
26/11/2024
छब्बीस ग्यारह को उट्ठा हम मुंबई का तूफान न भूले। उग्रवाद के दंश न भूले शहर बना शमशान न भूले। आंसू की बरसात में भीगे हम जलते अरमान न भूले। लोकतंत्र की लाश न भूले खाकी का बलिदान न भूले।
🇮🇳
|| इतिहासाच्या पानो-पानी अमर असेशहिदांची गाथा ||
|| अभिमानाने आम्ही झुकवतो त्यांच्या चरणी माथा ||
🇮🇳
आजच्याच दिवशी २००८ साली तुकाराम ओंबळेंनी पाकिस्तानी अतिरेकी कसाबला स्वतःचा जीव देऊन पकडले होते.
🇮🇳
त्यांच्या या बलिदानामुळे अखंड हिंदुस्थानच्या विरोधात रचलेला एक भयंकर कट उध्वस्त झाला.
२६/११
चौपाटी रोडवर नाकाबंदी करत असतानाच तेथे एक संशयास्पद वाटणारी गाडी
थांबली.
दोन पोलीस लाठी घेऊन गाडीकडे गेले असता, त्यांना दोन अतिरेकी दिसले, इस्माईल नामक एका अतिरेक्यास जागीच ठार मारण्यात आले. दुसरा अतिरेकी अजमल कसाब जखमी अवस्थेत दिसला.
🇮🇳
कसाबने प्रथम शरणागती पत्करल्याचे नाटक केले, व जसे ओंबळे गाडीजवळ गेले, तसे त्याने "ए के ४७" बंदुकीने सर्व पोलिसांवर निशाणा साधला. हे लक्षात येताच ओंबळेंनी जिवाची पर्वा न करता बंदुकीवर झडप घातली, त्यामुळे बाकीच्या पोलिसांचे प्राण वाचले पण त्या दरम्यान ओंबळेंच्या शरीरात २० गोळ्या गेल्या होत्या, ते बेशुद्ध पडेपर्यंत बंदुकीसमोर होते, त्यामुळे बाकीच्या पोलिसांनी कसाबला जागेवर थोड्या झटापटीनंतर पकडले.
🇮🇳
तुकाराम ओंबळे यांच्या सहित अनेक जीवांनी आपल्या जीवाची बाजी लावत मुंबईवरील हल्ल्यातील मुख्य आरोपी अजमल कसाब पकडला गेला, पण त्या बदल्यात ओंबळेना स्वत्ःच्या प्राणांची आहुती द्यावी लागली.
🇮🇳
#व्यर्थ_न_हो_बलिदान
#26/11
#26/11Mumbai_Attack
#26/11
🇮🇳
२६ ११ २००८ रोजी देशाची आर्थिकराजधानी मुंबई वर झालेला आतंकवादी हल्ला रोखताना शहिदझालेल्या त्या सर्व भारत मातेचे सुपूत्र आणि यामध्येबळी गेलेल्या त्या निरपराध जिवांना ...... भावपुर्ण श्रद्धांजली !!
🇮🇳
#2611 #26/11 #मुंबई