नाम तत्त्व

  • Home
  • नाम तत्त्व

नाम तत्त्व Naamtatv is a sign of devotion and feelings of existence of god in ownself as well as in every organisms. It is consist in breathing n that is our pran.

*परमार्थात गुप्ततेची जरूरी असते.*वासनेच्या तावडीतून सुटणे फार कठीण आहे. कारण वासनेच्या पोटीच प्राणी जन्माला येत असतो. त्...
09/07/2024

*परमार्थात गुप्ततेची जरूरी असते.*

वासनेच्या तावडीतून सुटणे फार कठीण आहे. कारण वासनेच्या पोटीच प्राणी जन्माला येत असतो. त्या वासनेला जिंकणे, म्हणजे आपण मरून जाण्याइतके कठीण आहे. वासनेच्या पोटी जन्म आणि जन्मानंतर अहंकार, ह्या जोडप्यापोटी कामक्रोधादि विकार जन्माला येतात. या जोडप्याचे वैशिष्ट्य असे की, त्यामध्ये बायको नवऱ्यापेक्षा वडील असते; कारण आधी वासना आणि त्यातून पुढे अहंकार. भगवंताजवळ ‘ वास ’ ठेवला तरच वासना नष्ट होते. प्रपंच मुळात चांगलाही नाही आणि वाईटही नाही. प्रपंचातली वासना बाहेर काढणे, याचेच नाव परमार्थ. प्रपंचात प्रसिद्धीची जरूरी वाटते. त्याच्या उलट परमार्थात गुप्ततेची जरूरी लागते. समजा, एखाद्या बाईने दागिने हवेत म्हणून नवऱ्याजवळ हट्ट धरला, आणि नवऱ्याने तिला हवे असलेले सर्व दागिने देण्याचे कबूल केले; पण अट अशी घातली की, जेव्हा दागिने अंगावर घालायचे असतील त्या वेळी ते घालून खोलीची दारेखिडक्या बंद करून आत बसले पाहिजे. अशी अट पाळून कोणती बाई दागिने घालायला कबूल होईल ? कारण दागिने लोकांनी पाहण्यातच तिला समाधान आहे. ही झाली प्रपंचातली रीत. परमार्थात याच्या उलट गुप्ततेची गरज आहे. आपली साधना कोणाच्याही नजरेत न येईल अशी खबरदारी घ्यावी; कारण परमार्थाला दृष्ट फार लवकर लागते. ती केवळ इतर लोकांचीच लागते असे नसून, आपली स्वत:चीसुद्धा लागण्याचा फार संभव असतो. म्हणून परमार्थात गुप्तता असावी; आणि आपल्या हातून जे साधन होते आहे, ते सद्‌गुरू किंवा परमात्मा यांच्या कृपेनेच माझ्याकडून करवून घेतले जात आहे, ही जाणीव ठेवावी.

आजारी माणसाने नुसते पडून रहावे, पण औषध मात्र नियमाने घ्यावे. बाकीच्या गोष्टी इतर लोक करतात; औषध मात्र आपण स्वत:च घेतले पाहिजे. एखादा मोठा राजा जरी झाला तरी कडू औषध दासीला देऊन काही त्याचा रोग बरा होत नाही; त्याचप्रमाणे, परमार्थात भगवंताचे स्मरण ठेवण्याचे काम आपल्या स्वत:लाच करायला पाहिजे. उगीच कुणाच्या नादी लागू नये. परमार्थ म्हणजे काय करायला पाहिजे हे नीट समजावून घ्या आणि मग त्या मार्गाने जा. कोणाला फसू नका, कारण स्वत: फसणे हे जगाला फसविण्याइतकेच पाप आहे. ज्याचा प्रपंचात पाठीराखा परमात्मा आहे, त्याचा तो प्रपंचच परमार्थ होतो. उलट ज्याच्या पाठीराखा अभिमान आहे, त्याचा परमार्थदेखील प्रपंचच म्हटला पाहिजे.
🙏आपला नाम दास जगदीश🙏

💐🙏🙏🏻💐जयहरी माऊली.बैसूं खेळूं जेवूं! तेथें नाम तुझें गाऊं!! रामकृष्णनाममाळा!घालूं ओवुनिया गळा!! विश्वास हा धरूं! नाम बळकट...
03/11/2023

💐🙏🙏🏻💐
जयहरी माऊली.

