Made In Sangli

Made In Sangli सांगली जिल्ह्याबद्दल व जिल्ह्यातील व्यवसायांबद्दल तुमच्या फायद्याची माहिती फक्त इथंच ♥️
(1)

14/08/2026

सांगलीकर, 15 ऑगस्ट ला तुम्ही सुद्धा घरी जिलेबी आणता का? तुम्हाला कोणाकडची जिलेबी आवडते कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा?

🇮🇳❤️

11/08/2026

सांगलीकर, जेव्हा जेव्हा आयुर्वेदाचा उल्लेख होतो, तेव्हा सांगलीचं नाव अत्यंत आदराने घेतलं जातं. याचं कारण म्हणजे सांगलीला लाभलेले एक असे 'युगपुरुष', ज्यांनी संपूर्ण वैद्यकीय जगाला आजारांवर मात करण्यासाठी एका नव्या चिकित्सेचा मार्ग दाखवला!
आज 'मेड इन सांगली'च्या 'सांगलीच्या मातीतील माणसं' या सिरीजमध्ये आपण माहिती घेणार आहोत... आयुर्वेदाचार्य 'बृहत्त्रयीरत्न' वैद्यराज आ. वा. दातारशास्त्री यांच्याबद्दल!
संपूर्ण विश्व आणि मानवी शरीर हे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे. या तत्त्वांचा सखोल अभ्यास करून त्यांनी 'पांचभौतिक चिकित्सा' ही अत्यंत प्रभावी आणि नवीन उपचार पद्धती शोधून काढली. यावर त्यांनी लिहिलेले ६ महान ग्रंथ आजही आयुर्वेद जगतात दीपस्तंभ मानले जातात.
१९८८ मध्ये त्यांनी सांगलीत वैद्यराज दातार पांचभौतिक चिकित्सा व संशोधन केंद्राची स्थापना केली. त्यांच्या या धर्मादाय संस्थेमार्फत आजही सांगलीत

06/08/2026

सांगलीकरांनो तुमची वाट संपली! 😍

तब्बल एक वर्षानंतर धनश्री येतेय ८ ऑगस्टला आपल्या सांगली शॉपला तुम्हाला भेटायला!

सकाळी साडे दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत.

भरपूर शॉपिंग + स्पेशल ऑफर्स + दुपारी २ वाजता पेजवर लाईव्ह पण असणार आहे!

ही रील सगळ्या सांगलीकर मैत्रिणींना शेअर करा आणि नक्की भेट द्या! 🙏

धनाज पैठणीचे सांगलीतील आउटलेट

📍Rukmini plaza, Back side of New Rohini hotel, Civil Hospital Rd, Sangli, Nishant Colony, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416

Contact: 7796717111



[ dhanaspaithani, sanglikar, sangli, dhanaspaithanisangli paithani, marathimulgi, sanglishopping, paithanisaree ]

04/08/2026
29/07/2026

सांगलीच्या मातीतील माणसं भाग: 4
जुन्या नाणी आणि नोटांचा खजिना बाळगणारे सांगलीचे हौशी संग्राहक श्री. मिलिंद तारळेकर. भारतीय आणि परदेशी नाणी आणि नोटा या सोबतच अस्सल सोन्या-चांदीची दुर्मिळ नाणी सुद्धा यांच्याकडे पाहायला मिळतात.
तुमच्या परिचयात असे कोणी संग्राहक असतील तर कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगा.

[Coin collection, foreign currency collection, Indian currency, sanglichya matitil manas, Made in Sangli, Sanglikar]

28/07/2026

25/07/2026

सांगली पोलीस तर्फे खास विद्यार्थ्यांसाठी सायबर अवेअरनेस प्रोग्राम.

22/07/2026

सांगलीच्या मातीतील माणसं भाग 3 : भारतीय बॅडमिंटनचे जनक- नंदू नाटेकर

बॅडमिंटन जगतात तब्बल ७ वेळा नॅशनल चॅम्पियन असणारे नंदू नाटेकर हे मूळचे सांगलीचेच.
सांगली जिमखान्याचे सदस्य बनून अवघ्या १४ व्या वर्षी त्यांनी ज्युनियर चॅम्पियनशिप जिंकली आणि आंतरराष्ट्रीय चॅम्पियन होण्याची तयारी सुरु झाली.
नाटेकर कोर्टवर आले की प्रेक्षक अगदी श्वास रोखून सामना बघत. त्यांच्या अजोड खेळीचा सन्मान म्हणजे १९६१ साली खेळातील सर्वोच्च पुरस्कार असणाऱ्या अर्जुन पुरस्काराचे ते पहिले मानकरी ठरले. इतकंच नव्हे तर इंटरनॅशनल स्पर्धेत जिंकणारे ते पहिले भारतीय बॅडमिंटनपटू आहेत.
कोणत्याही गुरूशिवाय घडलेला हा पठ्या भिंतीसोबत प्रॅक्टिस करायचा. ज्यातून जन्मलेला बॅकहँड हा डाव बघायला रसिक प्रेक्षकांची गर्दी होत असे.
सांगलीचा झेंडा सातासमुद्रापार फडकवणाऱ्या या खेळाडूला मेड इन सांगलीला अभिमान आहे.

[Badminton player, Arjun awardee, National player, tennis player, tennis, Badminton, Sports, proud sanglikar, Made in Sangli]

#

16/07/2026

सांगलीच्या मातीतील माणसं, भाग -२

मा. काका साहेब चितळे.

09/07/2026

आज दि. नऊ जुलै 2026, सकाळी 11 वाजता सांगलीचे मा. महापौर धीरज सूर्यवंशी आणि अतिरिक्त आयुक्त श्री राहुल रोकडे सर तसेच उपायुक्त आणि इतर सहकारी यांनी सूर्यवंशी प्लॉट सांगली याची पाहणी केली. आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला.

Address

Sangli
416416

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Made In Sangli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share