14/06/2026
शिरपूर महसूल घोटाळ्यात बोगस शिक्क्याचा 'पोलीस कनेक्शन'चा महास्फोट!
"कुणी न्याय देता का रे न्याय..." नटसम्राटच्या नाना पाटेकरांसारखी पीडित तक्रारदाराची अवस्था;
🚨स्वतः तहसीलदार महेंद्र माळी यांच्या आदेशानंतरही शिरपूर पोलिसांची संशयास्पद दिरंगाई!
🚨५% बेकायदेशीर व्याजाच्या सावकारी अटींवर कोणताही शासकीय अधिकारी स्वाक्षरी करूच शकत नाही!
🚨प्रतिज्ञापत्रावर चक्क 'POL/SR' (चाप्टर केस/पोलीस चौकशी) कोडचा बेकायदेशीर वापर; गोल शिक्क्याशेजारील कथित नोंद महसूल दप्तरात गायब!
🚨मा. उच्च न्यायालयाच्या १२ पानांच्या ऐतिहासिक निकालानंतर आणि तहसीलदारांच्या 'जावक क्र. १३९/२०२६' च्या आदेशानंतरही काउंटर FIR का नाही?
शिरपूर (विशेष प्रतिनिधी): शिरपूर येथील शेत जमीन गट नं. ३५/२ बेकायदेशीररीत्या बळकावण्यासाठी थेट शासकीय दंडाधिकारी अधिकाराचा गैरवापर करून बनावट दस्तऐवज तयार करणाऱ्या ७ आरोपींच्या हायप्रोफाईल टोळीचा आणि त्यांना मदत करणाऱ्या महसूल अधिकार्यांचा अत्यंत खळबळजनक तांत्रिक कायदेशीर पर्दाफाश झाला आहे 💥 मा. मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाचा अंतिम निकाल आणि तालुका कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार, शिरपूर यांचे अधिकृत आदेश पत्र (क्रमांक/फौजदारी/कावि/१३९/२०२६, दिनांक ०९/०६/२०२६) समोर असतानाही शिरपूर पोलीस गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई करत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे💥 या संतापजनक प्रशासकीय दडपशाहीमुळे हताश झालेले तक्रारदार श्री. संदीप प्रेमसिंग जमादार यांनी ३ नवीन तांत्रिक व थेट पुराव्यांचा महास्फोट करत प्रशासनाला उघडे पाडले आहे 💥 "कुणी न्याय देता का रे न्याय..." - तक्रारदाराचा नटसम्राटसारखा आर्त सवाल!सर्व कायदेशीर आणि सरकारी पुरावे खिशात असूनही स्थानिक पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जात असल्याने तक्रारदार संदीप जमादार कमालीचे व्यथित झाले आहेत। 'नटसम्राट' चित्रपटात नाना पाटेकर ज्याप्रमाणे आर्ततेने ओरडतात की "कुणी घर देता का रे घर...", तशीच अवस्था आज शिरपूरमध्ये आपली झाली असल्याचे जमादार यांनी सांगितले। ते म्हणतात, "माझ्याकडे हायकोर्टाची ऑर्डर आहे , तहसीलदारांचे पत्र आहे , तरीही मला या भ्रष्ट व्यवस्थेसमोर ओरडून विचारावे लागत आहे - 'या शिरपुरात मला कुणी न्याय देता का रे न्याय?' खोट्या तक्रारीवर माझ्यावर तत्काळ गुन्हे दाखल करणारी पोलीस यंत्रणा आज स्वतः तहसीलदारांनी आदेश देऊनही आरोपींना अटक करायला कोणाच्या पाया पडत आहे?
