News1 Marathi

News1 Marathi News1Marathi is Digital News Media Youtube Channel Publishing Marathi Letest news,

https://www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/scriptwritingकागदावरील कथाबीज ते चित्रपटाची संवादात्मक पटकथा लेखन क्षे...
06/08/2024

https://www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/scriptwriting

कागदावरील कथाबीज ते चित्रपटाची संवादात्मक पटकथा लेखन क्षेत्रात करियर करा...!
कागदावरील एका बिंदू सुरु होणा-या लिखित कथेचे, चित्र रूपातील माध्यमांतर म्हणजेच चित्रपट होय. तर त्या चित्रपटाची लिखित संहिता म्हणजे पटकथा होय. अर्थात कथा आणि पटकथा यामध्ये अंतर आहे. पटकथा म्हणजे चित्रपट, दूरदर्शन मालिका, माहितीपट आणि वेबसेरीज यांसाठीची लिहणे. त्यामध्ये दृष्यांच्या स्वरुपामध्ये कथा लिहली जाते. प्रेक्षकांसमोर आपले कथानक दृष्य माध्यमातून आणि घटना, प्रसंगातून सादर केले जाणार आहे, हे लक्षात घेऊन केलेली कथेतील कथानकाची दृष्यात्मक मांडणी म्हणजे पटकथा लेखन होय. त्यासाठी पटकथा लेखकाला त्याची कथा कशी सादर होणार आहे, याची दृष्ये कथानकातून डोळ्यासमोर आणावी लागतात. त्याचप्रमाणे कथेची मांडणी दृष्यकथा स्वरूपात करावी लागते.
पटकथा लेखन हे एक विशेष प्रकारचे लेखन कौशल्य आहे. ते फार अवघड असे नाही, मात्र त्याच्या मांडणीचे तंत्र आणि मंत्र नीट समजावून घ्यावे लागते. एकदा लेखनाचे कौशल्य आत्मसात केले की, कथा ते पटकथा हा प्रवास सहजपणे घडतो.
सध्याच्या काळात पटकथा लेखकांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेल्या दूरदर्शन वाहिन्यांना सतत नवनवीन कथानके हवी असतात. त्याचबरोबर डिजिटल जगामध्येही कौशल्यपूर्ण पटकथाकारांना चांगली मागणी आहे. शिवाय ओटीटी (Over The Top) या नाविन्यपूर्ण प्लॅटफॉर्ममुळे वेबसिरीजची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत चालली आहे. त्यांनाही सातत्याने पटकथाकार हवे असतात. त्यामुळे पटकथालेखन हे एक सतत मागणी असलेले नाविन्यपूर्ण क्षेत्र आहे. आपली संस्था, आपले प्रॉडक्ट, आपली सेवा यांची माहिती लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी माहितीपटांचा वापर आज सातत्याने केला जातो. यासाठी देखील मोठ्या प्रमाणात पटकथा लेखकांची गरज आहे.

ओटीटी (Over The Top) या नाविन्यपूर्ण प्लॅटफॉर्ममुळे वेबसिरीजची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत चालली आहे. त्यांनाही सातत्याने पटकथाकार हवे असतात. त्यामुळे पटकथालेखन हे एक सतत मागणी असलेले नाविन्यपूर्ण क्षेत्र आहे. आपली संस्था, आपले प्रॉडक्ट, आपली सेवा यांची माहिती लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी माहितीपटांचा वापर आज सातत्याने केला जातो. यासाठी देखील मोठ्या प्रमाणात पटकथा लेखकांची गरज आहे.

▶️कार्यशाळेतील विषय :
✅कथा, कथाबीज संकल्पना आणि कथेची मांडणी
तीन-अंगाची रचना
✅Three-Act Structure (प्रारंभ, मध्य, आणि शेवट)
✅नायकाचा प्रवास (Hero's Journey) आणि त्याचे टप्पे.
✅कथांचे नऊ रंग (नवरस)
✅प्रभावी पात्र कसे उभे करावे?
✅प्रमुख आणि गौण पात्रांमधील फरक.
✅पात्रांच्या उद्दिष्टे, प्रेरणा, आणि संघर्ष,
✅दृश्य(Scene)म्हणजे काय? दृश्यांची रचना कशी करावी?
✅प्रसंगातून दृश्य लेखन कसे करावे? दृश्य प्रभावीपणे कसे सादर करावे?
✅पटकथा लेखनाचे मूलभूत नियम.
✅फॉरमॅटिंगः दृश्य वर्णन, संवाद, एक्शन लाइन.
✅पटकथाचे नमुने वाचन आणि विश्लेषण.

