Ratnagiri News Network

Ratnagiri News Network बातम्या, लेख, फाेटाे आणि व्हिडिओ

🛍️ *रत्नागिरी ग्राहक पेठ**एकत्र येऊया ! समृद्ध होऊया !!*महिला बचत गट व इतर उद्योगिनी महिलांसाठी हक्काचे व्यासपीठ🌸 *दिवाळ...
25/10/2024

🛍️ *रत्नागिरी ग्राहक पेठ*
*एकत्र येऊया ! समृद्ध होऊया !!*
महिला बचत गट व इतर उद्योगिनी महिलांसाठी हक्काचे व्यासपीठ

🌸 *दिवाळी निमित्त भव्य प्रदर्शन व विक्री*
भरपूर व्हरायटी ... अवश्य भेट द्या...

*गुरुवार दि. २४ ऑक्टोबर ते रविवार दि. २७ ऑक्टोबर २०२४*
*वेळ : सकाळी ११.०० ते रात्रौ ८.३०*

🎁🏮🎉 दिवाळीसाठी आकाश कंदील, पणत्या, रांगोळ्या, उटणे, चविष्ट फराळ, गिफ्ट, ब्रँडेड पर्सेस, परफ्युम्स, विविध घरगुती उत्पादने, कोकण मेवा, खाद्य पदार्थ, इन्स्टंट फूड प्रॉडक्टस्, आयुर्वेदिक प्रॉडक्टस्, विविध ब्रँडेड वस्तू, लिनन, सिल्क, कॉटन साड्यांचे विविध प्रकार, बोरोसल काचचे विविध प्रकार, सौंदर्य प्रसाधने, कुर्तीज्, ज्वेलरी, हॅण्डीक्राफ्ट प्रॉडक्टस्, ड्रेस मटेरिअल्स, गाऊन्स, अंडर गारमेंटस्, पर्सेस, साड्या, ड्रेस मटेरिअल, विविध प्रकारची ब्रँडेड होलसेल व रिटेल दरात अगरबत्ती, नर्सरी आकर्षक झाडे, तसेच विविध खाद्य पदार्थांची रेलचेल, भेळ, शेवपुरी, चाट वगैरे सर्व काही इथेच...

💃 *महिलांसाठी कार्यक्रम*
▪️ दि. २४ ऑक्टोबर सकाळी ११.३० वा. उद्घाटन समारंभ.
दुपारी ३.३० वा. दंत तपासणी - डॉ. कवितके, लायन्स क्लब रत्नागिरी.
▪️ दि. २५ ऑक्टोबर दुपारी ४.०० वा. कौटुंबिक व व्यावसायिक जबाबदारीतून व्यक्तिमत्व
जपणे, एक कला - मार्गदर्शन डॉ. शिवानी पानवलकर, लायन्स क्लब रत्नागिरी.
▪️ दि. २६ ऑक्टोबर, दुपारी ४.३० वा. आरोग्य विमा - मार्गदर्शन : सिनिअर सेल्स मॅनेजर (स्टार हेल्थ) श्री. समीर सुर्वे - लायन्स क्लब रत्नागिरी.
▪️दि. २७ ऑक्टो. २४ दुपारी ३.३० फनी गेम्स. ५.०० वा. सांस्कृतिक कार्यक्रम : भरतनाट्यम, जोगवा, दांडीया डान्स.

*स्थळ* : अंबर हॉल गणेश कॉलनी, टी. आर. पी., रत्नागिरी.

*संपर्क : प्राची शिंदे-* 9422376224, 9764417079

25/10/2024

*खेडमध्ये मोत्याच्या दागिन्यांचे प्रशिक्षण*

✔️ *रत्नागिरी न्यूज नेटवर्क*
*२५ ऑक्टोबर*
*खेड* : विश्वकर्मा पांचाळ सुवर्णकार समाज महिला मंडळातर्फे आयोजित एकदिवसीय मोत्यांचे दागिने बनविण्याचे प्रशिक्षण श्रद्धा पालकर यांच्या अध्यक्षतेखाली झाले. प्रशिक्षणात सुमारे ३० ते ३५ महिलांनी सहभाग घेतला होता. या वेळी प्रशिक्षक सारिका पाटणकर यांनी मार्गदर्शन केले. त्यामध्ये मोत्याचे तन्मणी, चिंचपेटी, बांगड्या आणि कानातले यांचे आलेल्या सर्व महिलांना प्रशिक्षण दिले.

या कार्यक्रमात प्रणिता देवरूखकर, सरिता सागवेकर, ईशा देवरूखकर, रूपाली सागवेकर, क्रांती देवरूखकर, विद्या देवरूखकर, मीनाक्षी देवरूखकर, जान्हवी पालकर, समिधा माने या महिलांनी सहभाग घेतला होता. या वेळी कार्यक्रमाला मंडळाच्या अध्यक्षा श्रद्धा पालकर, उपाध्यक्ष रुचिता सागवेकर, सचिव वनश्री सागवेकर, उपसचिव स्नेहल पालकर, खजिनदार श्रुती देवरूखकर, उपखजिनदार श्रेया सागवेकर आदी उपस्थित होत्या.
➖➖➖➖➖➖
https://bit.ly/3A5B1R2
➖➖➖➖➖➖
*जॉईन कम्युनिटी ग्रुप लिंक*
https://chat.whatsapp.com/Cv57HQPM0fqAcjIc68xPMj

Ratnagiri News Network, Ratnagiri. 2,723 likes · 4 talking about this. बातम्या, लेख, फाेटाे आणि व्हिडिओ

25/10/2024

*साळवी स्टाॅप परिसरातील वीज एमआयडीसी विभागाऐवजी शहर विभागाला जोडण्याच्या भाजपच्या मागणीला यश*

✔️ *रत्नागिरी न्यूज नेटवर्क*
*२५ ऑक्टोबर*
*रत्नागिरी* : शहरातील साळवी स्टॉप परिसर हा महावितरणच्या एमआयडीसी विभागाऐवजी शहर विभागाला जोडण्याच्या भाजपच्या मागणीला यश आले आहे. एमआयडीसी विभागात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याची परिसरातील नागरिकांची तक्रार होती. त्यानुसार भाजपाने महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांकडे निवेदन देऊन, चर्चा करून मागणी केली होती. ही मागणी पूर्ण केल्याबद्दल भाजपाने महावितरणचे आभार मानले आहेत.

