Dams Kitchen

Dams  Kitchen नमस्कार मंडळी.

Dams kitchen
Link Youtube : https://youtu.be/8W2HFApgWv8
इंस्टाग्रामवर
https://www.instagram.com/dams_kitchen_damyanti?igsh=MWxwcDZic3Z6dWN5cA==

तुम्हाला मिळाला का?खूप मजा येते असा प्रसाद खायलाआजच्या दिवशी वर्षातून एकदाच असा प्रत्येक ठिकाणी मोठमोठ भरून प्रसाद मिळतो...
25/09/2026

तुम्हाला मिळाला का?
खूप मजा येते असा प्रसाद खायला
आजच्या दिवशी वर्षातून एकदाच असा प्रत्येक ठिकाणी मोठमोठ भरून प्रसाद मिळतो हातामध्ये ठेवायला जागा नसते आणि असा प्रसाद खायची मजा आणि चव काही वेगळीच असते तुम्ही पण नक्की या प्रसादाची चव चांगलीच असेल आवडलं ना तर लाईक करायला विसरु नका बर का कारण मला माहिती आहे की प्रत्येकाने एकदा ना एकदा तरी असा प्रसाद खाल्ला आहे तुम्हाला आज हा निरोपाचा प्रसाद मिळाला का मला कमेंट मध्ये सांगा आणि प्रसादामध्ये काय काय खाल्लं तेही सांगा

नारळ तर फोडून झाला पण त्याचं हे राहिलेलं किती खरवडलं तरी निघत नाही आणि निघालं तर काळ दिसत .....याचं काय करावं सांगा बरं ...
25/09/2026

नारळ तर फोडून झाला पण त्याचं हे राहिलेलं किती खरवडलं तरी निघत नाही आणि निघालं तर काळ दिसत .....याचं काय करावं सांगा बरं बऱ्याच ठिकाणी ही खरबड काढून यापासून चटणी करतात तुम्हाला आणखीन काही सुचतंय का मला कमेंट मध्ये सांगा

तुझे येणे,तुझे जाणे,    आणि आमचे उगा मिरवणे.    आम्ही तो आणला,आम्ही तो बसवला,    आम्ही नैवेद्य दाखवला,*आम्ही तो विसर्जित...
25/09/2026

तुझे येणे,तुझे जाणे,
आणि आमचे उगा मिरवणे.
आम्ही तो आणला,
आम्ही तो बसवला,
आम्ही नैवेद्य दाखवला,
*आम्ही तो विसर्जित*
*केला.*
*अनादी,अनंत तोचं एक!* *त्याला काय,*
*कोण कसा घडवेल?*
*अन् बुडवेल.??*
अनंत पिढ्या आल्या,
अनंत पिढ्या गेल्या,
*तो तरीही उरला.!*
काळ कधी नां थांबला,
*तो कधी ना संपला.!*
*आपल्या आधीही*
*तोचं एक!*
*आपल्या नंतरही*
*तोचं एक!*
*तो कर्ता,तोच करविता,*
*त्यास काय कोणाची*
*ती गरज..??*
मग का हा उत्सव दहा दिवसांचा...??
*का न करावा*
*तो रोजचा..?*
आपुले येणे,
आपुले जाणे,
त्यामधले क्षणभंगुर
हे जगणे.
*जगण्याचाचं या,*
*उत्सव करावा.!*
*अन् रोजचं तो*
*मनी जागवावा.*
सजावट करावी विचारांची.
रोषणाई विवेकी, माणुसकीची.
नैवेद्य दाखवावा सत्याचा.
फुले दया,क्षमा शांतीची.
*अन् आरती*
*प्रेमळ शब्दांची.*
रोजचा क्रोध,मोह,मत्सर *रोज विसर्जित करावा.*
*हिशोब आजच्या*
*भावनांचा आजचं*
*उरकावा.*
*असा तो,रोजचं का नं*
*पुजावा.?*
*रोज नव्याने*
*मनी तो असा*
*जागवावा...*
*अन् उत्सव*
*आयुष्याचा रोज नव्याने*
*साजरा करावा.*

*❝ आपुलकीच्या माणसांसाठी ❞*
सर्वाना अनंत चतुर्दशी च्या हार्दिक शुभेच्छा 🌹🙏

25/09/2026

*सवाष्ण*
सवाष्ण म्हणून जेवायला गेलेली माझी सून 10-15 मिनिटातच परत आलेली बघून मी विचारलं का गं अवकाश आहे का अजून जेवायला ? तर ती म्हणाली थांबा आई आधी भात- वरणाचा कुकर लावते नि मग बोलते .