कार्यशाळेची संपूर्ण माहिती आपल्या व्हॉटसअप क्रमांकावर मागविण्यासाठी पुढे क्लिक करा.

✅ अत्यंत मर्यादित जागा - पूर्व नोंदणी आवश्यक

✅ मार्गदर्शन व प्रश्नोत्तरे

✅ ​सर्व सहभागीना प्रमाणपत्र



सुचना:

1) एकदा केलेली नोंदणी कोणत्याही कारणामुळे रद्द केली जाणार नाही किंवा रक्कम परत केली जाणार नाही.

2) नोंदणी पक्की करण्यासाठी "Register now" वर क्लिक करा आणि कार्यशाळेची रक्कम ऑनलाइन भरा.

3) विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांनी 20% सवलतीसाठी - नोंदणी करण्यापूर्वी 7066251262 या व्हॉटसअप क्रमांकावर आपले नाव, सभासद क्रमांक, कार्यशाळेचे नाव ही माहिती पाठवावी. सवलत कशी मिळवावी हे सभासदांना स्वतंत्रपणे व्हॉटसअपद्वारे कळविले जाईल.

चौकशी / माहितीसाठी संपर्क - व्हॉट्सअ‍ॅप: 7066251262

 #शाळा हे नफा खोरी कमावण्याचा धंदा नव्हे – धनंजय जोगदंड सेंट थॉमस शाळेच्या फी वाढी विरोधात आम आदमी पार्टी आक्रमककल्याण :...
03/04/2023

#शाळा हे नफा खोरी कमावण्याचा धंदा नव्हे – धनंजय जोगदंड सेंट थॉमस शाळेच्या फी वाढी विरोधात आम आदमी पार्टी आक्रमक

कल्याण : कल्याण पूर्व विजयनगर येथील सेंट थॉमस शाळेने विद्यार्थ्यांच्या शाळेची फी वाढ केली आहे, ती अत्यंत अन्यायकारक भरमसाठ फी वाढ आहे त्याने पालकांचे कंबरडेच मोडेल. या फी वाढी बाबत आम आदमी पार्टी आक्रमक झाली असून शाळा हे नफा खोरी कमावण्याचा धंदा नव्हे असा इशारा आम आदमी पार्टी, कल्याण डोंबिवली शहर अध्यक्ष धनंजय जोगदंड यांनी दिला आहे.

मागच्या वर्षी इयत्ता सातवी वर्गाची ची फी अंदाजे 16 हजार ते 17 हजार होती. आता आठवी वर्गाला विद्यार्थ्यांना एकूण 27 हजार 300 रुपये एवढी फी वाढ झाल्याचे पत्र आपला प्राप्त झाले. शाळा प्रशासनाने अंदाजे 70% एवढी भरमसाठ अन्यायकारक ही वाढ केल्याचे प्रथम दर्शनी दिसून येते, आणि शाळा प्रशासन पालकांना असे सांगते की आम्ही एकुण 35% फी वाढ करत आहोत.

मुळात 35% असो अथवा 70% असो दोन्ही फी वाढ ही पालकांना न परवडणारी व पालकांचं कंबरडे मोडणारी ठरणार आहे. महाराष्ट्र शासनाचे शिक्षण विभाग इंग्रजी माध्यमाच्या अन एडेड शाळांना फी बाबत निर्देश देतात की, आपण दर तीन वर्षा नंतर प्रत्येकी 10% अथवा 15% फी वाढ करू शकता. तरी सेंट थॉमस शाळा हे निर्देशांचे पालन का करत नाही. हा अन्याय आम्ही सहन करणार नाही व लवकरात लवकर सेंट थॉमस शाळा प्रशासनाने भरमसाठ अन्यायकारक फी वाढीचा निर्णय मागे घ्यावा अन्यथा या अन्यायाविरुद्ध आम्ही सेंट थॉमस शाळे विरुद्ध लढा पुकारू व पालकांना न्याय मिळवून देऊ असा इशारा जोगदंड यांनी दिला आहे.


