Jyoti M Kohakade

Jyoti M Kohakade नमस्कार मंडळी रामराम मी राहुरी या गावातून आहे तुम्ही पेज वरती आलाच आहात तर नक्कीच शेतकरी मुलीला फॉलो करा🙏🙏💯

💥  आडनावांची जेवणाची सभा! 💥आडनावेंनी जोरदार बेत केला जेवणाचा सहस्त्रभोजनेंनी विडा उचलला निमंत्रणाचा सोबत पुजारी पंडित आण...
08/08/2026

💥 आडनावांची जेवणाची सभा! 💥

आडनावेंनी जोरदार बेत केला जेवणाचा
सहस्त्रभोजनेंनी विडा उचलला निमंत्रणाचा

सोबत पुजारी पंडित आणि शास्त्री आले
देवधर येताच देवापुढे दिवे लावले

नंतर श्रीमंत कनकदांडे आले
सराफांनी कुबेरांना सोबत आणले

गंधे पोहचले अगदी वेळेवर
टिळक दिसले सर्वांच्या कपाळावर

दूध घेऊन दुधाने पळत आले
सोबत श्रीखंडे व केळापूर आले

भाजीसाठी भोपळे पालकर जमले
साल्पेकरानी सगळ्यांना सोलून काढले

पोळी भाजी बरोबर आमटे व तुपे
काहींना पसंद होते दहिभाते

रसासाठी होते छान केशरी गोडांबे
मठ्ठा व पाण्यासाठी भरले होते तांबे

पंगत बसण्याअगोदर फडके उत्सुक दिसले
कचरे व धुळेंना शांतपणे बाहेर काढले

जेवणानंतर गोड करण्यात गोडबोले झाले व्यस्त
केळकर बोरकर आंबेकरांचे मिश्रण सर्वानी खाल्ले मस्त

नंतर होता कार्यक्रम संगीत व नृत्यांचा
गीतेच्या गाण्यांवर नाचल्या नर्तकी शृंगारपुरेंच्या

आचार्यांचा सन्मान करण्याचे सगळ्यांनी ठरविले
मानकारानी शाल श्रीफळ व सव्वालाखे अर्पण केले

खास शौर्यपदक देण्यात आले वाघमारेनां
कार्यक्रमाचा खर्च नीट सांभाळल्यामुळे शाबासकी मिळाली व्यवहारेंना

तोवर आकाशात सर्वत्र काळमेघ दाटून आले
काळे व अंधारेंनी समारंभ संपल्याचे घोषित केले! 😷😱😀

💥कसा वाटला आडनावांच्या जेवणाचा बेत...😂💥

#आडनावांची_जेवणाची_सभा 🍽️
#मराठी_विनोद 😂
#मराठी_कविता ✍️
#मराठी_लेखन 📖
#मराठी_माणूस ❤️
#हास्यकल्लोळ 😄
#विनोदी_कविता 🤣
#मराठी_संस्कृती 🚩

"सरू, चाळीस वर्षं... तब्बल चाळीस वर्षं रक्ताचं पाणी केलं ग म्या या पोरांसाठी! स्वतःच्या लेकरावाणी जपलं एकेकाला. पण आज मा...
08/08/2026

"सरू, चाळीस वर्षं... तब्बल चाळीस वर्षं रक्ताचं पाणी केलं ग म्या या पोरांसाठी! स्वतःच्या लेकरावाणी जपलं एकेकाला. पण आज माझा शाळेतला शेवटचा दिवस होता, निरोप समारंभ तर सोडाच, पण एकानेबी साधं १ रुपयाचं गुलाबाचं फूल बी दिलं न्हाय ग. म्या काय कमी पडलो व्हतो का ग शिकवायला? का आजकालच्या पोरांच्या काळजात पाझरच उरला न्हाय?"
देसाई सर सोफ्यावर बसून लहान मुलासारखे धाय मोकलून रडत होते आणि त्यांची बायको त्यांना निमूटपणे सावरत होती.

देसाई सर... जिल्हा परिषदेच्या शाळेचे मुख्याध्यापक. शिस्तीचे पक्के, पण मनाने मेणासारखे मऊ. हातातल्या छडीचा मार आणि डोळ्यातलं प्रेम, दोन्हीही विद्यार्थ्यांनी अनुभवलं होतं. आज ३१ मार्च. देसाई सरांच्या रिटायरमेंटचा (सेवानिवृत्तीचा) दिवस.

सकाळपासून देसाई सर आरशासमोर उभे राहून तयारी करत होते. त्यांनी आपली जुना पण कडक इस्त्री केलेला पांढरा शुभ्र शर्ट आणि खाकी पॅन्ट घातली होती. मनात एक वेगळीच हुरहुर होती. "आज नक्कीच शाळेत मोठा कार्यक्रम असेल. सगळी जुनी पोरं येतील, भाषणांवर भाषणं होतील, गळ्यात हारांचे ओझे असेल..." या विचारानेच त्यांचे डोळे पाणावले होते.

सर शाळेत पोहोचले. पण हे काय? शाळेचं फाटक उघडंच होतं, पण तिथे ना फुलांची सजावट होती, ना मंडप टाकला होता. पटांगण सुनं सुनं होतं. सर ऑफिसमध्ये गेले.

सहकारी शिक्षकांनी "गुड मॉर्निंग सर" म्हटलं आणि आपापल्या कामाला लागले. शिपाई रामू काका सुद्धा नेहमीसारखेच चहा घेऊन आले.

देसाई सरांना वाटलं, 'कदाचित सरप्राइज असेल. दुपारपर्यंत तयारी करतील.'

दुपार झाली, शाळा सुटायची वेळ झाली. पण काहीच हालचाल नाही. शेवटची घंटा वाजली. मुलं दप्तरं घेऊन पळाली. शिक्षकांनी रजिस्टरवर सह्या केल्या आणि "सर, येतो आम्ही, निवांत भेटा आता," असं रुक्षपणे म्हणून निघून गेले.

देसाई सर आपल्या खुर्चीतून उठले. त्यांनी त्या रिकाम्या वर्गांकडे पाहिलं. भिंतीवरचे फळे, ती बाकडी... सगळं काही शांत होतं. त्यांच्या गळ्यात हुंदका दाटून आला. "ज्या शाळेला मी मंदिर मानलं, तिथे आज माझ्या जाण्याने कुणालाच काही फरक पडत नाही?"

जड पावलांनी, मान खाली घालून सर शाळेबाहेर पडले. रस्ताभर त्यांना लोकांचे चेहरा बघवत नव्हते. त्यांना वाटत होतं, आपण आयुष्यभर फुकट राबलो. कुणालाच कदर नाही.

घरी येताना त्यांच्या डोक्यात एकच विचार चक्रावून गेला - 'कर्ज'.

देसाई सरांनी मुलीच्या लग्नासाठी आणि घराच्या दुरुस्तीसाठी बँकेतून ५ लाखांचे कर्ज काढले होते.

पेन्शनमधून अर्धे पैसे जाणार होते. म्हातारपण कसं जाईल, या चिंतेने त्यांना ग्रासलं होतं. पण त्याहीपेक्षा जास्त दुःख होतं ते 'उपेक्षेचं'.

घरी आल्यावर त्यांनी पत्नीसमोर मन मोकळं केलं आणि रडू लागले. तेवढ्यात दारावरची बेल वाजली.
सरांनी डोळे पुसले आणि दार उघडलं. समोर पोस्टमन उभा होता.

"देसाई साहेब, बँकेतून पत्र आलंय. अर्जंट आहे, सही करा."

सरांच्या पोटात गोळा आला. 'नक्कीच कर्जाच्या हप्त्याची नोटीस असेल. रिटायर झालो नाही तोच बँकेने तगादा लावला,' असं वाटून त्यांनी थरथरत्या हाताने पाकीट घेतलं.
ते सोफ्यावर बसले आणि त्यांनी पाकीट फोडलं. आत एक बँकेचं अधिकृत पत्र आणि एक दुमडलेला कागद होता.