बैसूं खेळूं जेवूं! तेथें नाम तुझें गाऊं!! रामकृष्णनाममाळा!घालूं ओवुनिया गळा!! विश्वास हा धरूं! नाम बळकट करूं!! तुका म्हणे आतां! आम्हां जीवन शरणागता!!
जिथे बसू अगर काही खेळ खेळू अथवा जेवण जेवूं त्यावेळेस तुझे नामच आम्ही गात राहू. रामकृष्णनामाची माळा ओवून आम्ही आपल्या गळ्यात घालूं, म्हणजे एका मागून एक सतत रामकृष्ण नामाचा जप करीत राहू. पूर्णपणे हरीच्या नामाविषयी विश्वास ठेवूं आणि हरीचे नाम मुखामध्ये दृढ धरु. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही हरीला शरण आलेलो आहोत, म्हणून आतां त्याचे नामचिंतन करणे हेच आम्हां शरणागतांचे जीवन आहे.

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹*तुजविण मज कोण वो सोयरे।आणीक दुसरे पांडुरंगे॥लागलीसे आस पाहातसे वास।रात्री वो दिवस लेखी बोटी॥काम गोड मज न लगे हो ...
19/08/2023

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*तुजविण मज कोण वो सोयरे।आणीक दुसरे पांडुरंगे॥लागलीसे आस पाहातसे वास।रात्री वो दिवस लेखी बोटी॥काम गोड मज न लगे हो धंदा।* *तुका म्हणे सदा हेचि ध्यान॥*
हे पांडुरंगा तुझ्या वाचून मला या जगामध्ये दुसरे कोण सोयरे आहे. देवा तुझी मी अहोरात्र तुझी वाट पाहत आहे मला तुझ्या भक्तीची आस लागली आहे रात्र गेली दिवस गेला कि मी बोटाने मोजत आहे. तुकाराम महाराज म्हणतात माझे कामात गोडी लागत नाही धंद्यात लक्ष लागत नाही सदा सर्वकाळ तुझेच ध्यान लागलेअआहे.हे देवाधीदेवा परब्रम्हा नारायणा तूच सर्व कर्ता आहेस तुझ्या वाचून सर्व व्यर्थ आहे.नीत्य तुझ्या चिंतनात
राहू दे.परंतु प्रापंचीक सामा न्य कशी स्थिती आहे बघा एक मनुष्य प्रवासाला निघाला. त्याने बरोबर सर्व सामान घेतले. तो पानतंबाखू खाणारा होता, त्याने तेही सर्व साहित्य बरोबर घेतले होते. गाडी सुरू झाल्यावर थोड्या वेळाने त्याने पानाचे साहित्य काढले, तेव्हा त्याच्या ध्यानात आले की, आपण चुन्याची डबी विसरलो आहोत. त्याने पुन्हा पुन्हा सामान हुडकले. त्याला मोठी चुटपुट लागली. कुठे काही पडल्याचा आवाज झाला, की त्याला वाटे चुन्याची डबीच पडली. कुणी त्याच्याशी बोलले की त्याला वाटे, आपल्याला हा चुना हवा का म्हणून विचारील. ज्या गोष्टीवर आपले प्रेम असते त्या गोष्टीची आपल्याला नड लागते; ती नसेल तर हळहळ वाटते. तशी आपल्याला देवाची कधी नड लागली आहे का ? आपण आपल्या घरातल्या सर्व वस्तू आपल्या म्हणतो. बायको, मुले आणि घरातल्या इतर वस्तूंची आपल्याला इत्थंभूत माहिती असते; परंतु देवघरातला देव, ज्याची आपण रोज पूजा करतो, तो कधी आपलासा वाटला आहे का ? आपली जर ही स्थिती आहे तर आपल्याला देवाचे प्रेम कसे लागेल ? देवाचे प्रेम लागायला हवे असेल तर जगताची आशा सोडली पाहिजे. व्यवहार न सोडावा, पण विषयाकडे गुंतणारी आपली वृत्ती भगवंताच्या आड येते, म्हणून तिला भगवंताकडे गुंतवावे. भगवंताची खरी आवड उत्पन्न झाली पाहिजे. देवावाचून आपले नडते असे वाटले पाहिजे.
*माझ्या मना छंद लागो!*
*गोविंद नित्य गोविंद !!*
*तेने देह ब्रम्हरूप गोविंद!*
*नरसेल नामरूप गोविंद !!*तुटेल सकळ उपाधी!नर सेल आधीव्याधी गोविंद !!*गोविंद हा जनी वनीं!*
*ह्यांनी एका जनार्दनी !!*
ज्याचा आपण सहवास करतो त्याचेच आपल्याला प्रेम लागते. ज्याचे प्रेम लागते त्याचीच आपल्याला नड भासते. आपण पाहतोच, सहवासात किती प्र

