08/06/2026
🚨 सख्या चुलत भावानेच केला भावाचा घात! मत्सराने घेतला जीव...
गावाकडे राहिल्याची आणि मजुरी करावी लागल्याची चीड, तर चुलत भाऊ शहरात जाऊन यशस्वी झाल्याचा राग... या भयानक ईर्ष्येतून फुलंब्री तालुक्यातील पाथ्री येथे एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे.
रोहित बनसोड याने स्वतःच्याच चुलत भावाला, राजू बनसोड याला जंगलात नेऊन निर्घृणपणे संपवले. धक्कादायक बाब म्हणजे, खून केल्यानंतर मृतदेह पाचोळ्याखाली लपवून त्यानेच आपला भाऊ हरवल्याची तक्रार पोलिसांत दिली होती! पण पोलिसांच्या चाणाक्ष आणि तांत्रिक तपासामुळे हे बिंग जास्त काळ लपून राहिले नाही.
माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या हत्याकांडाने संपूर्ण परिसर हादरला आहे. एकाची प्रगती दुसऱ्याच्या डोळ्यात इतकी खुपली की त्याने थेट रक्ताच्या नात्याचाच जीव घेतला.
यश आणि प्रगतीचा मत्सर माणसाला किती खालच्या थराला नेऊ शकतो, हेच या भयानक घटनेतून दिसते. या वाढत्या गुन्हेगारी आणि ईर्ष्येबद्दल तुमचे का