सरांनी बँकेचं पत्र वाचायला सुरुवात केली आणि... वाचता वाचता त्यांचे डोळे विस्फारले. त्यांना स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसेना. त्यांनी चष्मा पुसून पुन्हा वाचलं.
त्यात स्पष्ट लिहिलं होतं - "श्री. देसाई सर, तुमचे घराचे ५,००,००० (पाच लाख) रुपयांचे गृहकर्ज आज दिनांक ३१ मे रोजी पूर्णपणे परतफेड (Nil/Closed) करण्यात आले आहे. आता बँकेची तुमच्यावर कोणतीही देणी बाकी नाहीत."

सर गोंधळले. "हे कसं शक्य आहे? मी तर पैसे भरलेच नाहीत."

त्यांनी तो सोबतचा दुसरा कागद उघडला. ते एक हाताने लिहिलेलं पत्र होतं.

पत्र:
"आदरणीय देसाई सर,
आम्हाला माहित आहे, आज तुम्ही शाळेतून रिकाम्या हाताने आणि जड अंतकरणाने घरी गेलात. तुम्हाला वाटलं असेल की तुमच्या विद्यार्थ्यांची आठवणशक्ती कमी झाली आहे. पण सर, तुमची शिकवण आम्ही विसरलो नाही.
आम्ही सर्वांनी (तुमच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी आणि सहकारी शिक्षकांनी) मिळून ठरवलं होतं की, तुम्हाला हार-तुरे, शाल-श्रीफळ आणि पेढे देऊन तुमचा सत्कार करायचा नाही. त्या हार-फुलांची किंमत दोन दिवसात कोमेजून जाते.

त्याऐवजी आम्ही गेल्या सहा महिन्यांपासून 'गुप्त वर्गणी' जमा करत होतो. त्यात आम्हां विद्यार्थ्यांसोबत शाळेतल्या सगळ्या शिक्षकांनी, शिपायांनी आणि मुख्य म्हणजे तुमच्या मार्गदर्शनाखाली मोठमोठ्या पदावर असलेल्या तुमच्या माजी विद्यार्थ्यांनी तर खूप मदत केली. आम्हाला माहित होतं की तुमच्या डोक्यावर कर्जाचं ओझे आहे आणि निवृत्तीनंतर तुम्हाला त्याची काळजी सतावणार आहे.

म्हणून, तुमच्या निवृत्तीच्या दिवशी, आम्ही तुम्हाला 'ताणमुक्त' आयुष्य भेट देत आहोत.

सर, तुम्ही आम्हाला घडवलंत, आता तुमचं म्हातारपण सुखात जावं, हीच आमची खरी गुरुदक्षिणा!

तुमच्यावर प्रेम करणारी... तुमची 'कृतघ्न' वाटलेली पोरं!"

पत्राखाली शेकडो विद्यार्थ्यांच्या सह्या होत्या.
देसाई सर स्तब्ध झाले. त्यांच्या हातातून कागद गळून पडला.

तेवढ्यात घराबाहेर "देसाई सर आगे बढो, हम तुम्हारे साथ है!" अशा घोषणा ऐकू आल्या.

सरांनी खिडकीतून बाहेर पाहिलं. संपूर्ण गल्लीत त्यांचे शेकडो विद्यार्थी, शिक्षक आणि गावकरी उभे होते. कुणी ढोल वाजवत होतं, तर कुणी डोळ्यात पाणी आणून बघत होतं.

देसाई सर धावत बाहेर आले. त्यांनी कोणा एकाला नाही, तर समोरच्या गर्दीला हात जोडले आणि गुडघे टेकून जमिनीवर डोकं ठेवलं.

त्यांच्या डोळ्यातून आज दुःख नाही, तर अपार कृतज्ञतेचे अश्रू वाहत होते.

त्यांना उमजलं होतं - 'माणसं जोडली की पैसा गौण ठरतो. हार गळ्यात नाही, तर लोकांच्या हृदयात असावा लागतो.'
आज देसाई सर जगातले सर्वात श्रीमंत मुख्याध्यापक होते.

08/08/2026

Comment for link 🖇️❤️
🛍️

"बाबा, किती वेळा सांगितलं तुम्हाला? डायपर घालता येत नसेल तर अंथरुणात पडू नका. संपूर्ण घरभर वास सुटलाय. माझे क्लायंट्स घर...
08/08/2026

"बाबा, किती वेळा सांगितलं तुम्हाला? डायपर घालता येत नसेल तर अंथरुणात पडू नका. संपूर्ण घरभर वास सुटलाय. माझे क्लायंट्स घरी येणार आहेत आज. तुमची ही 'घाण' मला आता सहन होत नाहीये." सुमितने रागाने आपल्या ७० वर्षांच्या वडिलांच्या, आप्पांच्या अंगावर चादर फेकत आरडाओरडा केला.

एका मंगळवारी सकाळी सुमितच्या घरी एक महत्त्वाची मीटिंग असते. त्याच वेळी आप्पांची (वडिलांची) तब्येत बिघडते आणि त्यांना अंथरुणातच ल*घ*वी होते. यामुळे पूर्ण खोलीत वास सुटतो. सुमितला उशीर होत असतो आणि त्या वासाने त्याला मळमळायला लागते, तेव्हा त्याचा तोल सुटतो आणि तो वडिलांचा अपमान करतो.

आप्पा थरथरत्या हाताने कोपऱ्यात मान खाली घालून बसले होते. त्यांच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं.
इतक्यात स्वयंपाकघरातून सुमितची बायको, जानकी, बाहेर आली. तिच्या हातात गरम पाण्याचे भांडे होते. तिने ते जोरात टेबलवर आपटले.

तिने सुमितकडे बघत, शांत पण कणखर आवाजात म्हटलं, "सुमित, आवाज खाली! ज्या हातांनी आजवर तुझी 'घाण' साफ करून तुला मोठं केलं, त्याच हातांना आज तुला सांभाळता येत नाहीये? वास त्यांच्या आजाराचा नाही, तुझ्या सडलेल्या विचारांचा येतोय. आणि ऐक... क्लायंट्स महत्त्वाचे असतील, तर त्यांना हॉटेलमध्ये ने. हे घर 'आप्पांचं' आहे, आणि जोवर मी जिवंत आहे, तोवर या घरातला 'राजा' तेच राहतील."

कोकणातल्या दापोली गावातलं एक कौलारू घर. तिथे 'आप्पा' म्हणजे शंकरराव सर. आयुष्यभर शाळेत शिकवून हजारो मुलं घडवली. स्वतःचा मुलगा, सुमित, हुशार होता म्हणून त्यांनी आपल्या जमिनीचा तुकडा आणि आंब्याची बाग विकून त्याला पुण्यात इंजिनिअरिंगला शिकवलं. सुमितने पुण्यात नोकरी मिळवली, फ्लॅट घेतला आणि जानकीशी लग्न केलं. जानकी अनाथ होती, तिला आई-वडील नव्हते. लग्नानंतर जेव्हा ती पहिल्यांदा आप्पांच्या पाया पडली, तेव्हा आप्पांनी तिच्या डोक्यावर हात ठेवून सांगितलं होतं, "पोरी, सून न्हाय, लेक म्हणून ऱ्हा."

आप्पांना पार्किन्सन (Parkinson's) झाला. त्यांचे हात थरथरायचे. एकटे राहणं कठीण झालं म्हणून सुमितने त्यांना पुण्यात आणलं. पण पुण्यातला सुमित आता कोकणातला सुमित राहिला नव्हता. हाय-प्रोफाईल सोसायटी, पार्ट्या आणि स्टेटसच्या नादात त्याला बापाची अडचण वाटू लागली.
जानकी मात्र आप्पांची आई झाली होती. ती त्यांना वेळेवर औषधं देण्यापासून ते त्यांचे कपडे बदलण्यापर्यंत सगळं करायची.

एकदा रात्री जेवताना आप्पांचा हात थरथरला आणि डाळीची वाटी सांडली. डाळ सुमितच्या ब्रँडेड पँटवर पडली.