शाळा चालवणे हे पुंण्याचे काम आहे, शाळेमध्ये विद्यार्थ्यांना ज्ञान घेण्यासाठी पाठवले जाते, शाळा ही एका ट्रस्ट अथवा सामाजिक संस्थेद्वारे चालवली जाते शाळा हे नफा खोरी कमावण्याचा धंदा नव्हे शाळा हे ना नफा ना तोटा या धोरणानुसार चालवावी लागते. त्यामुळे कल्याण डोंबिवली व महाराष्ट्रातील सर्व शाळांनी शाळेची फी वाढ करताना पालकांना सोबत घेऊन व महाराष्ट्र शासनाचे सर्व नियम याला अधीन राहूनच काम करावे असे आवाहन जोगदंड यांनी केले आहे.

तर दिल्लीला मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व शिक्षण मंत्री मनीष शिषोदिया यांनी गेल्या आठ वर्षापासून दिल्ली राज्यातील सर्व सरकारी शाळे मध्ये सर्व विद्यार्थ्यांना मोफत व दर्जेदार शिक्षण देत आहेत व प्रायव्हेट शाळांच्या देखील फी वाढु दिल्या नसल्याचे त्यांनी सांगितले.

 #टीसीआय ग्रुपद्वारे देशभरात रक्तदान शिबिराचे आयोजनमुंबई, २९ सप्टेंबर २०२२: ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचे ...
29/09/2022

#टीसीआय ग्रुपद्वारे देशभरात रक्तदान शिबिराचे आयोजन

मुंबई, २९ सप्टेंबर २०२२: ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचे (टीसीआय ग्रुप) संस्थापक अध्यक्ष प्रभू दयाळ अग्रवाल (पीडीजी) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देशभरात २७ हून अधिक ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ८०० हून अधिक जणांनी सहभाग घेतला. ग्रुपकडून दरवर्षी या उपक्रमाचे आयोजन केले जाते. मुंबईत या उपक्रमाचे आयोजन सहारा प्लाझा कॉम्प्लेक्स, जे बी नगर, अंधेरी पूर्व येथे करण्यात आले.

पीडीजी यांना भारतीय वाहतूक उद्योगाचे प्रणेते म्हणून ओळखले जाते. त्यांनी आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण इत्यादी क्षेत्रांत मोठे योगदान दिले आहे. भारतातील खाजगी रक्तपेढ्या स्थापन करण्यात त्यांची भूमिका ही प्रमुख क्षेत्रांपैकी एक आहे. पीडीजी यांच्या कामाचा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी यावर्षी सप्टेंबर महिन्यात हे शिबिर पार पडले.

मुंबई, पुणे, लखनौ, राउरकेला आणि मदुराई, राजकोट, रायपूर, चाकण, हसनगढ, जमशेदपूर, पाटणा यांसारख्या ठिकाणांसह देशभरात २७ हून अधिक ठिकाणे हे शिबिर पार पडले. या मोहिमेमध्ये ८००हून कर्मचारी आणि इतर नागरिकांनी सक्रिय सहभाग घेतला.

 #नवीन निवासी रिअॅल्टी लॉन्चमध्ये वार्षिक ६१ टक्क्यांची वाढ: प्रोपटायगर सप्टेंबर तिमाहीमध्ये प्रॉपर्टी मागणीत वार्षिक ४९...
29/09/2022

#नवीन निवासी रिअॅल्टी लॉन्चमध्ये वार्षिक ६१ टक्क्यांची वाढ: प्रोपटायगर सप्टेंबर तिमाहीमध्ये प्रॉपर्टी मागणीत वार्षिक ४९ टक्क्यांची वाढ ~

मुंबई, २९ सप्टेंबर २०२२: सणासुदीचा काळ उत्साहात सुरू असताना भारतातील रिअल इस्टेट विकासकांना या क्षेत्रामधील रिकव्हरीला चालना मिळण्याची आशा आहे आणि त्यांच्या इच्छा पूर्ण होत आहेत. २०२१ च्या तिस-या तिमाहीच्या (जुलै ते सप्टेंबर) तुलेनत नवीन पुरवठ्याने वार्षिक ६१ टक्क्यांची वाढ केली.

