Thanedar - ठाणेदार

Thanedar - ठाणेदार बातमी स्वरूपातील व्हिडिओ किंवा फोटो आपण ठाणेदारच्या अधिकृत ई- मेल आयडी वर पाठवू शकता.. [email protected]

09/09/2024

दीड दिवसांचा पाहुणचार घेऊन बाप्पा निघाले

ठाणे: वाजत-गाजत ढोल ताशांच्या गजरात, गुलाल उधळत नाचत आज दीड दिवसांच्या 45 हजारपेक्षा जास्त श्री मूर्तीचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले.

ठाणे जिल्ह्यातील ठाणे, नवी मुंबई, कल्याण, भिवंडी, डोंबिवली, अंबरनाथ आणि उल्हासनगर या भागात तसेच ठाणे ग्रामिण पोलिस ठाण्याच्या हद्दीत दीड दिवसाच्या गणपती बाप्पाचे काल आगमन झाले होते, दीड दिवस पाहुणचार घेऊन आज बाप्पा त्यांच्या घरी गेले. ठाणे महापालिकेने कृत्रिम तलाव तसेच

तलावपाळी, स्वीकृती केंद्र आणि फिरत्या विसर्जन केंद्राची निर्मिती करून भक्तांना घराच्या जवळ विसर्जन

करण्याची सोय केली होती. तलाव पाळी, उपवन, रायला देवी तसेच घोडबंदर मार्गावरील गायमुख, कोलशेत, पूर्व ठाण्यातील चेंदणी कोळीवाडा या विसर्जन घाटावर भक्त बाप्पाला निरोप देत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत होते.

ठाणे पोलिस आयुक्तालय परिसरात सार्वजनिक सात आणि घरगुती 42 हजार गणरायाचे विसर्जन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. महापालिका प्रशासनाने
भक्तांसाठी चांगली सोय केली होती. पोलिसांच्या मदतीला होमगार्ड आणि महाविद्यालयातील विद्यार्थी मदतीला होते. रात्री उशिरापर्यंत बाप्पाचे विसर्जन सुरु होते. विसर्जन दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

09/09/2024

*ठाण्यात धर्मवीरांच्या आनंद मठाचे आकर्षण*

सूर्योदय मित्र मंडळाने उभारला सुंदर देखावा

09/09/2024

व-हाळदेवी विसर्जन घाटावर स्री सुरक्षेचा गजर

09/09/2024

जलविद्युत क्षेत्रात राज्याचं मोठं पाऊल

१.८९ लाख कोटींची गुंतवणूक
६२ हजार रोजगारनिर्मिती अपेक्षित
जलविद्युत निर्मितीसाठी सामंजस्य करार
७ कंपन्यासोबत करार

जलविद्युत निर्मितीसाठी ‘पंम्प्ड स्टोरेज’ धाटणीच्या प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासन आणि एनटीपीसी, वेलस्पन न्यू एनर्जी, एनएचपीसी, रीन्यू हायड्रो पावर, टीएचडीसी इंडिया, टोरंट पॉवर, अदानी ग्रीन एनर्जी या कंपन्यांशी महायुती सरकारने नुकतेच सामंजस्य करार केले. यामुळे ६२ हजार ५५० इतकी रोजगारनिर्मिती होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने हे विक्रमी करार करण्यात आले असून त्यातून ३५ हजार २४० मेगावॉट वीजनिर्मिती होणार आहे. राज्यातील या प्रकल्पांमध्ये सुमारे एक लाख ८८ हजार ७५० कोटी रुपयांची गुंतवणूक, तर राज्यात २०३० पर्यंत ५० टक्के वीजनिर्मिती ही नैसर्गिक ऊर्जा स्त्रोतांमधून होणार आहे. या करारांमुळे शाश्वत वीजनिर्मिती आणि अर्थव्यवस्था वाढीस मोठा हातभार लागणार आहे. राज्याची एकूण वीजनिर्मितीची स्थापित क्षमता ४६ हजार मेगावॉट असून, ४० हजार ८७० मेगावॅटचे पंम्ड स्टोरेज क्षेत्रात वीजनिर्मिती करार झाल्याने हरित ऊर्जा क्षेत्रात राज्याचे हे मोठे पाऊल आहे. राज्यात सौर ऊर्जा निर्मितीतही लक्षणीय वाढ करण्यात येत आहे.