"🔍 १. नवीन ३ तांत्रिक आणि धक्कादायक खुलासेतक्रारदार संदीप जमादार यांनी आता या बनावट दस्तऐवजातील ३ अत्यंत मजबूत तांत्रिक त्रुटी थेट पुराव्यांसह उघड केल्या आहेत, ज्या आरोपींना न्यायालयात थेट जेलमध्ये पाठवण्यासाठी पुरेशा आहेत:
५% व्याजाच्या बेकायदेशीर सावकारी अटींवर स्वाक्षरी?: महाराष्ट्र सावकारी कायदा आणि रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार, कोणताही शासकीय राजपत्रित अधिकारी किंवा कार्यकारी दंडाधिकारी (Executive Magistrate) ५% शेकडा व्याजदराच्या बेकायदेशीर अटी असलेल्या खाजगी 'समजुतीच्या लेखावर' किंवा स्टॅम्प पेपरवर आपली स्वाक्षरी करून त्याला कायदेशीर स्वरूप देऊच शकत नाही 💥 तत्कालीन निवृत्त नायब तहसीलदार सूर्यवंशी यांनी अशा अवैध दस्तऐवजावर स्वाक्षरी करणे हा थेट शासकीय पदाचा गैरवापर आणि फौजदारी गुन्हा ठरतो 💥गोल शिक्क्याशेजारील संशयास्पद नोंद महसूल दप्तरात गायब!: आरोपींनी न्यायालयात सादर केलेल्या कथित प्रतिज्ञापत्रावरील गोल शिक्क्याच्या बाजूला 'No/POL/SR/5038/2017' अशी आवक-जावक नोंद दाखवण्यात आली आहे 💥 मुख्य तहसीलदार यांनी महसूल अभिलेख कक्षातील मूळ शासकीय दप्तराची तपासणी केली असता, या नंबरची कोणतीही नोंद संपूर्ण शिरपूर महसूल कार्यालयात कुठेही आढळून आलेली नाही 💥 हा नंबर पूर्णपणे काल्पनिक आणि बनावट असल्याचे १००% सिद्ध झाले आहे 💥प्रतिज्ञापत्रासाठी चक्क 'POL/SR' (पोलीस/चाप्टर केस) कोडचा गैरवापर: गोल शिक्क्याजवळ जो 'No/POL/SR' हा कोड वापरण्यात आला आहे, तो सामान्य महसूल प्रतिज्ञापत्रासाठी (Affidavit) कधीही वापरला जात नाही 💥'POL/SR' (Police/Special Report किंवा Chapter Case) हा कोड सामान्यतः पोलीस अधिकारी किंवा दंडाधिकारी न्यायालयात चालणाऱ्या प्रतिबंधात्मक फौजदारी कारवाईसाठी (उदा. चाप्टर केस, पोलीस चौकशी संदर्भ) वापरतात 💥 आरोपींनी घाईघाईत बनावट दस्तऐवज तयार करताना थेट या कोडचा बेकायदेशीर गैरवापर केल्याचे उघड झाले असून, पोलिसांनी याची सखोल चौकशी करणे गरजेचे आहे 💥⚖️ २. मा. उच्च न्यायालयाचा चाबूक आणि तहसीलदारांचे आदेशतक्रारदार संदीप जमादार यांनी पूर्णपणे कायदेशीर मोबदला देऊन खरेदी केलेले खरेदीखत नाकारण्यासाठी, आरोपींनी त्यांच्यावर बेकायदेशीर सावकारीचा खोटा गुन्हा दाखल केला होता 💥 मात्र, मा. मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाने (Criminal Application No. 23 of 2025) १२ पानांचा विस्तृत निकाल देत तो खोटा गुन्हा पूर्णपणे रद्द केला व जमादार यांच्या खरेदीखतावर कायदेशीर शिक्कामोर्तब केले 💥यानंतर, स्वतः मुख्य तहसीलदार महेंद्र माळी यांनी शासकीय दप्तराची सखोल तपासणी करून, २०१३ पासून मॅन्युअल रजिस्टर पूर्णपणे बंद असल्याचा आणि दस्तऐवजावरील तो शिक्का १००% बोगस, खोटा आणि बनावट असल्याचा लेखी निर्वाळा पोलिसांना दिला आहे 💥⏳ दिरंगाई केल्यास 'मॅजिस्ट्रेट कोर्टाचा हँटर' फिरणार!स्वतः मुख्य तहसीलदारांनी दिनांक ०९/०६/२०२६ रोजी पोलिसांना लेखी आदेश देऊनही , स्थानिक पोलीस प्रशासनातील काही संशयित अधिकारी आरोपींच्या आर्थिक साखळीमुळे किंवा राजकीय दबावामुळे मुख्य गुन्हा नोंदवण्यास कमालीची दिरंगाई करत आहेत 💥 उलट, सोशल मीडियाच्या माध्यमातून या भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवणाऱ्या पीडित तक्रारदारालाच खोट्या गुन्ह्यांच्या धमक्या दिल्या जात आहेत 💥सूत्रांकडून मिळालेल्या अत्यंत खात्रीशीर माहितीनुसार, जर शिरपूर पोलिसांनी या अधिकृत पत्राची आणि मा. हायकोर्टाच्या निकालाची दखल घेऊन तात्काळ मुख्य काउंटर FIR दाखल केली नाही , तर तक्रारदार संदीप जमादार हे थेट शिरपूर न्यायालयात कलम अंतर्गत खाजगी फौजदारी फिर्याद दाखल करणार आहेत 💥 सरकारचा बोगस शिक्का मारणाऱ्या या ७ जणांच्या टोळीला आणि भ्रष्ट अधिकाऱ्याला पोलीस कधी बेड्या ठोकतात, याकडे संपूर्ण धुळे जिल्ह्याचे आणि राज्याचे लक्ष लागले आहे