लपलासी तरी नाम कैसें नेसी । आम्ही अहर्निशीं नाम गाऊं ॥१॥आम्हांपासोनियां जातां नये तुज । तें हें वर्म बीज नाम घोकूं ॥२॥आम...
13/08/2023

लपलासी तरी नाम कैसें नेसी । आम्ही अहर्निशीं नाम गाऊं ॥१॥

आम्हांपासोनियां जातां नये तुज । तें हें वर्म बीज नाम घोकूं ॥२॥

आम्हांसी तों तुझें नामचि पाहिजे । मग भेटी सहजें देणें लागे ॥३॥

भोळीं भक्तें आम्ही चुकलों होतों वर्म । सांपडलें नाम नामयासी ॥४॥

मनुष्याचा स्वभावच असा असतो की, आपल्या कल्पनेत जेवढे येते तेवढेच आपण सत्य मानतो. पण आपली कल्पनाच किती संकुचित असते, याचा ...
11/08/2023

मनुष्याचा स्वभावच असा असतो की, आपल्या कल्पनेत जेवढे येते तेवढेच आपण सत्य मानतो. पण आपली कल्पनाच किती संकुचित असते, याचा कोणी विचार करीत नाही. जो कल्पनेच्या पलीकडे आहे, जिथे कल्पना थांबते, ज्याला कल्पना बांधू शकत नाही, त्याला कल्पनेने कसे ओळखता येईल ? जो ज्ञानाच्या पलीकडे राहिला आहे त्याला माझ्या तोकड्या ज्ञानाने कसे आजमावता येणार ? माझ्या बुद्धीच्या पलीकडे तो आहे, तेव्हां त्याच्या इच्छेनेच त्याचे खरे ज्ञान होणार आहे. अविद्या ती हीच की आपल्या कल्पनेने होणारे ज्ञान हेच खरे मानणे. याकरिता श्रद्धा आणि कल्पना यांतला फरक ओळखावा. खरी श्रद्धा तीच की जी कल्पनेच्या पलीकडे राहते. प्रल्हादाइतके आपण नामाला सत्यत्व देत नाही. कल्पनेची मजल प्रल्हादाने नाही चालविली. कल्पनेच्याही पलीकडे राहिला असे मानायला काय हरकत आहे ?