सुमित ताडकन उठला. "शिट! बाबा, तुम्हाला नीट खाता येत नाही का? प्राण्यासारखं खाता तुम्ही. उद्यापासून तुम्ही किचनमध्ये खाली बसून जेवत जा. डायनिंग टेबलवर नको."

आप्पांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी अर्धच जेवण सोडलं.

जानकीने त्या रात्री सुमितशी भांडण केलं नाही, पण तिनेही जेवण सोडलं. ती आप्पांच्या खोलीत गेली, त्यांना हाताने भरवलं आणि म्हणाली, "आप्पा, तुम्ही नका मनावर घेऊ. त्याला कामाचा ताण आहे."
पण आप्पांना कळत होतं की आपला मुलगा आपल्याला कंटाळलाय.

डॉक्टरांनी आप्पांसाठी एक नवीन इंजेक्शन लिहून दिलं होतं, जे थोडं महाग होतं.

जानकी सुमितला म्हणाली, "सुमित, बाबांची औषळं संपली आहेत. ८००० रुपये हवेत."

सुमित चिडला. "जानकी, तू समजून का घेत नाहीस? पुढच्या महिन्यात मला नवीन कार घ्यायची आहे. या म्हाताऱ्याच्या औषधांवर दर महिन्याला इतका खर्च? आणि काय फरक पडणार आहे? त्यांचं वय झालंय आता."

जानकीला धक्का बसला. स्वतःच्या बापाच्या जीवापेक्षा मुलाला 'कार' महत्त्वाची वाटत होती.
त्या दिवशी जानकीने स्वतःचे सोन्याचे कानातले मोडले आणि आप्पांची औषळं आणली. सुमितला हे समजलं नाही.

सुमितची मुलगी पिहूचा वाढदिवस होता. मोठी पार्टी होती. सुमितने आप्पांना धमकी दिली, "खबरदार जर खोलीच्या बाहेर आलात तर. माझे मित्र येणार आहेत, मला तुमची लाज वाटते."

त्याने बाहेरून आप्पांच्या खोलीला कडी लावली. आत पंखा बंद होता आणि खूप उकडत होतं.

पार्टी संपल्यावर जानकी जेव्हा कडी उघडून आत गेली, तेव्हा आप्पा घामाने भिजून बेशुद्ध पडले होते. त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता.

जानकीने आरडाओरडा केला, डॉक्टरांना बोलावलं. सुमित मात्र निर्विकार होता. "काय नाटकं आहेत यांची," असं तो पुटपुटला.

या प्रसगानंतर दोन दिवसांनी सुमित घरी लवकर आला. तो खूप गोड बोलत होता.

"बाबा, तुम्हाला इथे कोंडल्यासारखं वाटत असेल ना? माझ्या एका मित्राने लोणावळ्याला एक 'नेचर केअर सेंटर' काढलंय. तिथे खूप झाडं आहेत, तुमच्या वयाची माणसं आहेत. तुम्ही तिथे राहायला जा. मज्जा येईल."

आप्पांना वाटलं मुलाला आपली काळजी वाटतेय.

सुमितने एक फॉर्म काढला. "फक्त इथे अंगठा द्या."
आप्पा अंगठा देणार, इतक्यात जानकीने तो कागद हिसकावून घेतला.

तिने वाचलं. तो 'आनंदाश्रम' नावाचा एक स्वस्त वृद्धाश्रम होता, जिथे एकदा माणसाला सोडलं की घरचे लोक जबाबदारीतून मुक्त होतात. त्या फॉर्मवर लिहिले होते, "पालकांचा ताबा सोडत आहोत."

जानकीने तो कागद फाडून सुमितच्या तोंडावर फेकला.

"सुमित, इतका खाली घसरलास तू? ज्या बापाने पोटाला चिमटा घेऊन तुला इंजिनिअर केलं, त्यांना तू भंगारातल्या वस्तूंसारखा घराबाहेर काढतोयस?"
सुमित ओरडला, "हो! काढणार! मला माझं आयुष्य जगायचं आहे. हे म्हातारं ओझं मला नकोय आता. आणि जानकी, तू मध्ये बोलू नकोस. तू माझी बायको आहेस, या घराची मालकीण नाही. तुला जर यांची इतकीच सेवा करायची असेल, तर तू पण चालती हो."
सुमितला वाटलं जानकी घाबरेल. पण जानकीने कपाटातून आपली बॅग काढली.

तिने आप्पांचा हात पकडला. आप्पा रडत होते, "नको पोरी, माझ्यापायी तुझा संसार मोडू नकोस. मी जातो आश्रमात."

जानकीने आप्पांचे अश्रू पुसले आणि सुमितकडे बघून म्हणाली,
"सुमित, संसार दोघांचा असतो रे, पण तिथे माणुसकी असावी लागते. जिथे माझ्या बापाचा सन्मान नाही, तिथे मला राहायचंच नाहीये. मी अनाथ होते, पण या माणसाने मला मुलगी मानलं. आज रक्ताचा मुलगा वैरी झाला, पण ही परकी मुलगी शेवटच्या श्वासापर्यंत बापाची काठी होईल. मी घटस्फोटाची नोटीस पाठवते, सह्या करायला तयार राहा."

जानकी आणि आप्पा त्या रात्रीच घर सोडून निघाले. बाहेर पाऊस पडत होता. त्यांच्याकडे जायला जागा नव्हती. त्यांनी ती रात्र एसटी स्टँडच्या बाकावर काढली.

दुसऱ्या दिवशी जानकीने आपल्या जुन्या मैत्रिणीच्या मदतीने एक छोटी खोली भाड्याने घेतली. जानकीने पुन्हा ट्युशन्स घ्यायला सुरुवात केली. तिने दिवसरात्र कष्ट केले.

तीन वर्षांनंतर...
एका मोठ्या हॉलमध्ये 'आदर्श शिक्षिका आणि समाजसेविका' म्हणून जानकीचा सत्कार चालू होता. स्टेजवर जानकी माईकवर बोलत होती आणि खाली प्रेक्षकांमध्ये आप्पा, आता ठणठणीत बरे होऊन, अभिमानाने टाळ्या वाजवत होते.

जानकी म्हणाली, "लोक म्हणतात सासू-सासरे त्रास देतात, पण कधीकधी आपणच त्यांना समजून घेण्यात कमी पडतो. मी आज जी काही आहे, ती माझ्या या 'बाबां'मुळे आहे."

कार्यक्रमाच्या शेवटी, एक फाटका माणूस तिथे आला. तो सुमित होता. गेल्या तीन वर्षात शेअर मार्केटमध्ये नुकसान होऊन आणि एकटेपणामुळे तो खचला होता. त्याला वाटलं जानकी आणि आप्पा त्याला माफ करतील.

तो आप्पांच्या पाया पडायला गेला.

जानकीने त्याला अडवलं.

"सुमित सर, इथे फक्त 'निमंत्रित' लोकांना प्रवेश आहे. ज्यांनी नाती तोडली, त्यांना परत जोडायला फेविकॉल मिळत नाही. तुम्ही जाऊ शकता."

सुमित रिकाम्या हाताने परत फिरला. त्याला जाणवलं की त्याने हिरा (बायको) आणि देव (बाप) दोन्ही गमावले होते.

आप्पांनी जानकीकडे पाहिलं.
"पोरी, तू खूप कठोर झालीस."

जानकीने आप्पांचा हात आपल्या हातात घेतला आणि डोळ्यात पाणी आणून म्हणाली, "आप्पा, ज्या झाडाने मला उन्हात सावली दिली, ते झाड म्हातारं झालं म्हणून त्याला तोडून कसं टाकू? तुम्ही माझं ओझं नाही, तर माझ्या घराचं 'मूळ' आहात! आणि ज्यांना हे ओझं वाटलं, त्यांचा भार आपण स्वतःहून कमी केला."

