Megacitylive.com

  • Home
  • Megacitylive.com

Megacitylive.com तुमच्या शहरातील प्रत्येक घटना आता सत?

20/11/2024

उबाठा पक्षाचे उमेदवार *केदार दिघे व त्यांचे साथीदार* यांच्या विरोधात कोपरी पोलीस स्टेशन, ठाणे येथे विदेशी दारू व पैसे पाकीटे वाटप करताना पकडून पोलीसांनी जप्त माल याविरोधात अदखलपात्र गुन्हा क्र. १८४२/२०२४ , भारतीय न्यायसंहिता कलम १७४ प्रमाणे नोंदवला आहे.. आणि व्हिडिओ..

कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघाच्या भाजप- महायुतीच्या उमेदवार सुलभाताई गणपत गायकवाड यांनी त्यांची कन्या सायली यांच्या स...
20/11/2024

कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघाच्या भाजप- महायुतीच्या उमेदवार सुलभाताई गणपत गायकवाड यांनी त्यांची कन्या सायली यांच्या सोबत आपला मतदानाचा हक्क बजावला.

( छाया- शंकर जाधव )

20/11/2024

कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष गणू भोईर यांनी ठाणे महानगपालिकेच्या शिळ गाव येथील शाळेत मतदान केले.

( छाया - शंकर जाधव )

कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार राजेश मोरे यांनी आपल्या कुटुंबासह डोंबिवली पश्चिमेकडील मोठा गाव ...
20/11/2024

कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार राजेश मोरे यांनी आपल्या कुटुंबासह डोंबिवली पश्चिमेकडील मोठा गाव येथील पालिकेच्या शाळेत मतदानाचा हक्क बजावला

( छाया - शंकर जाधव )

20/11/2024

डोंबिवली विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार उमेदवार रवींद्र चव्हाण यांनी आपल्या कुटुंबीयांसह मतदानाच्या हक्क वाजवला..

(छाया- शंकर जाधव )

कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार प्रमोद(राजू)पाटील यांनी काटई जिल्हा परिषदेच्या शाळेत बजावला मतदानाचा...
20/11/2024

कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार प्रमोद(राजू)पाटील यांनी काटई जिल्हा परिषदेच्या शाळेत बजावला मतदानाचा हक्क

( छाया- शंकर जाधव )

एमआयडीसी विभागात महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष गणू भोईर यांची  प्रचार रॅली डोंबिवली ( शंकर जाधव )  कल्याण ग्रामीण विधान...
11/11/2024

एमआयडीसी विभागात महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष गणू भोईर यांची प्रचार रॅली

डोंबिवली ( शंकर जाधव ) कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष गणू भोईर यांच्या प्रचारार्थ डोंबिवली शहरातील एमआयडीसी विभागात प्रचार रॅली काढण्यात आली होती. त्यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. डोंबिवली एमआयडीसी विभागातील गावदेवी मंदिर, सावरकर वाचनालय, कदम्ब सोसायटी, पाटील डेअरी, मॉडेल कॉलेज चौक, सिद्ध योगेश्वर सोसायटी, संदेश सोसायटी, नानासाहेब धर्माधिकारी मार्ग, कावेरी चौक, ममता हॉस्पिटल रस्ता, नवचैतन्य नगर, एम्स हॉस्पिटल रस्ता, नानासाहेब धर्माधिकारी मार्ग, सिस्टर निवेदिता शाळा, औदुंबर कट्टा, सुदर्शन नगर, आजदे गाव, आजदेपाडा, सागर्ली, आईस फॅक्टरी, मानपाडा रोड, संजय नगर, मोती नगर, सागाव परिसरातून शिवसेना शाखा सागाव येथे समाप्ती करण्यात आली. या प्रचार रॅलीमध्ये कॉंग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव संतोष केणे, उपजिल्हाप्रमुख तात्या माने, माजी जिल्हापरिषद सदस्य प्रकाश म्हात्रे, माजी नगरसेवक भालचंद्र म्हात्रे, माजी नगरसेविका प्रेमा प्रकाश म्हात्रे, पूजा योगेश म्हात्रे, सुलोचना पवार, विजय भाने, विभाग प्रमुख अशोक पगारे, मंगेश गावडे, महिला उपविभाग प्रमुख श्वेता मयेकर, रजनी कुचे, महिला उपशाखा संघटक माया प्रताप, शाखाप्रमुख मंगेश सरमळकर, सागर पाटील, गणेश जेठे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

मुंबई : भारतीय संविधानाची अनेकदा मोडतोड करणाऱ्या आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कायम अवमान करणाऱ्या काँग्रेसला ...
08/11/2024

