News Marathi Baana - न्यूज मराठी बाणा

  • Home
  • India
  • Thane
  • News Marathi Baana - न्यूज मराठी बाणा

News Marathi Baana - न्यूज मराठी बाणा Marathi news television channel

08/03/2025

अप्रतिम एआय! दक्षिण भारतातील एका लग्नादरम्यान एक व्हिडिओ दाखवण्यात आला होता ज्यामध्ये वराचे दिवंगत वडील स्वर्गातून खाली उतरताना, समारंभाला उपस्थित राहून, जेवण करून निघून जाताना दाखवण्यात आले होते.
विडियोग्राफी अप्रतिम आहे....

Happy Birthday! Be open to all those amazing changes, which are waiting for you!The world is full of adventure, exciteme...
16/02/2025

Happy Birthday! Be open to all those amazing changes, which are waiting for you!
The world is full of adventure, excitement, and happiness, explore them with every second of your life. Happy Birthday!
Let your life be filled with accomplishments and luck! You will achieve everything you want! Happy Birthday M Shinde !
Happy Birthday! Discover who you are and be pleased with what you have!
It’s your birthday! Smile and laugh, enjoy the life and forget about everything, you are young, free and the whole world is yours!
Happy Birthday! Focus on changes and you’ll get results, everything is in your hands!
Life is a one-time offer, use it wisely! Happy Birthday!
-Team N Marathi Baana Vidarbha

15/02/2025

भागीरथ बियाणी प्रकरण आहे, मर्डर केस आहेत त्या बाहेर निघतील

31/01/2025

अंड्याचा ट्रे घेऊन जितेंद्र आव्हाड ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीला...

देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती तो दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला ...
26/01/2025

देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती तो दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. भारताची राज्यघटना संविधान समितीने २६ नोव्हेंबर, इ.स. १९४९ रोजी स्वीकारली व ती २६ जानेवारी इ.स. १९५० रोजी अंमलात आली. त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस भारतीय प्रजासत्ताक दिवस म्हणून दरवर्षी साजरा केला जाणारा राष्ट्रीय दिन आहे.
खरा प्रजासत्ताक तेव्हाच साजरा होईल जेव्हा संविधान कागदावर न राहता त्यातील प्रत्येक अधिकार सामान्य माणसाला बजावता येईल. आपण सर्वांनी मिळून त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

शासकीय धोरणांना प्रसारमाध्यमांनी व्यापक प्रसिद्धी द्यावी - संचालक डॉ. गणेश मुळेचंद्रपूर: महाराष्ट्र सरकारने राज्याच्या भ...
22/01/2025

शासकीय धोरणांना प्रसारमाध्यमांनी व्यापक प्रसिद्धी द्यावी - संचालक डॉ. गणेश मुळे
चंद्रपूर: महाराष्ट्र सरकारने राज्याच्या भविष्यातील विकासाचा रोडमॅप तयार केला असून विविध विभागांसाठी पहिल्या 100 दिवसांचा आराखडा तयार केला आहे. तसेच नागरिकांना जलदगतीने आणि वेळेत शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी शासकीय विभागांनी सात कलमी कृती कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सुचना देण्यात आल्या आहेत. राज्य सरकारतर्फे राबविण्यात येणारी ही शासकीय ध्येयधोरणे तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रसारमाध्यम हे प्रभावी शस्त्र आहे. त्यामुळे या धोरणांना प्रसारमाध्यमांनी व्यापक प्रसिध्दी द्यावी, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, नागपूर – अमरावती विभागाचे संचालक डॉ. गणेश मुळे यांनी केले.