एकदा नक्की वाचा खुप छान लेख आहे 🥹

वाचाल तर रडाल 😔जीवन जीवनाचे 20 वर्षे वाऱ्यासारखी उडून गेली. मग सुरू झाली नोकरीची शोधमोहीम. हे नाही ते, ते नाही हे. अशी ...
08/08/2026

वाचाल तर रडाल 😔जीवन

जीवनाचे 20 वर्षे वाऱ्यासारखी उडून गेली. मग सुरू झाली नोकरीची शोधमोहीम. हे नाही ते, ते नाही हे. अशी धडपड करत करत 2–3 नोकऱ्या सोडल्या, आणि एक ठरली. थोडी स्थिरता सुरू झाली.

हातात आला पहिल्या पगाराचा चेक. तो बँकेत जमा झाला आणि सुरू झाला खात्यात जमा होणाऱ्या शून्यांचा अखंड खेळ. 2–3 वर्षे पुन्हा उडून गेली. बँकेतले शून्य थोडे वाढले. वय 25 झाले.

आणि मग विवाह झाला. जीवनाची रामकथा सुरू झाली. सुरुवातीचे 1–2 वर्षे मऊ, गुलाबी, स्वप्नाळू गेली. हातात हात घालून फिरणे, रंगीबेरंगी स्वप्नं. पण हे दिवस पटकन उडून गेले.

आणि मग बाळ येणार ही चाहूल लागली. वर्षभरात पाळणा झुलू लागला. आता सारे लक्ष बाळावर केंद्रित झाले. उठणं, बसणं, खाणं, पिणं, लाड कोड...

वेळ कधी निघून गेला, समजलंच नाही.
या दरम्यान माझा हात तिच्या हातातून कधी निसटला, फिरणं-गप्पा मारणं कधी थांबलं, हे दोघांनाही कळलंच नाही.

बाळ मोठं होत गेलं. ती बाळात गुंतली, मी कामात. घर आणि गाडीच्या हप्त्यांची चिंता, बाळाची जबाबदारी, शिक्षण, भविष्याची सोय, आणि त्याचबरोबर बँकेत शून्यं वाढवायची धडपड. तिनंही स्वतःला पूर्णपणे कामात झोकून दिलं, मीही.

इतक्यात मी 35 चा झालो. घर, गाडी, बँकेत शून्यं, कुटुंब—सगळं होतं, तरी काहीतरी कमी जाणवायचं. पण काय, हे कळत नव्हतं. तिची चिडचिड वाढू लागली, मी उदासीन होऊ लागलो.

दिवस निघत गेले. वेळ सरकत गेला. मुलगा मोठा झाला. त्याचं स्वतःचं जग तयार झालं. कधी दहावी आली आणि गेली, कळलंच नाही. तेव्हा आम्ही दोघं चाळिशीत पोहोचलो. बँकेतली शून्यं वाढतच गेली.

एका निवांत क्षणी मला ते गेलेले दिवस आठवले. मी प्रसंग पाहून तिला म्हटलं,
"अगं, इकडे ये जरा. हातात हात घेऊन फिरायला जाऊ या."

तिनं विचित्र नजरेनं माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली,
"तुला काहीही सुचतं, इथे ढिगभर काम पडलंय आणि तुला फिरायचंय!"
कमरेला पदर खोचून ती निघून गेली.

मग आलं पंचेचाळिसावं वर्ष. डोळ्यांना चष्मा लागला. केसांनी काळेपणा सोडला. डोक्यात गुंतागुंत वाढू लागली.

मुलगा कॉलेजमध्ये. इथे बँकेत शून्यं वाढतच होती. बघता बघता त्याचं कॉलेज संपलं. तो स्वतःच्या पायावर उभा राहिला. त्याला पंख फुटले आणि तो परदेशात उडून गेला.

तिचेही केस पांढरे होऊ लागले. कधी कधी डोकं साथ द्यायचं बंद करायचं. तिलाही चष्मा लागला. मी म्हातारा झालो. तीही वयस्कर दिसू लागली.

दोघं पंचावन्न–साठकडे जाऊ लागलो. बँकेतील शून्यांचा पत्ता नाही. बाहेर जाणं–येणं बंद झालं.

आता गोळ्या–औषधं ठरावीक वेळेला घेणं सुरू झालं. "मुलं मोठी झाली की सोबत राहतील" म्हणून घेतलेलं घर आता ओझं वाटू लागलं. मुलं केव्हा परत येतील, याच विचारात उरलेले दिवस जात होते.

एके दिवशी मी सोफ्यावर बसून थंड वाऱ्याचा आनंद घेत होतो. ती दिवा–बत्ती करत होती. तेवढ्यात फोन वाजला. मी पटकन उचलला. समोर मुलगा होता. त्यानं सांगितलं की त्यानं लग्न केलंय आणि आता परदेशातच राहणार आहे.

त्याने हेही म्हटलं, "बाबा, तुमचे बँकेतील शून्य एखाद्या वृद्धाश्रमाला द्या आणि तुम्हीही तिथे राहा."
काही औपचारिक गोष्टी बोलून त्यानं फोन ठेवला.

मी परत सोफ्यावर येऊन बसलो. तीही दिवाबत्ती संपवून जवळ आली. मी हळूच म्हटलं,
"चल, आज पुन्हा हातात हात घालून बोलूया."

ती लगेच म्हणाली,
"हो आले."

मला विश्वास बसला नाही. चेहरा आनंदाने उजळला. डोळ्यांत पाणी आलं. अश्रू गालांवर ओघळले. अचानक डोळ्यांची चमक हरवली आणि मी कायमचा शांत झालो.

ती पूजा संपवून माझ्या जवळ आली. म्हणाली,
"बोल, काय म्हणत होतास?"

पण मी काही बोललो नाही. तिनं माझ्या शरीराला स्पर्श केला. शरीर पूर्ण थंड झालं होतं. मी तिच्याकडे एकटक पाहत होतो.

क्षणभर ती शून्य झाली.
"काय करू?"
तिला काही सुचेनासं झालं.

पण दोन मिनिटांतच ती सावरली. हळूहळू उठली, देवघरात गेली, एक अगरबत्ती लावली. देवाला नमस्कार करून परत आली.

माझा थंड झालेला हात हातात घेतला आणि म्हणाली,
"चल, कुठं फिरायला जायचंय तुला? काय गप्पा मारायच्या आहेत तुला? सांग!"

असं म्हणताना तिच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या. माझं डोकं तिच्या खांद्यावर झुकलं. बाहेर अजूनही थंड वारा वाहत होता.

हेच का जीवन ?

सगळे आपलं नशीब घेऊनच जन्माला येतात. म्हणून थोडा वेळ स्वतःसाठीही काढा. जीवन आपलं आहे, तर जगण्याची पद्धतही आपली असली पाहिजे.

सुरुवात आजच करा, कारण उद्या कधीच येणार नाही...

" तुम्हाला काय वाटतं... बँकेतले शून्य महत्त्वाचे आहेत की एकत्र घालवलेले क्षण?"

💐🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻💐🙏💐🙏💐🙏
कोणी लिहिले माहिती नाही परंतु फारच छान आणि प्रेरणादायक होते म्हणून आपणास शेअर केले
फोटो - प्रातिनिधिक

जेव्हा हिंदू धर्माच्या आधारावर मतदान करतात तेव्हा त्याला "सांप्रदायिकता" म्हणतात. जेव्हा मुस्लिम धर्माच्या आधारावर मतदान...
08/08/2026

जेव्हा हिंदू धर्माच्या आधारावर मतदान करतात तेव्हा त्याला "सांप्रदायिकता" म्हणतात.
जेव्हा मुस्लिम धर्माच्या आधारावर मतदान करतात... तेव्हा त्याला "धर्मनिरपेक्षता" म्हणतात...

मूर्ख हिंदू विकास ,नोकरी,गुळगुळीत रस्ते, मेट्रो ,थुंकणे वगैरे वर मतदान करतो.... तर मुसलमान फक्त आणि फक्त इस्लाम साठी मतदान करतो...
मालेगावचे उदाहरण घ्या...इस्लाम पार्टी म्हणून नवीनच उदयाला आलेल्या कधी नावही न ऐकलेल्या पार्टीने भाजपला धूळ चाटवली आहे...का??
त्यांनी विकास केला म्हणून???
नाही...
फक्त इस्लाम च्या नावावर मते मागितली...
प्रत्येकाने आपापल्या धर्म जपावा..

