Solapur City News

Solapur City News महाराष्ट्रासह देशभरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या Youtube चॅनेलला subscribe करा

भाजपा ओबीसी मोर्चा (महाराष्ट्र प्रदेश)च्या नवनियुक्त पदाधिकारी जाहीरसोलापूर शहराच्या सहसंपर्कप्रमुखपदी संदिप जाधव, विक्र...
20/08/2026

भाजपा ओबीसी मोर्चा (महाराष्ट्र प्रदेश)च्या नवनियुक्त पदाधिकारी जाहीर
सोलापूर शहराच्या सहसंपर्कप्रमुखपदी संदिप जाधव, विक्रम शिरसाठ यांची नियुक्ती

३४ वर्षांचा प्रदीर्घ लढा यशस्वी! आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्यामुळे मोची समाजाच्या शाळेसाठी भूखंड मंजूरसोलापूर ...
20/08/2026

३४ वर्षांचा प्रदीर्घ लढा यशस्वी! आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्यामुळे मोची समाजाच्या शाळेसाठी भूखंड मंजूर

सोलापूर - गेल्या ३४ वर्षांपासून मोची समाजाकडून होत असलेल्या शैक्षणिक कामासाठी भूखंड मिळण्याच्या मागणीला अखेर यश आले आहे. आमदार देवेंद्र कोठे यांनी शासन दरबारी पाठपुरावा केल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून मंत्रिमंडळ बैठकीत ही मागणी मंजूर करण्यात आली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विशेषतः लष्कर आणि परिसरात प्रामुख्याने असलेल्या मोची समाजाच्या गोरगरीब कामगारांच्या मुलांची शिक्षणाची सोय व्हावी याकरिता श्री जांबमुनी मोची समाजसेवा मंडळाला येथील जागा शाळेकरीता द्यावी अशी मागणी समाजाच्यावतीने आमदार देवेंद्र कोठे यांच्याकडे करण्यात आली होती. त्यांची ही मागणी विचारात घेऊन आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे याबाबत पाठपुरावा केला होता. आमदार देवेंद्र फडणीस यांच्या मागणीला प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री बावनकुळे यांनी श्री जांबमुनी मोची समाजसेवा मंडळाला ही जागा देण्याचा निर्णय घेतला आहे.

यापूर्वी हा भूखंड मिळवण्यासाठी मोची समाजातील अनेकांनी तत्कालीन आमदार, खासदार, मुख्यमंत्री यांच्याकडे सातत्याने मागणी केली होती. परंतु हा प्रश्न सुटला नव्हता. आमदार देवेंद्र कोठे यांनी हा विषय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे मांडल्यानंतर मात्र या विषयाला गती आली.

सोलापूर उत्तर सदर बझार येथील माध्यमिक शाळेसाठी आरक्षित असलेली ३ हजार ९१० चौ.मी. जागा श्री जांबमुनी मोची समाज सेवा मंडळाला शैक्षणिक कारणासाठी २३४६ चौरस मीटर क्षेत्र प्रचलित बाजारमूल्याच्या वीस टक्के रक्कम घेऊन कब्जेहक्काने देण्याचा निर्णय घेण्यात आला. क्रीडांगणासाठी १५४६ चौरस मीटर क्षेत्र वर्षाला एक रुपया नाममात्र दराने तीस वर्षासाठी भाडेपट्ट्याने देण्यास मान्यता देण्यात आली.मात्र हा भूखंड़ देताना राज्य शासनाने काही अटी आणि शर्तीही घातल्या आहेत. या जमिनीचा वापर केवळ मंजूर प्रयोजनासाठीच करता येणार आहे. जमिनीचा ताबा मिळाल्यापासून तीन वर्षांच्या आत मंजूर प्रयोजनासाठी वापर सुरू करणे बंधनकारक आहे.