आरईए इंडिया मालकीचे ऑनलाइन रिअल इस्टेट व्यासपीठ प्रोपटायगर डॉटकॉमने जारी केलेला निवासी बाजारपेठ ट्रेण्ड्सवरील त्रैमासिक अहवाल रिअल इनसाइट रेसिडेन्शियल – जुलै-सप्टेंबर २०२२ नुसार प्रबळ मागणी पाहता निवासी विक्रीने प्रबळ वाढ सुरू ठेवली आहे, जेथे मागील वर्षाच्या जुलै ते सप्टेंबर कालावधीमध्ये विक्री करण्यात आलेल्या ५५,९१० सदनिकांच्या तुलनेत जुलै ते सप्टेंबर २०२२ दरम्यान वार्षिक ४९ टक्क्यांची वाढ होऊन ८३,२२० सदनिकांच्या विक्रीची नोंद करण्यात आली आहे.

‘’रिअल इस्टेट उद्योग महामारी आणि त्यानंतर झालेल्या परिणामांमधून पुन्हा सावरत आहे आणि हे आमच्या अहवालातील डेटा ट्रेंड व माहितीमधून स्पष्टपणे दिसून येते. विशेषत: नुकतेच सुरू झालेल्या सणासुदीच्या काळात मालमत्ता गुंतवणूकीबद्दल ग्राहकांच्या सकारात्मक भावनांमध्ये सतत वाढ होत असल्याचे आमच्या निदर्शनास येत आहे. यावर्षी तिस-या तिमाहीत घरांच्या मागणीत लक्षणीय सुधारणा झाली आहे आणि यामुळे पुढच्या तिमाहीसाठी देखील उत्तम मागणी दिसून येईल,’’ असे हाऊसिंग डॉटकॉम, प्रोपटायगर डॉटकॉम आणि मकान डॉटकॉमचे ग्रुप सीएफओ म्हणाले.

श्री. वाधवान पुढे म्हणाले, ‘’एकूण व्याजदरांमध्ये काहीशी वाढ झाली असली तरी घरांसाठी मागणी कमी झालेली नाही, ज्याचे श्रेय घराचे मालकीहक्क मिळवण्याप्रती नवीन विश्वासाला जाते. खरेतर आम्ही आमच्या अहवालामधून अनुमान काढला आहे की, निवासी मालमत्तांसाठी मागणीने २०१९ मधील तिस-या तिमाहीमधील (जुलै ते सप्टेंबर) महामारीपूर्वीच्या पातळ्यांना मागे टाकले आहे. सणासुदीच्या भावना आणि ऑफर केलेल्या विविध सवलतींमुळे विकासकांना खात्री आहे की, मालमत्ता खरेदी करण्यात ग्राहकांची आवड आणखी वाढेल.”

मुंबई आणि पुणे पुन्हा अव्वल स्थानावर:

२०२२ च्या तिस-या तिमाहीत (जुलै ते सप्टेंबर) एकूण विक्रीच्या ५३ टक्के हिस्स्यासह मुंबई आणि पुणे चार्टमध्ये अव्वल स्थानावर आहेत. बहुतेक विकल्या गेलेल्या मालमत्तांच्या (२७ टक्के) किंमती ४५ लाख ते ७५ लाख रूपयांपर्यंत कमी झाल्या.

रेडी-टू-मूव्ह-इन सदनिकांची कमी झालेल्या यादीमुळे विक्री करण्यात आलेल्या जवळपास १९ टक्के सदनिका आरटीएमआय प्रॉपर्टीज होत्या, तर उर्वरित ८१ टक्के सदनिकांचे बांधकाम सुरू होते किंवा नवीन लॉन्च होते. आमचा नवीन कंझ्युमर सेंटिमेंट आऊटलुक (जुलै-डिसेंबर २०२२) नुसार ५८ टक्के संभाव्य गृहखरेदीदार आरटीएमआय प्रॉपर्टींचा शोध घेत आहेत.