शहरातील प्रभाग क्र. चार, पाच, सहा या भागांतील कार्यकर्त्यांनी याबाबत भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्याकडे प्रश्न मांडला. त्यानंतर सावंत यांनी तातडीने महावितरणच्या अधिकाऱ्यांना भेट देत जाब विचारला व या परिसरातील लोकांना लवकरात लवकर न्याय मिळावा, हा परिसर रत्नागिरी शहर विभागाला जोडला जावा, अशी मागणी केली. महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी याची तातडीने दखल घेतली आणि साळवी स्टॉप परिसर एमआयडीसी विभागातून काढून शहर युनिटला जोडण्यात आला. याबद्दल भाजपा कार्यकर्ते शैलेश बेर्डे यांनी कार्यकारी अभियंता, इंजिनिअर यांची भेट घेत आभार मानले.
➖➖➖➖➖➖
https://bit.ly/3A5B1R2
➖➖➖➖➖➖
*जॉईन कम्युनिटी ग्रुप लिंक*
https://chat.whatsapp.com/Cv57HQPM0fqAcjIc68xPMj

Ratnagiri News Network, Ratnagiri. 2,723 likes · 4 talking about this. बातम्या, लेख, फाेटाे आणि व्हिडिओ

25/10/2024

🕉️ *श्रीमद्भगवद्गीता*

*शुक्रवार*: २५/१०/२०२४

*शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः ।*
*नात्युच्छ्रितं नातिनीचं चैलाजिनकुशोत्तरम् ॥११॥*
*तत्रैकाग्रं मनः कृत्वा यतचित्तेन्द्रियक्रियः ।*
*उपविश्यासने युञ्ज्यांद्योगमात्मविशुद्धये ॥१२॥*

*अर्थ* - पवित्र व शुद्ध अशा भूमीवर आधी दर्भ, त्यावर
हरणाचे कातडे, त्यावर वस्त्र अंथरून, फार सखल नव्हे व फार उंच नव्हे, असे आपले आसन स्थिर मांडून (११) त्या आसनावर बसून चित्त व इंद्रिये ह्यांचे व्यापार नियमित करून व आपले मन एकाग्र करून चित्तशुद्धीसाठी योगाभ्यास करावा.

*संग्राहक*-
श्रीकांत गजानन जोगळेकर,
हेदवी. ता. गुहागर
संस्कृत भारती, रत्नागिरी.
✔️ *रत्नागिरी न्यूज नेटवर्क*
➖➖➖➖➖➖
https://bit.ly/3A5B1R2
➖➖➖➖➖➖
*जॉईन कम्युनिटी ग्रुप लिंक*
https://chat.whatsapp.com/Cv57HQPM0fqAcjIc68xPMj

Ratnagiri News Network, Ratnagiri. 2,723 likes · 4 talking about this. बातम्या, लेख, फाेटाे आणि व्हिडिओ

25/10/2024

*✴️सकाळच्या बातम्या*
*दि.२५ ऑक्टोबर २०२४*

✔️ *रत्नागिरी न्यूज नेटवर्क*
▪️अजित पवार गटाकडून घड्याळ चिन्हावर 'न्यायप्रविष्ठ'चा उल्लेख नाही! सुप्रीम कोर्टाचे अजित पवार गटाला निर्देश

▪️समीर भुजबळांनी दिला राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा, नांदगावमधून सुहास कांदेंच्या विरोधात निवडणूक लढवणार

▪️विधानसभा निवडणुकीसाठी शक्तीप्रदर्शन करत दिग्गज नेत्यांनी दाखल केले उमेदवारी अर्ज

▪️दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल महाविकास आघाडीचा प्रचार करणार, उद्धव ठाकरे, शरद पवारांसाठी सभा घेणार, मविआचा मोठ प्लॅन

▪️महाराष्ट्राचा रणसंग्राम: पंतप्रधान मोदी 8 दिवस महाराष्ट्रात तळ ठोकणार, महायुतीच्या प्रचारासाठी घेणार 8 जाहीर सभा

▪️दाना चक्रीवादळाचा ओडिसा, पश्चिम बंगाल राज्याला तडाखा. समुद्र किनारपट्टी गावांना प्रभावित करणारा ठरला. शेतीचे प्रचंड नुकसान झाले.

▪️ स्विडनमध्ये भारताची दूत म्हणून डॉ. निना मल्होत्रा यांची निवड.

▪️शरद पवारांच्या राष्ट्रवादीची 45 जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; बारामतीत अजित पवारांविरुद्ध युगेंद्र पवारांना तिकीट

▪️ पुणे कसोटीत टीम इंडियाने न्यूझीलंडचा पहिला डाव 259 धावांत गुंडाळलं, भारताचीही खराब सुरुवात, पहिल्या दिवसअखेर भारताच्या 1 बाद 16 धावा
➖➖➖➖➖➖
https://bit.ly/3A5B1R2
➖➖➖➖➖➖
*जॉईन कम्युनिटी ग्रुप लिंक*
https://chat.whatsapp.com/Cv57HQPM0fqAcjIc68xPMj

Ratnagiri News Network, Ratnagiri. 2,723 likes · 4 talking about this. बातम्या, लेख, फाेटाे आणि व्हिडिओ

*कोकण रत्न श्रीकृष्ण यशवंत मुळ्ये* पुत्र ते यशवंतांचेनामवंत श्रीकृष्ण ।व्यवसाय जरी शिंपीकामतरी संगीत त्यांचे जीवन ।।    ...
20/08/2024

*कोकण रत्न श्रीकृष्ण यशवंत मुळ्ये*

पुत्र ते यशवंतांचे
नामवंत श्रीकृष्ण ।
व्यवसाय जरी शिंपीकाम
तरी संगीत त्यांचे जीवन ।।
कीर्तनी सुरांची साथ
संवादिनीच्या संगतीत ।
सुरांच्या संगतीत
तुडुंब भरले भक्तीरसात ।।
किर्तनाना साथ करिती
निरुपणाचा आस्वाद घेती ।
ज्ञानियांच्या संगतीत
संतश्रवणी होती दंग ।।

या वर्णनाला तंतोतंत जुळणारं व्यक्तिमत्व. मनाला निश्चितच भावणारं, जनसामान्यांसमोर यावं असं आहे. त्यांच्या या संचितामधून काही वेचून घ्यावं, अंगीकृत करावं म्हणून आपणाला माहित व्हावं, असं माझं तरी ठाम मत झालं. यापूर्वी रत्ननगरीतील माझ्या संपर्कातील नऊ रत्न पुस्तरूपाने प्रकाशकांच्या सहकार्याने प्रकाशित करण्याचा मोठा योग आला. पुस्तकाचं नावच रत्ननगरीतील नवरत्ने असं दिल्याने त्याला तशा मर्यादा पडल्या. रत्नागिरीतील खल्वायन या नाट्यसंस्थेचे अध्वर्यू कार्यकर्ते तेव्हापासून याचा भाग दोन काढण्यासाठी आग्रही होते. अनेक अडचणीतून जात असताना तो योग अद्यापी आला नसला तरी अशाच निवळी या खेड्यात राहणाऱ्या श्रीकृष्ण यशवंत मुळ्ये यांच्याबाबत लिहावं असं वाटलं. तसा योगच चालून आला. बराचकाळ बंद पडलेल्या लेखणीला चालना मिळाली.

