Dainik Thane Varta

Dainik Thane Varta Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dainik Thane Varta, Newspaper, Thane.

दैनिक ठाणे वार्ता (स्थापना: २०११)
ठाणे जिल्ह्यासह मुंबई, नवी मुंबई, पालघर व रायगडच्या बातम्यांचा विश्वासार्ह आवाज.
संपादक: अमोल सुरेश सुर्वे
📞 +91 98693 29948
📧 [email protected]

महापौर सुजाता पाटील यांच्या हस्ते राष्ट्रध्वजवंदन.
05/05/2026

महापौर सुजाता पाटील यांच्या हस्ते राष्ट्रध्वजवंदन.

सरकारी शाळांमध्ये शिवकालीन शस्त्र प्रशिक्षणाची गरज-आमदार निरंजन डावखरे.
05/05/2026

सरकारी शाळांमध्ये शिवकालीन शस्त्र प्रशिक्षणाची गरज-आमदार निरंजन डावखरे.

पश्चिम बंगालमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय.पंतप्रधान मोदींकडून कार्यकर्त्यांच्या 'संघर्षाला' सलाम !
05/05/2026

पश्चिम बंगालमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय.
पंतप्रधान मोदींकडून कार्यकर्त्यांच्या 'संघर्षाला' सलाम !

04/05/2026

ठाण्यात भाजपाचा जल्लोष; बंगाल विजयी झाला

पश्चिम बंगालमध्ये अखेरीस विजय झाला.

ठाण्यातील वर्तक नगर येथील भाजप कार्यालयात ठाण्यातील भाजप पदाधिकाऱ्यांकडून मोठा जल्लोष करण्यात आला आहे. दरम्यान ठाणे शहराध्यक्ष संदीप लेले यांनी माध्यमांशी संवाद साधत आनंद व्यक्त केला आहे.

04/05/2026

तहानलेल्यांची तहान भागवण्याकरिता ठाणे महापालिकेच्या वतीने ठाणे रेल्वे स्थानकात मोफत बिसलरी पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

04/05/2026

पश्चिम बंगाल आणि आसामच्या निवडणुकीतील विजयाचा जल्लोष भाजपा कार्यकर्त्यांनी नगरसेवक संजय वाघुले यांच्या नेतृत्वाखाली साजरा केला.
.

एमएमआरडीएचा मेट्रो लाईन ६ प्रकल्प वेगात.नियोजित वेळेच्या निम्म्या वेळेत महत्त्वपूर्ण रेल्वे स्पॅनची उभारणी पूर्ण.
04/05/2026

एमएमआरडीएचा मेट्रो लाईन ६ प्रकल्प वेगात.
नियोजित वेळेच्या निम्म्या वेळेत महत्त्वपूर्ण रेल्वे स्पॅनची उभारणी पूर्ण.

04/05/2026

ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील हनुमाननगर येथे बिबट्याचा वावर दिसून आला असुन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते स्वगणना प्रक्रियेचा शुभारंभ.
04/05/2026

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते स्वगणना प्रक्रियेचा शुभारंभ.

बाबासाहेब समजुन घ्यायचे असतील तर वाचावं लागेल-कवी सतीश सोळांकूरकर.
01/05/2026

बाबासाहेब समजुन घ्यायचे असतील तर वाचावं लागेल-कवी सतीश सोळांकूरकर.

01/05/2026

*छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयातील ८० कंत्राटी कामगारांना समान काम समान वेतन तत्वानुसार थकबाकी मिळणार*
ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयात वर्षानुवर्षे काम करणाऱ्या ८० कंत्राटी कामगारांच्या सुमारे २० वर्षाच्या लढ्याला यश मिळाले असून दिनांक ३० एप्रिल रोजी कामगार दिनाच्या पूर्वसंध्येला मुंबई न्यायालयाचे न्यायमूर्ती जी. एस. कुलकर्णी व श्रीमती आरती साठे यांच्या खंडपिठाने समान काम समान वेतन तत्वानुसार मागील थकबाकी देण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. कामगार दिनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या या आदेशामुळे कंत्राटी कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. आज एका पत्रकार परिषदेत म्युनिसिपल लेबर युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी हि माहिती दिली.

01/05/2026

*ठाणे प्रीमियर लिग `उमुख्यमंत्री चषका'चे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन*

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न राजकारणाच्या रिंगणात विरोधकांना धोबीपछाड देणारे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज क्रिकेटच्या मैदानात तुफान फटकेबाजी करत क्रीडाप्रेमींचे मन जिंकले. निमित्त होते महाराष्ट्र माझा सेवा संस्थेतर्फे आयोजित ठाणे प्रीमियर लिग `उमुख्यमंत्री चषका'चे उद्घाटन.

महाराष्ट्र माझा सेवा संस्थेतर्फे युनियन क्रिकेट क्लबच्या सहकार्याने, मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या संलग्नतेने १ ते ८ मे दरम्यान ठाणे प्रिमियर लीग २०२६ चे आयोजन दादोजी कोंडदेव प्रेक्षागृह येथे करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी त्यांनी उत्कृष्ठ फलंदाजी करत चौकार आणि षटकार ठोकले.

उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहूणे म्हणून ठाणे महापालिकेचे उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हणमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते शानू पठाण, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी उन्मेश खानविलकर, कार्यकारी सेक्रेटरी सी.एस. नाईक, युनियन क्लबचे तुषार समाणी, रॉयल क्लबचे सुनील करंदीकर, व्होल्टासचे अदिर काजारी, ठाण्याचे माजी महापौर रमेश वैती, स्पोर्टिंग क्लब कमिटीचे अध्यक्ष विलास जोशी, स्पर्धेचे आयोजक मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अॅपेक्स कौन्सिल मेंबर विकास रेपाळे, नगरसेविका नम्रता भोसले-जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

Address

Thane
400604

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dainik Thane Varta posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Dainik Thane Varta:

Share

Category