निवासी रिअॅल्‍टीची २०२२ च्‍या तिसर्‍या तिमाहीमधील स्थिर मागणी गती

विक्री

२०२२

२०२१

तिमाही वाढ

वार्षिक वाढ

शहर

तिसरी तिमाही

दुसरी तिमाही

तिसरी तिमाही

अहमदाबाद

७,८८०

७,२४०

५,४८०

९ टक्‍के

४४ टक्‍के

बेंगळुरू

७,८९०

८,३५०

६,५५०

-६ टक्‍के

२० टक्‍के

चेन्‍नई

४,४२०

३,२२०

४,६७०

३७ टक्‍के

-५ टक्‍के

दिल्‍ली एनसीआर

५,४३०

४,५२०

४,४६०

२० टक्‍के

२२ टक्‍के

हैदराबाद

१०,५७०

७,९१०

७,८१०

३४ टक्‍के

३५ टक्‍के

कोलकाता

२,५३०

३,२२०

२,६५०

-२२ टक्‍के

-५ टक्‍के

मुंबई

२८,८००

२६,१५०

१४,१६०

१० टक्‍के

१०३ टक्‍के

पुणे

१५,७००

१३,७२०

१०,१३०

१४ टक्‍के

५५ टक्‍के

भारत

८३,२२०

७४,३३०

५५,९१०

१२ टक्‍के

४९ टक्‍के

स्रोत: रिअल इनसाइट रेसिडेन्शियल – जुलै-सप्‍टेंबर २०२२, प्रॉपटायगर रिसर्च

‘’महामारीचा प्रादुर्भाव कमी झाला असताना निवासी प्रॉपर्टी बाजारपेठेची स्थिती सुरळीत होत आहे. मागणी वाढत आहे (२०२२ ची जुलै-सप्टेंबर तिमाही), तसेच प्रॉपर्टी विक्रीने लक्षणीय दोन अंकी वार्षिक विकासाची नोंद केली आहे. सकारात्मक गृहखरेदीदार आणि निवासी रिअॅल्टीमध्ये गुंतवणूक करण्याची भावना, तसेच सणासुदीच्या काळात घर खरेदी करण्याच्या भावनेला मिळालेली चालना यामुळे विकासकांना नवीन प्रकल्प लॉन्च करण्यास प्रेरणा मिळाली आहे,’’ असे हाऊसिंग डॉटकॉम, प्रोपटायगर डॉटकॉम आणि मकान डॉटकॉमच्या संशोधन प्रमुख अंकिता सूद म्हणाल्या.

श्रीम. सूद पुढे म्हणाल्या, ‘’एकूणच, ट्रेण्ड्समधून आगामी तिमाहींमध्ये निवासी रिअॅल्टीसाठी सकारात्मक दृष्टिकोन दिसून येत आहे; सणासुदीच्या काळातील सूट व स्थिर पेमेंट योजना, तसेच नवीन घराचे मालकीहक्क मिळवण्याचे महत्त्व अशा कारणांमुळे मागणीमध्ये वाढ होत राहिल.’’

नवीन लॉन्चनी सलग दुस-या तिमाहीसाठी दोन अंकी वाढीची नोंद केली:

प्रोपटायगर डॉटकॉमचा नवीन सदनिका बाजारपेठेसाठी तिस-या तिमाहीचे (जुलै ते सप्टेंबर) विश्लेषण निदर्शनास आणते की, २०२२ च्या तिस-या तिमाहीमध्ये एकूण १,०४,८२० सदनिका लॉन्च करण्यात आल्या, तसेच नवीन लॉन्च २०१५ मधील १,००,००० सदनिकांच्या सरासरी तिमाही पातळ्यांइतके होते. एकूण नवीन पुरवठ्याने मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत वार्षिक (२०२१ ची तिसरी तिमाही वि. २०२२ ची तिसरी तिमाही) ६१ टक्क्यांच्या वाढीची नोंद केली आणि २०२२ ची दुसरी तिमाही ते २०२२ ची तिसरी तिमाही यादरम्यान तिमाही ३ टक्क्यांची वाढ केली.

किंमतीसंदर्भात २०२२ च्या तिस-या तिमाहीमध्ये बहुतांश नवीन पुरवठ्याची किंमत १ कोटी ते ३ कोटी रूपयांपर्यंत होती, ज्यामध्ये एकूण नवीन प्रॉपर्टी लॉन्चचा हिस्सा ३२ टक्के होता. त्यानंतर हीच किंमत रेंज ४५ लाख ते ७५ लाख रूपयांपर्यंत होती, ज्यामध्ये त्याचा हिस्सा ३१ टक्के होता.