सकाळीच माझी सून अदितीने सांगितलं होतं की आज संध्याकाळी मला इथेच बिल्डिंग मध्ये माझ्या मैत्रिणी कडे सवाष्ण म्हणून जेवायला जायचंय , तर माझ्या वाटच्या पोळ्या नाही करून घायच्यात. वैभव लक्ष्मीच्या पूजेसाठी तिने 21 सवाष्णीना जेवायला सांगितलंय .त्या मैत्रिणीने तिला 2-3 वेळा फोन करून सांगितलं होतं . मैत्रीण म्हणजे , अजून इथे आमची कोणाचीच खूप अशी ओळख नाहीय . इथे आमच्या नव्या घरात राहायला येऊन आम्हाला जास्त दिवस झाले नसल्याने आणि भाषेचाही प्रश्न पडत असल्याने तितकीशी ओळख नाही .पण या मैत्रिणीचा मुलगा आणि माझी नात एका शाळेत असल्याने स्कुल बसला नेता आणताना त्यांची जरा बऱ्या पैकी ओळख झाली होती . ती नॉन महाराष्ट्रीयन असल्याने बोलणे हिंदी किंवा इंग्लिश मधून होई. म्हणून माझ्या सुनेनं ही खात्री करून घेतली होती नक्की जेवायलाच बोलावलंय ना . सवाष्ण म्हणून जायचंय म्हटल्यावर खटकटे काही खायचे नाही असे एक आपल्या डोक्यात फिक्स बसलेलं असतं ना. त्या मुळे दिवसभर तिने पोहेच खा, कुठे चहाच पी, सरबतच पी असे केले होते .त्या मुळे भूक कडकडून लागली होती .

तर संध्याकाळी साडी बिडी नेसून आवरून ती जेवायला गेली . जशा जशा 2-3 2-3 बायका येतील तसे तसे जेवायला वाढत होते . अदिती आणि 2-3 बायका जमल्यावर त्यांना जेवायला वाढले . ताटात बघितले तर काय , एक छोटी पुरी, बटाट्याची थोडी भाजी आणि एका छोट्या वाटीत खीर ,बस एव्हढेच . एक पुरी संपल्यावर अजून पुऱ्या किंवा कमीत कमी भात तरी येईल असे वाटले . पण पुढे किती तरी वेळ वाट पाह्यली तरी कोणीच काही वाढायला आणले नाही की कोणी काही विचारें ना पण .ती मैत्रीण तिथेच छोट्या पोरीला कडेवर घेऊन उभी होती, तिने पुढे काहीच विचारले नाही की वाढायला सांगितले नाही .शेवटी सर्वानी वाट पाहून हात धुतले . बरं , पूजा ही कुठे मांडलेलीय ते दिसेना .विचारले तर एका कोपऱ्यात बोट दाखवलं. तर फक्त एका लक्ष्मी च्या फोटोवर चार फुले वाहिली होती . ते काही का असेना. प्रत्येकाची पूजेची पद्धत वेगवेगळी असेल. पण जेवायला बोलावलेल्या सवाष्णीना तरी व्यवस्थित जेवायला द्यावे की नाही ? मग नंतर त्या सवाष्णीना हळदी कुंकू लावले नि एक वैभव लक्ष्मीचे पुस्तक ,एक मेंदीचा कोन , सिंदूर नि काजळा ची छोटी डबी नि 10 रुपये दक्षिणा असे दिले . त्या बद्दल ही काही नाही हो , ज्यांची त्याची इच्छा असते . पण सर्वजणी जेवणाचंच आश्चर्य करत होत्या .

आपण कोणाला तरी साधं जरी जेवायला सांगितलं तरी किती तयारी करतो ना ... कुठे काही कमी पडू नये, काही कमतरता भासू नये या साठी किती आटा पिटा करतो ना !! आणि इथे बघा ...इतक्या सवाष्णी खास जेवायला सांगून , अर्ध पोटीच जेवून गेल्या त्या बद्दल ना खेद ना खंत . कशी असतात ना एकेक माणसं . प्रत्येक जण म्हणत होती आता घरी जाऊन कुकर लावून काहीतरी खायला पाहिजे . हल्ली 2-4 माणसांच्या संसारात मोजकंच अन्न शिजवलेलं असतं ना. मी म्हणते आपल्याला जमत नसेल तर एव्हडा पसारा वाढवूच नये . देव काही म्हणत नाही एव्हडा व्याप वाढवा म्हणून . तर , हाही एक अनुभव गाठीशी बघायला मिळाला तर .