जिल्हा माहिती कार्यालय, चंद्रपूर येथे पत्रकारांशी संवाद साधतांना ते बोलत होते. संचालक डॉ. मुळे म्हणाले, राज्य सरकारने अनेक विकासकामे हाती घेतली आहेत. सामान्य लोकांना शासनाच्या सेवा वेळेत आणि तत्परतेने मिळाव्यात, यासाठी देखील पाऊले उचलली आहेत. या योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहचविणे आवश्यक आहे. यासाठी प्रसारमाध्यमांची भुमिका महत्वाची आहे. पहिल्या 100 दिवसांत नागपूर विभागातसुध्दा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे आराखडा तयार करण्यात आला आहे. यात विदर्भातील संपूर्ण 11 जिल्ह्यांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. कृत्रिम बुध्दिमत्तेचा (आर्टिफिशल इंटलिजन्स) वापर करून अधिक जलद गतीने नागरिकांपर्यंत पोहचण्याचा आमचा मानस आहे. त्यासाठी प्रसारमाध्यमात कार्यरत असणा-या पत्रकारांसाठी आर्टिशिल इंटलिजन्सचे प्रशिक्षणसुध्दा घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर, पत्रकार रविंद्र जुनारकर, संजय रामगिरवार, प्रमोद उंदिरवाडे, अरुणकुमार सहाय, हरविंदरसिंग धुन्ना, यशवंत दाचेवार, मुरलीमनोहर व्यास, कल्पना पलीकुंडवार, सुनील तिवारी, अनिल देठे, राजेश सोलापन, डॉ. आरती दाचेवार, वैभव पलीकुंडवार, रवी नागपुरे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिका-यांशी चर्चा : तत्पुर्वी संचालक डॉ. गणेश मुळे यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांची भेट घेतली. शासनाने दिलेल्या निर्देशानुसार पहिल्या 100 दिवसांच्या आराखड्याच्या अंमलबजावणीकरीता माहिती व जनसंपर्क महासंचालनालय कटिबध्द असून सर्व जिल्ह्यांची माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध होईल, याबाबत जिल्हा‍धिका-यांना अवगत केले.

22/01/2025

ओ.बी.सी. प्रवर्गातील गुरव आणि लिंगायत समाजातील युवक-युवतींकरीता महामंडळाच्या विविध कर्ज योजना
चंद्रपूर, दि. 22 : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाकडे गुरव समाजासाठी संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ आणि लिंगायत समाजासाठी जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना 9 ऑगस्ट 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार झाली आहे. या दोन्ही महामंडळाचे कामकाज महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत कार्यान्वित करण्यात आले आहे.

1 लक्ष रुपयांपर्यंतची थेट कर्ज योजना : इतर मागास प्रवर्गातील गुरव आणि लिंगायत समाजातील व्यक्तींना स्वयंरोजगार व लघुउद्योग सुरु करण्याकरीता 1 लक्ष रुपयांची निरंक व्याजदर असलेली थेट कर्ज योजना सुरु केली आहे. सदर योजनेमध्ये अर्जदाराचे वय 18 ते 55 वर्ष असावे. कर्ज परतफेडीचा कालावधी हा 4 वर्षापर्यंतचा असून नियमित 48 समान मासिक हप्त्यांमध्ये मुद्दल 2085 रुपये परतफेड करणाऱ्या लाभार्थींना व्याज अदा करावे लागणार नाही. परंतु, थकीत झालेल्या हप्त्यांवर द.सा.द.शे 4 टक्के व्याज आकारण्यात येईल. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लक्ष रुपयांपर्यंत असावे.

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना : महाराष्ट्र राज्यातील गुरव आणि लिंगायत समाजातील गरजू व कुशल व्यक्तींना कृषी संलग्न व पारंपारिक उपक्रम, लघु व मध्यम उद्योग, उत्पादन, व्यापार व विक्री, सेवा क्षेत्र आदि व्यवसायाकरिता कर्ज व्याज परतावा उपलब्ध करून देणे.

योजनेचे स्वरुप : बँकेमार्फत लाभार्थीना रु. 10 लाखापर्यंत कर्ज वितरीत केले जाईल. कर्ज रक्कमेचे हप्ते नियमित भरल्यास व्याजाची रक्कम (12 टक्केच्या मर्यादेत) व्याजपरतावा रक्कम अनुदान स्वरूपात बँक प्रामाणिकरण नुसार लाभार्थीच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल. सदर योजनेमध्ये अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्षे असावे. तसेच कुटुंबातील वार्षिक मर्यादा रु. 8 लक्षपर्यंत आहे. ही योजना संपूर्णपणे संगणीकृत असून महामंडळाचे वेबपोर्टल www.msobcfdc.org या संकेतस्थळावर जाऊन नाव नोंदणी व अर्ज सादर करणे अनिवार्य राहील.

