Shahaji Furde Patil

Shahaji Furde Patil Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shahaji Furde Patil, Patil Plot , Shivajinagar Barshi Dist Solapur, Solapur.

लोकमत वृत्तपत्रात 20 वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत
TATA AIA Life Insurance – Court of the Table विमा सल्लागार
म्युच्युअल फंड व विमा क्षेत्रातील विश्वासार्ह मार्गदर्शक
तुमच्या संपन्न आणि सुरक्षित भविष्याचा सल्लागार

ll आग्रहाचे निमंत्रण ll'धनसंपदा वेल्थ'ऑफिस उद्घाटन समारंभ  🙏 आपल्या आशीर्वादाने आणि सहकार्याने नव्या प्रवासाची सुरुवात.....
24/10/2025

ll आग्रहाचे निमंत्रण ll

'धनसंपदा वेल्थ'ऑफिस उद्घाटन समारंभ

🙏 आपल्या आशीर्वादाने आणि सहकार्याने नव्या प्रवासाची सुरुवात... 🙏

✨ धनसंपदा वेल्थ मॅनेजमेंट ✨
(Mutual Fund | Tata Life & Health Insurance | Financial Planning)

आमच्या नवीन कार्यालयाच्या उद्घाटन समारंभानिमित्त आयोजित चहापान कार्यक्रमास
आपण सहकुटुंब उपस्थित राहून आम्हाला आशीर्वाद द्यावेत आणि आमचा आनंद द्विगुणित करावा
ही आमची नम्र विनंती.

नक्की या आम्ही आपली वाट पाहत आहोत..

📅 दिनांक: सोमवार, २७ ऑक्टोबर २०२५
🕙 वेळ: सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत
📍 स्थळ: मोहिते कॉम्प्लेक्स, युनियन बँकेसमोर,
शिवाजी कॉलेज रोड, बार्शी
संपर्क : 9422033551,878884550

🌼 आपले स्नेहांकित 🌼
श्री.शहाजी हरिदास फुरडे-पाटील
चि. इंजि.रामराजे ,मालोजी,समर्थ
व समस्त फुरडे-पाटील परिवार, बार्शी.

सिंगापूर ते न्यूयॉर्क हा प्रवास इतका लांब आहे की विमान जवळपास 18 तास 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ हवेत असतं. एकूण अंतर 15,...
05/10/2025

सिंगापूर ते न्यूयॉर्क हा प्रवास इतका लांब आहे की विमान जवळपास 18 तास 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ हवेत असतं. एकूण अंतर 15,000–16,000 किमी – म्हणजे संपूर्ण पृथ्वीच्या अर्ध्या फेऱ्याएवढं!
या थकवणाऱ्या पण रोमांचक प्रवासासाठी खास Airbus A350-900ULR विमानाचा वापर केला जातो. हे विमान केवळ उड्डाण क्षमतेसाठीच नव्हे तर प्रवाशांच्या सोयीसाठी डिझाइन केलं गेलं आहे.
प्रशस्त व मऊ आसनं, अधिक पाय मोकळेपणाने ठेवण्याची सोय, लांब उड्डाणासाठी संतुलित जेवण, आणि दमणूक कमी करण्यासाठी आधुनिक हवेचं नियमन – या सर्व सोयींमुळे प्रवास सुखकर होतो.
इतक्या लांबचा अखंड प्रवास पूर्ण केल्यावर प्रवाशांना वाटतं की त्यांनी एखादं हवाई मॅरेथॉन पूर्ण केलंय – म्हणूनच हिला म्हणतात "मॅरेथॉन फ्लाइट".

05/10/2025

भारतातील एक असं रेल्वे स्टेशन, येथून देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यासाठी ट्रेन जातात.

रिरूमला... तिरुपती..!
05/10/2025

रिरूमला... तिरुपती..!

ज्यांच्या आयुष्याची सुरुवात या सायकल ने झाली आहे त्यांनी  पटकन 👍करा.अ‍ॅटलस सायकल ही भारतातील सर्वात जुनी व लोकप्रिय सायक...
05/10/2025

ज्यांच्या आयुष्याची सुरुवात या सायकल ने झाली आहे त्यांनी पटकन 👍करा.

अ‍ॅटलस सायकल ही भारतातील सर्वात जुनी व लोकप्रिय सायकल कंपनींपैकी एक आहे. १९५१ मध्ये हरियाणातील सोनीपत येथे याची स्थापना झाली. सुरुवातीला अगदी कमी प्रमाणात सायकल तयार केली जात होती, परंतु हळूहळू अ‍ॅटलसने देशभरात आपली ओळख निर्माण केली. साधी, मजबूत व किफायतशीर सायकल म्हणून ग्रामीण भागात याला विशेष लोकप्रियता मिळाली.

अ‍ॅटलस सायकल कंपनीने अनेक प्रकारच्या सायकली बाजारात आणल्या – पुरुषांसाठी, महिलांसाठी तसेच विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे मॉडेल्स. विशेषतः विद्यार्थ्यांनी शाळा–कॉलेजसाठी जाण्यासाठी अ‍ॅटलस सायकल मोठ्या प्रमाणावर वापरली. कंपनीने “स्ट्राँग फ्रेम” आणि टिकाऊ टायर यासाठी आपली खास छाप सोडली.