•महसूल विभागाचे क्रांतिकारी निर्णय घेणाऱ्या
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे सोलापूरला पुन्हा प्रत्यंतर

महसूल विभागाचे क्रांतिकारी निर्णय
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे घेत आहेत. याचे या निर्णयाच्या निमित्ताने सोलापूरकरांना पुन्हा एकदा प्रत्यंतर आले. बी टू च्या ऐतिहासिक निर्णयानंतर १९९२ पासून रखडलेला मोची समाजाचा शैक्षणिक विषयातील प्रश्न महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मार्गी लावला आहे. कष्टकरी, मागासवर्गीय प्रवर्गातील मोची समाजाच्या शैक्षणिक कामासाठी जमीन उपलब्ध करून दिल्यामुळे येणाऱ्या काळात अनेक चांगले विद्यार्थी घडणार आहेत.

•मोची समाजाने व्यक्त केला आनंद

आजवर मोची समाजाचा केवळ राजकीय फायद्यासाठी उपयोग करून घेण्यात आला. मात्र गोरगरीब मोची समाजाला न्याय मिळाला नाही. मोची समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी याकरिता महाराष्ट्राचे विकासाभिमुख मुख्यमंत्री फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार देवेंद्र कोठे यांनी मात्र हा विषय मार्गी लावून मोठी समाजाच्या पाल्यांच्या शिक्षणाची सोय केली आहे, असे म्हणत या निर्णयाबद्दल मोची समाजातील समाजधुरिणांनी एकत्र येत आनंद उत्सव साजरा केला.

•मोची समाजाला दिलेल्या शब्दपूर्तीचे समाधान

मोची समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचा शब्द मी विधानसभा निवडणुकीप्रसंगी दिला होता. यातीलच एक टप्पा म्हणजे हा निर्णय आहे. सोलापूर शहरात मोची समाजासह गोरगरीब कामगार वर्गाची संख्या मोठी आहे. त्यांच्या पाल्यांच्या उत्तम शिक्षणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. विद्यार्थ्यांचे शिक्षण उत्तम होण्यासाठी आवश्यक सर्व मदत शासनाच्यावतीने मिळवून देण्यात येईल.
-- देवेंद्र कोठे, आमदार, शहर मध्य

भारतस्य तेज । शाश्वतम् भारतम् ।अखण्ड भारतम् ॥भारताच्या ८०व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व देशवासीयांना मनःपूर्वक शुभेच्...
15/08/2026

भारतस्य तेज । शाश्वतम् भारतम् ।अखण्ड भारतम् ॥

भारताच्या ८०व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व देशवासीयांना मनःपूर्वक शुभेच्छा!

असंख्य स्वातंत्र्यसैनिकांच्या त्याग, शौर्य आणि बलिदानातून मिळालेल्या स्वातंत्र्याचा अभिमान बाळगत, देशाची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्व अधिक बळकट करण्याचा संकल्प करूया. संविधानाने दिलेली लोकशाही मूल्ये जपत, राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देत प्रत्येक क्षेत्रात भारताला अधिक सक्षम, समृद्ध, आत्मनिर्भर आणि विकसित करण्यासाठी योगदान देऊया.

स्वातंत्र्याचा गौरव, राष्ट्रहिताचा संकल्प आणि विकसित भारताचा ध्यास!

जय हिंद! वंदे मातरम्!
Solapur City News

आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हत्येचा कट रचणारे दोन गुन्हेगार गजाआड; सोलापूर पोलिसांकडून इंदापूर व कोल्हापूर टोलनाक्या...
13/08/2026

आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हत्येचा कट रचणारे दोन गुन्हेगार गजाआड; सोलापूर पोलिसांकडून इंदापूर व कोल्हापूर टोलनाक्यावर थरारक कारवाई!
सोलापूर- अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार श्री. सचिन पंचप्पा कल्याणशेट्टी यांना गोळ्या घालून ठार मारण्यासाठी त्यांच्या चालकाला पैशांचे आमिष दाखवून चिथावणी देणाऱ्या दोन अट्टल आरोपींना सोलापूरच्या सदर बझार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले आहे. प्रभाकर हणमंत फुलारी (वय २३, रा. अभिषेक नगर, अक्कलकोट रोड, सोलापूर) आणि श्रीशैल बाबूराव हुळ्ळे (वय ३२, रा. मणिधारी हेरीटेज, अक्कलकोट रोड, सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून, पोलिसांनी त्यांना दोन वेगवेगळ्या जिल्ह्यांतील हायवे टोलनाक्यांवरून बेड्या ठोकल्या आहेत.
या प्रकरणातील फिर्यादी आनंद स्वामीराव सुरवसे (वय ३०, रा. मोट्याळ, ता. अक्कलकोट) हे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे चालक म्हणून काम करतात. दिनांक ०७ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३.४५ वाजण्याच्या सुमारास ते सोलापूर येथील महावीर चौकातील प्युमा शोरूमबाहेर आमदारांच्या पत्नी व मुलाची गाडीत वाट पाहत थांबले होते. त्यावेळी आरोपी श्रीशैल हुळ्ळे व प्रभाकर फुलारी यांनी चालकाजवळ जाऊन, "तुला पैसे देतो, तुझ्या दादा आमदाराला गोळी घालून मार, पुढचे मी बघून घेतो," असे म्हणत आमदारांचा घातपात करण्यासाठी चालकाला पैशांचे आमिष दाखवून चिथावणी दिली.
या घटनेनंतर चालकाने दिलेल्या कायदेशीर फिर्यादीवरून दिनांक ०९ ऑगस्ट २०२६ रोजी सदर बझार पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ५५, ३(५) सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा नोंद होताच दोन्ही आरोपी फरार झाले होते. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्त डॉ. एम. राजकुमार, पोलीस उपआयुक्त डॉ. प्रीतम यावलकर, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती विजयालक्ष्मी कुर्री यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे व पोलीस निरीक्षक (गुन्हे) रवींद्रनाथ भंडारे यांच्या पथकाने आरोपींचा शोध सुरू केला.
तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी प्रभाकर फुलारी यास पुणे-सोलापूर हायवेवरील इंदापूर टोलनाक्यावरून ताब्यात घेतले. तर मुख्य आरोपी श्रीशैल हुळ्ळे यास कोल्हापूर-पुणे हायवेवरील किनी टोलनाक्यावरून (जि. कोल्हापूर) शिताफीने ताब्यात घेऊन अटक केली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता पोलीस कस्टडी मंजूर करण्यात आली आहे.
ही धडक कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल सावंत, पोलीस अंमलदार मुलाणी, राजेश चव्हाण, संतोष पापडे, प्रमोद पकाले, बागलकोटे, उमेश चव्हाण, हणमंत पुजारी, विशाल बोराडे, अमीन शेख, सागर गुंड, सोमनाथ सुरवसे, काशिनाथ वाडेकर, आनंद निंबाळकर व अनमोल लड्डे यांच्या पथकाने पार पाडली.

बी टू चा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल आमदार देवेंद्र कोठे यांचा बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियातर्फे सत्कारसोलापूर - सोलापूर शहर...
13/08/2026

बी टू चा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल आमदार देवेंद्र कोठे यांचा बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियातर्फे सत्कार

सोलापूर - सोलापूर शहरातील बी टू चा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करून हा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे यांचा बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, सोलापूर सेंटर यांच्यावतीने यथोचित सत्कार करण्यात आला.

यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांना श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रतिमा, शाल, श्रीफळ देऊन बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, सोलापूर सेंटरतर्फे सन्मानित करण्यात आले.

या सत्काराप्रसंगी असोसिएशनचे माजी ज्येष्ठ चेअरमन बिपिनभाई पटेल, मल्लिकार्जुन कावळे, अशोक गांधी, चेअरमन मनोज म्हेत्रस, व्हाईस चेअरमन हनुमंत कुलकर्णी, सचिव यशवंत पाथरूट, खजिनदार सलीम दर्जी, संतोष कलगुडगी, अजय अन्नलदास, युवराज चुंबळकर, राजेश देशमुख, दत्ता मुळे, गोरख देशमुख, अमर बिराजदार, भगवान जाधव, बाबुभाई सोनी, रामभाऊ दुधाळ, उमेश गायकवाड, विनोद बोरकर, विजय बेंद्रे, विश्वनाथ पवार, अशोक तंबोळू आदी उपस्थित होते.