5 लक्षपर्यंतची 20 टक्के बीज भांडवल योजना : बीज भांडवल कर्ज योजनेअंतर्गत कमाल मर्यादा रु. 5 लाखापर्यंतच्या प्रकल्पास मंजुरी देण्यात येते. कृषी व संलग्न व्यवसाय, वाहतूक क्षेत्राशी संबंधित व्यवसाय तसेच पारंपारिक लघु व सेवा उद्योगासाठी महामंडळामार्फत कर्ज देण्यात येते. नाविन्यपूर्ण व्यवसायासाठी कर्ज मंजुरीस प्राधान्य देण्यात येईल. मंजूर कर्ज रकमेच्या 5 टक्के लाभार्थी, 20 टक्के महामंडळ व 75 टक्के बँकेचा सहभाग आहे. महामंडळाच्या कर्ज रक्कमेवर 6 टक्के व्याज दर असून बँकेच्या कर्ज रकमेवर बँकेचा व्याजदर लागू राहील. सदर कर्जाची परतफेड 5 वर्षापर्यंत करता येईल. सदर योजनेत अर्जदाराचे वय 18 ते 55 वर्षे असावे व कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा रु. 1 लक्ष पर्यंत असावे.

शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना : इतर मागास प्रवर्गातील गुरव आणि लिंगायत समाजातील व विद्यार्थ्यांकरीता उच्च शिक्षणासाठी राज्य, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याकरीता बँकेमार्फत उपलब्ध होणाऱ्या शैक्षणिक कर्ज रक्कमेवरील व्याजाचा परतावा करणे.

योजनेचे स्वरूप : राज्यांतर्गत व देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी महत्तम कर्ज मर्यादा रु. 10 लक्षपर्यंत, परदेशी अभ्यासक्रमासाठी महत्तम कर्ज मर्यादा रु. 20 लक्ष पर्यंत राहील.

लाभार्थी पात्रतेच्या अटी व शर्ती : अर्जदाराचे वय 17 ते 30 वर्षे असावे. अर्जदार हा इतर मागास प्रवर्गातील तसेच महाराष्ट्राचा रहिवासी असावा. अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामिण व शहरी 'भागाकरीता रु. 8 लक्ष पर्यंत असावी. अर्जदार इयत्ता 12 वीत 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण असावा. तसेच पदवीच्या व्दितीय वर्षे व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारे विद्यार्थी 60 टक्के गुणांसह पदवीका उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अर्जदाराचा सिबील क्रेडिट स्कोअर 0-1 (म्हणजेच यापूर्वी त्याने कर्ज घेतलेले नसावे) किंवा 500 पेक्षा अधिक असावा.

सदर योजना पुर्णपणे ऑनलाईन असून ज्या उमेदवारांना शैक्षणिक कर्ज योजनेचा लाभ घ्यावयाचा असेल त्यांनी आपले अर्ज महामंडळाच्या www.msobefdc.org या संकेतस्थळावर जावून भरावे. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जलनगर वार्ड, चंद्रपूर येथे तसेच संपर्क क्र. 07172-262420 येथे संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.

‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’च्या दशकपूर्तीनिमित्त सायकल रॅली; मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी व्यापक जनजागृती करा- जिल्हाधिकारी ड...
22/01/2025

‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’च्या दशकपूर्तीनिमित्त सायकल रॅली; मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी व्यापक जनजागृती करा- जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील
‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’च्या दशकपूर्तीनिमित्त सायकल रॅली;
मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी व्यापक जनजागृती करा- जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील
बुलडाणा : जिल्ह्यातील मुलीचा जन्मदराचे प्रमाण वाढविण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न होणे आवश्यक आहे. गर्भलिंग निदान, तपासणी, कन्याभ्रूण हत्या, बालविवाह यासारख्या अनिष्ठ प्रथाना आळा घालण्यासाठी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या अभियानाची व्यापक प्रमाणात जनजागृती करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये आज ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या योजनेस १० वर्षपूर्तीनिमित्त जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्यावतीने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी हिरवी झेंडी दाखवून सायकल रॅलीला रवाना केले. यावेळी शाळाचे विद्यार्थी, महिला शिक्षक सहभागी झाल्या होत्या.
जिल्हाधिकारी डॉ. पाटील म्हणाले की, मुलींचा घटता जन्मदर ही एक सामाजिक समस्या असून ती सोडविण्यासाठी प्रत्येकाने कटीबद्ध होणे आवश्यक आहे. यासाठी सर्वसामान्य लोकांपर्यंत प्रबोधन, जनजागृती करुन लोकशिक्षण व्हायला हवे. हे आपले प्रत्येकाचे कर्तव्य असून समाजाचे संतुलन साधण्यासाठी महिला व पुरुषांचे प्रमाण योग्य हवे. बेटी बचाओ, बेटी पढाओ ही मोहिम मर्यादेत कालावधीसाठी न राबविता त्यांची व्यापक स्वरुपात अंमलबजावणी करावी, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला उपस्थितांना बेटी बचाओ बेटी पढाओची शपथ देऊन स्वाक्षरी मोहिम राबविण्यात आली. त्यानंतर ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ सायकल रॅली जिल्हाधिकारी कार्यालय येथून सुरु होऊन कारंजा चौक, बोंडे सरकार चौकमार्गे भारत विद्यालय येथे रॅलीचा समारोप झाला. या रॅलीमध्ये जिल्हा परिषदचे अधिकारी, कर्मचारी तसेच भारत विद्यालय, प्रबोधनी विद्यालय, शारदा ज्ञानपीढ व एडेड हायस्कूलच्या विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते. ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या योजनेस १० वर्षपूर्तीनिमित्त विविध विभागामार्फत दि. 24 जानेवारी ते 8 मार्चपर्यंत विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद एंडोले यांनी दिली.

22/01/2025

महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळामार्फत विविध पदासाठी पदभरती
महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मर्या. (मेस्को) पुणे यांच्यामार्फत विविध पदासाठी पदभरती करण्यात येणार आहे. याकरीता गरजू माजी सैनिकांनी दि. 27 जानेवारी 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे. महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मर्या. (मेस्को) पुणे यांच्यामार्फत दि. 12 जानेवारी रोजी जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती. त्यामध्ये महासैनिक औद्योगिक वसाहत भोसरी येथे प्रकल्प व्यवस्थापक(एक पद), क्षेत्रीय व्यवस्थापक नागपूर (एक पद), व्यस्थापकीय मेस्को मुख्यालय पुणे (एक पद), व्यस्थापक लेखा मेस्को मुख्यालय पुणे(एक पद) आहे. यासर्व पदासाठी उमेदवार सशस्त्र सेना दलातील माजी सैनिक असावा. तसेच वयाबाबतचा निर्णय व्यवस्थापकीय मंडळाचा असेल. जाहिरातीमधील अटी व शर्तीमध्ये काही बदल झालेला नसून अर्ज करावायाचा नमुना मेस्कोच्या वेबसाईट www.mescoltd.co.in वर उपलब्ध आहे.

22/01/2025

राष्ट्रीय बालिका दिवसानिमित्त विशेष मोहिम; सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
बुलडाणा : भारतीय डाक विभागामार्फत दि. 24 जानेवारी 2025 रोजी “राष्ट्रीय बालिका दिवस” दिवस साजरा करण्यात येणार आहे. या दिनानिमित्त जिल्ह्यातील आदिवासी, दुर्गम, डोंगराळ, वंचित व बँकिंग सेवा नसलेल्या भागातील मुलींच्या सक्षमीकरणासाठी सुकन्या समृद्धी योजना विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. मोहिमेंतर्गत सर्व नागरिकांनी जवळच्या डाक कार्यालयात संपर्क साधून आपल्या 10 वर्षांच्या आतील मुलींचे सुकन्या समृध्दी खाते काढून मुलींचे भविष्य सुरक्षित करावे, असे आवाहन डाक अधीक्षक गणेश आंभोरे यांनी केले आहे.

Address

Thane
Thane
400601

Alerts

Be the first to know and let us send you an email when News Marathi Baana - न्यूज मराठी बाणा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to News Marathi Baana - न्यूज मराठी बाणा:

Share