ShrirampurTimes

ShrirampurTimes आता मिळवा श्रीरामपूर मधील मराठी बातम?

कल्याणमध्ये वास्तव्यला असणाऱ्या एका ४५ वर्षीय उद्योजकाने आपली पत्नी आणि ७ वर्षांच्या मुलाला तोंडावर उशी दाबून ठार मारल्य...
02/12/2023

कल्याणमध्ये वास्तव्यला असणाऱ्या एका ४५ वर्षीय उद्योजकाने आपली पत्नी आणि ७ वर्षांच्या मुलाला तोंडावर उशी दाबून ठार मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. यानंतर संबंधित उद्योजक फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दीपक गायकवाड असे या उद्योजकाचे नाव असून त्याने पत्नी आणि मुलाला ठार मारल्यानंतर आपल्या कंपनीतील एका कर्मचाऱ्याला याविषयी कळवले. तसेच मीदेखील आत्महत्या करत असल्याचे त्याने संबंधित कर्मचाऱ्याला सांगितले होते....

कल्याणमध्ये वास्तव्यला असणाऱ्या एका ४५ वर्षीय उद्योजकाने आपली पत्नी आणि ७ वर्षांच्या मुलाला तोंडावर उशी दाबून .....

नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आह...
28/11/2023

नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आहे. त्यामुळे शेतीपिकाचं मोठं नुकसान झालं असून बळीराजा संकटात सापडला आहे. अवकाळीचं संकट कधी दूर होणार? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. अशातच हवामान खात्याने पावसासंदर्भात मोठी अपडेट दिली आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या ४८ तासांत राज्यातील विविध ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे. यामध्ये उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसासह गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे....

नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गार....

शनिशिंगणापूर येथे मुख्य रस्त्यापासून सुरू होणारी जुनी दर्शन रांग बंद करून नव्याने बांधण्यात आलेल्या पानसनाला तीर्थ प्रकल...
26/11/2023

शनिशिंगणापूर येथे मुख्य रस्त्यापासून सुरू होणारी जुनी दर्शन रांग बंद करून नव्याने बांधण्यात आलेल्या पानसनाला तीर्थ प्रकल्प योजनेतील भुयारी मार्गाने नवीन दर्शन पथास बुधवारी सुरुवात करण्यात आली. देवस्थानच्या वाहन तळापासून सुरू होणार्‍या भुयारी मार्गाने भाविक महाद्वारासमोर निघणार असून येथून जुन्या दर्शनपथ इमारती मधून भाविक दर्शनाकरता जातील या प्रकल्पामध्ये दशावतार मूर्ती बसवण्यात आल्या आहेत दीपस्तंभ, नवग्रह मंदिराचे दर्शन घेता येईल. चाळीस फुट रुंद व आठशे फुट लांबीचा हा दर्शन पथ बनवण्यात आला आहे. दर्शन करून बाहेर जाण्याच्या मार्गावर बगीचा, पानसनाला प्रकल्प, सप्ततीर्थ बंघारा, सेल्फी पॉईंट आदीं बनवण्यात आले आहेत. मोठ्या संख्येने भाविकांनी या नवीन मार्गाने जात शनीदर्शन घेतले.

शनिशिंगणापूर येथे मुख्य रस्त्यापासून सुरू होणारी जुनी दर्शन रांग बंद करून नव्याने बांधण्यात आलेल्या पानसनाला त...

कोरोना महामारीने संपूर्ण जगाला हादरवून सोडल होतं. आता पुन्हा नव्या भयंकर आजाराने डोकं वर काढलं असून या आजाराची सुरुवात द...
25/11/2023

कोरोना महामारीने संपूर्ण जगाला हादरवून सोडल होतं. आता पुन्हा नव्या भयंकर आजाराने डोकं वर काढलं असून या आजाराची सुरुवात देखील चीनमधूनच झाली आहे. चीनच्या उत्तर पूर्व प्रांतातील लियाओनिंग भागातील मुलांमध्ये निमोनिया सारखी लक्षणं आढळून आली आहेत. फुफ्फुसाला सूज, श्वास घेण्यात अडचणी आणि खोकल्यासह तापाची लक्षणं दिसून आली आहेत. त्यामुळे पुन्हा खळबळ माजण्याची शक्यता असून डब्ल्यूएचओनेही सतर्कतेचा इशारा दिला आहे. भारत सरकारनेही नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.चिनने या आजाराबाबत १३ नोव्हेंबर रोजी स्थानिक माध्यमांना माहिती दिली होती....

कोरोना महामारीने संपूर्ण जगाला हादरवून सोडल होतं. आता पुन्हा नव्या भयंकर आजाराने डोकं वर काढलं असून या आजाराची स.....

राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच तापला असून आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Mano...
23/11/2023

राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच तापला असून आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्यभर दौरे सुरु केले आहेत. काल त्यांची नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथे जाहीर सभा पार पडली. त्यानंतर आज नाशिकमधील इगतपुरी (Igatpuri) येथील शेणीत याठिकाणी जंगी सभा झाली. यावेळी त्यांनी येत्या २४ डिसेंबरपर्यंत मराठ्यांना आरक्षण द्यावे, अन्यथा २५ डिसेंबरनंतर मुंबईत (Mumbai) आंदोलन करणार असा इशारा शेणीत येथील सभेत बोलतांना दिला...इगतपुरी तालुक्यातील (Igatpuri Taluka) शेणीत येथे सकल मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटलांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी ते बोलत होते....

राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच तापला असून आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) य...

जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील पाथरवाला येथील सुरेश गणेश जाधव याने पेटवून घेतले आहे. त्याचे आई वडील देखील वाचविण्यासाठी ग...
22/11/2023

जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील पाथरवाला येथील सुरेश गणेश जाधव याने पेटवून घेतले आहे. त्याचे आई वडील देखील वाचविण्यासाठी गेल्याने तिघेही भाजले आहेत. गणेश जाधव आणि मंगल गणेश जाधव यांच्या अकरावीत शिकणाऱ्या युवा मुलाने मराठा आरक्षण मिळावे यासाठी आज राहत्या घरी सात वाजता पेटवून घेतले आहे,असे बोलले जात आहे. गंभीररित्या भाजलेल्या या मुलाची तब्येत खूप खराब असल्याने पुढील उपचारासाठी त्याला जालना येथून छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात येत आहे....

जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील पाथरवाला येथील सुरेश गणेश जाधव याने पेटवून घेतले आहे. त्याचे आई वडील देखील वाचविण....

सर्वोच्च न्यायालयात नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांतील धरणांमधून मराठावाड्यातील जायकवाडी धरणात पाणी सोडण्यासाठीच्या हस्तक्षे...
21/11/2023

सर्वोच्च न्यायालयात नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांतील धरणांमधून मराठावाड्यातील जायकवाडी धरणात पाणी सोडण्यासाठीच्या हस्तक्षेप याचिकांवर सुनावणी झाली. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळानं जायकवाडीसाठी ८.६०३ इतके पाणी सोडण्याचे आदेश दिले होते. नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील लोक प्रतिनिधींनी याला विरोध केला होता. तर, मराठवाड्यातील लोक प्रतिनिधी पाणी मिळावे यासाठी लढा देत होते. अखेर सर्वोच्च न्यायालयानं नाशिक आणि नगर जिल्ह्यातील कारखानदारांकडून करण्या आलेल्या हस्तक्षेप याचिकेतील ३० ऑक्टोबरच्या आदेशाला स्थगिती देण्याच्या मागणीला नकार दिला....

सर्वोच्च न्यायालयात नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांतील धरणांमधून मराठावाड्यातील जायकवाडी धरणात पाणी सोडण्यासाठी....

जालन्यात धनगर आरक्षणासाठी आंदोलन पेटले आहे. धनगर आरक्षणाला हिंसक वळण लागले आहे. जालन्यात तुफान राडा पहायाला मिळत आहे. धन...
21/11/2023

जालन्यात धनगर आरक्षणासाठी आंदोलन पेटले आहे. धनगर आरक्षणाला हिंसक वळण लागले आहे. जालन्यात तुफान राडा पहायाला मिळत आहे. धनगर आंदोलक आक्रमक झाले. आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या काचा फोडल्या, जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर राडा,अधिकारी निवेदन घेण्यासाठी खाली येत नसल्याने आंदोलन कर्त्यांनी राडा घातला आहे. दरम्यान, जालन्यात धनगर आरक्षणासाठी आंदोलन पेटले असतानाच दुसरीकडे भाजपचे जालन्यातील बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांना मराठा समाज बांधवांनी गावातून हाकलून लावलंय.अंबड तालुक्यातील शिराढोण गावात ही घटना घडली आहे.शिराढोण गावात कुचे आज गावातील विविध विकास कामांच्या उदघाटन कार्यक्रमासाठी गेले होते.यावेळी गावकऱ्यांनी एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी करत कुचे यांना उदघाटन कार्यक्रमनानंतर हाकलून लावलं.शिराढोण गावात मराठा आरक्षणासाठी नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे.

जालन्यात धनगर आरक्षणासाठी आंदोलन पेटले आहे. धनगर आरक्षणाला हिंसक वळण लागले आहे. जालन्यात तुफान राडा पहायाला मिळत...