स्वीकृत सदस्य आणि परिवहन समितीत भाजयुमोला संधी द्या; सोलापुरात भाजपा शहराध्यक्षांना भाजयुमोच्या कार्यकर्त्यांचे निवेदनसो...
13/08/2026

स्वीकृत सदस्य आणि परिवहन समितीत भाजयुमोला संधी द्या; सोलापुरात भाजपा शहराध्यक्षांना भाजयुमोच्या कार्यकर्त्यांचे निवेदन

सोलापूर - भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना महापालिकेत योग्य प्रतिनिधित्व द्यावे, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष विजय कुलथे यांच्यासह कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांच्याकडे केली.

या निवेदनात म्हटले आहे की, भारतीय जनता पक्षाने नेहमीच युवा मोर्चाच्या माध्यमातून नव्या नेतृत्वाला संधी देण्याची परंपरा जपली आहे. आजचा काळ नव्या पिढीच्या नेतृत्वाचा असून युवकांना जबाबदारी देणे ही काळाची गरज आहे. भारतीय जनता युवा मोर्चा हा पक्षाचा सक्रिय व समर्पित घटक असून पक्षाच्या प्रत्येक निवडणुकीत आंदोलनात व संघटनात्मक उपक्रमात युवा मोर्चाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सातत्याने उल्लेखनीय योगदान दिले आहे. मात्र महापालिका निवडणुकीत युवा मोर्चाच्या एकाही कार्यकर्त्याला उमेदवारी देण्यात आली नाही. तसेच महापालिकेतील स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीमध्येही युवा मोर्चाला प्रतिनिधित्व मिळालेले नाही. त्यामुळे किमान नववे स्वीकृत सदस्य पद भारतीय जनता युवा मोर्चाला देण्यात यावे. तसेच महापालिकेच्या परिवहन समितीवर युवा मोर्चाच्या किमान पाच कार्यकर्त्यांना संधी द्यावी. भाजपाकडून भाजपच्या युवा कार्यकर्त्यांना संधी दिल्यास त्यांचा उत्साह वाढेल. पक्षाला सक्षम आणि दीर्घकालीन नेतृत्व मिळेल. तसेच भारतीय जनता पक्ष युवकांना संधी देणारा पक्ष असल्याचा समाजात अधिक प्रभावी संदेश जाईल. त्यामुळे भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना सोलापूर महानगरपालिकेत प्रतिनिधित्व द्यावे, अशी मागणी याप्रसंगी शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांच्याकडे करण्यात आली.

याप्रसंगी भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष विजय कुलथे, विश्वनाथ प्याटी, मयूर घुगे, यतिराज होनमाने, आकाश मुदगल, अंबादास पामु, अर्जुन मोहिते, ऋषिकेश चिट्टे, शिवानंद कावडे, राहुल डांगरे, देवेंद्र डेरबेरे, संदीप महाले, विशाल बनसोडे, लक्ष्मण सरवदे, प्रवीण गलांडे, ओंकार पत्तेवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

निधन वार्तासिद्धाराम चंद्रकांत झेंडेकर (रा. विद्यानगर, शेळगी, सोलापूर) यांचा वयाच्या 38 व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र ...
11/08/2026

निधन वार्ता

सिद्धाराम चंद्रकांत झेंडेकर (रा. विद्यानगर, शेळगी, सोलापूर) यांचा वयाच्या 38 व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मिक निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा बुधवार, दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता त्यांच्या राहत्या घरापासून रूपा भवानी हिंदू स्मशानभूमीकडे निघणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील, एक भाऊ व मुले असा परिवार आहे

जीवन प्रेरणा दिनानिमित्त आजी आजोबांची चरण पूजाविष्णुपंत कोठे यांची ८९ वी जयंती समाजोपयोगी कार्यक्रमांनी साजरी;विष्णुपंत ...
10/08/2026