08/09/2024

माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या घरातील दीड दिवसाचा गगणपति बाप्पाचे इकोफ्रेंडली विसर्जन..

08/09/2024

*माजी आमदार रविंद्र फाटक यांच्या घरी गणपतीचे आगमन*

07/09/2024

*श्रीगणेशाची कृपादृष्टी सगळ्यांवर राहो!*

*महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले महापालिका कर्मचाऱ्यांच्या गणेशाचे पूजन*

*

07/09/2024

आॅक्सफर्ड इंग्लिश स्कुल आयोजित उद्योत्ता इंटरस्कुल स्पर्धेचा गुणगौरव सोहळा संपन्न..

आॅक्सफर्ड इंग्लिश शाळेचे संस्थापक रविंद्र फाटक यांची प्रमुख उपस्थिती..

ठाणे -:
ठाण्यातील आॅक्सफर्ड इंग्लिश स्कुलच्या वतीने उद्योत्ता इंटरस्कुल स्पर्धेचा गुणगौरव सोहळा शुक्रवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. आॅक्सफर्ड इंग्लिश स्कुलचे संस्थापक रविंद्र फाटक यांच्या प्रमुख उपस्थितीत व यांच्या हस्ते गुणगौरव सोहळा संपन्न झाला. आॅक्सफर्ड इंग्लिश स्कुलच्या वतीने इंटरस्कुल स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यंदाचे हे चौथ वर्ष असून विद्यार्थ्यांचे मनोधर्य वाढावे तसेच त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी यावर्षापासून या स्पर्धेला उद्योत्ता ( प्रोत्साहन ) हे नाव देण्यात आले आहे. दरवर्षी या स्पर्धेत ठाणे तसेच मुलूंड परिसरातील अनेक शाळा सहभागी होत असतात. यावर्षी एकुण १४ शाळांनी सहभाग घेतला होता.
विविध प्रकारच्या वीस स्पर्धांमध्ये ३०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आपल्या कलागुणांचे प्रात्यक्षीके सादर कोले, यामध्ये चित्रकला, नृत्य , वक्तृत्व स्पर्धा, ग्रीटींग कार्ड मेकिंग अश्या अनेक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. अडीशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी यावेळी सहभाग घेतला. ही स्पर्धी ३० आॅगस्ट रोजी संपन्न झाली असून शुक्रवारी या स्पर्धेचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला.
यावेळी शिवसेना उपनेते आॅक्सफर्ड इंग्लिश स्कुलचे संस्थापक रविंद्र फाटक, संस्थेचे सदस्य सुरेश कडू, तसेच शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या स्पर्धेसाठी सेकंडरी विभाग प्रभारी मुख्याध्यापिका दुर्गा गुप्ता, प्रायमरी विभाग मुख्याध्यापिका रेखा पाटील, प्रिप्रायमरी इनचार्ज किशोरी कुलकर्णी शाळेतील सर्व शिक्षक , शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या एकत्रित सहकार्याने कार्यक्रमाचे नियोजन चांगल्या प्रकारे करण्यात आले.

06/09/2024

जलविद्युत क्षेत्रात राज्याचं मोठं पाऊल
१.८९ लाख कोटींची गुंतवणूक
६२ हजार रोजगारनिर्मिती अपेक्षित
जलविद्युत निर्मितीसाठी सामंजस्य करार
७ कंपन्यासोबत करार
जलविद्युत निर्मितीसाठी ‘पंम्प्ड स्टोरेज’ धाटणीच्या प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासन आणि एनटीपीसी, वेलस्पन न्यू एनर्जी, एनएचपीसी, रीन्यू हायड्रो पावर, टीएचडीसी इंडिया, टोरंट पॉवर, अदानी ग्रीन एनर्जी या कंपन्यांशी महायुती सरकारने नुकतेच सामंजस्य करार केले. यामुळे ६२ हजार ५५० इतकी रोजगारनिर्मिती होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने हे विक्रमी करार करण्यात आले असून त्यातून ३५ हजार २४० मेगावॉट वीजनिर्मिती होणार आहे. राज्यातील या प्रकल्पांमध्ये सुमारे एक लाख ८८ हजार ७५० कोटी रुपयांची गुंतवणूक, तर राज्यात २०३० पर्यंत ५० टक्के वीजनिर्मिती ही नैसर्गिक ऊर्जा स्त्रोतांमधून होणार आहे. या करारांमुळे शाश्वत वीजनिर्मिती आणि अर्थव्यवस्था वाढीस मोठा हातभार लागणार आहे. राज्याची एकूण वीजनिर्मितीची स्थापित क्षमता ४६ हजार मेगावॉट असून, ४० हजार ८७० मेगावॅटचे पंम्ड स्टोरेज क्षेत्रात वीजनिर्मिती करार झाल्याने हरित ऊर्जा क्षेत्रात राज्याचे हे मोठे पाऊल आहे. राज्यात सौर ऊर्जा निर्मितीतही लक्षणीय वाढ करण्यात येत आहे.

