26/11/2024
द केळशी एज्युकेशन सोसायटी, केळशी आणि नानासाहेब दांडेकर पब्लिक ट्रस्ट यांच्या सहकार्याने आणि सईशा प्रोडक्शन्स, मुंबई निर्मित व प्रस्तुत छत्रपती शिवाजी महाराज आणि "शिवचरित्र" या विषयांना संपूर्णतः वाहिलेल्या 3 दिवसीय भव्य अशा उपक्रमाचे आयोजन परशुरामभाऊ दांडेकर विद्यालय व काकासाहेब दांडेकर महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात, कोकणातील निसर्गरम्य अशा केळशी येथे करण्यात आलेले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात वसलेले, ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले आणि अथांग समुद्रकिनारा लाभलेले केळशी हे इतिहासातील महत्वाचे गाव.
सदर उपक्रमाची रूपरेषा खालीलप्रमाणे असेल :-
१. शिवसंस्कार चित्रकाव्य कलादालन - संपूर्ण शिवचरित्र, आपली संस्कृती, आपले गडदुर्ग, शिवकाळातील परिचित-अपरिचित योद्धे, शिवरायांची युद्धनीती, राजनीती, अर्थनीती, शासननीती आणि अशा सर्वच विषयांवर आधारित 100 चित्रकाव्यांचे भव्य कलादालन 3 दिवस म्हणजेच दि. ०५ ,०६ , ०७ डिसेंबर २०२४ या दिवशी सदरहू प्रांगणात हे कलादालन उभारले जाईल. सकाळी ०९ वा. ते सायं. ५ वाजेपर्यंत हे दालन सर्वांसाठी खुले असेल. (प्रवेश विनामूल्य आहे.)
२. " संगीत शिवस्वराज्यगाथा " या संपूर्ण शिवचरित्रावर आधारित ४२ नवगीतांमधून साकारलेल्या धगधगत्या संगीतमय शिवचरित्राचे सादरीकरण रविवार दि. ०७ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६.०० वाजता त्याच परशुराम भाऊ दांडेकर विद्यालयाच्या भव्य खुल्या सभागृहात संपन्न होईल.
गायक श्रीरंग भावे, नचिकेत देसाई, केतकी भावे जोशी, अनिल नलावडे हे असतील तर ओघवत्या शैलीतील शिवचरित्र कथन पद्मश्री राव यांचे असेल. या गीतांना भव्य एलईडी स्क्रीनवर जुन्या ऐतिहासिक चलचित्रांची साथसोबत असेल.. ( प्रवेश फक्त निमंत्रितांसाठी )
अशा या शिवचरित्रातील आचार, विचार, संस्कारांनी प्रेरित ३ दिवसीय भव्य उपक्रमासाठी द केळशी एज्युकेशन सोसायटी, केळशी आणि नानासाहेब दांडेकर पब्लिक ट्रस्ट यांचे विशेष सहकार्य लाभले... यासाठी सईशा प्रोडक्शन, मुंबई यांच्यातर्फे मनःपूर्वक धन्यवाद..
अधिक माहितीसाठी संपर्क:
सईशा प्रोडक्शन्स, मुंबई
पद्मश्री राव
९८२१५५४१३०