02/10/2023
*राजुरा विधानसभा आढावा बैठक राजुरात संपन्न*
रविवार दिनांक 1-10-2023 ला 1:00 वा. दुपारी ,संत नगाजी महाराज सभागृह येथे भारत राष्ट्र समिती आढावा बैठक घेण्यात आली.मा. माजी आमदार साळुंखे गुरुजी पूर्व विदर्भ सह समन्वयक ह्यांच्या अध्यक्षतेखाली व वामसीकृष्ण अरर्किल्ला चंद्रपूर जिल्हा समन्वयक ह्यांच्या उपस्थिती मद्ये तालुका समन्वयक , सदस्य नोंदणी अहवाल तसेच जमा खर्चाचा तपशील सादर करण्याचे उद्देशाने बैठकीचे आयोजन मा. आनंदराव अंगलवार राजुरा विधानसभा समन्वयक, सौ रेशमाताई चव्हाण महिला समन्वयक, मा संतोष कुळमेथे सह समन्वयक, ह्यांच्या उपस्थिती करण्यात आला.
बैठकीची प्रस्तावना रेशमा चव्हाण ह्यांनी सादर केली. कार्यकर्ता हा पार्टी चा मुख्य घटक असून त्यांची काळजी घेणे गरजेचे आहे असे मत मा. आनंदराव अंगलवार ह्यांनी बोलून दाखविले. चंद्रपूर जिल्ह्यातील सदस्य नोंदणी कार्यक्रम राजुरा विधानसभा मद्ये यशस्वी रित्या जबाबदारी घेऊन पार पाडले ह्यांची तारिफ खुद्द मुख्यमंत्री तेलंगाना मा.के चंद्रशेखर राव साहेब करतात असे मत मा. वमशीकृष्ण अरकिल्ला ह्यांनी सांगितले.जे कार्यकर्ते पक्ष वाढी साठी प्रयत्न करून काम करीत आहेत त्यांना कुठेच डावलण्यात येणार नाही. ज्यांनी राजकारणात येऊन मोठ होण्याचे स्वप्न बघितले आहे,त्यांनीच येऊन पार्टी मद्ये काम करून पार्टी ला घरा घरात नेण्याचे कार्य करावे.असे मत मा. माजी आमदार बाळसाहेब साळुंखे गुरुजी ह्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले. आज पर्यंत झालेल्या जमा खर्चाचा तपशील अध्यक्ष समोर मा रेशमा चव्हाण ह्यांनी सादर केला.
राजुरा विधानसभा क्षेत्र मधील चारही तालुका समन्वयक व शहर समन्वयक ह्यांनी गेल्या चार महिन्यांपासून केलेल्या कामाचा आढावा बैठकीत सादर करून त्यांनी केलेल्या नियुक्ती बैठकीत वाचून दाखविल्या.तसेच समोर येणाऱ्या अडचणी ची माहिती मान्यवरांच्या समोर मांडल्या.व पक्ष प्रवेश व पक्ष वाढ करण्यासाठी काय करता येईल ह्यावर चर्चा करण्यात आली.
या बैठकित उपस्थित अजय पुणेकर , सुनील साखलवार गोंडपीपरी , रीयाज शेख ,प्रशांत दुर्गे ,अशोक दुर्गे ,बालाजि नेवारे,विजय राठोर ,बालाजी आत्राम ,महेन्द्र ठाकुर , प्रशांत गड्डम , सारिका पचनुर,ज्योती नळे,अनुसुर्या नुती, विजय जुलमे, इस्माईल शेख,तिरुपती सोडनर, ज्ञानेश्वर सुरनर ,सुबोध चिकटे, सदानंद मडावि, अशोक क्षिरसारकर ,डॉ.लखन अडबायले ,किशोर मडावि, इस्लाम शेख ,अश्विनी मसाखेत्रि ,किरण वाघमारे, बाबाराव मस्के, इस्लाम शेख,भूषण फूसे ,राकेश चिलकुलवार , संदीप निमकर,धनराज बोरडे, शंकर आत्राम,सुशील मडावी, जिवंनदास