२० ऑगस्ट १९४५ रोजी जन्म झालेले श्रीकृष्ण मुळ्ये हे आज २० ऑगस्ट २०२४ रोजी ८० व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. माझ्या पंचवीसाव्या वर्षापासून मी त्यांना ओळखतो, पाहतोय. तेव्हापासून ते जसे घडत गेले तसेच आजही आहेत. त्यांचे चिरंजीव जे. के. फाईल्स समोरच्या पर्शुराम सोसायटीत राहतात. तेही तिथेच असल्याचे कळल्यावर लगेच त्यांची भेट घेतली. पूर्वपरिचय असल्याने लगेचच भेटीचा हेतू सांगितला. जवळजवळ तास दीड तास त्यांच्याशी गप्पा मारल्या. अगदी जीवा-शिवाची भेट झाल्याचा आनंद मिळाला. मीच त्यांच्याविषयी लिहिणार म्हटल्यावर त्यांचा स्मृतीपटल एकदम प्रकाशित झाला. त्यांचा जीवनपटच माझ्यासमोर तरळून गेला. वडिल यशवंत आणि चिरंजीव श्रीकृष्ण बहुतेक वडिलांना मुलाचे पाय पाळण्यात दिसतात हे समजलं होतं म्हणून श्रीकृष्ण. हाच तो महिना श्रीकृष्ण जन्माचा, दहीहंडीचा. या पृथ्वीतलावर वास्तव करणाऱ्या चिरंजीवांनी खरोखरच त्यांचं नाव सार्थ केलं. कारण श्रीकृष्ण म्हटलं की गोकुळाष्टमी उत्सव, दहीहंडी आणि या नात्याचा संबंध थेट किर्तनाशी. आणि ही स्वारी जीवनाची सुमारे ५० वर्षांहून अधिक काळ किर्तनात दंग राहिली. लौकिक अर्थाने यांचं शालेय शिक्षण फक्त चौथीपर्यंत झालेलं. तरीही त्यांच्या ज्ञानाचा सागर आजच्या पदवीधर झालेल्यांना लाजवेल असा आहे. टेलरिंग व्यवसायात स्वतःचं कुटुंब चालवून हा छंद देखील त्यांनी जोपासला आहे. शिंपीकाम करणाऱ्या त्यांचे गुरु अच्युत जोशी यांचेकडे सुमारे चार वर्ष त्यांनी टेलरिंग काम करून सन १९६३ नंतर गोवान्स डिसोझा यांचेकडे टेलर म्हणून सेवा करून नीटनेटका प्रपंच चालवला आहे. हे चालू असताना मध्यंतरी त्यांच्या वडिलोपार्जित घरठाण क्षेत्राकडे त्यांनी कधीच दुर्लक्ष केले नाही. आज जरी वयानुसार त्यांना किर्तनाची साथ झेपत नसली तरी रत्नागिरीतील निवळीच्या मुळ घरी कलमाच्या बागेत आपला वेळ देतात.

हार्मोनियमचे शिक्षण त्यांनी जुलै १९६५ पासून गुरुवर्य भा. ल. रानडेबुवा यांचेकडे सुरू केले. मूळात स्वरज्ञान चांगले असल्यामुळे दोन वर्षानंतर छोट्या छोट्या कार्यक्रमांना आणि आणखी दोन वर्षानंतर रत्नागिरीतील प्रसिध्द कीर्तनकार ह.भ.प. नाना जोशी व ह. भ. प. सुरेश भावे यांना त्यांनी पेटीची साथसंगत सुरू केली. त्यानंतर १९७० पासून त्यांना बाहेरगावची मंडळी कीर्तन साथीसाठी बोलावू लागली.दरम्यान त्यांनी गायन विशारद पर्यंतचे शिक्षण एकनिष्ठ पध्दतीने रानडे बुवांकडून घेतले. त्यानंतर गुरुवर्य भा. ल. रानडे व गुरुवर्य वि. ल. रानडे यांच्या संगीत क्लास मध्ये सुमारे १९७० ते २०१५ या कालावधीत त्यांनी सुमारे ४५ वर्षे हार्मोनियम शिक्षक म्हणून काम केले. गुरुंच्याच संगीत विद्यालयात विद्यार्थ्यांना हार्मोनियम शिकवण्याचं काम करण्याची संधी मिळणं याला खूप मोठं भाग्य लागतं. त्यानंतर ५ वर्षांहून अधिक काम महिला विद्यालयातील पटवर्धन अॅकॅडमीत हार्मोनियम अध्यापनाचं काम त्यांनी केलं. तसेच प्रदीप नाटेकर, मुकूंद मराठे, स्वप्नील गोरे इ. गायकांच्या सुमारे १०० हून अधिक गायन बैठकीस त्यांनी हार्मोनियमची साथसंगत केली आहे. कालांतराने ते केवळ किर्तनातच दंग झाले. सुरवातीला टेलर ते हार्मोनियम शिक्षक ही सेवा चालू असताना स्थानिक कलाकार म्हणून हभप नाना जोशी, पाटणकर बुवा, रानडेबुवा, सुरेश भावे या स्थानिक किर्तनकारांना हार्मोनियमची साथ केल्यावर त्यांची किर्ती दूरवर पसरली आणि मग मोठ मोठ्या बुवांना त्यांनी मूर्ती लहान पण किर्ती महान या उक्तीप्रमाणे सुमारे १२ ते १३ वर्षे नृसिंहवाडी येथे कृष्णावेणी उत्सव, दत्तजयंती उत्सव तसेच शिपोशी, देवळे, श्री लक्ष्मी पल्लिनाथ देवस्थान - पाली, खानू, हेदवी, साखरीआगर, गुहागर, चिपळूण, खेड, गोवा, नागपूर, मध्य प्रदेश अशा अनेक ठिकाणी जावून त्यांनी हार्मोनियम साथ केली. ह.भ.प. - दत्तदास घागबुवा, मकरंद सुमंत बुवा, शरद घागबुवा, गंगाधर व्यास, मुकुंद देवरस, शाम धुमकेकर, मोहन कुबेर, डबीर बुवा, श्रीपाद ढोल्ये, हरीहर नातू, नारायणशास्त्री गोडबोले, पुण्याचे घैसास, उद्धव जावडेकर, चारुदत्त आफळे, वासुदेव बुरसे, आप्पा मार्जने, मकरंद करंबेळकर, राजू करंबेळकर, निलकंठ गोखले, रोहन पुराणिक, आनंद जोशी, संदीप माणके, घनःशाम जोशी, मनोहर दीक्षित, कमलाकर घोंगडे अशा पन्नासहून अधिक कीर्तनकारांना त्यांच्या पाच हजारांहून अधिक किर्तनांना त्यांनी हार्मोनियमची साथ दिली आहे. तसेच रत्नागिरीतील नाट्य चळवळीतही त्यांनी सहभाग घेत, सहयोग संस्थेमार्फत सादर झालेल्या संगीत सौभद्रमध्ये त्यांनी नारदाची भूमिका उत्तमप्रकारे वठविली होती. तसेच त्या काळी काही संगीत नाटकांना त्यांनी ऑर्गनची साथसंगतही केली.
एका दगडात दोन पक्षी मारण्याचं काम साऱ्यांनाच जमतं असं नाही. थोडसं अर्थार्जन पण बरचसं शिक्षण असंच होतं ते. किर्तनांना सुरांची साथ देता देता निरुपणाच्या श्रवणाचा खूप आनंद त्यांनी घेतला.

