Thane News 9 - ठाणे न्युज 9

Thane News 9 - ठाणे न्युज 9 ठाणेकरांचे हक्काचे व्यासपीठ

11/08/2025
आपल्या मराठा साम्राज्यातील एक मौलिक आणि ऐतिहासिक ठेव असलेली, नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक राजे रघुजी भोसले यांची ...
11/08/2025

आपल्या मराठा साम्राज्यातील एक मौलिक आणि ऐतिहासिक ठेव असलेली, नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक राजे रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार ही लिलावात निघाली होती. ती राज्य सरकारने 29 एप्रिल रोजी खरेदी केल्यानंतर, आज त्याचा प्रत्यक्ष ताबा राज्य सरकारकडे आला आहे.
माझे सहकारी आणि राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांनी लंडनमध्ये हा ताबा स्वीकारला. काही तांत्रिक कारणांमुळे ती मध्यस्थामार्फत खरेदी करावी लागली होती. पण, आता ती त्या मध्यस्थामार्फत सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करीत त्यांनी ताब्यात घेतली आहे.
आता ही तलवार लवकरच महाराष्ट्रात येईल आणि त्याचा कायमस्वरुपी ताबा हा राज्य सरकारकडे असेल. छत्रपती शाहू महाराजांनी ‘सेनासाहिबसुभा’ ही उपाधी राजे रघुजी भोसले यांना दिली होती. राजे रघुजी भोसले यांनी अनेक युद्धमोहीमांचे नेतृत्त्व करीत मराठा साम्राज्याचा बंगाल, ओडिशापर्यंत विस्तार केला होता. दक्षिण भारतात सुद्धा त्यांनी आपला लष्करी आणि राजकीय दबदबा निर्माण केला होता.
ही तलवार मराठा शैलीच्या फिरंग पद्धतीच्या तलवारीचा उत्कृष्ट नमुना आहे. एकधारी पाते, सोन्याचे नक्षीकाम हे या तलवारीचे वैशिष्ट्य आहे. युरोपिय बनावटीचे पाते हे त्या काळात प्रसिद्ध होते. या पात्याच्या पाठीवर तळाशी ‘श्रीमंत रघोजी भोसले सेनासाहिबसुभा’ असे सोन्याच्या पाण्याने लिहिले आहे. 1817 मध्ये नागपुरात ईस्ट इंडिया कंपनीने भोसल्यांच्या खजिन्याची लूट केली होती. त्यात ही तलवार नेली असावी, असा जाणकरांचा अंदाज आहे. आता ही तलवार अधिकृतपणे राज्य सरकारच्या ताब्यात आल्याचा आम्हाला विशेष आनंद आहे. यासाठी परिश्रम करणाऱ्या मंत्री आशिष शेलार आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन !

Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार

10/08/2025

युनियन बँक ऑफ इंडिया, क्षेत्रीय कार्यालय ठाणे-मुंबई तर्फे
वित्तीय समावेशन मेळावा व मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न.

10/08/2025

५८ वा युवा महोत्सव : प्रायोगिक कला विभागीय फेरी उत्साहात पार पडली.

*ठाणे महापालिका वर्षा मॅरेथॉनमध्ये पुरुष गटात धर्मेंद्र आणि महिला गटात रविना गायकवाड ठरले विजेते*• *३१वी ठाणे महापालिका ...
10/08/2025

*ठाणे महापालिका वर्षा मॅरेथॉनमध्ये पुरुष गटात धर्मेंद्र आणि महिला गटात रविना गायकवाड ठरले विजेते*

• *३१वी ठाणे महापालिका वर्षा मॅरेथॉन*
• *उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि लता शिंदे यांनी दाखवला मॅरेथॉनला झेंडा*
• *उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही घेतला मॅरेथॉनमधील धावण्याचा आनंद*
• *परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या हस्ते झाले पारितोषिक वितरण*
• *ठाणे महापालिका आणि ठाणे जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशन यांनी केले आयोजन*

*ठाणे (१०) :* 'मॅरेथॉन ठाण्याची.. उर्जा तरुणाईची' या घोषवाक्यासह आयोजित करण्यात आलेल्या एकतिसाव्या ठाणे महानगरपालिका वर्षा मॅरेथॉन या स्पर्धेत पुरुष गटात पुण्याच्या एएसआयच्या धर्मेंद्र याने अव्वल स्थान पटकावले. त्याने ०१ तास ०७ मिनिटे आणि ४१ सेकंद वेळेसह २१ किमीचे अंतर पार केले. तर, महिला गटात नाशिकच्या रविना गायकवाड यांनी ०१ तास २५ मिनिटे आणि ४६ सेकंद वेळ घेत शर्यत पूर्ण केली. या स्पर्धेत सुमारे २५ हजार स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी मॅरेथॉनला झेंडा दाखवला. तर, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या हस्ते विजेत्या धावपटूंना गौरविण्यात आले.
कोरोनापासून गेली पाच वर्षे खंडित झालेली ही स्पर्धा यंदा आबालवृद्धांच्या सहभागाने अत्यंत उत्साहात झाली. यावेळी सहभागी धावपटूंचा उत्साह पाहून मॅरेथॉनला झेंडा दाखवल्यानंतर स्वत: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मॅरेथॉनमध्ये धावण्याचा आनंद घेतला. त्यांनी धावपटूंसमवेत काही अंतर धावून त्यांचा उत्साह वाढवला.