मुंबई : भारतीय संविधानाची अनेकदा मोडतोड करणाऱ्या आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कायम अवमान करणाऱ्या काँग्रेसला जनता यावेळी माफ करणार नाही, अशी टीका संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी गुरुवारी येथे केली. आतापर्यंत केलेल्या संविधानाच्या अवमानाबद्दल आधी काँग्रेसने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही त्यांनी भाजप मिडिया सेंटरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत केली. देशाची अर्थव्यवस्था जागतिक स्तरावर अधिक मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र आणि आर्थिक राजधानी मुंबईचे योगदान महत्त्वाचे आहे. महायुती सरकारच्या काळात अधिक वेगाने विकासकामे होत असून, या कामाची पोचपावती मतदार निवडणुकीत देतील, असा विश्वासही रिजिजू यांनी व्यक्त केला.

मागास वर्गातून आलेल्या माझ्यासारख्या व्यक्तीवर पंतप्रधानांनी आतापर्यंत मोठी जबाबदारी सोपवल्याने मी हे जबाबदारीने सांगू शकतो की, जी व्यक्ती संविधानाचा सन्मान करत नाही त्याच्या हातात संविधानाची प्रत आणि त्याच्या तोंडून संविधान शब्द निघणे हे निषेधार्ह आहे. निळ्या रंगाऐवजी लाल रंगाचे मुखपृष्ठ घालून आत कोरे कागद असलेल्या नकली संविधानाची प्रत राहुल गांधी यांनी नागपुरात नाचवली अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली.

मंत्री रवींद्र चव्हाण यांचा पालघर ते सिंधुदुर्ग व्हाया डोंबिवली झंझावाती दौराआबालवृद्ध नागरिकांचा मिळतोय प्रचंड प्रतिसाद...
08/11/2024

मंत्री रवींद्र चव्हाण यांचा पालघर ते सिंधुदुर्ग व्हाया डोंबिवली झंझावाती दौरा

आबालवृद्ध नागरिकांचा मिळतोय प्रचंड प्रतिसाद

मंत्री चव्हाण यांच्या साधेपणाची नव मतदारांना क्रेझ

डोंबिवली ( शंकर जाधव ) सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचा सोमवारपासून पालघर ते सिंधुदुर्ग असा झंझावाती प्रचार दौरा सुरू असून त्यांच्या प्रचाराला सर्वत्र प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आबालवृद्ध नागरिक त्यांचे मनोमन स्वागत करत असून 'अभि नही तो कभी नही' म्हणत कमळ फुलणार असे आशीर्वाद देत आहेत.
पालघर, वसई, वाडा, भिवंडी, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, पाली, महड, रायगड, कर्जत, चिपळूण, रत्नागिरी, लांजा, कुडाळ, सिंधुदुर्ग या सर्व ठिकाणी त्यांना उदंड प्रतिसाद मिळत असून मतदारांमध्ये प्रचंड उत्साह असल्याचे जाणवत आहे असे ठिकठिकाणी दिसून आल्याचे मंत्री चव्हाण म्हणाले.खासदार नारायण राणे, मंत्री उदय सामंत, खासदार सुनील तटकरे, अदिती तटकरे यांसह प्रशांत ठाकूर, गणेश नाईक आदी सर्व नेतेमंडळी भरपूर कार्यरत असून कोकणात बहुतांशी ठिकाणी महायुतीला यश मिळणार असल्याचे आशीर्वाद नागरिकांनी दिले. नव मतदाराना पहिल्यांदाच संधी असल्याने त्यांना भरपुर उत्साह आहे.मंत्री चव्हाण यांच्या साधी राहणी आणि जीन्स पॅन्ट, चेक्स शर्टने युवकांना भुरळ घातली असून आपल्यातले मंत्री अशी भावना नागरिकांनी व्यक्त केल्याचे सर्वत्र ऐकिवात आले.

पुरोहित मंडळींनी मंत्री रविंद्र चव्हाण यांना दिला जाहिर पाठिंबा : यशवान भव, म्हणत दिले शुभाशीर्वादश्री राजस्थान जैन श्वे...
05/11/2024

पुरोहित मंडळींनी मंत्री रविंद्र चव्हाण यांना दिला जाहिर पाठिंबा : यशवान भव, म्हणत दिले शुभाशीर्वाद

श्री राजस्थान जैन श्वेतांबर मूर्ती पूजक संघ, लोहाणा समाज, यादव समाज, बिलावल असोसिएशन, युवा आशापुरा मंडल संस्था यांचाही *कमळ फुलणार* म्हणत दिले आशीर्वाद