१९७०–८० च्या दशकात अ‍ॅटलस सायकल ही ग्रामीण भारताचे प्रतीक बनली. शेतकरी बाजारात जाण्यासाठी, कामगार रोजंदारीवर जाण्यासाठी किंवा व्यापारी लहानसहान सामान नेण्यासाठी अ‍ॅटलस सायकलचा वापर करत. स्वस्तात व सोप्या देखभालीमुळे ही सायकल प्रत्येक कुटुंबात सहज उपलब्ध होती.

काळ बदलला तसा मोटारसायकल आणि स्कूटरच्या वाढत्या वापरामुळे सायकलींची मागणी कमी झाली. तरीसुद्धा अ‍ॅटलसने आधुनिक डिझाईन, गिअर सायकली, स्पोर्ट्स मॉडेल्स आणि मुलांसाठी विशेष सायकली बाजारात आणण्याचा प्रयत्न केला. काही काळ कंपनीला आर्थिक अडचणीही आल्या, परंतु तिच्या ब्रँडला अजूनही ऐतिहासिक महत्त्व आहे.

आजही अ‍ॅटलस सायकल हे नाव भारतीयांच्या मनात विश्वास आणि टिकाऊपणाचे प्रतिक आहे. जुन्या पिढीला अ‍ॅटलस सायकल म्हणजे कष्टकरी वर्गाचा अविभाज्य भाग वाटतो. जरी आधुनिक वाहतुकीच्या साधनांनी तिची जागा घेतली असली, तरी “भारतातील प्रत्येक घराची सायकल” अशी ओळख अ‍ॅटलसने कायम ठेवली आहे.

*श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन पंढरपूर*      *गुरुवार दि- 02 ऑक्टोबर 2025*           *🌸दुपारचा पोशाख 🌸*              ...
02/10/2025

*श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन पंढरपूर*
*गुरुवार दि- 02 ऑक्टोबर 2025*
*🌸दुपारचा पोशाख 🌸*
*🙏🏻 जय हरी.🙏🏻*
🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕
*आज विजयादशमी दसरा निमित्त श्री.विठ्ठलास पारंपरिक सोन्याचे घोंगडी सोन्याचे धोतर काठी पोशाख व अलंकार व श्री.रुक्मिणीमातेस श्री.विजयालक्ष्मीदेवी पारंपरिक पोशाख व अलंकार परिधान करण्यात आले आहेत.*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

नजर जाईल तिथपर्यंत फक्त मावळेच मावळे..⛳🧡 कॅमेऱ्याची पण क्षमता नाही की ते आपल्या सगळ्यांना  छायाचित्रात सामावु शकेल..! ह...
02/10/2025

नजर जाईल तिथपर्यंत फक्त मावळेच मावळे..⛳🧡

कॅमेऱ्याची पण क्षमता नाही की ते आपल्या सगळ्यांना छायाचित्रात सामावु शकेल..!
हा तर फक्त एक कोपरा आहे....... 🙏🙏

#दसरा #श्री_क्षेत्र_नारायणगड #रावन

लक्ष्मण खेडकर यांनी काढलेला जायकवाडी धरणाजवळचा हा फोटो... धरणाच्या इतिहासात क्वचितच एखाद्या वेळेस सगळे 27 दरवाजे उघडून ल...
28/09/2025

लक्ष्मण खेडकर यांनी काढलेला जायकवाडी धरणाजवळचा हा फोटो... धरणाच्या इतिहासात क्वचितच एखाद्या वेळेस सगळे 27 दरवाजे उघडून लाखो क्यूसेस पाण्याचा विसर्ग चालू आहे. पाणी अजून सोडण्यात येणार आहे याचा सायरन वाजतोय आणि या मुलीला शाळेत जायचे आहे.
salute to that brave girl...❤️❤️❤️

रोजच्या जीवनात जगण्याचा संघर्ष करणारी हीच आहे खरी शक्तीदायीनी..🙏🙏

तुम्हीच सांगा आता कसे जगायचे ते
27/09/2025

तुम्हीच सांगा आता कसे जगायचे ते

23/09/2025

सीना नदी महापूर.. . सोलापूर- कोल्हापूर रोड रात्री 10 वा. बंद करण्यात आला

Address

Patil Plot , Shivajinagar Barshi Dist Solapur
Solapur
413411

Telephone

+919423526187

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shahaji Furde Patil posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

अन्नदाता सुखी भव :

शेतकरी बंधूंनो, या पेजवर आम्ही जी माहिती टाकतो ती

माहिती विविध पुस्तकांमधून, मासिकांमधून, वेबसाईटस

वरून व आमची स्वतः ची माहिती, अशी सर्व एकत्र करून

माहिती टाकत असतो, यासाठीचे सर्व श्रेय फक्त