लंडनच्या बस ड्रायव्हरचे उत्तर ऐका...
रोचक पण सत्य घटना*

*लंडनमध्ये एक अरब मुस्लिम बसमध्ये चढला आणि त्याने बस चालकाला विनंती केली की बसमध्ये वाजणारे पाश्चात्य संगीत त्वरित थांबवा.*

*बस चालकाने याचे कारण विचारले असता अरब मुस्लिमाने सांगितले की, "इस्लामच्या शिकवणीनुसार, संगीत ऐकणे हराम आहे कारण प्रिय पैगंबराच्या वेळी संगीत नव्हते आणि विशेषतः पाश्चात्य संगीत."*
*बस चालकाने नम्रपणे रेडिओ बंद केला! बसचा दरवाजा उघडला आणि अरब मुस्लिमाला बसमधून खाली उतरण्याची विनंती केली!*
*अरब मुस्लिमाने याचे कारण विचारले.*

बस चालकाने नम्रपणे उत्तर दिले.

*अरे अरब भाई! प्रिय पैगंबराच्या वेळी टॅक्सी नव्हती, बस नव्हती, बॉम्ब नव्हते, विमान अपहरणकर्ते नव्हते, मशिदीत आवाज करणारे लाऊडस्पीकर नव्हते, आत्मघाती हल्ले नव्हते, आरडीएक्स नव्हते. AK 47 नव्हते, सगळीकडे फक्त शांतता होती.*
*आता तुम्ही शांतपणे खाली उतरा आणि मुक्कामाला जाण्यासाठी उंटाची वाट पहा.*....!!

आज मला लिहिण्यास भाग पाडले आहे, आणि तुम्ही ते जरूर वाचा🙏

*नानकापूर्वी कोणीही शीख नव्हता!*

*मुहम्मद यांच्या आधी एकही मुस्लिम नव्हता!*

*ऋषभदेवांच्या आधी जैन नव्हते!*

*बुद्धापूर्वी बौद्ध नव्हते!*

*कार्ल मार्क्सच्या आधी कोणी डावे नव्हते!*

पण:
*कृष्णापूर्वी राम* होता...
*रामाच्या* आधी *जमदग्नी* होता...
*जमदग्नीच्या* आधी *अत्री* होते.
*अत्रीच्या* आधी *अगस्त्य* होते.
*अगस्त्यच्या* आधी *पतंजली* होते.
*पतंजली* पूर्वी *कानड* होते.
*कानडा* पूर्वी *याज्ञवल्क्य* होते.
*याज्ञवल्क्याच्या* आधी...
सर्व *"सनातन वैदिक"* अनुयायी होते..!
त्यांना त्यांच्या धर्माचा गर्व आहे ते त्यांचा धर्म जपतात आणि आपण....
ते पाच वेळा नमाज पडतात
आपली सुशिक्षित मुल म्हणतात मंदिरासाठी खर्च म्हणजे विनाकारण पैसा व्यर्थ
मला कुणाच्या धर्माच्या विरोधात बोलायचे नाही पण किमान आपण आपल्या धर्माचा स्वाभिमान तरी बाळगा..
ते त्यांचा धर्म जपतात आपण आपला जपा..
आमच्या बायकांना कपाळावर कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्र घालायची लाज वाटते..
संस्कृती परंपरा जपा..
मला यातुन कोणता धर्म उच निच लेखायचा नाही फक्त प्रत्येकाने आपल्या धर्माचा स्वाभिमान बाळगायला शिकावे हे सांगायचे आहे
जन्माला येताना ज्या धर्मात जन्माला आलो तो धर्म जपा..
मग कोणताही असो...
टीप:ही पोस्ट कोणत्या च धर्माच्या विरोधात नाही..हे लक्षात घ्यावे.. ज्याला माझा लेख आवडला नसेल त्याने वाचून सोडून द्यावे विनाकारण खराब कमेंट्स करून ब्लॅक लीस्ट ला आमंत्रण देऊ नये

"दादा, तुला कितीदा सांगितलंय रं, माझ्या साहेबी दोस्तांसमोर येत जाऊ नकोस म्हणून. तुझे ते ऑईलानं माखलेले काळे हात अन् मळकट...
08/08/2026

"दादा, तुला कितीदा सांगितलंय रं, माझ्या साहेबी दोस्तांसमोर येत जाऊ नकोस म्हणून. तुझे ते ऑईलानं माखलेले काळे हात अन् मळकट कपडे... लाज वाटते रं मला! तुला अक्कल असती तर तू बी माझ्यासारखा इंजिनिअर झाला असतास, पण नशिबातच तुझ्या गॅरेजचं काम लिहिलंय, तिथंच बरं दिसतोस तू."

सागरचे हे तीक्ष्ण शब्द ऐकून आकाशच्या काळजात चर्रर्र झालं, पण चेहऱ्यावरची शांत रेष तशीच ठेवत त्याने आपले ग्रीसने माखलेले हात पॅन्टला पुसले आणि मान खाली घालून तिथून निघून गेला. त्याला सवय झाली होती आता या अपमानाची. आपलाच लहान भाऊ, ज्याला त्याने खांद्यावर खेळवलं होतं, आज तोच त्याला 'अडाणी' समजत होता.

पिंपळगावच्या एका छोट्याशा कौलारू घरात आकाश आणि सागर लहानाचे मोठे झाले होते. परिस्थिती तशी बेताचीच. वडील, ज्यांना ते 'आप्पा' म्हणायचे, दिवसभर दुसऱ्याच्या शेतात राबायचे आणि आई लोकांची धुणीभांडी करायची. पण घरात गरिबी असली तरी सरस्वती प्रसन्न होती. आकाश आणि सागर दोघेही शाळेत हुशार होते. वर्गात पहिला-दुसरा नंबर त्यांचाच असायचा. आकाश मोठा असल्याने त्याला सागरची भारी काळजी. स्वतःच्या पाटीवरची पेन्सिल छोटी झाली की ती सागरला देऊन स्वतः तुकड्याने लिहिणारा आकाश होता तो. "माझा सागर मोठा साहेब होणार बघ," असं तो कौतुकाने सगळ्यांना सांगायचा.

दिवस सरत होते. आकाश दहावीत गेला आणि सागर आठवीत. आकाशने रात्रंदिवस एक करून अभ्यास केला. त्याला खात्री होती की आपण बोर्डात चमकणार. पण नियतीचा खेळ काही वेगळाच होता. दहावीच्या परीक्षेच्या काही दिवस आधीच आप्पा शेतात काम करताना प*डले आणि त्यांचा पा*य मो*डला. घरातलं कमवतं माणूस अंथरुणाला खिळलं. आईच्या एकटीच्या कमाईवर घर चालणं मुश्किल झालं. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत तिथे पुढच्या शिक्षणाचा विचार कोण करणार?

दहावीचा निकाल लागला त्या दिवशी घरात तणावाचं वातावरण होतं. आप्पांच्या डोळ्यात पाणी होतं. "पोरांना शिकवायचं स्वप्न बघितलं व्हतं, पण आता पोटालाच चिमटा बसतोय तर फी कुठून भरायची?" हे शब्द आकाशने दाराआड उभा राहून ऐकले होते. त्याच्या मनात वादळ उठलं होतं. त्याला माहित होतं की, घरात जेमतेम एकाच मुलाला शहरात पाठवून शिकवण्याइतके पैसे साठवता येतील, तेही आईने स्वतःचे दागिने गहाण ठेवले तरच.