ज्ञानियांचा राजा-विठू महाराज
विठ्ठल म्हणजे श्रीकृष्णच ना मग संतांचं ते आराध्य दैवत, वारकरी भक्तांचा तो आश्रयदाता. त्याचा महिमा सतत ऐकून यांचंही जीवन तसंच स्वच्छ, मंगलमय, भक्तीमय झाल्याचा भेटीत प्रत्यय आला. त्यांच्या बोटांच्या करामतीने अनेक मंदिरांचा, मठांचा परिसर दुमदुमला असेल. किर्तनांचा आस्वाद घेणारेही काही कमी नाहीत. त्यांचे कान व मन तृप्त झाले असतील, यात शंकाच नाही.

पत्नी सौ. रुक्मिणी आणि अभय व अमिता ही त्यांची दोन मुले. तसेच सूनबाई सौ.कांचन व ऋतूजा, हृषिकेश ही मुले तसेच चिन्मयी, चैतन्य ही अमिताची मुले. असा यांचा हा परीवार. सुरवातीच्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा पत्नीने त्यांना उत्तम साथ देवून संसाराचा गाडा तीने समर्थपणे हाकला. मुलगा अभय पौरोहित्य करतो पण वडिलांचा अंशतः वारसा चालवतो. संगीत नाटकांची आवड असलेला त्याने भूमिका केलेलं संगीत जय जय गौरीशंकर. मी दोन वर्षांपूर्वी पाहिलं आहे. या बाबतीत वडिलांजवळ जुळलेल्या त्याच्या तारांचं मला प्रत्यक्ष दर्शन झालं. अमिता ग्रॅज्युएट झाली. विवाहानंतर एका खासगी डॉक्टरांकडे लेखनिक म्हणून काम करते.

विशेष म्हणजे या सर्वांमुळे त्यांचा जनसंपर्क मोठा आहे. परंतू ते कधीही प्रसिद्धिकडे वळले नाहीत . ज्यांचा जनसंपर्क मोठा तो माझ्यामते सर्वांत श्रीमंत असतो. ती श्रीमंती टिकाऊ असते. ती मनाची श्रीमंती असते. सर्वसामान्य माणूस संकटातून वाचला की देवापुढे शरणागत होतो. तो संगीताचा आधार घेतो. कोणी अभंग, भावगीत, नाट्यगीत तर कोणी सिनेगीतांचा आस्वाद घेऊन दुःखावर फुंकर घालतो, पुन्हा अधिक जोमाने कामाला लागतो. आयुष्यभर संतांच्या वाङ्मयातून श्रीकृष्ण मुळेंचे जीवन घडले आहे.

ठेविले अनंते तैसेची राहावे ।
चित्ती असू द्यावे समाधान ।।
या संतवचनाचा पुरेपूर प्रत्यय देणाऱ्या यांच्या जीवनातून वाचकांनी काही बोध घ्यावा, स्वतःच्या आचरणात त्याचा आदर्श ठेवावा, अशा असामीना मनोमन दिर्घायुष्यासाठी परमेश्वराजवळ प्रार्थना करावी अशी अपेक्षा करून मी देखील त्यांना दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करतो.

*श्री. वसंत फडके,*
माजी प्राचार्य, टेंभ्ये हायस्कूल
🎯 *रत्नागिरी न्यूज नेटवर्क*
-------------------------------
*जॉईन कम्युनिटी ग्रुप लिंक*
https://chat.whatsapp.com/Cv57HQPM0fqAcjIc68xPMj

🪷 *आश्वासक विश्वासू उमलते व्यक्तिमत्व अनिकेतजी पटवर्धन* 🪷*अल्पावधीतच राजकीय प्रवासात यशस्वी झेप घेत रत्नागिरीचे युवा नेत...
09/06/2024

🪷 *आश्वासक विश्वासू उमलते व्यक्तिमत्व अनिकेतजी पटवर्धन* 🪷

*अल्पावधीतच राजकीय प्रवासात यशस्वी झेप घेत रत्नागिरीचे युवा नेतृत्व अनिकेत पटवर्धन यांनी भाजपामध्ये मोठी कामगिरी बजावली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी केलेले काम हे वाखाणण्याजोगे आहे. कारण रत्नागिरीज सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात कमळ फुलण्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत दृष्टीआड करुन चालणार नाही. महायुतीसह अन्य पक्षातील लोकप्रतिनिधी मंत्री, आमदार, खासदार यांच्याशी त्यांचे असणारे मैत्रीपूर्ण संबंध हे उत्तम कार्याचे फलितच म्हणावे लागेल. अत्यंत आत्मविश्वासाने नियोजनबद्ध काम करताना प्रत्येक मुद्द्याचा विचार करुन निर्णय घेण्याची क्षमता असल्याचा अनुभव या लोकसभा निवडणुकीत दिसून आला. येणार्‍या काळात भाजपा नेते, मंत्री रविंद्रजी चव्हाण यांच्या नेतृत्वात पुढील 25 वर्ष रत्नागिरी- सिंधुदूर्ग लोकसभा, विधानसभा मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्लाच असेल, अशा तर्‍हेचे नियोजन करण्याचा संकल्प अनिकेतजी पटवर्धन यांनी केला आहे.*
------------

▪️कॉलेज जीवनात उत्तम गुरूंचे मार्गदर्शन लाभले. कॉलेज जीवनात जनरल सेक्रेटरीची (जीएस) निर्विवाद निवडणूक लढवत विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यात ते यशस्वी ठरले. युवा जीवनात अनेक संघर्ष करीत हॉटेलमध्ये नोकरी संभाळत कॉलेज शिक्षण पूर्ण केले. त्या वेळी अनेक पुढार्‍यांशी ओळख होत होती, काम सुरू होते. पण खर्‍या खोट्याची उपजत जाण असलेले अनिकेतजी यांनी आपला पाय कधीही घसरू दिला नाही. कोणत्याही मोहात, व्यसनात ते अडकले गेले नाहीत. सूर्यप्रकाशाइतपत स्वच्छ व्यक्तिमत्व हीच त्यांची खरी ओळख आहे.

▪️भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पद भूषवताना अनिकेत पटवर्धन यांनी विविध जनहिताचे विषय हाती घेतले आणि ते पूर्ण ताकदीने पूर्णत्वास नेले. कोरोना काळात जिल्हा रुग्णालयात सुरू असलेले गैरप्रकार रोखण्यासाठी आवाज उठवला. रुग्णांची होणारी परवड, औषधांची असणारी कमतरता, आरोग्य व्यवस्था इ. सुधारण्यासाठी प्रशासनाला नमवित जिल्हा रुग्णालयाच्या अनेक गैर गोष्टी उघड केल्या. जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सेवेशी तत्पर अशा उक्तीप्रमाणे जनसेवक युवा नेते म्हणून त्यांच्याकडे विश्वासाने पाहिले जाते.