ठाणे महानगरपालिका आणि ठाणे जिल्हा हौशी अॅथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या ३१व्या वर्षा मॅरेथॉनचे रविवार सकाळी आयोजन करण्यात आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुरुष गटाच्या तर लता शिंदे यांनी महिला गटाच्या स्पर्धेला झेंडा दाखवला. त्यानंतर, टप्प्याटप्याने एकूण १२ गटातील स्पर्धांचा शुभारंभ महापालिका मुख्यालयासमोरील चौकातून करण्यात आला. याप्रसंगी, खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी उपमहापौर पल्लवी कदम, महापालिका आयुक्त सौरभ राव, माजी ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे, एकनाथ भोईर, परिवहन सेवेचे माजी सभापती विलास जोशी, माजी नगरसेवक पवन कदम, विकास रेपाळे, नम्रता भोसले, राजेश मोरे, सिद्धार्थ ओवळेकर, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, परिवहन व्यवस्थापन भालचंद्र बेहरे, उपायुक्त जी. जी. गोदेपुरे, सचिन सांगळे, दिनेश तायडे, शंकर पाटोळे, मिताली संचेती, क्रीडा उपायुक्त मीनल पालांडे, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद पाटील आदी उपस्थित होते.

ठाणे वर्षा मॅरेथॉन थोड्या खंडानंतर आता पुन्हा होत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. या क्षणी या मॅरेथॉनसाठी पहिल्यापासून पुढाकार घेणारे माजी खासदार सतीश प्रधान यांनी प्रकर्षाने आठवण होत असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मॅरेथॉनला प्रारंभ करून देताना सांगितले. ठाणे बदलतंय आणि त्या बदलत्या ठाण्याबरोबर ठाण्यातील तरुणाईलाही उर्जा देण्याचे काम ही मॅरेथॉन करत आहे. म्हणूनच 'मॅरेथॉन ठाण्याची…उर्जा तरुणाईची’असे घोषवाक्य घेतले आहे. तू धाव, तू धाव...घे क्षितिजाचा ठाव हे गाणेही अत्यंत प्रेरणादायी असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

ठाण्यात सप्टेंबर महिन्यात मेट्रोची ट्रायल रन होणार आहे. अंतर्गत मेट्रोचे कामही सुरू होत होत आहे. त्यामुळे ठाण्याचे रुप आणखी बदलेल. आपले ठाणे हरित होत आहे. यंदा दोन लाख झाडे लावण्याचा महापालिकेचा निश्चय केला असल्याचेही त्यांनी सांगितले.

*खेळाडूंचा सत्कार*

याप्रसंगी, इंग्लड ते फ्रान्स हे सागरी अंतर पोहून जाणाऱ्या भारतीय संघातील जलतरणपटू आयुषी कैलास आखाडे, आयुष प्रवीण तावडे, मानव राजेश मोरे या जलतरणपटूंचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे, आतंरराष्ट्रीय अॅथलिट शौर्या अविनाश अंबुरे आणि फुल्ल आर्यनमॅन स्पर्धा पूर्ण करणाऱ्या स्मिता जावळे यांचाही उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

*घरोघरी तिरंगा प्रतिज्ञा*

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपस्थित सगळयांनी याप्रसंगी, घरोघरी तिरंगा अभियानाच्या निमित्ताने मॅरेथॉनच्या व्यासपीठावर तिरंगा प्रतिज्ञा घेतली.

*कॉर्पोरेट रन*

महापालिका अधिकारी कर्मचारी व लोकप्रतिनिधी यांच्यासाठी एक कि.मी ची 'कॉर्पोरेट रन' ठेवण्यात आली होती. या स्पर्धेत महापालिका अधिकारी, कर्मचारी, पत्रकार यांनी सहभाग घेतला. त्याचप्रमाणे, ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांच्या स्पर्धेत महिला आणि पुरुष गटात ज्येष्ठ नागरिक उत्साहाने सहभागी झाले होते. त्याचबरोबर, दिव्यांगांच्या त्रिदल समुहानेही या मॅरेथॉनमध्ये विशेष सहभाग घेतला.