 #डोंबिवलीत जागतिक श्वानदंश निमित्त रॅली आणि चर्चा सत्र         डोंबिवली ( शंकर जाधव ) रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊन बु...
29/09/2022

#डोंबिवलीत जागतिक श्वानदंश निमित्त रॅली आणि चर्चा सत्र


डोंबिवली ( शंकर जाधव ) रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊन बुधवारी डोंबिवली पूर्वेकडील आप्पा दातार चौकातील श्री गणेश मंदीर येथून जागतिक श्वान दंश दिनानिमित्त एक भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली होती. त्यानंतर आयोजित केलेल्या चर्चा सत्रात पशूवैद्यक संघटना, महात्मा गांधी विद्यामंदिर, प्रकाश विद्यालय, इंटरॅक्टर्स, रोटरॅक्टर्स, श्वानमित्र, प्राणीमित्र, श्वान निर्बीजीकरण केंद्र - कंडोमपा, एन एस एस युनिट - प्रगती महाविद्यालय, एम के एम पटेल कॉलेज या सर्वांनी त्यात सहभाग झाले होते.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. अश्विनी पाटील, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, कंडोमपा या होत्या. त्यांचे हस्ते श्वान आणि इतर प्राणी/पक्षी यासाठी झटणाऱ्या/मदत करणाऱ्या नागरिक, संस्था, कॉलेज इत्यादींचा रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊन यांच्यातर्फे सर्टिफिकेट ऑफ अँप्रीसीएशन (Certificate of Appreciation) देऊन गौरव करण्यात आला.


चर्चासत्राच्या सुरवातीला रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊनचे प्रोजेक्ट चेअरमन आणि पशूवैद्यक डॉ. मनोहर अकोले यांनी या रॅली आणि चर्चा विषयी तसेच श्वान दंश बाबत समज-गैरसमज याविषयी विस्तृत माहिती सांगितली. १७ ते २३ सप्टेंबरमध्ये डोंबिवलीत विविध ठिकाणी जाऊन अँटीरेबीज लस एकूण १५८४ इतक्या भटके श्वान - मांजरे यांना देण्यात आली आहे.

तसेच डोंबिवलीत निर्बीजीकरण केंद्र सुरू करणे आणि पाळीव श्वानधारंकासाठी परवाना पद्धत चालू करणे अशी मागणी डॉ. अकोले यांनी रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊन आणि पशूवैद्यक संघटनेच्या वतीने केली व तसे निवेदन डॉ. अश्विनी पाटील, वैद्यकीय आरोग्य अधिकारी केडीएमसी यांना देण्यात आले असून त्यांनीही आपल्या भाषणात या मागणीची पूर्तता लवकरच करण्यात येईल तसेच भटक्या कुत्र्यांचे प्रश्न सोडविण्यात येतील असे आश्वासन दिले.

याप्रसंगी व्यासपीठावर रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊनचे अध्यक्ष श्री अजय कुलकर्णी, सचिव श्री किशोर अढळकर हे उपस्थित होते. त्यांनीही रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊन तर्फे करीत असलेल्या कामाची माहिती सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मकरंद गणपुले यांनी केले. तर आभार प्रदर्शनाची जबाबदारी प्रदीप बुडबाडकर यांनी सांभाळली. कार्यक्रमात पसायदान होऊन कार्यक्रमाचा समारोप झाला.

 #रिक्षावर कमान कोसळल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरकल्याण : सध्या नवरात्रोत्सवामुळे कल्याण डोंबिवली शहरात रस...
29/09/2022

#रिक्षावर कमान कोसळल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

कल्याण : सध्या नवरात्रोत्सवामुळे कल्याण डोंबिवली शहरात रस्त्यावर जागोजागी होर्डिंग आणि कमानी लावण्यात आल्या आहेत. महापालिकेचे लक्ष नसल्याने या कमानी जिवघेण्या ठरत आहेत. कल्याण पूर्व भागातील मलंग रोडवरील रस्त्यावर लावण्यात आलेली कमान अचानक एका रिक्षावर पडली. या घटनेतून रिक्षा चालक सुदैवाने बचावला आहे. प्रशासनाने या होर्डिंग आणि कमानीवर कारवाई केली पाहिजे. अशी मागणी जोर धरू लागली आहे.

सणासुदीच्या काळात राजकीय पक्षाकडून तसेच समाजिक कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी आणि रस्त्याच्या मधोमध कमानी लावल्या जातात. आता या बॅनर आणि कमानी प्रशासनासाठी डोकेदुखी आणि नागरीकांसाठी जीवघेण्या ठरत आहेत. कल्याण पूर्व भागातील मलंग रोडवर लावण्यात आलेली एक कमान अचानक कोसळली. ही कमान रिक्षावर पडल्यानं रिक्षाचे नुकसान झालं आहे.

