17/07/2025
श्री साईसच्चरित पारायण सोहळा - 2025 | शुक्रवार, दिनांक २५ जुलै २०२५ ते शनिवार, दिनांक २ ऑगस्ट २०२५
शिर्डी पंचक्रोशीतील सर्व साई भक्तांनो,
"श्री साईसच्चरित पारायण सोहळा" याही वर्षी मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, नाट्य रसिक मंच आयोजित आणि समस्त शिर्डी ग्रामस्थांच्या सहकार्याने आयोजित या सोहळ्याचे हे ३१ वे वर्ष आहे.
।। सोहळ्याचे वेळापत्रक ।।
कालावधी: शुक्रवार, दिनांक २५ जुलै २०२५ ते शनिवार, दिनांक २ ऑगस्ट २०२५
स्थळ: साई आश्रम क्रमांक १ (हजार रुम), नगर-मनमाड रोड, शिर्डी
।। कार्यक्रमाची रूपरेषा ।।
शुक्रवार, २५ जुलै: सकाळी समाधी मंदिरातून श्रींच्या प्रतिमेची व पोथीची भव्य मिरवणूक आणि पारायण मंडपात कलश स्थापना.
दररोज:
पुरुष वाचक: सकाळी ७:०० ते ११:३०
महिला वाचक: दुपारी १:०० ते ५:००
शुक्रवार, १ ऑगस्ट: सकाळी विशेष अवतरणिका वाचन, सहभोजन आणि सायंकाळी ४ ते ७ या वेळेत भव्य शोभायात्रा.
शनिवार, २ ऑगस्ट: सकाळी १० वाजता काल्याचे कीर्तन आणि दुपारी १२ वाजता महाप्रसादाने सोहळ्याची सांगता होईल.
।। महत्त्वाच्या सूचना ।।
पारायणासाठी येताना स्वतःचा 'श्री साईसच्चरित' ग्रंथ, एक श्रीफळ व बसण्यासाठी आसन आणावे.
१८ वर्षांखालील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार नाही.
महिलांसाठीचा हळदीकुंकू कार्यक्रम मंगळवार ऐवजी पहिल्याच दिवशी, शुक्रवारी आयोजित केला आहे.
पारायण स्थळी येण्या-जाण्यासाठी शिर्डी गावातून वाहनांची सोय आहे.
अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी आपल्या जवळच्या केंद्रावर संपर्क साधा.
चला तर मग, सर्वजण मिळून हा भक्तीचा उत्सव साजरा करूया. हेच आमचे आग्रहाचे निमंत्रण.
।। अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज, योगीराज, परब्रह्म, श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय ।।