जीवन प्रेरणा दिनानिमित्त आजी आजोबांची चरण पूजा

विष्णुपंत कोठे यांची ८९ वी जयंती समाजोपयोगी कार्यक्रमांनी साजरी;
विष्णुपंत कोठे मेमोरियल इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांचा कौतुकास्पद उपक्रम

सोलापूर - विष्णुपंत तथा तात्यासाहेब कोठे यांची ८९ वी जयंती सोमवारी जीवन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात आली. आमदार देवेंद्र कोठे यांचे आजोबा विष्णुपंत कोठे यांच्या जयंतीनिमित्त विष्णुपंत कोठे प्रतिष्ठान संचलित विष्णुपंत कोठे मेमोरियल इंग्लिश स्कूल येथे ज्येष्ठांचा सन्मान व संस्कारांचा अभिमान कार्यक्रमांतर्गत आजी-आजोबांचे पाद्यपूजन हा अतिशय कौतुकास्पद अन भावस्पर्शी कार्यक्रम करण्यात आला.

यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या आजी आजोबांचे चरण पूजन करून आशीर्वाद घेतले. या उपक्रमाचे पालकांनी तसेच विद्यार्थ्यांच्या आजी-आजोबांनी कौतुक केले.

जयंतीनिमित्त शाळेतर्फे विद्यार्थ्यांसाठी लाठीकाठी, दंड साखळी व कराटे यांचे प्रशिक्षण, व्याख्यान, दंत तपासणी, मेंटल हेल्थ अवेअरनेस शिबिर, आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी शिबिर आदी उपक्रमही राबविण्यात आले. याप्रसंगी आत्मतृप्ती योजनेच्या डब्यांचे पूजन करून त्यांचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी नगरसेवक सत्यनारायण गुर्रम, सिद्धेश्वर कमटम, दर्शन पटेल, माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, राधिका चिलका, मोनिका कोठे, रमेश यन्नम, मुख्याध्यापिका पुष्पा नायर, श्रीनिवास म्याडम पंतलु तसेच शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

संस्कार आणि सन्मानाची रुजवण पुढील पिढीत होण्याकरिता पाद्यपूजन

आजी आजोबा म्हणजे कुटुंबाच्या संस्कारांची शिदोरी असते. त्यांच्या अनुभवातून मिळणारे मार्गदर्शन मायेची ऊब आणि आशीर्वाद हे पुढच्या पिढीच्या जडणघडणीचे अमूल्य आधार असतात. आजी आजोबांच्या तसेच आई-वडिलांच्या प्रति मुलांमध्ये सन्मानाची भावना अधिक दृढ व्हावी याकरिता हा उपक्रम राबविण्यात आला. संस्कार आणि सन्मानाची रुजवण पुढील पिढीत होण्याकरिता पाद्यपूजन कार्यक्रम झाला.
--- देवेंद्र कोठे, आमदार, शहर मध्य

बाळे येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटपडॉ. किरण देशमुख मित्र परिवार व श्री सिद्धिविनायक प्रत...
08/08/2026

बाळे येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
डॉ. किरण देशमुख मित्र परिवार व श्री सिद्धिविनायक प्रतिष्ठानचा सामाजिक उपक्रम
सोलापूर - बाळे (सोलापूर) येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना 'डॉ. किरण देशमुख मित्र परिवार' व 'श्री सिद्धिविनायक प्रतिष्ठान, दर्शनाळ' यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम नगरसेवक डॉ. किरण वि. देशमुख यांच्या शुभहस्ते उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्र प्रमुख जीवराज खोबरे उपस्थित होते. शालेय जीवनात गरजू विद्यार्थ्यांना योग्य प्रोत्साहन आणि शैक्षणिक सहकार्य मिळाल्यास त्यांच्या प्रगतीला गती मिळते, असे प्रतिपादन मान्यवरांनी यावेळी केले.
याप्रसंगी मंडल अध्यक्ष देवीदास बनसोडे, जि. प. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सोजर मस्के, शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा मीनाताई पवार, बाळे सोसायटीचे माजी चेअरमन श्री. तोडकरी, उमेश तरवळे सर, प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुमित बिराजदार, सचिन लकडे, राहुल शाहबादे व बाहुबली जिरगे यांची प्रमुख उपस्थिती होती. या उपक्रमाला शाळेतील सर्व शिक्षकवृंद, पालक वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शालेय साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहावयास मिळाला. आयोजकांच्या या सामाजिक उपक्रमाचे परिसरातून विशेष कौतुक करण्यात आले.