दुसऱ्या दिवशी सकाळी आकाश आई-बाबांसमोर उभा राहिला. त्याचा चेहरा निर्विकार होता. त्याने खोटं नाटकी रडू आणत सांगितलं, "आप्पा, आई... मला माफ करा. माझा निकाल लई खराब लागलाय. मला फक्त ४५ टक्के पडलेत. मला आता पुढं शिकायचा लई कंटाळा आलाय. माझ्या डोक्यात ती पुस्तकं घुसतच न्हाईत. मी ठरवलंय, मी एसटी स्टँडच्या मागच्या त्या शिंदे मामाच्या गॅरेजवर कामाला जातो. दोन पैसे मिळतील तर तुम्हालाबी हातभार लागेल."
आप्पांना धक्काच बसला. "अरे, पण तू तर हुशार व्हतास ना रं? असं कसं झालं?" आकाशने नजर चोरली. "काय माहित आप्पा, पण आता शिकणं माझ्या बसचं न्हाई." आई ढसाढसा रडली, पण परिस्थितीपुढे सगळेच लाचार होते.

आणि तिथून दोन भावांचे रस्ते वेगळे झाले. आकाशने शाळेचं दप्तर कायमचं खुंटीला टांगून हातात पाना-पकड घेतली. कोवळ्या वयात त्याचे हात ग्रीस आणि ऑईलने काळे पडू लागले. उन्हातान्हात गाड्यांच्या खाली झोपून तो काम करू लागला. दुसरीकडे, सागर हुशार होताच. त्याला आकाशने गॅरेजमध्ये काम करून पाठवलेल्या पैशांवर शहरातल्या चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं. वर्षं सरत गेली. आकाशच्या घामाच्या पैशावर सागर इंजिनिअर झाला. शहरात राहून सागरला तिथल्या चकचकीत जगाची हवा लागली. त्याला आता आपल्या गावरान पद्धतीची, गरिबीची आणि मुख्य म्हणजे आपल्या 'अडाणी' भावाची लाज वाटू लागली.

सुट्टीत घरी आला की तो आकाशशी तुसडेपणाने वागायचा. "तू आयुष्यभर गाड्यांची चाकंच खोलत बसणार, तुला काय कळणार जगात काय चाललंय ते," असे टोमणे तो सर्रास मारायचा. आकाश मात्र फक्त हसायचा. "हो रं बाबा, तू शिकलेलास, तुला जास्त कळतं," एवढंच म्हणायचा. सागरला नवीन कपडे, मोबाईल घेताना आकाशने कधी स्वतःच्या फाटक्या बनियनचा विचार केला नाही. 'लहान आहे, हौस करू दे त्याची,' हेच त्याचं म्हणणं असायचं. काही वर्षांनी सागरचं एका मोठ्या कंपनीत चांगल्या पगारावर सिलेक्शन झालं. त्याचं लग्न एका श्रीमंत घरातल्या मुलीशी ठरलं. घरात लग्नाची धामधूम सुरू झाली. घर रंगवायचं होतं, साफसफाई करायची होती. सगळा भार पुन्हा आकाशवरच पडला. सागर फक्त ऑर्डरी सोडत होता.

लग्नाच्या आधी घराची अडगळ साफ करताना जुन्या ट्रंका आणि कपाटं उघडली जात होती. एका जुन्या, गंजलेल्या पत्र्याच्या पेटीत सागरला एक जुनी, धुळीने माखलेली डायरी सापडली. ती आकाशची दहावीतली डायरी होती. कुतूहलापोटी सागरने ती उघडली. सुरुवातीच्या पानांवर शाळेतल्या गमतीजमती होत्या. पण शेवटच्या पानावर एक तारीख होती - दहावीच्या निकालाचा दिवस.

सागरने ते पान वाचायला सुरुवात केली आणि त्याच्या काळजाचा ठोकाच चुकला. आकाशने त्यात लिहिलं होतं, "आज दहावीचा निकाल लागला. मला ९२% मिळालेत. बोर्डात तेरावा आलोय मी. खूप आनंद झालाय, वाटतंय धावत जाऊन आई-आप्पांना सांगावं. पण... पण काल रात्री आप्पा आईशी बोलताना मी ऐकलं. घरात पैसे नाहीत. आप्पांचा पाय मो*डलाय. जर मी आता 'मला पुढं शिकायचंय' असा हट्ट धरला, तर आप्पांना ते जमिनीचा तुकडा विकावा लागेल, नाहीतर आईला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागेल. आणि जर मी शिकलो, तर सागरचं काय? त्यालाही शिकायचंय. त्याच्यात खूप बुद्धी आहे. आम्ही दोघंही नाही शिकू शकत. कोणाला तरी माघार घ्यावीच लागेल.

मी ठरवलंय. मी मोठा आहे. माझं स्वप्न जळालं तरी चालेल, पण सागरचं भविष्य मी अंधारात जाऊ देणार नाही. मी उद्या सगळ्यांना खोटं सांगणार आहे की मला कमी मार्क पडलेत आणि मला शिकायचं नाहीये. मला माहित आहे, हे खोटं बोलताना माझा जीव जाईल, पण माझ्या लहान भावासाठी मी हे विष प्यायला तयार आहे. सागर, तू खूप मोठा साहेब हो रे. माझ्या वाट्याचं शिक्षणही तूच घे. मी गॅरेजमध्ये काम करेन, माझे हात काळे करेन, जेणेकरून तुझे हात नेहमी स्वच्छ आणि सुटाबुटात राहतील. हे रहस्य या डायरीतच गाडून टाकतोय."

त्या डायरीच्या पानाखाली एक घडी घातलेला कागद होता. सागरने थरथरत्या हाताने तो उघडला. ते आकाशचं दहावीचं खरं मार्कशीट होतं. विषयवार मार्क बघून सागरचे डोळे दिपले - गणित ९६, विज्ञान ९०... एकूण ९२%!

सागरला स्वतःचीच घृणा वाटू लागली. ज्या भावाला तो आयुष्यभर 'ढ', 'अडाणी' म्हणून हिणवत होता, त्याने त्याच्यासाठी स्वतःच्या उज्ज्वल भविष्याची राखरांगोळी केली होती. त्या काळ्या ग्रीसने माखलेल्या हातांमागे किती मोठा त्याग दडलेला होता, हे त्याला आज उमजलं होतं. त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या. तो डायरी छातीशी कवटाळून ओक्साबोक्शी रडू लागला.

तो धावतच बाहेर आला. अंगणात मांडव दारीचं काम सुरू होतं. आकाश एका शिडीवर चढून मांडवाचे बांबू बांधत होता. घामाने थबथबलेला, अंगात तीच जुनी मळकट शर्ट.

सागर धावत गेला आणि त्याने शिडीवरून खाली उतरणाऱ्या आकाशला घट्ट मिठी मारली. आकाश गोंधळला. "काय झालं रं सागर? काय बिनसलं?"
सागरला बोलताच येत नव्हतं. त्याने फक्त ती डायरी आणि ते मार्कशीट आकाशच्या समोर धरलं. ते बघून आकाशचा चेहरा पांढराफटक पडला. त्याचं इतक्या वर्षांचं गुपित उघड झालं होतं.

"दादा... तू... तू हे काय केलंस?" सागर हुंदके देत म्हणाला, "तू इतका हुशार होतास, आणि माझ्यासाठी तू स्वतःला अडाणी बनवलंस? आणि मी... मी नराधम तुला आयुष्यभर टोमणे मारत राहिलो. तुझी लाज वाटून घेतली. मला माफ कर दादा, मी तुझ्या पायाच्या धुळीच्या लायकीचा पण नाही." सागर आकाशच्या पाया पडायला खाली वाकला.

आकाशने पटकन त्याला वर उचललं आणि आपल्या छातीशी धरलं. त्याच्याही डोळ्यात पाणी होतं, पण त्यात समाधान होतं. तो शांतपणे म्हणाला, "अरे वेड्या, यात माफी कसली मागायची? तू माझा लहान भाऊ आहेस. त्या वेळी परिस्थितीच तशी होती रं. एकाला थांबायचंच होतं. मग मी थांबलो तर काय बिघडलं? आणि कोण म्हणतं माझं शिक्षण वाया गेलं? अरे, आज तू जेव्हा इंजिनिअर म्हणून त्या मोठ्या खुर्चीत बसतोस ना, तेव्हा मला वाटतं की मीच त्या खुर्चीत बसलोय. तुझं यश हेच माझं शिक्षण आहे."