डोंबिवली ( शंकर जाधव ) आपले सांस्कृतिक, अध्यात्मिक शहर आणि महायुती यांचा वैचारिक डीएनए एकच असून समस्त डोंबिवलीकर महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.डोंबिवलीतील देशस्थ शुक्ल यजुर्वेदीय पुरोहितांचे वेद विज्ञान मंडळातील सर्व सभासदांनी यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना संपूर्ण पाठिंबा दर्शवला. तसेच "आपण प्रचंड मताधिक्याने निवडून याल" असे सांगत विजयाचा विश्वास व्यक्त केला. यासोबतच "पुढील सामाजिक कार्यासाठी जय, यश, बल लाभो" असे आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्या. या शुभाशीर्वादांमुळे निवडणूक लढवण्यासाठी शंभर हत्तींचं बळ मिळालं अशी प्रांजळ प्रतिक्रिया चव्हाण यांनी व्यक्त केली.

याप्रसंगी पुरोहित मंडळाचे अध्यक्ष वेदमूर्ती अमोल विजय कुलकर्णी, संतोष पुराणिक, कोदंडपाणी कुलकर्णी, लक्ष्मण पारेकर, केदार पारेकर, राहुल शुक्ल, महेश जोशी, दिनेश उपासनी, यज्ञेश जोशी, कपिल भंडारी, सार्थक आराध्ये, श्रीपाद कुलकर्णी आणि कुलकर्णी आदी सभासद उपस्थित होते. शहरातील रामनगर येथील विविध संस्था आणि सोसायटी यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक रामनगर मधील राजस्थान जैन संघ हॉल येथे संपन्न झाली. या बैठकीमध्ये श्री राजस्थान जैन श्वेतांबर मूर्ती पूजक संघ, लोहाणा समाज, यादव समाज, बिलावल असोसिएशन, युवा आशापुरा मंडल इ. संस्था यांचा सहभाग होता.त्या बैठकीदरम्यान उपस्थितांशी संवाद साधला. त्यांनी मंत्री रविंद्र चव्हाण यांना शुभेच्छा दिल्या. त्या बैठकीदरम्यान सी.ए.जय जैन आणि ॲड. रोहन देसाई या युवकांचे सत्कार केले.त्यावेळी सर्व उपस्थितांनी डोंबिवलीत कमळच फुलणार असल्याचे सांगत विजयाचा विश्वास व्यक्त केला.या बैठकीला माजी नगरसेवक भाई देसाई, मंदार हळबे, मुकुंद पेडणेकर, माजी अध्यक्ष गिरीश साठे, युवा मोर्चा प्रदेश सचिव मिहिर देसाई, आशिष मौर्य, सिद्धांत घुले, सुनील वेताळ, स्वानंद भणगे आदी भाजपा पदाधिकारी तसेच किरण राजजी राणावत, प्रमोद ठक्कर, राजबहादूर यादव, लल्लन यादव, तगदराज राणावत, भावेश जैन, प्रदीप जैन, दिलीप कोठारी, सुखलाल जैन, तेजराज जैन आदी प्रमुख संस्था पदाधिकारी उपस्थित होते.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार  सुभाष भोईर यांना जाहीर पाठिंबाडोंबिवली ( शंक...
04/11/2024

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सुभाष भोईर यांना जाहीर पाठिंबा
डोंबिवली ( शंकर जाधव )

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने राज्यात महाविकास आघाडीला पाठिंबा जाहिर केला आहे. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सुभाष भोईर यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करणार असल्याचा विश्वास रिपाईने यावेळी व्यक्त केला आहे.रिपाईचे राष्ट्रीय नेते डॉ. राजेंद्र गवई यांच्या आदेशाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस रमेश भागे तसेच ठाणे जिल्हा अध्यक्ष शशिकांत रसाळ, कल्याण तालुका अध्यक्ष नेताजी कांबळे, कल्याण शहर अध्यक्ष राजेश जाधव यांनी अशा आशयाचे पाठिंबा पत्र सुभाष भोईर यांना दिले आहे. सुभाष भोईर यांच्या विजयासाठी एकदिलाने काम करण्याची ग्वाही यावेळी नेत्यांनी दिली.

https://youtu.be/q9XUYYqcZQ8?si=10_KmviflXECAPWC
07/10/2024

https://youtu.be/q9XUYYqcZQ8?si=10_KmviflXECAPWC

निराधार महिलांसाठी मोफत सिलेंडर रिफिल ; कल्याणातील काँग्रेस नेत्याकडून "बहिणींचा लाडका भाऊ " अभियानबहिणींचा लाड....

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when Megacitylive.com posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Megacitylive.com:

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Contact The Business
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share