End plate
३५ हजार २४० मेगावॉट वीजनिर्मिती

Super
जलविद्युत ऊर्जा निर्मिती स्वावलंबी
विजेता तुटवडा संपणार
नवीन रोजगार निर्मिती होणार
ऊर्जेमुळे उद्योगधंद्यांना चालना मिळणार
State steps in hydropower- Thumbnail-04-09-2024
जलविद्युत क्षेत्रात राज्याचं मोठं पाऊल

06/09/2024

वागळे इस्टेट परिसरातून कोकणात व इतर ठिकाणी जाणाऱ्या भाविकांसाठी मोफत एस टी बस सेवा

ठाणे : महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथ संभाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही गणेशोत्सवास गावी जाणाऱ्या भक्तांसाठी मोफत एस टी बस सेवेच्या शुभारंभ करण्यात आला.
शिवसेना वागळे विभाग प्रमुख व कार्यसम्राट नगरसेवक एकनाथ अनंत भोईर, व वागळे प्रभाग समितीच्या माजी अध्यक्षा माजी नगरसेविका सौ एकता एकनाथ भोईर यांच्या पुढाकाराने वागळे इस्टेट प्रभागातील पहिली बस ठाण्याहून-कोकणात रवाना झाली. यावेळी एकंदर 35 एस टी बस,रत्नागिरी, खेड, चिपळूण, दापोली, सावंतवाडी, सातारा, कोल्हापूर व इतर ठिकाणी भाविकांना मोफत एस टी सेवा देण्यात आली यावेळी भाविकांना आरतीचे पुस्तक देऊन गणेशोत्सवानिमित्त शुभेच्छाही दिल्या.व शिवसेना वागळे विभाग प्रमुख व कार्यसम्राट नगरसेवक एकनाथ अनंत भोईर, व वागळे प्रभाग समितीच्या माजी अध्यक्षा माजी नगरसेविका सौ एकता एकनाथ भोईर यांनी निरोप देण्यात आला यावेळी यज्ञेश भोईर, शाखाप्रमुख संजय जाधव व सर्व विभागप्रमुख,उपविभागप्रमुख,शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, महिला आघाडी, युवा सैनिक स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी भाविकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नगरसेवक एकनाथ भोईर, नगरसेविका एकता भोईर यांचे आभार व्यक्त केले.

06/09/2024

ठाणे दि :ठाणे महापालिका प्रभाग क्र १९मधील नागरिकांना शिवसेनेच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त श्री गणेश प्रतिष्ठापना साहित्याचे तसेच घरगुती गणेश दर्शन स्पर्धाच्या प्रवेशिका वाटप करण्यात येणार आहे याचे अनावरण बुधवारी माजी नगरसेवक विकास रेपाळे यांच्या हस्ते झाले यावेळी वृक्षप्राधिकरण समिती सदस्य नम्रता भोसले -जाधव आदिसह मान्यवर उपस्थित होते.

गणेशोत्सव म्हटलं की आपल्या लाडक्या बाप्पाच्या पूजेसाठी साहित्य आवश्यक असेत कोरोना काळात नागरिकांचा गर्दीशी संपर्क होऊ नये म्हणून सुरु केलेला हा उपक्रम दिवसेंदिवस वाढत आहे.यंदा देखील नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक विकास रेपाळे व वृक्षप्राधिकरण समिती सदस्य नम्रता भोसले-जाधव यांच्या वतीने मोफत श्री गणेश प्रतिष्ठापना साहित्य वाटप करण्याचा अनोखा उपक्रम राबविण्यात आला.बुधवारी प्रभाग क्र १९ मधील काही नागरिकांना प्रतिनिधिक स्वरूपात श्री गणेश प्रतिष्ठापना साहित्य किट तसेच घरगुती गणेश दर्शन स्पर्धेच्या प्रवेशिकेचे वाटप करण्यात आले. तसेच विभागवाईज पदाधिकाऱ्यांना देखील या किटचे वाटप करण्यात आले असून येत्या दोन दिवस या किट व प्रवेशिका नागरिकांच्या घरात पोहचणार आहे.