▪️गेले काही वर्षे अनिकेतजी बांधकाममंत्री मा. श्री. रवींद्र चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहत आहेत. या संधीचा उपयोग अनिकेतजींनी लोकसेवेसाठी केला. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मार्फत विविध योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी ते नेहमीच आग्रही असून तशी कामे खात्याकडून करण्यासाठी आग्रही असतात. मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासोबत राहून अनिकेतजींनी मंत्रालयीन कामकाज जाणून घेतले. त्यामुळे आता ते स्वतः मंत्रालयीन कामकाज योग्य कौशल्याने हाताळतात. कोणतेही काम असो काम हातावेगळे करण्याची हातोटी त्यांच्याकडे आहे.

गावपाड्या पासून थेट वाडी, वस्तीपर्यंत थेट संपर्क त्यांचा दिसून येतो. त्यामुळे मंडणगड ते सावंतवाडीपर्यंत अनिकेत पटवर्धन यांना प्रत्येकजण आपला माणूस म्हणूनच ओळखतो. सर्व पत्रकार मंडळींशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत.

▪️किंगमेकर लोकप्रिय नेते मंत्री रवींद्र चव्हाण यांनी त्यांच्या चाणाक्ष नजरेनं अचूक माणूस हेरला हे नक्की. नवीन आश्वासक चेहरा, उत्कृष्ट नियोजनकार, उत्तम वक्तृत्व कौशल्य, अजातशत्रू या गुणांमुळे मंत्री चव्हाण यांनी हा ब्राह्मण चेहरा समोर आणला आहे. भाजपसाठी पुढील 25 वर्षे निष्ठेने काम करेल, असा हा आश्वासक चेहरा नक्कीच आहे. रत्नागिरीतील एकाधिकारशाही मोडीत काढण्यासाठी भाजपला पुढील 25 वर्षाचे नेतृत्व नक्कीच मिळाले आहे.

▪️अनिकेत पटवर्धन यांचे कार्यक्षेत्र सुरवातीला रत्नागिरी जिल्हा होते, आता ते पालघर, सिंधुदुर्ग, ठाणे, रायगड यासह महाराष्ट्रापर्यंत विस्तारले आहे. एखादं विकासकाम करून घ्यायचे असल्यास ते कौशल्याने करून घेण्याची शिष्टाई त्यांच्याकडे आहे. तसेच प्रशासकिय अधिकारी मग ते जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, तहसीलदार, प्रांताधिकारी अशा सर्वाशी असलेली मैत्रीपूर्ण विश्वासक ओळख, सलोख्याचे संबंध यामुळे अनिकेतजी कोणतेही विकास काम लीलया पार पाडतात.

▪️सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री म्हणून रवींद्र चव्हाण काम करताना दौर्‍यात त्यांच्या सोबत असणारे अनिकेत पटवर्धन यांनी मुंबई- गोवा महामार्गाचा बारकाईने अभ्यास केला आहे. अडीअडचणी समजून घेत त्यावर पर्याय काढत, महामार्ग लवकर पूर्ण होण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. बांधकाम खात्यातील ठेकेदारांच्या पेमेंटचा 19 वर्षांचा बॅकलॉग भरून काढण्याचे श्रेय अनिकेतजींनी द्यावे लागेल.

▪️नैसर्गिक फयान वादळात चांगले काम केलेला हाच तो अनिकेत पटवर्धन अशी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी करून दिलेली ओळख. हीच केलेल्या कामांची खरी पोच पावती म्हणावी लागेल. अनिकेत यांची प्रशासकिय कामकाज पद्धती, राजकीय घडमोडीतील त्यांची महत्त्वाची कामगिरी जनसेवा या सर्व देदीप्यमान कामानी त्यांची ओळख अधिकच खुलली आहे. रोखठोक स्वभाव, कामात प्रामाणिकपणा व भाजप हेच मूळ आहे हे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी अनिकेतमध्ये हेरले आहे. त्यामुळे कितीही खोट्या-नाट्या तक्रारी झाल्या तरी चव्हाण साहेब ठामपणे वडिलांप्रमाणे विश्वासाने त्यांच्या मागे उभे राहतात व राहतील, असा विश्वास अनिकेतजी व्यक्त करतात.

▪️भाजपचे केंद्रीय नेते अमित शहा यांच्याशी अनिकेतजी यांची थेट ओळख आहे. तसेच भाजप नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपाचे केंद्रीय सरचिटणीस विनोद तावडे, कोकणचे नेते, खासदार नारायण राणे यांच्याशी असलेली ओळख व व्यक्तिगत संबंध आहेत.

▪️अनिकेतजी जसे भाजपमध्ये लोकप्रिय आहेत, तसे ते अन्य पक्षाच्या नेत्यांच्याही जवळचे आहेत. राज्याचे उद्योगमंत्री, रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, राजापूरचे आमदार राजन साळवी व अन्य राजकीय पक्षाच्या नेते मंडळी, लोकप्रतिनिधी यांच्या समवेत मैत्रीपूर्ण संबंध आहेत. येणार्‍या काळात मंत्री रविंद्रजी चव्हाण यांच्या नेतृत्वात पुढील 25 वर्ष रत्नागिरी- सिंधुदूर्ग लोकसभा विधानसभा भाजपाचा बालेकिल्लाच असेल अशा तर्‍हेचे नियोजन करण्याचा संकल्प अनिकेतजी यांनी व्यक्त केला.

🎊 *अनबाॅक्सच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त*अनबॉक्सकडून एक सामाजिक उपक्रम🩸 *रक्तदान शिबीर*🩸*💁‍♂️ आजच आपले नाव नोंदवा**रक्त...
07/06/2024

🎊 *अनबाॅक्सच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त*

अनबॉक्सकडून एक सामाजिक उपक्रम
🩸 *रक्तदान शिबीर*🩸

*💁‍♂️ आजच आपले नाव नोंदवा*

*रक्तदान करा आणि अनबॉक्सकडून मिळवा आकर्षक गिफ्ट व्हाऊचर*

नाव नोंदणीसाठी आपले नाव या 8767461499 नंबरवर व्हॉटसॲप मेसेज करा.

*दिनांक*: रविवार ९ जून २०२४
*वेळ*: सकाळी १०.०० ते दुपारी ३.०० वा.
*स्थळ*: मराठा मंडळ हॉल, जिल्हा परिषद शेजारी, तारांगण समोर, रत्नागिरी

🧘‍♀️🧘🏻‍♂️ *योग प्राणायाम सराव व प्रशिक्षण*  *🕉️साई मित्रमंडळ व पतंजली योग संस्था, रत्नागिरीतर्फे* योग प्राणायाम सराव व प...
07/06/2024

🧘‍♀️🧘🏻‍♂️ *योग प्राणायाम सराव व प्रशिक्षण*

*🕉️साई मित्रमंडळ व पतंजली योग संस्था, रत्नागिरीतर्फे*
योग प्राणायाम सराव व प्रशिक्षण आयोजित केले आहे.