 #कल्याणात शालेय विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती केडीएमसी आणि पर्यावरण दक्षता मंडळ यांचा  संयुक्त उपक्रम कल्याण...
29/09/2022

#कल्याणात शालेय विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती केडीएमसी आणि पर्यावरण दक्षता मंडळ यांचा संयुक्त उपक्रम


कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि पर्यावरण दक्षता मंडळ डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांसाठी स्वच्छ सर्वेक्षण २०२३ व माझी वसुंधरा ३.० अंतर्गत स्वच्छ्ता जनजागृती या अभियानाच्या माध्यमातून जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन आज कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिरात करण्यात आले होते.


बुधवारी डोंबिवली मध्ये महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्याहस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले होते. आज कल्याणमध्ये अत्रे रंगमंदिरात दोन सत्रात शालेय विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छते बाबत आणि पर्यावरणाबाबत जनजागृती करण्यात आली. आधी तज्ञांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले त्यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांना प्रबोधनात्मक लघुपट दाखविण्यात आले.

उपमुख्य स्वच्छता अधिकारी घुटे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना पर्यावरणाशी संबंधित प्रश्न विचारुन, बोलते करत पर्यावरणा विषयी, स्वच्छते विषयी जिज्ञासा जागृत करत, घराघरातून स्वच्छता, कचरा विलगीकरण केले गेले तर शहर स्वच्छ होण्यास मोठा हातभार लागेल असे सांगत कचरा विलगीकरणाबाबत सुलभ सोप्या भाषेत मार्गदर्शन केले.

त्याचप्रमाणे उपस्थितांमार्फत स्वच्छता विषयी शपथ देखील घेण्यात आली. पर्यावरण दक्षता मंडळाच्या रुपाली शाईवाले तसेच विद्यार्थी वर्गाने प्रचंड संख्येने उपस्थित राहून उत्तम प्रतिसाद दिला.

 #नवरात्रीमध्ये कलाकारांचा सन्मानकल्याण : आपला उल्लेखनीय अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अभिराज्य गाजवणारे अभिनेत्री ...
29/09/2022

#नवरात्रीमध्ये कलाकारांचा सन्मान

कल्याण : आपला उल्लेखनीय अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अभिराज्य गाजवणारे अभिनेत्री अभिनेते आपल्या बहारदार अभिनयाने त्याच बरोबर नृत्य आणि उत्तम असा कलेचा अविष्कार सादर करणारे कलावंत यांचा नवरात्रीचे औचित्य साधून हर्षदा प्रोडक्शन च्या वतीने सन्मान करण्यात आला.

गायिका साळवी मॅडम, अभिनेत्री करुणा साळवी, अभिनेत्री सुरेखा लोकरे अभिनेते प्रकाश आवरी, अभिनेते दिग्दर्शक अविनाश महाबळ आणि अभिनेते, सहाय्यक दिग्दर्शक, गायक, गणेश वाघमारे यांचा सन्मान कवयत्री डॉक्टर कविता विघे यांच्याहस्ते करण्यात आला.

 #कल्याण मध्ये ठाकरे शिंदे गटाचा भाईचारा कल्याण खाडीवर सुटले जुन्या मैत्रीचे वारे  ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याच्या मदतीला ...
29/09/2022

#कल्याण मध्ये ठाकरे शिंदे गटाचा भाईचारा कल्याण खाडीवर सुटले जुन्या मैत्रीचे वारे ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याच्या मदतीला शिंदे गटाचे आमदार आणि नगरसेवक धावले गट वेगळे पण जुनी मैत्री जपली

कल्याण : राजकारणात कधी काय होईल यांचा नेम नाही. असाच प्रत्यय कल्याण खाडीवर सुटलेल्या जुन्या मैत्रीच्या वार्यामुळे घडल्याने राजकीय वुर्तळात खमंग चर्चा रंगल्या आहेत. ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख विजय साळवी यांना पोलिसांकडून तडीपारची नोटीस मिळाल्यानंतर शिंदे गटातील आमदार विश्वनाथ भोईर हे त्यांच्या मदतीसाठी धावून आल्याचे दिसून आले. या घटनेमुळे ठाकरे - शिंदे गटातील जुन्या मैत्रीचे दर्शन झाले.

ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख विजय उर्फ बंड्या साळवी यांना पोलिसांकडून तडीपारची कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. या नोटीसी नंतर शिंदे गटात गेलेले कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर हे त्यांच्या मदतीसाठी धावून गेले आहेत.