या श्री गणेश प्रतिष्ठापना साहित्यामध्ये आरती संग्रह, कंठी, हळद, कुंकू, गुलाल, अबिर, अष्टगंध,अत्तर,गोमुत्र, धुप, अगरबत्ती, कापुर, वाती, कापसाचे वस्त्र, जानवे ,लाल वस्त्र, गुळ-खोबरे, सुपारी, खारीक बदाम-५, अक्रोड-,हळकुंड-, रांगोळी आदीचा समावेश असून सुमारे ४०० रुपयांची श्री गणेश प्रतिष्ठापना साहित्याचा डब्बा मोफत देणाचा अनोखा उपक्रम राबवण्यात आला आहे.ठाणे महापालिका प्रभाग क्र १९ मधील कशीश पार्क,रघुनाथनगर,सुर्वेवाडी,झरींडेवाडी,हाजुरी, गौतम नगर, परबवाडी, धर्मवीर नगर, साठेवाडी, सेवालाल नगर, मेंटल हॅास्पीटल परिसर, लुईसवाडी आदी भागातील सुमारे ११०० नागरिकांना याचे वाटप करण्यात येणार आहे . अशी माहिती माजी नगरसेवक विकास रेपाळे यांनी दिली.
नगरसेवक विकास रेपाळे व वृक्षप्राधिकरण समिती सदस्य नम्रता भोसले-जाधव यांच्या वतीने विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येत असतात गणेशोत्सवानिमित्त देखील मोफत पूजेचे साहित्य देण्याच्या हा उपक्रम राबवल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी त्यांचे कौतुक केले.

06/09/2024

वाघबीळ परिसरात गणपती विसर्जनासाठी विशेष सोयी: स्थानिक नगरसेविका अर्चना मनेरा आणि डॉक्टर मनेरा यांचा स्तुत्य उपक्रम

वाघबीळ परिसरातील गणपती विसर्जनाच्या अडचणी दूर करण्यासाठी स्थानिक माजी नगरसेविका अर्चना मणेरा आणि समाजसेवक डॉक्टर किरण मणेरा यांच्या वतीने वाघबीळ खाडीवर खास विसर्जन व्यवस्था उभारण्यात आली आहे, ज्यामुळे नागरिकांना आता सहजतेने आणि सुरक्षितपणे विसर्जन करता येणार आहे.

दरवर्षी गणपती विसर्जनाच्या वेळी वाघबीळ खाडी किनार्‍यावर चिखलाचा मोठा त्रास होत असे. स्थानिक गावकरी आणि भाविकांना खोल चिखलात उतरून गणपती विसर्जन करावे लागत होते, ज्यामुळे त्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. या परिस्थितीचा विचार करून, यावर्षी भारतीय जनता पक्षाच्या ठाणे महानगर पालिकेच्या स्थानिक माजी नगरसेविका अर्चना मणेरा यांनी खाडी परिसरात एक उत्तम विसर्जन व्यवस्था निर्माण केली आहे.

या व्यवस्थेत, खाडी किनार्‍यावर एक तरंग प्लॅटफॉर्म उभारण्यात आला आहे, ज्यामुळे भाविकांना आता गणपती विसर्जन करताना चिखलाचा सामना करावा लागणार नाही. यामुळे गणेश भक्तांना सुरक्षित आणि सोयीस्करपणे विसर्जनाची प्रक्रिया पूर्ण करता येईल.

आज भाजपा ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले यांच्या उपस्थितीत माजी नगरसेविका अर्चना किरण मणेरा आणि स्थानिक नागरिक, कार्यकर्त्यांनी या व्यवस्थेचा आज पाहणी दौरा केला.यावेळी युवा मोर्चा सूरज दळवी, उपाध्यक्ष सागर भदे, वृषाली वाघुले,तसेच स्थानिक ग्रामस्थ आदी यावेळी उपस्थित होते
विसर्जनाची उत्कृष्ट सोय बघून नागरिकांनी अर्चना किरण मणेरा यांचे मनःपूर्वक कौतुक केले. गावातील गणेश भक्तांनी यावेळी समाधान व्यक्त केले, कारण आता त्यांना आपल्या लाडक्या बाप्पाला योग्य पद्धतीने निरोप देता येणार आहे.
वाघबीळ परिसरातील या विशेष व्यवस्थेमुळे गणपती विसर्जनाची प्रक्रिया आता अधिक सुलभ आणि सुरक्षित झाली आहे. अर्चना मणेराआणि डॉक्टर मणेरा यांच्या या उपक्रमामुळे स्थानिक नागरिकांच्या समस्या दूर होणार असून, गणेश भक्तांसाठी हा एक सकारात्मक बदल ठरणार आहे.