सागरने त्या दिवशी एक शपथ घेतली. ज्या हातांनी त्याच्यासाठी इतका त्याग केला, त्या हातांना तो यापुढे कधीच कष्ट करू देणार नाही. त्याने ठरवलं की लग्नानंतर पहिली गोष्ट काय करायची असेल, तर आकाशला गॅरेजच्या कामातून सोडवायचं आणि त्याने अर्धवट सोडलेलं शिक्षण पुन्हा सुरू करायला लावायचं. कारण वय कितीही झालं तरी स्वप्नं पूर्ण करायला उशीर होत नाही, हे त्याला आज उमजलं होतं.

मंडपात सनईचे सूर वाजू लागले होते, पण आज त्या सुरांपेक्षा दोन भावांच्या पुन्हा जुळलेल्या काळजाचे सूर जास्त गोड होते. सत्य हेच होतं की, सागरच्या सुटाबुटातल्या ऐटीपेक्षा आकाशच्या ग्रीसने माखलेल्या काळ्या हातांचे मोल कित्येक पटीने जास्त होते.

मुलाच्या तेराव्याच्या दिवशी सून म्हणाली: ‘बाबा, घर रिकामं करा!’आणि दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये बापाने असा ‘सत्याचा स्फोट’ के...
08/08/2026

मुलाच्या तेराव्याच्या दिवशी सून म्हणाली: ‘बाबा, घर रिकामं करा!’
आणि दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये बापाने असा ‘सत्याचा स्फोट’ केला की सुनेचा आवाजच बसला!"

नाशिकच्या एका आलिशान टॉवरमध्ये ६५ वर्षांचे माधवराव देशमुख मुलगा समीर आणि सून नेहा यांच्यासोबत राहत होते.
माधवराव निवृत्त हेड क्लर्क… शांत, सोज्वळ.
नेहा — एका फायनान्स कंपनीत ब्रांच मॅनेजर. पैसा, पोस्ट आणि अहंकार या तिन्हींचा नशा तिच्या बोलण्यातूनच दिसायचा.
आणि मग एक दिवस… ⚡
ऑफिसमधून परतताना समीरला गाडीवरच हार्ट अटॅक आला.
३२ वर्षांचा तरुण मुलगा एका क्षणात गेल्याने माधवरावांचं जगच उद्ध्वस्त झालं.
१२ दिवस शोक… तेरावी झाल्यावर घरात शांतता.
💔 सुनेचा ‘खरा चेहरा’ तेराव्याच्याच रात्री दिसला!
रात्री उशिरा नेहा थेट माधवरावांच्या खोलीत आली.
तिच्या चेहऱ्यावर दुःखाचा एक कणही नव्हता… फक्त कठोरपणा.
ती म्हणाली—
“बाबा, आता मला माझं आयुष्य बघायचं आहे. हा फ्लॅट समीरच्या नावावर होता. म्हणजे आता माझा.
तुमचे खर्च मी पेलू शकत नाही.
२४ तासांच्या आत घर खाली करा. गावी जा… किंवा वृद्धाश्रमात!”
ते शब्द ऐकून वृद्ध बापाचा जीवच पिळवटला.
पण ते कणभरही रागावले नाहीत… एकही शब्द न बोलता शांतपणे पिशवीत दोन कपडे ठेवले…
समीरच्या फोटोला शेवटचा नमस्कार केला…
आणि रात्री ११ वाजता घर सोडून निघून गेले.
नेहाला वाटलं— म्हातारा घाबरला… आता शांतता.
⚡ दुसऱ्या दिवशीचा तो प्रसंग — सुनेचे होश उडाले!
दुसऱ्या दिवशी नेहा ऑफिसमध्ये बसली होती. तेवढ्यात केबिनचा दरवाजा उघडला…
आत आले माधवराव… आणि त्यांच्या बाजूला वकील.
नेहा खेकसली—
“तुम्ही इथे? मी सांगितलं होतं ना माझ्या आयुष्यात दिसू नका!”
वकीलाने तिच्यासमोर फाईल आपटली.
माधवराव शांत पण धारधार आवाजात म्हणाले—
“काल तू मला ज्या घरातून हाकललं… ते घर खरं तर पूर्णपणे माझंच आहे.
ही रजिस्ट्रेशन पेपर्स… उघडून बघ!”
नेहाच्या हातातली फाईल थरथरली.
पहिलंच पान पाहताच तिचा रंगच उडाला!
त्या ५० लाखांच्या घरावर समीरचं नाही… ‘माधवराव देशमुख’ हे नाव जळजळीत मोठ्या अक्षरात लिहिलेलं होतं.
💥 सत्याचा स्फोट!
माधवराव पुढे म्हणाले—
“समीरच्या नावावर लोन मिळत नव्हतं.
मी माझ्या आयुष्यभराची बचत—२९ वर्षांची पेन्शन आणि संपूर्ण PF—एकूण ४० लाख देऊन हे घर माझ्या नावावर घेतलं.
फक्त माझ्या पोराला कमीपणा वाटू नये म्हणून दारावर ‘समीर निवास’ असं लिहिलं.”
वकील म्हणाला—
“आपल्याविरुद्ध १५ दिवसांची Eviction Notice निघाली आहे.
घर रिकामं केलं नाही तर पोलीस येतील.”
ऑफिसच्या कर्मचार्‍यांसमोर ब्रांच मॅनेजर नेहा जमिनीवरच कोसळली.
तिचा माज, तिचा अहंकार… सगळं धुळीस मिळालं.
ती रडत माधवरावांच्या पायांवर पडली—
“बाबा… चूक झाली… मला माफ करा… मला घराबाहेर काढू नका…”
पण माधवरावांनी पाय मागे घेतले.
“काल माझी सून नव्हतीस तू… फक्त स्वार्थी मालकीण होतीस.
बापाशी वाईट वागलीस, आता या अश्रूंना किंमत नाही.
१५ दिवसांत घर रिकामं कर…”
माधवराव ताठ मानेने बाहेर गेले.
नेहा?
ना नवरा… ना घर… ना किंमत.
फक्त अहंकाराच्या आहारी गेलेलं उद्ध्वस्त आयुष्य.
✍️ शेवटचा संदेश
पैसा आणि प्रॉपर्टीच्या नशेत अनेकजण नाती विसरतात…
पण कागदावरचं नाव आणि कर्म—दोन्ही कधीही फसवत नाहीत.
📢 डिस्क्लेमर
ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. कोणत्याही व्यक्तीशी किंवा घटनेशी साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग आहे.
#️⃣

"तू माझ्या लायकीचा नाहीस संग्राम... आरश्यात चेहरा बघितलायस का तुझा? माझ्या पायातील सँडलची किंमत तुझ्या महिन्याच्या खर्चा...
08/08/2026

"तू माझ्या लायकीचा नाहीस संग्राम... आरश्यात चेहरा बघितलायस का तुझा? माझ्या पायातील सँडलची किंमत तुझ्या महिन्याच्या खर्चापेक्षा जास्त आहे..." भर कॉलेजच्या गेटवर सायलीने संग्रामचा अपमान केला आणि तोच अपमान संग्रामच्या काळजात जिवंत निखाऱ्यासारखा पे_टत राहिला!