🧘‍♀️ *नोंदणी आवश्यक* 🧘🏻‍♂️

*तारीख* : 10 जून 2024 पासून
*वेळ* : दररोज सकाळी 6.00 ते 7.15
*पत्ता* : 🕉️साई मित्रमंडळ सभागृह, माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या समोर, साळवी स्टॉप- नाचणे लिंक रोड, रत्नागिरी

✅ रत्नागिरीतील तमाम नागरिकांनी त्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी अवश्य भाग घ्या.

🎯 *पतंजलीच्या तज्ञ योग शिक्षकांकडून उत्तम मार्गदर्शन उपलब्ध*

*संपर्क*
श्री. अनंत आगाशे
📱7083162975

*रत्नागिरीतील वाहतुकीच्या गैरसोयीबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन*🟣 *रत्नागिरी न्यूज नेटवर्क* *२० मार्च/रत्नागिरी* : रत्नाग...
20/03/2024

*रत्नागिरीतील वाहतुकीच्या गैरसोयीबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन*

🟣 *रत्नागिरी न्यूज नेटवर्क*
*२० मार्च/रत्नागिरी* : रत्नागिरी शहरातील रस्त्यांच्या मजबुतीकरणामुळे नागरिकांच्या होत असलेल्या गैरसोयीबाबत महाराष्ट्र ग्राहक पंचायतीच्या रत्नागिरी जिल्हा शाखेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की, रत्नागिरी शहरातील सर्वच रस्त्यांचे मजबुतीकरण सध्या सुरू आहे. काही भागातील काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. ते काम संपूर्ण झाल्यानंतर नागरिकांना चांगल्या रस्त्याची सुविधा मिळेल, यात कोणतीही शंका नाही, मात्र सध्या हे काम सुरू असताना नागरिकांना, वाहनचालकांना, पादचार्‍यांना खूपच मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्याकडे प्रशासनाने सोयीस्कर दुर्लक्ष केल्याच्या तक्रारी ग्राहक पंचायतीकडे आल्या आहेत.

रत्नागिरी शहरात रस्त्यांचे मजबुतीकरण सुरू आहे. वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये काम केले जात आहे. त्यासाठी नेहमीची वाहतूक सोयीनुसार वळविली जात आहे. पण ते करत असताना वाहतुकीचे कोणतेही नियोजन करण्यात आलेले नाही. रत्नागिरी नगरपरिषद आणि पोलिसांच्या वाहतूक शाखेने याकडे लक्ष द्यायला हवे होते. पण त्याबाबतीत साफ दुर्लक्ष झाले आहे. कॉंक्रिटीकरण वेगवेगळ्या टप्प्यात होत आहे. हे काम जेथे जोडले आहे तेथे खड्डे आहेत. त्यावरून वाहतूक सुरू आहे. दुचाकी वाहनांना त्याची कोणतीच सूचना मिळत नसल्यामुळे वेगाने आलेली वाहने त्या खड्ड्यात आदळत आहेत. त्यामुळे छोटे मोठे अपघात अनेक ठिकाणी होत आहेत. अनेक ठिकाणी वाहतूक वळविल्याच्या ठिकाणी रस्त्यावर खडी पसरली आहे.‌ ही खडी दुचाकीचालकांना फारच त्रासदायक ठरत आहे. रस्त्याच्या डावीकडच्या किंवा उजवीकडच्या भागाचे काँक्रिटीकरण झाले असेल तर तो भाग दुसऱ्या भागाच्या तुलनेत उंच झाला आहे. ते साहजिक असले तरी वाहनचालकांना त्याबाबतची सूचना मोठ्या फलकांद्वारे देणे आवश्यक आहे. तशी ती दिली जात नाही. त्यामुळे एक तर वाहनचालकांना मोठा हेलपाटा पडतो. शिवाय वाहतुकीच्या नियमांचे कोणतेही पालन न करता वाहने उलट्या सुलट्या दिशेने चालविली जात आहेत. योग्य सूचना ठळकपणे लिहिल्या गेल्या नसल्यामुळे वाहनचालकांचा गोंधळ उडतो. त्यामुळे वाहने उलटी सुलटी चालविली जातात. दररोज वेगवेगळ्या टप्प्यात काम होत असल्यामुळे वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्याची ठिकाणेही सातत्याने बदलत आहेत. त्याबाबत एक तर मोठे सूचना फलक लावणे आवश्यक आहे किंवा त्या ठिकाणी रात्रंदिवस वाहतूक पोलिसांची व्यवस्था करणे जरुरीचे आहे. रस्ते जोडल्याच्या ठिकाणी पसरलेली खडी वाहतुकीला त्रासदायक असल्याचे संबंधित ठेकेदाराला समजावून सांगितले गेले पाहिजे. वाहतूक पोलीस आणि रत्नागिरी नगरपरिषदेने याबाबत बारकाईने लक्ष घातले पाहिजे.

निर्धोक आणि सुरळीत रस्ते हा ग्राहकांचा हक्क आहे. तो सध्या पोलीस आणि पालिकेकडून दुर्लक्षिला जात आहे. याकडे यानिमित्ताने आवर्जून लक्ष वेधत असून योग्य ती कार्यवाही तातडीने व्हावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनाच्या प्रती रत्नागिरी पालिकेचे मुख्याधिकारी आणि जिल्हा पोलीस वाहतूक शाखेच्या निरीक्षकांना देण्यात आल्या आहेत.

ग्राहक पंचायतचे अध्यक्ष संदेश सावंत आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी ही निवेदने दिली. दरम्यान, रत्नागिरी पालिकेचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांना निवेदन दिल्यानंतर तुषार बाबर यांनी त्याची तातडीने दखल घेतली आणि पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना कार्यवाहीचे आदेश दिले.
---------------------------------
https://bit.ly/3A5B1R2
---------------------------------
*जॉईन कम्युनिटी ग्रुप लिंक*
https://chat.whatsapp.com/FDkWO6qpe2lIIJQA3N2keO

Ratnagiri News Network, Ratnagiri. 2,678 likes · 2 talking about this. बातम्या, लेख, फाेटाे आणि व्हिडिओ

