
25/09/2025
महाराष्ट्रीयन घरगुती ताट हे फक्त जेवण नाही, तर जीवनशैलीचं, पोषणाचं आणि प्रेमाचं प्रतीक आहे. पोळी किंवा भाकरीतून तात्काळ ऊर्जा, उसळीतून प्रोटीन, भाज्यांमधील फायबर आणि कोशिंबिरीतील जीवनसत्त्वं – सर्व मिळून शरीराला संतुलित पोषण पुरवतात. ताकातील प्रोबायोटिक्स पचन सुधारतात, तर वरणातील खनिजे हाडे, स्नायू आणि रक्तासाठी आवश्यक आहेत.
जिरे, मोहरी, हिंग, आलं, लसूण यासारखे मसाले पचनसंस्थेला बल देतात, जेवण हलके होते, आणि मर्यादित तेल-मसाल्यामुळे स्वाद टिकतो पण कॅलरी नियंत्रित राहते. हळद, आवळा, मेथी, कोथिंबीर यासारख्या घटक नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.
ऋतूनुसार अन्न बदलल्याने शरीराचे नैसर्गिक संतुलन टिकते. आणि सर्वात खास म्हणजे आईच्या हाताची ‘comfort food’ ही ताटात असते, ज्यामुळे मानसिक आरोग्य टिकते, प्रेमाची आणि सुरक्षिततेची भावना मिळते, आणि प्रत्येक घासातून शरीर आणि मन दोन्ही तृप्त होतात.