सुप्रिया सुळे यांचे प्रवक्त्यांच्या संयुक्त बैठकीत आदेश - *एकनाथ शिंदे से बैर नही- देवेंद्र तेरी खैर नहीं*- *आपले टार्गे...
06/09/2024

सुप्रिया सुळे यांचे प्रवक्त्यांच्या संयुक्त बैठकीत आदेश - *एकनाथ शिंदे से बैर नही- देवेंद्र तेरी खैर नहीं*
- *आपले टार्गेट फक्त देवेंद्र फडणवीस असतील*
- मुख्यमंत्री यांच्यावर टिका करायची नाही. सरकारवर टिका करताना फक्त देवेंद्र यांच्यावर टिका करायची
- मनोज जरांगे पाटील यांच्यावर टिका कोणी ही करणार नाही. आपण त्यांच्या बाजूने आहोत.
- अजित पवार यांना सहानुभूती कुणी दाखवणार नाही..

05/09/2024

लोकशाहीच्या वृध्दीसाठी मतदान करा –
राज्यात ९ कोटी ५० लाख मतदार
राज्याचं भवितव्य तरुणांच्या हतात
२ ते ३ टक्के मतदारांच्या हातात हार-जीत
३० ते ५० वयोगटातील २ कोटी मतदार
महाराष्ट्र 2024 च्या विधानसभा निवडणुकीत एकूण ९ कोटी ५० लाख कोटी मतदार आहेत. यातील केवळ दोन टक्के मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. ४ कोटी ९० लाख पुरुष मतदार असून ४ कोटी ६० लाख महिला मतदार आहेत. तर १८ ते १९ वयोगटातील मतदारांची संख्या १६ लाख ९० हजार आहे. असे म्हटले जाते की ह्या मतदारांची संख्या केवळ दोन टक्के आहे. परंतु खर असं आहे, की केवळ 2 ते 3 % मतदारचं निवडणुकीतील विजय किंवा पराभवाचा निर्णय ठरवतात . हार जीतच्या फरकाचा अभ्यास केला तर प्रत्येक मताचे मूल्य कळते. आणि लोकशाहीसाठी तुमचे एक मत किती मोठे हे यावरून दिसून येते.
महाराष्ट्रात, मात्र गेल्या वेळी ही संख्या ९ कोटी २५ लाख होती. राज्यात दर १,००० पुरुष मतदारांमागे ९३३ महिला मतदार आहेत, तर मागील विधानसभा निवडणुकीत महिला मतदार संख्या ९२५ इतकी होती . म्हणजे मागील आणि ह्या होणाऱ्या निवडणुकीत महिला मतदार संख्येत फक्त ८ मतदारांचा फरक आहे. म्हणजे लोकसंख्या वाढली आहे असं नाही, तर राज्यातील अंगणवाडी सेविका, महिला बचत गट आणि गृहनिर्माण संस्थांनी जीवतोड मेहनत घेतली. म्हणून मतदान अधिक झाले . महाराष्ट्रातील ३६ पैकी ५ जिल्हे असे आहेत. जेथे महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे, ते जिल्हे म्हणजे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नंदुरबार, गोदिया, भंडारा आहेत. महिला मतदारांनी पुरुष मतदारांपेक्षा कमी मतदान करू नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. गडचिरोलीमध्ये सर्वात जास्त ८.१ लाख मतदार आहेत. राज्यात ३० ते ५० वयोगटातील २ कोटी मतदार आहेत. तर २० ते ३० वयोगटातील १ कोटी ८० लाख मतदार आहेत. ८० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांची संख्या १८.६० हजारा पेक्षा जास्त आहे. संयुक्त महाराष्ट्र विधानसभेची पहिली निवडणूक झाली. तेव्हा एकूण मतदानाची टक्केवारी ६०.३६ टक्के होती आणि २०१९ मध्ये ती ६१.४४ टक्के इतकी होती . दरम्यान, ११ निवडणुका झाल्या, पण सरासरी मतदानाची टक्केवारी फक्त 62 इतके मतदान झाले. १९९५ वगळता महाराष्ट्रात ७१.६९ टक्के मतदान झाले होते. देशात कमी मतदान होण्यामागे नक्षलवाद आणि दहशतवादी हे सर्वात मोठे कारण मानले जाते. आता त्यांची भीती एकतर नाहीशी झाली आहे. पण जिथे मतदारांना ही भीती वाटत नाही, तिथे मतदान कमी करण्याची सक्ती समजण्यापलीकडची आहे. केंद्रशासित प्रदेश आणि पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेशसह लहान राज्यांमध्ये, मतदानाची टक्केवारी सुमारे ८० टक्के आहे. प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी निवडणूक आयोग सर्वतोपरी प्रयत्न करते. महाराष्ट्रातील लोकसभेच्या निवडणुकीत मतदार फक्त ६१ टक्के नाव नोंदवतात, हे योग्य नाही. जर तुम्हाला राज्याचा देशाचा विकास हवा असेल तर मतदान करा आणि लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हा !

