Sandeep Ingale, Shirol

Sandeep Ingale, Shirol Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sandeep Ingale, Shirol, Shirol.

06/06/2026

भात पेरणीसाठी गेलेल्या कुटुंबाच्या घरावर डल्ला; २४ तासांत चोरट्याला बेड्या

फिर्यादीचाच मित्र निघाला चोर; सव्वा लाखांचे दागिने जप्त

कोल्हापूर | प्रतिनिधी

करवीर तालुक्यातील बहिरेश्वर येथे घडलेल्या घरफोडीच्या घटनेचा करवीर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावत फिर्यादीच्याच मित्राला अटक केली आहे.विश्वासघाताच्या या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपीकडून चोरीस गेलेले सोन्या-चांदीचे दागिने असा तब्बल १ लाख ४४ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,बहिरेश्वर येथील एक कुटुंब भातपेरणीच्या कामासाठी शेतात गेले होते.याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरात प्रवेश करून कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले.घरी परतल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला.याबाबत करवीर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस निरीक�

06/06/2026
06/06/2026

जयसिंगपूर येथे ७ जूनला होणाऱ्या ३ रे नांगरट साहित्य संमेलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे मा खा राजू शेट्टी यांचे आवाहन

05/06/2026

प्रोसेस मालकांनी त्यांचे सांडपाणी सोडण्यासाठी उपलब्ध केलेली 106 एकर जमीन बघण्यासाठी गेलो असता,प्रोसेस मालकांनी सांगितलेल्या 3 एकर जमीन पाहणीत फक्त 19 गुंठे जमीन निघाली.त्यामुळे आपला डाव फसणार हे लक्ष्यात आल्यावर त्यांनी दादागिरी करण्याचा प्रयत्न केला.पण अश्या गुंडगिरीने घाबरणारी आम्ही लोक नाही. पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त झाल्याशिवाय सोडणार नाही. 

धनाजी चुडमुंगे 

आंदोलन अंकुश संघटना

05/06/2026

प्रोसेस मालकांनी त्यांचे सांडपाणी सोडण्यासाठी उपलब्ध केलेली 106 एकर जमीन बघण्यासाठी गेलो असता,प्रोसेस मालकांनी सांगितलेल्या 3 एकर जमीन पाहणीत फक्त 19 गुंठे जमीन निघाली.त्यामुळे आपला डाव फसणार हे लक्ष्यात आल्यावर त्यांनी दादागिरी करण्याचा प्रयत्न केला.पण अश्या गुंडगिरीने घाबरणारी आम्ही लोक नाही. पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त झाल्याशिवाय सोडणार नाही. 

धनाजी चुडमुंगे 
आंदोलन अंकुश संघटना

05/06/2026

लक्ष्मीनगर येथे उभी असलेली बारा चाकी ट्रक मध्यरात्री जळून खाक

नरवाड / प्रतिनिधी

नरवाडजवळील लक्ष्मीनगर परिसरात घरासमोर उभी केलेल्या बारा चाकी ट्रकला मध्यरात्री अचानक आग लागून ती पूर्णपणे जळून खाक झाल्याची घटना घडली.या आगीत ट्रकचे मोठे नुकसान झाले असून लाखो रुपयांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.लक्ष्मीनगर येथील रहिवासी चंद्रकांत ज्योतिबा कदम यांच्या मालकीची केए-२२ बी-८५८७ क्रमांकाची बारा चाकी ट्रक विविध दुरुस्तीची कामे पूर्ण करून अवघ्या एक दिवसापूर्वीच घरी आणण्यात आली होती. नेहमीप्रमाणे ही ट्रक घरासमोर उभी करण्यात आली होती.मध्यरात्रीच्या सुमारास ट्रकमधून अचानक आगीचे लोट उठू लागले.घरातील सदस्यांना खिडकीतून आगीचा प्रकाश दिसताच त्यांनी बाहेर धाव घेतली. त्यावेळी ट्रकला भीषण आग लागल्याचे निदर्शनास आले.घटनेची माहिती मिळताच कदम कुटुंबीयांसह परिसरातील नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला.

Address

Shirol

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sandeep Ingale, Shirol posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share