14/09/2025
*गुरुच्या कविता*
निसर्गानेच चक्क
आम्हाला इथं अडवलं..,
म्हणे जन्माला मी घातलं
तुम्ही माझ्या लेकरांना का तुडवलं...।।
भांडण सुरू तेव्हा पासूनची जुणीच
म्हणे आजही तो रुसला..,
सगळं कसं गुपचूप दिखाऊ
व्यवहार परस्पर तसाच कुणी रेटला...।।
निसर्गही आता चांगला
त्वेषाने जणू हट्टालाच पेटला..,
सगळं झाकून ठेवतोय दाखवत
नाही अस्तित्व पाहणाऱ्याला...।।
पंचाईत त्यांची झाली करायचं
काय आता कोणाला कळेना..,
निसर्गाच्या निर्मितीला रुजवात
करण्या पुढं कोणीच धजवेना..।।
वरुण राजा निसर्गाच्या
आदेशाने उगाच का इथं बरसतो..,
अस्तित्व सगळं झाकोळून
मजा बघत त्यांच्यावरच हसतो...।।
त्याना तरी निसर्गाच कुठं
आता आणि कधीच काय पडलंय..,
खळगी भरण्या स्वतःची
निसर्ग नियमाना चक्क तुडवलंय..।।
सगळे लोंढे येतात जातात
निसर्ग त्यांच्या सेल्फीत मात्र सामावत नाही..,
आभासी जगणं साऱ्यांचं प्रश्न हा
आम्हाला देणं घेणं निसर्गापाई उरल का नाही..?
*गुरू*