*एकूण १० लाखांची बक्षिसे*

ठाणे वर्षा मॅरेथॉन स्पर्धा विविध १२ गटात झाली. विजेत्यांना एकूण १० लाख ३८ हजार ९०० रुपयांची रोख पारितोषिके देण्यात आली. मॅरेथॉन स्पर्धेतील विजेत्यांना देण्यात येणाऱ्या पारितोषिकांमध्ये वाढ करण्यात आली. २१ कि.मी स्पर्धेतील विजेत्यास एक लाखांचे रोख पारितोषिक, सन्माचिन्ह, मेडल व प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले.
...

*स्पर्धेचा निकाल*

*पुरुष खुला गट - अंतर २१ किमी*

१. धर्मेंद्र, एसएसआय, पुणे
२. अंकुश हक्के, सांगली
३. कमलाकर देशमुख, नाशिक
४. बेलिअप्पा एपी, एसएसआय, पुणे
५. सचिन यादव, मुंबई उपनगर
६. राज तिवारी, मुंबई
७. इश्वर झिरवाल, नाशिक
८. धुलदेव घागरे, सांगली
९. अमोल अमुने, सोलापूर
१०. सिद्धेश बर्जे, रत्नागिरी

*महिला खुला गट - अंतर २१ किमी*

१. रविना गायकवाड, नाशिक
२. आरती पवार, नाशिक
३. साक्षी जड्याल, रत्नागिरी
४. ऐश्वर्या खलाडकर, पुणे
५. रुक्मिणी भोरे, पालघर
६. अभिलाषा मोडेकर, पुणे
७. प्रियांका पैकाराव, ठाणे
८. प्रतिक्षा चोरमले, मुंबई
९. आंचल मारवा, मुंबई
१०. उर्मिला बने, मुंबई

*पुरुष, १८ वर्षावरील, १० किमी*

१. चैतन्य रुपनेर, सांगली
२. अतुल बरडे, नाशिक
३. वैभव शिंदे, नाशिक
४. आशुतोष यादव, मुंबई
५. प्रतिक डांगरे, पालघर
६. मन्नू सिंग, ठाणे
७. हितेश शिंदे, मुंबई
८. हर्षा चौहान, मुंबई
९. दत्ता आढाव, परभणी
१०. सूरज झोरे, सातारा

*महिला, १६ वर्षावरील, १० किमी*

१. साक्षी भंडारी, अहिल्यानगर
२. मानसी यादव, पुणे
३. रिनकी पवार, नाशिक
४. शेवंता पवार, धुळे
५. आरती भगत, नागपूर
६. मोनिका सिंग, मुंबई
७. प्रियांका कुपते
८. आदिती पाटील, ठाणे
९. प्रियांका देवरे, नाशिक
१०. जयश्री कुंजरा, पालघर

*मुले, १८ वर्षाखालील, १० किमी*

१. रोहित संगा
२. विवेक शाह
३. ओंकार सावंत
४. आदित्य यादव
५. कृष्णा जाधव
६. आशिष गौतम
७. अनुप प्रजापती
८. विघ्नेश पाटील
९. दुर्वेश पाटील
१०. निशू शर्मा

*मुले, १५ वर्षाखालील, ०५ किमी*

१. आशिष राजबर
२. रुद्र घाडगे
३. कयान चव्हाण
४. ओंकार भट
५. सर्वेश लावंड
६. आयान पिंजारी
७. आर्यन वेखंडे
८. हर्षवर्धन सुर्वे
९. रोहीत राठोड
१०. प्रतिक खानसोळे

*मुली, १५ वर्षाखालील, ०५ किमी*

१. अल्येस लोपेझ
२. अल्विना मॅट्स
३. श्रेया ओझा
४. जस्लीन शैजू
५. भक्ती कदम
६. बुर्शा शेख
७. मानसी कांबळे
८. नेहा हलगरे
९. वंशिका जंगम
१०. प्रिती शहा

*मुले, १२ वर्षाखालील, ०३ किमी*

१. आराध्य पाटील
२. रिधम साईल
३. पवन वर्मा
४. तेजप्रताप कुमार
५. जेकब मेयन
६. दक्ष दळवी
७. सार्थक यादव
८. अयन पांडे
९. मारुती वर्मा
१०. अर्णव अडसुळ

*मुली, १२ वर्षाखालील, ०३ किमी*

१. ओवी पाटील
२. जान्हवी गुंजाळ
३. अभिगेल गॅरजल
४. आहाना निरंकारी
५. रिया गोसावी
६. तन्मयी भोईर
७. स्तुती फातर्फेकर
८. अद्विका घोळे
९. अनन्या प्रसाद
१०. अनघा भोईर

*पुरुष - ६० वर्षांवरील, ०१ किमी*

१. नारायण कंदमवार
२. सुधाकर शिंदे
३. एकनाथ पाटील
४. अशोक भोगले
५. पुनाजी सातव

*महिला - ६० वर्षांवरील, ०१ किमी*

१. आशा पाटील
२. रेखा ताम्हाणेकर
३. प्राची वाघ
४. शुभांगी भोगले
५. साधना दलाल

*कॉर्पोरेट रन, अंतर ०१ किमी*

१. दिलीप शिंदे
२. प्रकाश साईल
३. स्मिता काजवे
४. हर्षल पाटील
५. श्रीकांत आंबाडे...