कोल्हापूरच्या एका छोट्याशा गावातली संग्राम आणि सायलीची जोडी म्हणजे शाळेपासूनची 'फेव्हरेट लव्ह स्टोरी'. दहावीच्या निरोपाच्या दिवशी शाळेच्या पटांगणात वडाच्या झाडाखाली उभं राहून संग्रामने सायलीला वचन दिलं होतं, "बाळा, परिस्थिती गरीब आहे ग माझी, पण तुला राणीसारखं ठेवेन. आपण लग्न करू." सायलीने लाजून होकार दिला होता.
शाळा संपली. सायली पुढच्या शिक्षणासाठी पुण्यात गेली आणि संग्राम घरची शेती सांभाळत गावातल्या कॉलेजमध्ये जाऊ लागला. सुरुवातीला दोघे तासनतास फोनवर बोलायचे. संग्राम शेतात राबून, भाजी विकून साठवलेले पैसे सायलीच्या मोबाईल रिचार्जसाठी पाठवायचा.💲💲💲💲💲💲💲💲

पण शहराचा वारा सायलीला लागला. कॉलेजमध्ये श्रीमंत मुलांच्या गाड्या, त्यांचे महागडे कपडे, मॉलमध्ये फिरणं हे पाहून सायलीचे डोळे दिपले. तिला तिच्या मैत्रिणींचे बॉयफ्रेंड्स भारी गिफ्ट्स देताना दिसायचे. तिला वाटू लागलं, "माझा बॉयफ्रेंड तर नुसता शेतकरी आहे, गावंढळ आहे. तो मला काय देणार?".... 🔥🔥🔥🔥🔥

हळूहळू तिने संग्रामचे फोन उचलणे बंद केले. मेसेजला रिप्लाय उशिरा येऊ लागले.
एकदा संग्रामने कसाबसा पैसा जमवून तिला वाढदिवसाला कुरिअरने एक छानसा ड्रेस पाठवला. पण सायलीने फोन करून त्याला सुनावले, "संग्राम, काय हे चिंध्यांसारखे कपडे पाठवलेत? माझ्या कॉलेजमध्ये मुली ब्रँडेड घालतात. तुला स्टॅंडर्ड कळतं का रे?" संग्रामच्या मनाला खूप लागलं, पण प्रेमापोटी तो गप्प राहिला.

काही दिवसांतच सायलीने कॉलेजमधल्या 'रोहित' नावाच्या एका श्रीमंत मुलाशी मैत्री केली. रोहित तिला कारमधून फिरवायचा, महागड्या हॉटेलमध्ये नेायचा. संग्रामला हे मित्रांकडून कळलं तेव्हा तो कोलमडला. तो रडत तिला फोन करू लागला, पण तिने नंबर ब्लॉक केला. त्याने वेड्यासारखे तिच्या मैत्रिणींचे नंबर मिळवले, त्यांना विनवण्या केल्या, "प्लीज ताई, एकदा माझं सायलीशी बोलणं करून द्या, मी तिच्याशिवाय मरून जाईन." पण त्या मैत्रिणींनी उलट त्याची चेष्टा केली.

संग्रामला राहवलं नाही. तो तसाच एसटीने पुण्यात आला. तिचा कॉलेजच्या गेटवर तासनतास उभा राहिला. दुपार झाली, सायली रोहितच्या कारमधून खाली उतरली. ती खूप मॉडर्न दिसत होती. संग्राम धावत तिच्या जवळ गेला.
"सायली..." त्याचे डोळे भरले होते.
तिने रागाने मागे वळून पाहिलं. "तू? इथे काय करतोयस भिकारड्यासारखा?"
संग्रामने तिचे हात पकडले, तो गुडघ्यावर बसला. "सायली, तोडू नकोस ग आपलं नातं. मी खूप प्रेम करतो तुझ्यावर. मी मेहनत करीन, तुला हवं ते देईन, पण मला सोडून जाऊ नकोस." तो ढसाढसा रडत होता.

कॉलेजची मुलं जमा झाली. सायलीच्या मैत्रिणी कुत्सितपणे हसल्या. "हहाहा, सायली हा तुझा तो गावठी बॉयफ्रेंड का ग?"
सायलीचा अहंकार दुखावला. तिने सर्वांसमोर संग्रामच्या थोबाडीत मारली. "माझ्या जवळ येऊ नकोस. तुझी लायकी आहे का माझ्याशी बोलण्याची? गेट लॉस्ट!"

तेवढ्यात रोहित आला. "ए ए, कोण रे तू? माझ्या गर्लफ्रेंडला त्रास देतोस?" रोहितने आणि त्याच्या मित्रांनी मिळून संग्रामला लाथा-बुक्क्यांनी तुडवलं. संग्राम र_क्ताळला, कपडे फाटले, पण त्याची नजर फक्त सायलीवर होती. पण सायलीने एकदाही त्याला वाचवायचा प्रयत्न केला नाही. उलट ती रोहितच्या हातात हात घालून निघून गेली.

त्या दिवशी पुणे स्टेशनवर बसून संग्राम रात्रभर रडला. पण त्या अश्रूंसोबतच त्याच्यातल्या जुन्या 'प्रेमवेड्या' मुलाचा अंत झाला होता. त्याने ठरवलं, "आता प्रेम नाही, जिद्द पेटवायची. ज्या लायकीवरून तिने मला हिणवलं, तीच लायकी कमवून दाखवायची."
संग्राम गावी परतला. त्याने स्वतःला खोलीत कोंडून घेतलं. शेतीसोबतच त्याने 'एमपीएससी'चा अभ्यास सुरू केला. दिवस-रात्र एक केली. लोकांच्या टोमण्यांकडे लक्ष दिलं नाही.

पाच वर्षानंतर...

कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात (Collector Office) लोकांची गर्दी होती. सायली एका फाईलसाठी हेलपाटे मारत होती. रोहितचा बिझनेस जुगारात आणि व्यसनात बुडाला होता. त्यांच्या जमिनीचा लिलाव होणार होता आणि तो थांबवण्यासाठी एका वरिष्ठ अधिकाऱ्याची सही हवी होती.

शिपायाने नाव पुकारले, "मिसेस सायली रोहित कदम, साहेबांनी आत बोलावलंय."
सायली केबिनमध्ये गेली. ती रडवेली झाली होती. "सर, प्लीज आमचं घर वाचवा, ही सही नाही मिळाली तर आम्ही रस्त्यावर येऊ."
समोरच्या खुर्चीवर बसलेल्या अधिकाऱ्याने फाईलवरून नजर वर केली. ते भेदक डोळे, तो रुबाब आणि चेहऱ्यावर एक गंभीर शांतता.
तो 'संग्राम' होता. आता तो 'उपजिल्हाधिकारी' (Deputy Collector) झाला होता.

सायलीच्या पायाखालची जमीन सरकली. तिचे शब्द तोंडातच अडकले. "संग्राम... तू?"
संग्रामने शांतपणे पेन उघडलं. तिच्याकडे बघून तो हसला नाही की रागावला नाही. त्याच्या नजरेत आता प्रेम नव्हतं, फक्त कर्तव्य होतं.
त्याने फाईलवर सही केली आणि फाईल तिच्याकडे सरकवली.

सायलीला रडू कोसळलं. "संग्राम, मला माफ कर. मी खूप मोठी चूक केली. त्या रोहितने मला बर्बाद केलं. तुझं प्रेम..."

संग्रामने हात वर करून तिला थांबवलं. "मॅडम, तुमचं काम झालंय. तुम्ही जाऊ शकता. बाहेर खूप लोक ताटकळत आहेत."

"संग्राम, एकदा तरी बोल ना..." तिने विनवणी केली.
संग्रामने शिपायाला बेल वाजवून बोलावलं आणि शांतपणे म्हणाला, "ज्या मुलाला तू कॉलेजच्या गेटवर मारलंस, तो तिथेच मेला. या खुर्चीवर जो बसलाय, तो फक्त एक अधिकारी आहे. आणि हो, जाताना गेटवरच्या वॉचमनला सलाम करून जा, कारण पाच वर्षांपूर्वी एका 'भिकारी' समजल्या जाणाऱ्या मुलामुळेच आज तुला ही सही मिळाली आहे."
सायली फाईल छातीशी धरून रडत केबिनबाहेर पडली. तिला आज कळलं होतं की, ती ज्याला दगड समजून सोडून गेली होती, तो खरं तर 'हिरा' होता, जो आता तिच्या नशिबात उरला नव्हता..... 🔥🔥🔥🔥🔥🔥
😔😌😌😌😌💔💔🥲🥲

Address

Rahuri
413705

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jyoti M Kohakade posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Jyoti M Kohakade:

Shortcuts

Share