असे बरेच प्रसंग अनुभवायला , बघायला मिळाले आहेत , पण त्या बद्दल पुन्हा केव्हातरी ......

© नीता कुलकर्णी,
हैदराबाद

एका गुजराती मैत्रिणीने छान वेगळा पदार्थ आहे म्हणून डबा भरून दिला आहे हे काय आहे कोणाला माहिती असेल तर सांगा आत मध्ये छान...
24/09/2026

एका गुजराती मैत्रिणीने छान वेगळा पदार्थ आहे म्हणून डबा भरून दिला आहे हे काय आहे कोणाला माहिती असेल तर सांगा आत मध्ये छान असा मसाला भरलेला आणि भाजलेला असा हा काहीतरी पदार्थ आहे कुणाला माहिती आहे का त्याला काय म्हणतात

24/09/2026

खूप छान माहिती आहे

Recipe माझ्या youtube चॅनेल वर पहा
24/09/2026

Recipe
माझ्या youtube चॅनेल वर पहा

एक चविष्ट आणि चटपटीत पदार्थ आहे ओळखा बघून तुम्हाला ओळखता येतं का हा पदार्थ असा खायला मला तर खूप आवडतो तुम्हाला आवडतो का ...
24/09/2026

एक चविष्ट आणि चटपटीत पदार्थ आहे ओळखा बघून तुम्हाला ओळखता येतं का हा पदार्थ असा खायला मला तर खूप आवडतो तुम्हाला आवडतो का आणि तुम्ही कशा सोबत खात आहे मला आठवणीने कमेंट करून सांगा

व्हॉट्सॲपवर आलेला अप्रतिम मेसेज.. 👇🏼कॉपी.."उठ. उभी राहा. मांडीखालचा कागद काढ नि माझ्या हातात दे. अख्खा पेपर बघतोय मी तुल...
24/09/2026

व्हॉट्सॲपवर आलेला अप्रतिम मेसेज.. 👇🏼

कॉपी..

"उठ. उभी राहा. मांडीखालचा कागद काढ नि माझ्या हातात दे. अख्खा पेपर बघतोय मी तुला.. दर पाच मिनिटांनी घडी उघडतेस नि खाली बघतेस!"

काळे सरांचा शब्द वर्गात घुमला, नि पन्नास माना एकदम वर झाल्या. सहामाही परीक्षेचा गणिताचा पेपर चालू होता. काळे सर म्हणजे केंद्रावरचा दरारा. त्यांच्या नजरेखाली कॉपी करणं म्हणजे वाघाच्या गुहेत शिरणं, असं पोरं म्हणायची. नि आज त्यांच्या तावडीत सापडली होती मागच्या बाकावरची सविता.

पोरगी उभी राहिली. तिचे हात कापत होते. डोळ्यांत टचकन पाणी आलं. तिनं मांडीखालचा घडी केलेला कागद काढला, नि सरांच्या हातात दिला. वर्ग श्वास रोखून बघत होता. आता ही घरी जाणार, पेपर रद्द होणार, नि उद्या अख्ख्या शाळेत हिचं नाव होणार.. सगळ्यांच्या डोळ्यांपुढं तेच चित्र होतं.

काळे सरांनी घडी उघडली. नि ते वाचत राहिले.

कागदावर गणितं नव्हती. सूत्रं नव्हती. आजारी माणसाच्या थरथरत्या अक्षरांत चार ओळी होत्या..

चिऊ, घाबरू नकोस. तू वर्षभर अभ्यास केलायस, तो कागद कधी विसरत नसतो. पेपर अवघड वाटला की माझी आठवण काढ नि सावकाश श्वास घे. मी इथं दवाखान्यात बरी होतेय, नि तू तिथं पास होतेयस.. दोघी मिळून घरी गोड करू. तुझी आई.

खाली कुंकवाचं बोट उमटवलेलं होतं.