आमदार विश्वनाथ भोईर यांनी कल्याण परिमंडळ ३ चे पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ यांची भेट घेत साळवी यांच्या विरोधात कोणतीही अन्यायकारक कारवाई होऊ नये अशी मागणी केली आहे. राज्यात सुरु असलेल्या राजकारण हे प्रथमच होत आहे की, ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यासाठी शिंदे गटातील आमदाराने मदतीचा हात पुढे केला आहे.

राज्यात सत्ता संघर्षाची लढाई एकीकडे कोर्टात सुरु असताना दुसरीकडे कल्याणमध्ये एक वेगळे राजकारण पाहावयास मिळाले आहे. काही दिवसापूर्वी ठाकरे गटाचे कल्याण महानगर प्रमुख आणि कल्याण मुरबाड शिवसेना जिल्हा प्रमुख विजय साळवी यांना पोलिसांकडून तडीपारची नोटिस पाठविण्यात आली. साळवी यांना पोलिसांकडून त्यांचे प्रतिउत्तरासाठी वेळ देण्यात आली.

यावेळी साळवी यांनी ही कारवाई सूडबूद्धीने होत असल्याचा आरोप केला होता. साळवी यांनी शेकडो समर्थकांसह एसीपी कार्यालयात जाऊन त्यांचा जबाब नोंदविला आहे. पोलिसांत हे प्रकरण सुरु असताना थेट शिंदे गटातील आमदार विश्वनाथ भोईर शिंदे गटातील नगरसेवकांसोबत डीसीपी सचिन गुंजाळ यांची भेट घेतली.

यावेळी आमदार विश्वनाथ भोईर, माजी नगरसेवक मोहन उगले, जयवंत भोईर, प्रभुनाथ भोईर, रवी पाटील, सुनील वायले, श्रेयस समेळ, परिवहन सदस्य सुनील खारूक आदी उपस्थित होते. या वेळी विश्वनाथ भोईर यांनी सांगितले की, विजय साळवी आणि आमचे पारिवाराचे संबंध आहे. आम्ही दोघे एकत्रित काम केले आहे.

ही कारवाई सूडबुद्धी केली गेली नाही. त्यांच्या विरोधात राजकीय गुन्हे दाखल आहेत. ही रूटीन प्रोसेस आहे. मात्र विजय साळवी यांच्या वर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये यासाठी पोलिसांनी याची दक्षता घ्यावी. विश्वनाथ भोईर यांच्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे.

 #एनएनएमटीच्या बसला कल्याणमध्ये आग नागरिक आणि ड्रायव्हर - कंडक्टरच्या सतर्कतेमुळे टळली मोठी दुर्घटनाकल्याण  : कल्याणहून ...
29/09/2022

#एनएनएमटीच्या बसला कल्याणमध्ये आग नागरिक आणि ड्रायव्हर - कंडक्टरच्या सतर्कतेमुळे टळली मोठी दुर्घटना

कल्याण : कल्याणहून नवी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या बसला कल्याणात आग लागल्याने एकच गोंधळ उडाला. मात्र नागरिक आणि बसच्या ड्रायव्हर-कंडक्टरने वेळीच सतर्कता दाखवल्याने मोठी दुर्घटना टळली. बुधवारी रात्री साडे दहाच्या सुमारास हा प्रकार घडला.

नवी मुंबई महापालिकेची एमएच ४३ एच ५२९८ या क्रमांकाची बस प्रवासी घेऊन कल्याणहून नवी मुंबईच्या दिशेने निघाली. कल्याणमध्ये ही बस कल्याण पूर्वेच्या नेतिवली परिसरातून जात असताना बसच्या बोनेटमधून धूर येत असल्याचे नागरिक आणि ड्रायव्हरच्या निदर्शनास आले. त्यामुळे नागरिकांनी लगेचच ही ही बस थांबवली आणि ड्रायव्हर आणि कंडक्टरने सतर्कता दाखवत बसमधील सर्व प्रवाशांना तत्काळ खाली उतरवलं.

तर आजूबाजूच्या नागरिकांनी अग्निशमन दल येईपर्यंत बादल्यांच्या सहाय्याने पाणी मारण्यास सुरुवात केली. केडीएमसी अग्निशमन दलानेही त्वरीत घटनास्थळी धाव घेतली आणि अवघ्या काही मिनिटांत या आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे सुदैवाने या दुर्घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही. मात्र या आगीमध्ये बसचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

Address

Thane West

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when News1 Marathi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to News1 Marathi:

Share