03/10/2026
मनोरंजन : वाढदिवसाच्या दिवशीच दाक्षिणात्य अभिनेत्री रचिता रामला चाहत्याकडून मोठा धक्का; नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्समुळे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
कन्नड चित्रपटसृष्टीतील (सँडलवूड) आघाडीची अभिनेत्री रचिता राम हिच्या वाढदिवशी एका चाहत्याने केलेल्या अनपेक्षित कृतीमुळे ती अवाक झाली असून हा प्रसंग सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. कन्नड चित्रपटसृष्टीत तब्बल १२ वर्षांहून अधिक काळ आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी आणि तेलुगूमध्ये 'सुपर माची' चित्रपटातून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली रचिता राम आपल्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करत होती. त्याच दरम्यान एका चाहत्याने केलेल्या विचित्र वागण्यामुळे अभिनेत्रीला मोठा धक्का बसला. या अनपेक्षित प्रकारानंतर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस पाडला असून, "हा नेमका कोण आहे?" अशा आशयाचे भन्नाट आणि मजेदार मीम्स तसेच कमेंट्स तुफान व्हायरल हो