सूर्यप्रकाश जसा सर्व ठिकाणी भरलेला असतो, त्याप्रमाणे देवळात, घरात, तीर्थक्षेत्रांत, सर्व ठिकाणी परमात्मा भरलेला आहे. परमात्मा फक्त विद्वानांचा किंवा श्रीमंतांचा नसून तो सर्वांचा आहे. भगवंत सर्वांचा आहे, म्हणूनच तो सर्वांना सुसाध्य असला पाहिजे. एखादा मोठा गणिती हिशेब लवकर करू शकतो; परंतु खेडेगावातले अडाणी लोक गणित न शिकताही हिशेब बरोबर करतात, आणि त्यांचा व्यवहार बरोबर चालतो. तसे विद्वानाला कदाचित् भगवंत लवकर प्राप्त होईल, पण अडाणी माणसालादेखील तो प्राप्त होऊ शकेलच. भगवंताची दृष्टीच अशी आहे की, त्याला आपले अंतःकरण स्पष्ट दिसते. ते जसे असेल त्याप्रमाणे भगवंत आपल्याला जवळ किंवा दूर करतो. मनुष्य जन्माला आला की सगळी नाती त्याला आपोआप येतात, त्याचप्रमाणे, परमात्मा आनंदरूप आहे असे म्हटले की बाकीचे सर्व गुण त्यामध्ये आले असे समजावे. जसा मारुतीमध्ये देवअंश होता तसाच तो आपल्यामध्येही आहे. त्याने तो फुलविला, पण आपण झाकून तो विझवून टाकला, याला काय करावे ? मामलेदाराला बरोबर असलेल्या शिपायाची भिती वाटत नाही, चोराला मात्र त्याच्याबरोबर असलेल्या शिपायाची भिती वाटते. त्याचप्रमाणे भगवंत आपल्या पाठीमागे आहे ही जाणीव ज्याला असते, त्याला उपाधीची भिती वाटत नाही; कारण ती त्याच्याच इच्छेने आली आहे अशी त्याची खात्री असते. आपण आपले मागले घडलेले सर्व भगवंताला अर्पण करावे, मग पुढची जबाबदारी त्याच्यावर पडते.

*जे निश्चित नाही त्याचे नाव कल्पना होय. देव आहे असे निःशंकपणाने वाटणे, हे ज्ञान होय*.

नामें सदा शुद्धि प्राणिया होतसे । नामापाशीं असे भुक्तिमुक्ति ॥१॥नामा ऐसें सोपें नाहीं त्रिभुवनीं । नाम संजीवनी साधकांसी ...
11/08/2023

नामें सदा शुद्धि प्राणिया होतसे । नामापाशीं असे भुक्तिमुक्ति ॥१॥

नामा ऐसें सोपें नाहीं त्रिभुवनीं । नाम संजीवनी साधकांसी ॥२॥

नामें भक्ति जोडे नामें कीर्ति वाढे । नामें सदा चढे मोक्ष हातां ॥३॥

यज्ञ दान तप नामें आली हातां । नामें सर्व सत्ता प्राप्त होय ॥४॥

नामा म्हणे सदा नाम ज्याचे मुखीं । नाहीं याच्या तुकीं दुजा कोणी ॥५॥

💐🙏🙏🏻💐जयहरी माऊली. सापडलें जुनें! आमुच्या वडिलांचे ठेवणें! केली नारायणें! कृपा पुण्यें पूर्वीचिया!! सुखें आनंदरूप आतां! आ...
11/08/2023

💐🙏🙏🏻💐
जयहरी माऊली.
सापडलें जुनें! आमुच्या वडिलांचे ठेवणें! केली नारायणें! कृपा पुण्यें पूर्वीचिया!! सुखें आनंदरूप आतां! आम्ही आहो याकरितां! निवारिली चिंता! देणें घेणें चुकलें!! जाले भांडवल घरींचें! अमूप नाम विठ्ठलाचें! सुकृत भावाचें! हें तयानें दाविलें!! तुकयाबंधू म्हणे फिटला! पांग नाहीं बोलायाला! चाड दुसरी विठ्ठला! वांचूनियां आणिक!

🙏🏻 आमच्या वडिलांचे जुने परमार्थाचे ठेवणे आम्हांला सापडले. आमच्या पूर्व पुण्याईने ही आमच्यावर नारायणी कृपा केली. ह्यास्तव आम्ही आता आनंदरूप आहोत. आमचे सर्व चिंता नाहिसी होऊन देणे घेण्याचा व्यवहार चुकला. असंख्य विठ्ठल नामाचे भांडवल आमच्या घरी झाले आहे. हे सर्व आमच्या भावाच्या सुकृताने दाखविले आहे. तुकाराम महाराजांचे बंधू म्हणतात, सर्व दारिद्र्य आता दूर झाले आहे, एका विठ्ठलावांचून दुसरे कांही बोलण्याची गरज नाही.
जयहरी माऊली
💐🙏🙏💐

Address


Telephone

+17875754607

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when नाम तत्त्व posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to नाम तत्त्व:

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Contact The Business
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share