सरांनी वर बघितलं. पोरगी खाली मान घालून उभी होती, नि तिच्या पापण्यांतनं पाणी ठिबकत होतं. ती अडखळत म्हणाली,

"सर, आई सरकारी दवाखान्यात आहे.. मोठं ऑपरेशन झालंय तिचं. परीक्षेच्या आधी भेटायला गेले होते, तेव्हा तिनं हे लिहून दिलं. म्हणाली, पेपरला जवळ ठेव. भीती वाटली की वाचत जा. मी कॉपी नाही केली सर.. देवाशपथ. फक्त भीती वाटली की घडी उघडून आईचं अक्षर बघत होते."

वर्गात टाचणी पडली असती तरी ऐकू आली असती. काळे सर बराच वेळ त्या कागदाकडं बघत उभे राहिले. मग त्यांनी सावकाश घडी घातली, नि तो कागद पोरीच्या हातात परत दिला.

"जागेवर बस. पाणी पी आधी." त्यांनी स्वतःच्या टेबलावरचा तांब्या तिच्या बाकावर नेऊन ठेवला. "अन् हा कागद मांडीखाली नको.. कंपासपेटीत ठेव, उघड्यावर. लपवलेल्या वस्तूची भीती वाटते, उघड्या वस्तूची ताकद होते. हे कॉपीचं पान नाही, पोरी. वर्षभराच्या अभ्यासाची पावती आहे.. लिही आता. वेळ भरपूर आहे."

सविता बसली. तिनं कागदाची घडी कंपासपेटीत ठेवली, डोळे पुसले, नि पेपर लिहायला लागली. सरांनी बाकीच्या वर्गाकडं एकदाच बघितलं, नि पन्नास माना परत पेपरात गेल्या. मधल्या सुट्टीत सरांनी शिपायाकडनं सविताच्या घरचा पत्ता नि दवाखान्याचं नाव लिहून घेतलं.. कुणाला कळू न देता. त्या दिवशी त्या वर्गात एकानंही कॉपीचा विचार केला नाही, असं पुढं पोरं गमतीनं सांगायची.. कारण सरांच्या डोळ्यांत पाणी बघणं हे वाघाच्या डरकाळीपेक्षा अवघड होतं.

निकाल लागला. सविता गणितात चांगल्या गुणांनी पास झाली. पेढे घेऊन ती दवाखान्यात गेली, नि तिथं तिला दुसरा धक्का बसला.. आईच्या उशाशी फळांची पिशवी ठेवलेली होती, नि आई सांगत होती, तुझ्या शाळेतले कुणी काळे सर म्हणून आले होते. म्हणाले, पोरगी हुशार आहे, तिची काळजी करत बसू नका.. तुम्ही फक्त बऱ्या व्हा.

पुढच्या वर्षीपासनं काळे सरांच्या केंद्रावर एक नवी रीत सुरू झाली. पेपर वाटायच्या आधी ते वर्गाला सांगायचे,

"ज्याला देवाचा अंगारा, आईचा फोटो, बापाचं पत्र.. असं काही जवळ ठेवायचं असेल, त्यानं खुशाल ठेवावं. फक्त कंपासपेटीत, उघड्यावर ठेवा. धीराच्या वस्तू लपवायच्या नसतात. लपवायची असते ती फक्त चोरी.. नि चोरी इथं कुणी करत नाही, कारण तुम्ही वर्षभर अभ्यास केलाय. लिहा आता. वेळ भरपूर आहे."

दरवर्षी कुणा ना कुणाच्या कंपासपेटीत एखादी घडी असते. सर ती बघतात, नि न बघितल्यासारखं करत नाहीत.. बघून मान डोलावतात.

🙏

टीप : लेखकाचं नाव माहीत असल्यास कमेंटमध्ये अवश्य टॅग करा.. 🙏🏼

मोदक करण्यासाठी नारळ फोडला आणि तो असा निघाला आता याचं काय करावं कमेंट करून सांगा..…. आणि हे असं का झालं असेल ?याचा उपयोग...
23/09/2026

मोदक करण्यासाठी नारळ फोडला आणि तो असा निघाला आता याचं काय करावं कमेंट करून सांगा..…. आणि हे असं का झालं असेल ?याचा उपयोग काय करता येईल! काहीच सुचत नाही

Address

Satara

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dams Kitchen posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Dams Kitchen:

Shortcuts

Share