20/03/2024

*लोकसभा निवडणूक-2024*
*ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांना टपाली मतपत्रिकेची सुविधा*
*रत्नागिरी, दि. २० (जिमाका) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 85 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिक मतदारांना व 40 टक्क्यांहून अधिक अपंगत्व असणाऱ्या दिव्यांग मतदारांना टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची सुविधा देण्यात आली आहे. ही सुविधा ऐच्छिक आहे, अशी माहिती माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली आहे.*
मतदार यादीमध्ये ज्या मतदारांचे वय 85 वर्षे पेक्षा जास्त आहे, ज्या मतदारांची नोंद दिव्यांग अशी करण्यात आली आहे, अशा मतदारांना ही सुविधा मिळणार आहे. दिव्यांग मतदारांच्या बाबतीत मतदाराचे अपंगत्व 40 टक्क्यापेक्षा जास्त आहे, असा सक्षम प्राधिकारी यांचा दाखला असणे आवश्यक आहे. मतदान केंद्रनिहाय अशा मतदारांना मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत नमुना 12 ड चे वाटप घरोघरी करण्यात येत आहे. या नमुन्यामध्ये अर्ज करणाऱ्या मतदाराला त्यांच्या घरी टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल. नमुना 12 ड मध्ये आवश्यक सर्व माहिती भरुन ती मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या मार्फत दि. 16 मार्च रोजी आचार संहिता घोषित झाल्यापासून हा फाॕर्म 12 ड चे वितरण सुरु आहे. दि. 17 एप्रिलपर्यंत तो आपल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत संबंधित सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जमा करावा. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी या कालावधीत हा नमुना 12 ड मधील अर्ज स्वीकारण्यासाठी या मतदारांना घरोघरी भेट देत आहेत.
टपाली मतपत्रिकेची मागणी करणाऱ्या अशा मतदाराला त्याचे मत फक्त टपाली मतपत्रिकेद्वारेच नोंदवता येईल. अशा मतदाराला मतदान केंद्रावर मतदान करण्याचा हक्क असणार नाही. घरोघरी मतदान करण्यासाठीचे पथक पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार टपाली मतपत्रिकेची सुविधा मागणी करणाऱ्या मतदाराच्या घरी भेट देईल. असा मतदार या भेटीच्या वेळी अनुपस्थित असल्यास हे पथक एका अंतिम संधीसाठी मतदाराच्या घरी भेट देईल. दुसऱ्या भेटीच्या वेळी सुद्धा मतदार उपस्थित नसल्यास अशा मतदाराला टपाली अथवा मतदान केंद्रावर मतदानाची संधी मिळणार नाही. या सुविधेच्या अनुषंगाने मतदाराला कोणतीही शंका असल्यास अथवा माहिती हवी असल्यास आपल्या घरी येणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे विचारणा करावी, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांनी कळविले आहे.

20/03/2024

*लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024*
*12 हजार 544 पोस्टर्स, बॅनर्स उतरवले*
*कणकवलीत 10 लाख तर सावंतवाडीत 4 लाख 22 हजार 750 रुपयांचे मद्य जप्त*
*- आचारसंहिता समिती समन्वयक अधिकारी कीर्ती किरण पुजार*
*रत्नागिरी, दि. 19(जिमाका) : आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर शासकीय, सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेवरील 12 हजार 544 वाॕल राईटिंग, पोस्टर्स, बॅनर्स आणि इतर साहित्य उतरवण्याची, झाकण्याची कार्यवाही करण्यात आली. कणकवली येथे स्थायी निगरानी पथक (एसएसटी) ने 10 लाखांची कॅश जप्त केली. तर, सावंतवाडी येथे 4 लाख 22 हजार 450 रुपयांचा मद्यसाठा जप्त केला, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी तथा आदर्श आचारसंहिता समिती समन्वयक अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिली.*
विधानसभा मतदार संघनिहाय करण्यात आलेली कार्यवाही पुढीलप्रमाणे आहे. 265 चिपळूण – शासकीय मालमत्ता - अनुक्रमे वॉल रायटिंग 288, पोस्टर्स 192, बॅनर्स 334, इतर 634.
266 रत्नागिरी –331, 192, 332, 310.
267 राजापूर – 89, 151, 404, 524.
268 कणकवली – 0, 43, 338, 368.
269 कुडाळ – 0, 11, 224, 0, 235.
270 सावतंवाडी – 128, 212, 429, 350.
सार्वजनिक मालमत्ता - 265 चिपळूण – अनुक्रमे वॉल रायटिंग 210, पोस्टर्स 150, बॅनर्स 211, इतर 589.
266 रत्नागिरी –163, 83, 45, 139.
267 राजापूर – 89, 151, 467, 651.
268 कणकवली – 2, 69, 279, 246.
269 कुडाळ – 26, 231, 337, 336.
270 सावतंवाडी – 11, 286, 435, 746.
खासगी मालमत्ता - 265 चिपळूण – अनुक्रमे वॉल रायटिंग 16, पोस्टर्स 41, बॅनर्स 86, इतर 105.
266 रत्नागिरी –13,18, 29, 39. 267 राजापूर – 129, 170, 545, 852.
268 कणकवली – 48, 84, 52, 33.
269 कुडाळ – 27, 246, 392, 386.
270 सावतंवाडी – 8, 48, 65, 123.

000

20/03/2024

*निवडणुक काळात होणाऱ्या पैशांच्या गैरवापरावर लक्ष ठेवण्यासाठी आयकर विभागाचा नियंत्रण कक्ष -जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह*
*रत्नागिरी, दि.19 (जिमाका) निवडणुकीच्या काळात होणाऱ्या पैशांच्या गैरवापरावर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक विशेष नियंत्रण कक्ष पुणे आयकर विभागाने रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे विभागातील जिल्ह्यांसाठी स्थापन केला आहे. हा नियंत्रण कक्ष आठवड्याचे सातही दिवस दिवसाचे 24 तास,(24x7) कार्यरत असणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली.*
2024 च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये होणाऱ्या पैशांच्या अधिकाराच्या गैरवापराशी संबंधित माहिती / तक्रारी देण्यासाठी पुढील संपर्क क्रमांक, ईमेल किंवा पत्ता
टोल फ्री क्रमांक : 1800-233-0353
टोल फ्री क्रमांक : 1800-233-0354
व्हॉट्सॲप क्रमांक : 9420244984
ईमेल आयडी : [email protected]
नियंत्रण कक्षाचा पत्ता : रूम क्र. 829, 8वा मजला, आयकर सदन, बोधी टॉवर, सॅलिसबरी पार्क, गुलटेकडी, पुणे 411037.
या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून नागरिक त्यांच्या तक्रारी नोंदवू शकतात किंवा पैशांच्या गैरवापराची माहिती देऊ शकतात.
पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, अहमदनगर, सोलापूर, सातारा, सांगली,सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर,या जिल्ह्यांसाठी हा कक्ष आहे.
नागरिकांनी दक्ष राहून माहिती कळवावी, यामुळे आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत काळ्या पैशाच्या गैरवापरावर लक्ष ठेवण्यास आणि त्यावर अंकुश ठेवण्यासाठी आयकर विभागाला मदत होईल, असे आवाहन श्री. सिंह यांनी केले.