श्रीरामपूर नेवासे राज्यमार्गावर वडाळामहादेवनजीक डंपर उलटून झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला. अपघातात डंपर चालक जखमी...
20/11/2023

श्रीरामपूर नेवासे राज्यमार्गावर वडाळामहादेवनजीक डंपर उलटून झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला. अपघातात डंपर चालक जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मयतामध्ये सोमनाथ रंगनाथ माळी (वय ३०, रा. वांगी, ता. श्रीरामपूर) यांचा समावेश आहे. चालक सुरेश सुकदेव पवार (वय २८, रा. टाकळीभान) हे जखमी झाले. घटनास्थळी पोलिस फौजफाटा तसेच नागरिक जमा झाले. त्यांनी तत्काळ चालक पवार यांना बाहेर काढले. माळी हे डंपरखाली सापडल्याने जागीच ठार झाले. कामगार रुग्णालयात पवार हे उपचार घेत आहेत.

श्रीरामपूर नेवासे राज्यमार्गावर वडाळामहादेवनजीक डंपर उलटून झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला. अपघातात डंपर...

भारतात गेल्या दीन महिन्यापासून सुरु असलेली आयसीसी विश्वचषक स्पर्धा (ICC World Cup 2023) आता शेवटच्या टप्प्यात आहे. स्पर्...
17/11/2023

भारतात गेल्या दीन महिन्यापासून सुरु असलेली आयसीसी विश्वचषक स्पर्धा (ICC World Cup 2023) आता शेवटच्या टप्प्यात आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या दहा संघांपैकी आता केवळ संघ उरलेत. येत्या रविवारी म्हणजे 19 नोव्हेंबरला भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान (India vs Australia Final) आयसीसी विश्वचषकाचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. जगभरातील क्रिकेटप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा विश्वचषकावर नाव कोरणार की टीम इंडिया तिसऱ्यांदा विश्वचषक पटकावणार याकडे संपूर्ण क्रिकेट जगताचं लक्ष लागलं आहे....

भारतात गेल्या दीन महिन्यापासून सुरु असलेली आयसीसी विश्वचषक स्पर्धा (ICC World Cup 2023) आता शेवटच्या टप्प्यात आहे. स्पर्धेत ...

जम्मू काश्मीरमधील दोडा जिल्ह्यातील आसार भागात त्रंगलजवळ एक प्रवासी बस रस्त्यापासून २५० मीटर खोल दरीत कोसळल्याने भीषण अपघ...
15/11/2023

जम्मू काश्मीरमधील दोडा जिल्ह्यातील आसार भागात त्रंगलजवळ एक प्रवासी बस रस्त्यापासून २५० मीटर खोल दरीत कोसळल्याने भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात पाच प्रवाशांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे... याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सदर प्रवासी बस किष्टवाडवरून जम्मूकडे जात होती. त्यावेळी ही दोडा जिल्ह्यातील असार भागाजवळ असलेल्या त्रंगलजवळ आली असता २५० मीटर खोल दरीत कोसळली. यावेळी बसचा अपघात होऊन पाच प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे....

जम्मू काश्मीरमधील दोडा जिल्ह्यातील आसार भागात त्रंगलजवळ एक प्रवासी बस रस्त्यापासून २५० मीटर खोल दरीत कोसळल्यान...

राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला असून ठिकठिकाणी आंदोलने, साखळी उपोषण केले जात आहे. तर काही ठिक...
13/11/2023

राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला असून ठिकठिकाणी आंदोलने, साखळी उपोषण केले जात आहे. तर काही ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. त्यातच सरकारने दोन महिन्यांचा अवधी मागून घेतल्याने मराठा आरक्षणाचा लढा काही अंशी थंडावला आहे. मात्र, अद्याप मराठा तरुणांच्या मनात राज्य सरकारच्या उदासीन धोरणामुळे संतापाचे वातावरण असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आता पुन्हा एकदा नांदेडमधील एका तरुणाने आरक्षणासाठी आपलं जीवन संपवल्याची घटना घडली आहे......

राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला असून ठिकठिकाणी आंदोलने, साखळी उपोषण केले जात आहे. तर .....

Address

Analog Media, Jijamata Chowk
Shrirampur
413709

Telephone

+917709601193

Website

https://play.google.com/store/apps/details?id=shrirampur.times.com&pli=1

Alerts

Be the first to know and let us send you an email when ShrirampurTimes posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to ShrirampurTimes:

Share

Shrirampur Times #1

श्रीरामपूर टाइम्स या प्रतिष्ठित दैनिकातील ताज्या आणि वेगवान बातम्या मिळवा. हे वृत्तपत्र गेल्या ५ वर्षांपासून बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवत असून अधिकृत मराठी माहिती हवी असणाऱ्या वाचकांची पहिली पंसत हे वृत्तपत्र आहे.