, आमदार शंकर मांडेकर, आमदार शंकर जगताप यांच्यासह असंख्य आयटी कर्मचारी, स्थानिक नागरिक आणि रहिवासी सहभागी झाले.

A massive march was held today in Hinjawadi IT Park over pothole-ridden roads, traffic congestion and long-pending civic infrastructure issues. Shiv Sena leader Aaditya Thackeray, MLAs Shankar Mandekar and Shankar Jagtap, along with a large number of IT professionals, residents and citizens, participated in the protest.





Address

Paudgaon
Pune
412108

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hinjawadi Times posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Hinjawadi Times:

Shortcuts

Share