*आदर्श आचारसंहिता/खर्चाच्या उल्लंघन तक्रारींसाठी सी-व्हीजील ॲप**100 मिनिटात होणार तक्रारीचे निवारण**रत्नागिरी, दि. 19(जि...
20/03/2024

*आदर्श आचारसंहिता/खर्चाच्या उल्लंघन तक्रारींसाठी सी-व्हीजील ॲप*
*100 मिनिटात होणार तक्रारीचे निवारण*
*रत्नागिरी, दि. 19(जिमाका) : सीटीजन ॲप अर्थात सी-व्हीजील हे प्रत्येक नागरिकाला त्याच्या स्मार्ट फोनचा वापर करुन फोटो, ऑडीओ किंवा व्हीडीओ क्लीक करण्याचा अधिकारी देऊन आदर्श आचारसंहितेचा तसेच खर्चाच्या उल्लघंनाचा पुरावा प्रदान करतो. तक्रार प्राप्त होताच 100 मिनीटात त्याचे निवारण होणार आहे. त्यासाठी जिल्हास्तरावर 24 X 7 जिल्हा नियंत्रण कक्ष आदर्श आचारसंहिता लागू झाल्यावर तात्काळ कार्यान्वित करण्यात आला आहे.*
भारत निवडणूक आयोगाच्या https://cvigil.eci.gov.in वरुन डॉऊनलोड करावे अथवा गुगल प्ले स्टोअर अथवा ॲप स्टोअरमधून सी व्हीजील ॲप डाऊनलोड करावे.
यावर नागरिकांना चित्रात्मक, ऑडीओ आणि व्हीडीओ पुरावे देता येतात. जीआयएस आधारित आॕटो ट्रॅकींग, मजबूत आणि त्वरित प्रतिसाद प्रणाली, केलेल्या कारवाईबद्दल प्रतिसाद मिळवा, जलद आणि अचूक रिपोर्टींग, आचारसंहिता उल्लंघनाचा थेट अहवाल द्या, पूर्व रेकॉर्ड केलेल्या प्रतिमा आणि व्हीडीओंना परवानगी देत नाही, ही याची वैशिष्ट्ये आहेत.
नागरिकांची तक्रार प्राप्त होताच नियंत्रण कक्षात ती दिसते. त्यानंतर ती तक्रार एफएसटी अर्थात फिरते निगरानी पथकाकडे पाठविली जाते. त्यानंतर घटनास्थळी एफएसटी पथक भेट देते. त्याबाबतचा अहवाल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सादर केला जातो. निवडणूक निर्णय अधिकारी त्याबाबत निर्णय घेतात.
लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षात याबाबतचे नियंत्रण कक्ष स्थापन झाले आहे.
तक्रार दाखल करण्यासाठी एमएमसी/ खर्च उल्लघंन घटनेचा फोटो किंवा व्हिडीओ घेतल्यानंतर त्याचे पूर्वावलोकन, फ्लाईंग स्कॉडद्वारे अचूक स्थान ओळखण्यास मदत करण्यासाठी अतिरिक्त माहिती प्रविष्ट करा. तक्रारीचे स्वरुप निवडा. दिलेल्या जागेत घटनेचे अचूक वर्णन प्रविष्ट करा. अनिवार्य फिल्डमध्ये प्रवेश केल्यानंतर सबमिटवर क्लिक करा.

20/03/2024

*फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 प्रमाणे जिल्ह्यात 16 मे पर्यंत आदेश*
*रत्नागिरी, दि. 18 (जिमाका)- फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 नुसार दि. 18 मार्च 00.01 वाजता पासून ते दि. 16 मे चे 24.00 वा.पर्यतच्या कालावधीमध्ये जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अनुषंगाने सर्व नियोजित कार्यक्रम शांततेत व सुरळीत पार पडावेत, मतदान शंततेने व सुव्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी आणि कोणताही उपद्रव किंवा अडथळा न होता मतदारांना आपला अधिकार बजावण्याचे पूर्ण स्वातंत्र्य मिळावे, मतदारांना आपला मतदानाचा हक्क निर्भयतेने बजावता यावा, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राखण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मनाई आदेश फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) अन्वये जिल्हादंडाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी आज दिले.*
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची आचार संहिता दि. 16/03/2024 रोजी पासून लागू झालेली आहे. 46 रत्नागिरी-सिंधुदुर्ग व 32 रायगड रत्नागिरी, लोकसभा मतदार संघात दि. 07/05/2024 रोजी मतदान होणार असून, लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीची दि. 04 जूनरोजी मतमोजणी होणार आहे. आचार संहिता निवडणूक निकाल जाहीर होईपर्यत अंमलात राहणार आहे. निवडणूक खुल्या व निर्भय वातावरणात पार पडण्यासाठी तसेच मतदारांना आपला मतदानाचा हक्क निर्भयपणे बजावता येणे आवश्यक आहे. निवडणूक कालावधीत राजकीय पक्षाचे पुरस्कृत उमेदवार प्रभागामध्ये पक्षाचा प्रभाव वाढवण्यासाठी पत्राव्दारे, प्रत्यक्ष संपर्क साधन जास्तीत जास्त मतदारांना आपल्या पक्षाकडे आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करीत असतात. त्याृष्टीने राजकीय पक्षांकडून प्रचाराला सुरुवात झाली आहे. सर्व राजकीय पक्षांनी आप आपली मोर्चे बांधणी सुरु केलेती असून, एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणे, वर्तमान पत्रांमध्ये वारंवार एकमेकांविरुध्द टीका टिपणी करणे, सोशल मीडीयावर एकमेकांविरोधात माहिती प्रसारित करणे वगैरे कारणांवरुन राजकीय पक्षामधील किरकोळ स्वरूपाच्या वादाचे, आरोप प्रत्यारोपांचे एखाद्या घटनेत होवून तणाव निर्माण होवून त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच उमेदवारांना मतदारांना घातक हत्यारांनी धाक धपटशा दाखविणे, तसेच प्रचारा दरम्यान क्षेपके किंवा प्राणघातक हत्यारे., बंदुका वापरण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी क्षेपके किंवा प्राणघातक हत्यारे, बंदुका (शस्त्र) बाळगणेस व बरोबर घेवून फिरणेस बंदी जारी करणे जरुरीचे आहे. तरी जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने सर्व नियोजित कार्यक्रम शांततेत व सुरळीत पार पाडावेत, मतदान शांततेत व व्यवस्थीतपणे पार पाडण्यासाठी आणि कोणताही उपद्रव किंवा अडथळा न होता मतदारांना आपला अधिकार बजावण्याचे पूर्ण स्वातंत्र्य मिळावे, मतदारांना आपला मतदानाचा हक्क निर्भयतेने बजावता यावा यासाठी सर्व परवानाधारकांना शस्त्र बाळगणेस व बरोवर घेवून फिरणेस., जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राखण्यासाठी, तसेच कोणताही अनुचित प्रकार घड़ नये म्हणून रत्नागिरी जिल्ह्यात संपूर्ण भू भागात फौजदार प्रक्रिया संहिता कायदा 1973 चे कलम 144 प्रमाणे दि. 18/03/2024 रोजी 00.01 ते दि. 16/05/2024 रोजी 24.00 वा पर्यत बंदी आदेश लागू करण्यात आला आहे.

Address

Ratnagiri
415612

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ratnagiri News Network posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Ratnagiri News Network:

Videos

Share