सोलापूरच्या हातमाग साडीला पारंपरिक वस्त्रोद्योगात समावेश करण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वस्त्रोद्योग मंत्री ...
07/08/2026

सोलापूरच्या हातमाग साडीला पारंपरिक वस्त्रोद्योगात समावेश करण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या सूचना

आमदार देवेंद्र कोठे यांचा पाठपुरावा : हातमाग दिनी आमदार देवेंद्र कोठे यांनी विणकर बांधवांना दिली गोड बातमी

सोलापूर - सोलापूरच्या हातमाग साडीला पारंपरिक वस्त्रोद्योगात समावेश करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी प्रशासनाला दिल्या. याबाबत आमदार देवेंद्र कोठे यांनी पाठपुरावा केला होता.

सोलापूर शहर हे ऐतिहासिक काळापासून वस्त्रोद्योगासाठी देशात प्रसिद्ध शहर आहे. सोलापुरात हातमाग कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात असून येथील हातमागधारकांकडून जगप्रसिद्ध सोलापूर सिल्क साडी अत्यंत परिश्रमाने तयार केली जाते. हातमाग विणकारांना साडी निर्मिती करताना जटिल, सूक्ष्म, कलाकृतीचे, अंगावर ताण येणारे आणि उच्च कौशल्याचे काम करावे लागते.

एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३ - २८ मध्ये पारंपारिक वस्त्रोद्योग म्हणून पैठणी साडी, हिमरू, करवतकाठी, विदर्भ घोंगडी, पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रातील खण फॅब्रिक या वस्त्रोद्योगांचा समावेश करण्यात आला आहे. परंतु सोलापुरी सिल्क साडी या उत्कृष्ट पारंपारिक वारशाला शासनाच्या अधिकृत पारंपारिक वस्त्रोद्योग यादीत हक्काचे स्थान मिळालेले नाही. त्यामुळे एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरणात सोलापूर सिल्क साडीचा पारंपारिक वस्त्रोद्योग म्हणून समावेश करून हातमाग कामगारांना सवलती व आर्थिक सहाय्य मिळावे, अशी मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्याकडे ३० जुलै रोजी पावसाळी अधिवेशनादरम्यान केली होती. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक निर्णय घेत सोलापूरच्या हातमाग साडीला पारंपरिक वस्त्रोद्योगात समावेश करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.

हातमाग दिनी आमदार देवेंद्र कोठे यांची विणकर बांधवांना गोड बातमी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या या निर्णयाची गोड बातमी शुक्रवारी हातमाग दिनी आमदार देवेंद्र कोठे यांनी सोलापुरातील विणकर बांधवांना दिली. त्यामुळे विणकर बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

विकसित महाराष्ट्रात सोलापूरचे मिळणार अधिक योगदान

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला दिलेल्या विकसित भारत २०४७ या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकसित महाराष्ट्र २०४७ हे लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवून वाटचाल सुरू ठेवली आहे. याचाच एक भाग म्हणून सोलापूरच्या हातमाग साडीला पारंपरिक वस्त्रोद्योगात समावेश करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे विकसित महाराष्ट्रात सोलापूरचे योगदान अधिक ठळकपणे देणे शक्य होणार आहे.
-- देवेंद्र कोठे, आमदार, शहर मध्य

Address

Solapur
413002

Alerts

Be the first to know and let us send you an email when Solapur City News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share