07/08/2025

ठाणे महापालिका शिक्षण विभागाच्या कार्यालया बाहेर काँग्रेस चे आंदोलन.

07/08/2025

‘वृक्षबंधन’ उपक्रमाने ठाण्यात झाडांना राखी बांधून दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश.

07/08/2025

रिपाई- आठवले गटाच्या ठाणे शहर महिला आघाडी अध्यक्ष पदाची नियुक्ती तसेच मोठ्या संख्येने महिलांचा पक्षप्रवेश.

06/08/2025

डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्त मुंब्र्यात गोरगरीब विद्यार्थी, दिव्यांगांना भरघोस मदत.

*राम गणेश गडकरी रंगायतनच्या नुतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात**नुतनीकरणाविषयी कलाकार आणि निर्माते यांनी व्यक्त केले समाधान*...
06/08/2025

*राम गणेश गडकरी रंगायतनच्या नुतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात*
*नुतनीकरणाविषयी कलाकार आणि निर्माते यांनी व्यक्त केले समाधान*
*रंगायतन लवकरच होणार रसिकांसाठी खुले*

ठाणे महापालिकेच्या राम गणेश गडकरी रंगायतन या नाट्यगृहाच्या वास्तूचे नूतनीकरण आता अंतिम टप्प्यात आहे. लवकरच रसिकांसाठी रंगायतन खुले होणार आहे. त्यापूर्वी, पूर्ण होत आलेल्या कामांची पाहणी बुधवारी ज्येष्ठ कलाकार, निर्माते आणि पदाधिकारी यांनी केली. नुतनीकरणाच्या झालेल्या कामाविषयी त्यांनी समाधान व्यक्त केले असून लवकरात लवकर या रंगमंचावर प्रयोग करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्यासह, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, ज्येष्ठ निर्माते आणि दिग्दर्शक अशोक हांडे, निर्माते दिलीप जाधव, निर्माते प्रसाद कांबळी यांच्यासह ठाण्यातील नाट्यकर्मी अभिनेते आणि दिग्दर्शक मंगेश देसाई, दिग्दर्शक विजू माने यांनी रंगायतनची पाहणी केली. त्यावेळी, उपायुक्त उमेश बिरारी, उपनगर अभियंता सुधीर गायकवाड, शुभांगी केसवानी, कार्यकारी अभियंता भगवान शिंदे आदी उपस्थित होते.

गडकरी रंगायतनमध्ये रंगमंच, आसन व्यवस्था, ध्वनी व्यवस्था, रंगपट, स्टेजच्या मागची बाजू, सेट आणण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहे यांच्या कामांची पाहणी यावेळी करण्यात आली. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग यांच्यासाठी लिफ्टची व्यवस्था करण्याचा निर्णय स्तुत्य आहेच. त्यासोबत, रंगायतनच्या तळमजल्यावर नाटकासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी आसनव्यवस्थाही करावी, अशी सूचना आजच्या पाहणीत करण्यात आली. तसेच, पार्किंग व्यवस्था, तालीम हॉल, तिकिट खिडकी, नाटकांचे फलक लावण्यासाठी असलेली जागा यांचीही पाहणी केली.

गडकरी रंगायतनच्या नुतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. जुन्या वास्तूला असलेल्या मर्यादा सांभाळून शक्य तेवढ्या जास्तीच्या सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आज झालेल्या पाहणीच्या वेळी कलाकार, निर्माते यांनी केलेल्या सूचनांचीही महापालिकेने नोंद घेतली आहे. त्यावर तत्काळ कार्यवाही करून लवकरात लवकर रंगायतन नाट्यरसिकांसाठी खुले करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी स्पष्ट केले.

06/08/2025

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी गृहनिर्माण मंत्री तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्त मुंब्रा माजी विरोधी पक्षनेते शानू पठाण व राष्ट्रीय कार्याध्यक्ष मर्जीया शानू पठाण यांच्या वतीने अमृत नगर येथे भव्य फ्री डॉक्युमेंट मेगा शिबिराच्या आयोजन.

06/08/2025

विक्रांत चव्हाण यांची महापालिका शाळेतील खाजगी अनुदानित व विनाअनुदानित शाळेसंदर्भात संदर्भात पत्रकार परिषद.

Address

Thane West

Alerts

Be the first to know and let us send you an email when Thane News 9 - ठाणे न्युज 9 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Thane News 9 - ठाणे न्युज 9:

Share