End plate -पाच जिल्ह्यात महिलांचे सर्वाधिक मतदान

Super -
४ कोटी ९० लाख पुरुष मतदार
४ कोटी ६० लाख महिला मतदार
१७ लाख नवे मतदार
पाच जिल्ह्यात महिलांचे सर्वाधिक मतदान

05/09/2024

वाहतूक कोंडीविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन

05/09/2024

THUMBANAIL मुंबई- इंदूर नव्या रेल्वे प्रकल्पाला मंजुरी

मुंबई - इंदूर नवा रेल्वे मार्ग
दोन व्यावसायिक शहरांना जोडणार
१८ हजार ३६ कोटी रुपयांचा प्रकल्प
नव्या रेल्वेमार्गाने प्रवास सुसाट

SUPER
मुंबई -इंदूर नवा रेल्वे मार्ग
३०९ किमीचा रेल्वे मार्ग
३० नवीन रेल्वे स्थानके
२०२८-२९ पर्यंत प्रकल्प पूर्ण करणार
६ जिल्ह्यांतून रेल्वे मार्ग जाणार
नव्या रेल्वेमार्गाने प्रवास गतीमान
स्थानिकांना रोजगाराची संधी

मुंबई आणि इंदूर या दोन प्रमुख व्यावसायिक शहरांना जोडणाऱ्या रेल्वे प्रकल्पांना केंद्रसरकारने मंजुरी दिलीय.
३०९ किलोमीटरटचा हा रेल्वे मार्ग आहे या रेल्वे मार्गावर 30 नवीन स्थानके बांधली जाणार आहेत. १८ हजार ३६ कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. नवीन रेल्वे मार्ग प्रकल्प सुमारे 1,000 गावं आणि सुमारे 30 लाख लोकसंख्येला जोडेल.
२०२८ ते २९ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या ६ जिल्ह्यांचा या रेल्वे प्रकल्पात समावेश आहे. इंदूर आणि मनमाड दरम्यान प्रस्तावित रेल्वे मार्ग थेट संपर्क सुविधा प्रदान करेल. त्याचसोबत प्रवासाची गतीशिलता सुधारेल.या भागातील लोकांच्या रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी वाढतील.

END PLATE
निर्णय गतिमान, महाराष्ट्र वेगवान

05/09/2024

आमदार प्रताप सरनाईक युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेस र्सरनाईक यांच्यावतीने ओवाळा माजिवडा विधानसभा क्षेत्रातील सर्व नागरिकांसाठी गणपती बाप्पाचा प्रसादासाठी लागणारे साहित्याचे वाटप सर्व करण्यात आले.
लोकमान्य नगर मध्यवर्ती शाखेवर माजी नगरसेविका परीक्षा सरनाईक माजी नगरसेविका आशा डोंगरे शाखाप्रमुख राकेश बच्चू यादव यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शाखाप्रमुख राकेश बच्चू यादव यांच्या आरती संग्रहाचे प्रकाशन माजी नगरसेविका परिशा सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले

Address

Thane

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Thanedar - ठाणेदार posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Thanedar - ठाणेदार:

Videos

Share